दिवाळीचा गोडवा…

रवा तुपावर खमंग भाजून घ्या. दूध-पाणी एकत्र उकळवून घ्या. गरम रव्यावर उकळलेले दूध-पाणी घाला.

sanjyachi-poli
सांज्याची पोळ्या

रुचकर आणि शॉपिंग विशेष
मुसाफिर खवय्या – @MKhavaiyya / response.lokprabha@expressindia.com

सांज्याच्या पोळ्या

सांज्याचे साहित्य :

१ वाटी बारीक रवा

१/२ वाटी साखर

३. १ वाटी पाणी

४. ४ टेबलस्पून साजूक तूप

५. १ टीस्पून वेलची पूड

६. चिमूटभर मीठ

पोळीचे साहित्य :

१/२ वाटी मैदा

१/२ वाटी कच्चे दूध

चवीनुसार मीठ

तांदळाची पिठी

कृती :

सांजा

रवा तुपावर खमंग भाजून घ्या. दूध-पाणी एकत्र उकळवून घ्या. गरम रव्यावर उकळलेले दूध-पाणी घाला. झाकण ठेवून एक वाफ काढा. साखर, मीठ मिसळा. परत झाकण ठेवून दोन वाफा येऊ द्या. वेलची पूड मिसळा. तयार सांजा ओल्या हाताने मळून घ्या. मऊसर सांज्याचे सारखे भाग करून गोळे करून घ्या.

पोळीची कृती :

मैदा मीठ मिसळून, कच्चे दूध घालून भिजवून घ्या. तेलाचा हात लावून अर्धा तास झाकून ठेवा. नंतर तेलाचा हात लावून मैदा तिंबून घ्या.

१ भाग मैदा, ३ भाग सांजा घेऊन पुरणपोळीप्रमाणे उंडा भरून तांदळाच्या पिठीवर लाटून घ्या. पुरणपोळी सारख्याच भाजून घ्या.

खवा-रवा लाडू

साहित्य :

६ वाटय़ा रवा

४ वाटय़ा साखर

२०० ग्रॅम खवा

१ टेबलस्पून वेलची पूड

१ टीस्पून साजूक तूप

पाक करण्यासाठी पाणी

५० ग्राम बेदाणे

कृती :

कढईत १ टीस्पून साजूक तूप घालून रवा गुलाबी रंगावर भाजून घ्या. भाजलेला रवा ताटात काढून घ्या. त्याच कढईत खवा परतून घेऊन, काढून ठेवा. आता कढईत साखर घ्या, त्यामध्ये साखर बुडेल इतके पाणी घालून १ तारी पाक करा. पाकात आधी परतून ठेवलेला खवा व रवा मिसळा. आता वेलची पूड मिसळा. मिश्रण पाकात छान मुरले पाहिजे. मधून मधून मिश्रण हलवत राहा. मिश्रण घट्ट झाल्यावर लाडू वळा. लाडू वळताना प्रत्येक लाडूवर एक-एक बेदाणा लावा.

मलई पमकिन

साहित्य :

अर्धा किलो लाल भोपळा

कन्डेन्स्ड मिल्कचा एक डबा

एक वाटी ओला नारळ

अर्धी वाटी बारीक रवा

एक वाटी रिफाइंड तेल (तळण्यासाठी)

अर्धा टीस्पून रोझ इसेन्स

अर्धा लिटर दूध

 कृती :

लाल भोपळा किसून घ्या. रवा, नारळ, किसलेला भोपळा एकत्र करून अर्धा तास झाकून ठेवा. तापवलेले दूध व कन्डेन्स्ड मिल्क एकत्र करून तासभर फ्रिजमध्ये ठेवा. भोपळा, रवा व नारळाचे मिश्रण मळून त्याचे सुपारीएवढे गोळे करा व मंद आचेवर हे गोळे बदामी रंगावर तळून काढा. दुधाच्या मिश्रणात इसेन्स घाला व त्यात तळलेले गोळे गार झाल्यावर घाला. मिश्रण फ्रिजमध्ये झाकून ठेवा आणि खाण्याच्या वेळी काढून वाढा.

खजूर- ड्रायफ्रूट वडी

साहित्य :

पाव किलो खजूर

२०० ग्रॅम अक्रोड, पिस्ता व काजू, जाडसर तुकडे

दूध, साखर

कृती :

खजुराच्या बिया काढून त्यात खजूर भिजतील एवढे दूध घाला. हे मिश्रण प्रेशर कुकरमध्ये शिजवा. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून काढा. या मिश्रणाच्या दीडपट साखर घाला. वरील मिश्रण कढईत काढा व मंद आचेवर ठेवून सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर गॅस बंद करा व अक्रोड, काजू, पिस्त्यांचा जाडसर चुरा ढवळत ढवळत घाला. खाली उतरवून मिश्रण घोटत राहा. मिश्रण आणखी थोडे घट्ट झाल्यावर तूप लावलेल्या ट्रेमध्ये थापून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर तूप लावलेल्या सुरीने वडय़ा पाडा.

मटारची टिक्की

साहित्य :

सोललेले मटार – १/२ किलो

आले – ३० ग्रॅम

लसूण – ५० ग्रॅम

बेसन – २५ ग्रॅम

तेल – ५० मिली

मीठ – चवीनुसार

कोथिंबीर – ५० ग्रॅम

पुदिना – २० ग्रॅम

जिरे पूड – १ टेबलस्पून

गरम मसाला पूड – २ टीस्पून

हिरवी मिरची – ४-५

आमचूर पावडर – १ टेबलस्पून 

कृती :

१. मटार, आले, लसूण, मिरची एकत्र करून कुकरमध्ये शिजवून घ्या.

२. थंड झाल्यावर पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घ्या. या कोथिंबीर व पुदिना घालून मिक्सरमध्ये पुन्हा फिरवून घ्या.

३. एका कढईत तेल गरम करून त्यावर बेसन मंद आचेवर परतून घ्या. बेसनाचा रंग बदलायला सुरुवात झाली की त्यावर वाटलेल्या मटारचे मिश्रण घाला आणि ५ मिनिटे नीट परतवून घ्या.

४. यात मीठ, जिरे पूड, गरम मसाला पूड व आमचूर घालून एकजीव करा. चव योग्य आहे का पाहा.

५. गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे छोटे पॅटिस तयार करून घ्या व मध्यम आचेवर श्ॉलो फ्राय करा. पुदिना चटणीसोबत वाढा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali festival sweet food recipes dd

Next Story
रंग माझा वेगळा
ताज्या बातम्या