जाफरानी पेढा

साहित्य :

अर्धा किलो मावा

३-४ टेबलस्पून साजूक तूप

२०० ग्रॅम साखर

२-३ केशराचे धागे

केसरी रंग.

कृती :

मावा आणि साखर एकत्र करून गॅसवर ठेवत चांगले हलवत राहणे. बारीक गॅसवर साखर विरघळली की लगेच त्यात केसरी रंग, केशक धागे व तूप टाकणे व गॅस बंद करून घोटणे. घोटून घोटून ते घट्ट होईल. त्याला पेढय़ाचा आकार देऊन सव्‍‌र्ह करा.

कंदचे (कोनफळ) पॅटिस

साहित्य :

५०० ग्रॅम कोनफळी रंगाचे कंद

चवीनुसार मीठ

तीन टेबलस्पून आरारुट पीठ (वाटल्यास जास्त)

तीन हिरव्या मिरच्या.

स्टफीजचे साहित्य :

अर्धा कप नारळाचा कीस

१ टीस्पून तीळ

मीठ   ल्ल २-३ हिरव्या मिरच्या

बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती :

सर्वप्रथम कंद सोलून त्याचे तुकडे करून कुकरमध्ये एका पातेल्यात शिजवून घेणे. गार झाल्यावर स्मॅश करून त्यात आरारुट पीठ, थोडं मीठ व मिरच्या क्रश करून घालणे. चिकटपणा कमी होईपर्यंत आरारुटचे पीठ टाकून एकजीव करणे. स्टफिंगचे सर्व जिन्नस एकत्र करून ठेवणे. कंदचे मध्ये हे स्टफिंग भरून लाडू तयार करणे व त्याला पॅटिसचा आकार देऊन ते श्ॉलोफ्राय करणे. चटणीबरोबर गरमागरम पॅटिस सव्‍‌र्ह करणे.

टीप :

आरारुट पिठाऐवजी कॉर्नफ्लोअर किंवा कॉर्नस्टार्चही मिसळू शकता.

मक्याचे वडे

साहित्य :

४ ते ५ कोवळी कणसे ल्ल हिरव्या मिरच्या

मीठ

१ टीस्पून क्रश केलेले आले

चिमूटभर हळद

बेसन

तळण्यासाठी तेल.

कृती :

कणसे किसून घेणे. त्यात मीठ, आले-मिरची क्रश करून घालणे. थोडी हळद आणि त्यात २-३ चमचे बेसन घालून चांगले मिक्स करणे. गरम तेलात लहान गोळे तळून घेणे आणि हिरव्या चटणीबरोबर वाढणे.

टीप :

हे मक्याचे वडे गरमगरमच खायला छान लागतात.

अंजीर-जर्दाळू डेलाइट

साहित्य :

१ कप अंजीर

१ कप जर्दाळू

१ कप खजूर

अर्धा कप बारीक केलेला सुकामेवा

२ मोठे चमचे तूप

सजावटीसाठी खसखस.

कृती :

अंजीर आणि जर्दाळू वाफवून घेणे. कढईमध्ये तूप टाकून दोन्ही छान परतून घेणे. पाहिजे असेल तर बी काढून काळा खजूरही घेणे. सर्व छान गोळा झाले की, त्यात सुकामेवा टाकून ट्रेमध्ये सेट करायला ठेवणे. सेट झाल्यावर कुठलाही आकार देऊन खसखसमध्ये घोळून सव्‍‌र्ह करणे.

कोकोनट बर्फी

साहित्य :

अर्धा किलो मावा

२०० ग्रॅम साखर  ल्ल पिवळा रंग

१२५ ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट

पाव टीस्पून जायफळ

पाव टीस्पून वेलची पावडर

१ टेबलस्पून तूप.

कृती :

मावा व साखर चांगले एकत्र करणे. साखर विरघळेपर्यंत शिजवावे. हे मिश्रण पातळ होते. त्यात जायफळ, वेलची पावडर घालणे व अर्धा मोठा चमचा तूप टाकणे. गॅस बंद करून ताक करण्याच्या रवीने मावा साखरेचे मिश्रण घोटणे. खूप मऊ करणे. त्यात रंग घालून व खोबऱ्याचा कीस घालून परत घोटणे. खोबरे घातल्याने मिश्रण घट्ट होते. एका ट्रेमध्ये पसरवणे आणि १० तास सेट होऊ देणे व मग वडय़ा कापणे.

पाइनॅपल कलाकंद

साहित्य :

२०० ग्रॅम अननसाचे बारीक तुकडे

२५० ग्रॅम पिठीसाखर

दीड किलो मावा

पाव वाटी बारीक कापलेले पिस्ता-बदाम.

कृती :

कढईमध्ये नुसता मावा ८-१० मिनिटे चांगला परतून घेणे. कढईमध्ये मावा पसरून ठेवणे. थोडा गार झाल्यावर त्यात अननसाचे तुकडे व पिठीसाखर घालणे व खूप हलवून एका ट्रेमध्ये सेट करायला ठेवणे. या कलाकंदला सेट व्हायला ९ ते १० तास लागतात. त्यावर बारीक पिस्ता-बदाम कापून सजवणे.

कॉकटेल पकोडा

साहित्य :

१ कप चणाडाळ

१ कप मुगाची पिवळी डाळ

बारीक चिरलेला अर्धा कप कांदा

अर्धा कप बटाटय़ाचे तुकडे

१ कप किसलेले गाजर

२-३ टेबलस्पून मिरची क्रश

थोडे आले

मीठ

१ टीस्पून गरम मसाला पावडर

तळण्यासाठी तेल.

कृती :

चण्याची डाळ व मुगाची डाळ वेगवेगळी भिजत घालणे. नंतर ५ तासांनी अर्धवट वाटून घेणे. त्यात सर्व जिन्नस टाकणे. त्याचे थापून वडे किंवा पकोडे बनवणे.

मावा पनीर रोल

साहित्य :

१ वाटी खवा

१ वाटी पनीर

अर्धी वाटी पिठीसाखर

३ टेबलस्पून मिल्क पावडर

अर्धा टीस्पून रोझ इसेन्स

लाल रंग

हिरवा रंग

बटर पेपर

कृती :

खवा आणि पनीर एकत्र करणे व त्यात मिल्क पावडर आणि इसेन्स मिसळणे. नंतर त्यात साखर एकत्र करून त्या मिश्रणाचे ३ भाग करणे. एका भागात लाल रंग मिसळणे. दुसऱ्या भागात हिरवा रंग मिसळणे आणि तिसरा भाग पांढराच ठेवणे.

बटर पेपरवर सगळ्यात आधी पांढरा व नंतर लाल आणि शेवटी हिरवा रंग असं एकावर एक थालिपीठासारखे थापणे व बटर पेपरसकट रोल करणे. पेपरच्या दोन बाजू दोऱ्याने बांधणे व ४-५ तास फ्रिजमध्ये ठेवणे. ४-५ तासांनी बाहेर काढून चाकूने रोल कापणे.

अ‍ॅपल वॉलनट रोल्स

साहित्य :

समोशाच्या पट्टय़ा  ल्ल अर्धा कप मैदा

१ टीस्पून तेलाचे मोहन.

कृती :

मैदय़ामध्ये तेल टाकून पीठ चांगले भिजवणे आणि त्याच्या मोठय़ा पोळ्या लाटून तव्यावर अध्र्या भाजून घेणे.

रोलच्या आतल्या फिलिंगचे साहित्य :

अर्धा कप व्हेनिला केकचा चुरा

पाव कप अक्रोडचे बारीक तुकडे

पाव कप सफरचंदाचे बारीक तुकडे.

कृती :

केकमध्ये अक्रोड व सफरचंदाचे तुकडे व दालचिनी पावडर घालून बाजूला ठेवा.

रोल्स बनवायची कृती :

समोशाची पट्टी तीन इंच बाय अडीच इंच कापा. थोडा मैदा आणि पाणी घालून पट्टीला चिकटायची लापी तयार करा. समोशाच्या पट्टीवर एका बाजूला फिलिंग भरून रोल तयार करा व रोलच्या कडा लापी लापून चिकटवा. गरम तेलात तळून घ्या व वितळवलेलं चॉकलेट चमच्याने रोलवर टाका आणि गरम सव्‍‌र्ह करा.

बनाना कोलाडा

साहित्य :

१ केळं

अर्धा कप अननसाचे तुकडे

अर्धा कप अननसाचा ज्यूस

अर्धा कप बर्फाचे तुकडे

अर्धा कप नारळाचे दूध

२ मोठे चमचे साखर.

कृती :

सर्व एकत्र ब्लेंड करणे व उभ्या, लांब ग्लासमध्ये सव्‍‌र्ह करणे.
सीमा नाईक – response.lokprabha@expressindia.com