हनिमून स्पेशल : देखणं सेशेल्स

हिंदी महासागरामध्ये असलेला ११५ बेटांचा समूह म्हणजे सेशेल्स. अगदी स्वप्नवत वाटावा असा.

निळाशार समुद्र, त्याची ती अविरत गाज, पांढरीशुभ्र रेती, आसपास पसरलेली हिरवाई, सोबतीला नव्याने आपल्या आयुष्यात आलेलं आपलं माणूस आणि हवाहवासा एकांत.. परफेक्ट हनिमूनची तुमची कल्पना हीच आहे ना? त्यासाठी कुठे जायचं हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर एक आणि एकच ठिकाण आहे, ते म्हणजे सेशेल्स.

हिंदी महासागरामध्ये असलेला ११५ बेटांचा समूह म्हणजे सेशेल्स. अगदी स्वप्नवत वाटावा असा. हनिमूनच्या नेहमीच्या ठिकाणांची यादी ऐकायचासुद्धा कंटाळा आला असेल, आपला हनिमून एकदम वेगळा, एक्झॉटिक व्हावा असं तुम्हाला वाटत असेल, तर इकडेतिकडे कुठेही बघू नका, इतर कोणत्याही पर्यायाचा विचारच करू नका.

आता तुम्ही म्हणाल कशावरून? तर एक साधं सोपं मोजमाप.. सेशेल्समध्ये २४ खोल्यांपेक्षा जास्त खोल्या असलेली हॉटेलं ही मोठी हॉटेलं समजली जातात. म्हणजे अर्थातच गर्दी कमी. सगळ्या सेशेल्सची अर्थव्यवस्था एकतर मासेमारीवर आणि पर्यटनावर. त्यामुळे साहजिकच पर्यटक देवो भव..

सेशेल्सचं वैशिष्टय़ म्हणजे इथली वेगवेगळी नितांतसुंदर बेटं. समुद्राचं पाणी इतकं नितळ की वीस-तीस फूट खालचं प्रवाळही सहज दिसतं. माही बेटावरचा बिऊ व्हेलान बीच, प्रॅस्लिन या इथल्या आकारात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेटावरचा अन्मे लाझिओ हा बीच बघाल तर तुम्हीही म्हणाल की हा जगातला सगळ्यात सुंदर बीच आहे. ला दिगुआ बेटावर अल्फान्स बीचवर तुम्ही प्रवाळांचं वैविध्य बघू शकता. तिथल्या समुद्रात मासेमारी करू शकता. या वेगवेगळ्या बेटांच्या टूर असतात. त्यांचं पॅकेज घेऊ शकता. कर्फ बीच स्वीिमग, स्नॉर्किलगसाठी झक्कास आहे, तर कोझीन या बेटावर तुम्हाला हवा तसा एकांत मिळू शकतो. तिथलं सागरी जीवन, वन्यजीवनदेखील अफलातून आहे. डेनिस बेटाइतकं रोमॅण्टिक वातावरण तुम्हाला इतर कुठेच मिळणार नाही. तिथला गोल्फ क्लबदेखील उत्तम आहे. या सगळ्याच बेटांवर तुम्ही पॅरासेिलग करू शकता, स्कूबा डायिव्हग करू शकता. स्नॉर्किलग करू शकता. नव्यानं आपल्या आयुष्यात आलेल्या माणसाच्या सहवासात अशी सगळी धाडसं अनुभवणं हेसुद्धा रोमॅण्टिकच.

इथे तुम्हाला हवा तेवढा एकांत मिळेलच. पण तरीही हवेच असतील भारतीय लोक खूप आहेत. अगदी आपली मंदिरंदेखील आहेत. तुम्हाला आवडेल असं जेवण इथे मिळू शकतं. तुमच्या खिशाला परवडतील अशा दरापासून हाय एन्डपर्यंत वेगवेगळ्या स्तरातली हॉटेल्स इथे आहेत. सगळ्यात मुख्य म्हणजे एअर सेशेल्सची मुंबईहून थेट विमानसेवाही नुकतीच सुरू झाली आहे.

केव्हा जाल : ऑक्टोबर ते मार्च (पावसाळा टाळावा)
कसे जाल :  मुंबईहून सेशल्ससाठी थेट विमानसेवा सुरु असून, काही महिन्यांपूर्वीच त्यामध्ये बरीच सवलत देण्यात आली आहे. सेशेल्समध्ये ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ सुविधा असल्यामुळे, व्हिसासाठीची धावपळ कमी होते.

(छायाचित्र सौजन्य – सेशेल्स ट्रॅव्हल)
शैलेंद्र कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Honeymoon special seychelles

ताज्या बातम्या