एखाद्या विषयाचा खोलवर अभ्यास करण्याऐवजी शिक्षण, पदवी मग नोकरी अशा ठरावीक चौकटीत आपण अडकत जातो. म्हणूनच प्राणिशास्त्राच्या औपचारिक अभ्यासानंतर प्रत्यक्ष वास्तवाचा अनुभव घेण्यासाठी जंगलात वास्तव्याला गेलेल्या या तरुण मुलीचं अनुभवविश्व आपल्याला आकर्षून घेतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकटीने कर्नाटकमध्ये प्रवास करण्याची माझी पहिलीच वेळ. मुंबई-बंगलोर आणि मग पुढे म्हैसूर. तिथून पुढे अजून एक बस, चामराजनगर नावाच्या गावाजवळ नेणारी. अपेक्षेपेक्षा जास्तच उशीर झालेला या सगळ्या प्रवासात. अंधार व्हायला सुरुवात झालेली. जिथे पोहोचायचं होतं तिथे फोन केल्यावर उत्तर मिळालं, ‘‘तू फारच उशीर केलास. आता तू बस स्टॉपवरून चालत येऊ शकणार नाहीस. रस्त्यात हत्ती आडवे येऊ शकतील रात्री, आम्हीच येतो घ्यायला.’’ तशी मनाची तयारी होती कुठल्या तरी ऑड ठिकाणी राहण्याची, पण पुढे कशाची आशा करावी याची कल्पनाच येईना. खिडकीतनं बाहेर बघावं तर काहीच कळायला मार्ग नाही. कंडक्टरबुवा विसरले तर मला सांगायला कुठे उतरायचं ते? बाजूला बसलेल्या माणसाला बहुधा माझ्या चेहऱ्यावरची काळजी जाणवली असावी. त्याने मला मोडक्या िहदीत विचारलं, ‘‘कहाको जानाय आपको मेडम?’’ मी मोठ्ठे कष्ट घेत त्या जागेचं लांबलचक कन्नड नाव बोलून दाखवलं. ‘‘कोई आयेगा ना? आप चिंता मत करना, मं उतार के देता है’’ संवाद पुढे गेल्यावर समजलं की बुवा वन विभागातच कामाला आहेत. मग काय, स्टॉप येईपर्यंत गप्पा.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnatak forest
First published on: 10-06-2016 at 01:02 IST