आपल्या भविष्याविषयी प्रत्येकाच्या मनात कुतूहल असते. अनेकांना त्यासाठी ज्योतिषशास्त्र शिकायचेही असते. त्यासाठी काही प्राथमिक बाबी माहीत असणे आवश्यक असते.

ज्योतिषशास्त्राविषयी अभ्यास करावयाचा असेल त्यांना हे शास्त्र शिकत असताना, त्या विषयांशी निगडित बाबी समजावून घेणे आवश्यक आहे. सदर विषयाची प्राथमिक बठक चांगली झाल्यावर पुढील माहितीपूर्ण ज्ञान समजावून घेणे सोप्पे जाते. त्यामुळे या लेखात केवळ प्राथमिक माहिती समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Loksatta anvyarth Muslim students beaten up in Savitribai Phule University Pune
अन्वयार्थ: विद्यापीठांतला राजकीय हेका
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
27 March Daily Mesh To Meen Rashi Bhavishya
२७ मार्च पंचांग, राशी भविष्य: कुणाच्या नशिबी नात्यांचं प्रेम, सुख व गोडवा तर कुणाची वाढेल डोकेदुखी, आज काय होणार?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

ज्योतिष अभ्यासात प्रामुख्याने ग्रह, राशी आणि नक्षत्रांचे स्वभाव वैशिष्टय़े अभ्यासून मुखोद्गत असावीत. किमान त्यांचे प्राथमिक ज्ञान उत्तरोत्तर अभ्यासात सहज समजले पाहिजे. हे शास्त्र नवीन अभ्यासकांसमोर मांडताना उदाहरणादाखल आपल्या दैनंदिन सभोवतालच्या बाबींचा संदर्भ देतो. जसे की, आपले घर व त्याच्याशी संबंधित लोक आपल्या परिसरात राहत असतात. आपण राहत असलेल्या परिसरात किती घरे आहेत, त्या घरांचा क्रमांक कोणता आहे, सदर घरात किती व्यक्ती राहतात, त्यातील प्रमुख व्यक्ती कोण, त्याहीपेक्षा त्यातील प्रभावी व्यक्ती कोण, त्यांचा स्वभाव काय, त्यांची आíथक स्थिती कशी आहे, त्यापकी सर्वामध्ये मिळून मिसळून कोण राहतो वा त्यांचे कोणाशी चांगले पटते वा पटत नाही इत्यादी बाबींचा स्वानुभव आपणास थोडाबहुत असतो. त्यापकी ज्यांचे स्वभावगुण आपल्या व्यक्तिमत्त्वाशी साम्य राखणारे असतील किंवा जुळतील त्यांच्याशी आपली मत्री होते. जुळत नसतील तर आपण त्यांच्यापासून लांब राहणे पसंत करतो. परिस्थितीजन्य कारणांमुळे वाद वा इतर काही घटना आपल्यासोबत घडतात. त्याचप्रमाणे ज्योतिषीय विषय ज्या मूलभूत गोष्टींशी निगडित आहे त्यांचा योग्य तो अभ्यास करून, त्यांची गुण वैशिष्टय़े तपासून त्याचे आपल्या जन्मपत्रिकेशी वा घरातील परिवारातील व्यक्तींच्या जन्मपत्रिकेशी ताडून ज्योतिष अभ्यासातील मिळणाऱ्या ज्ञानातून ताळमेळ घेत जाऊ तसतसे ज्योतिष अभ्यासात आपण पारंगत होत जाऊ.

मनुष्य जन्मानंतर जसजसा प्रौढ होत जातो त्या दरम्यानच्या जीवनप्रवासात अनपेक्षितपणे त्यास सुख-दु:खाच्या अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागते. एखादी घटना आनंद देऊन जाते किंवा दु:खी करून जाते. कित्येक समस्या षडम्रिपूंनी (काम, क्रोध, लोभ, मद्, मोह, मत्सर इत्यादी..) ग्रस्त मनामुळे नकळतपणे आपल्यावर आपणच समस्या बेतून घेत असतो. म्हणजेच आपणच आपल्याबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीस कारणीभूत असतो. परंतु त्याचे मूळ शोधावयास ज्योतिषशास्त्र खूप उपयोगी ठरते. आपले मन ज्या काही बाबी मिळविण्याचा ध्यास घेते ते मिळवण्याचे प्रयत्न होतच असतात. परंतु सदर प्रयत्नांसोबत नकळतपणे मनाला त्रास देणाऱ्या, नको असणाऱ्या बाबींचा प्रवेश वा समावेश आपल्या जीवनात होत असतो. उदाहरणार्थ भरपूर धन-संपत्तीच्या आसक्तीने धनप्राप्ती होण्याकरिता आपल्या मनशक्तीचे प्रयत्न सफल होतीलही, परंतु त्या कमावलेल्या धन-संपत्तीचा सांभाळ करणे वा त्याबाबतच्या धनजतनाची, सुरक्षेसंबंधी इतर जबाबदारीने त्रस्त होणे क्रमप्राप्तच होते.

ज्योतिष शास्त्र हे आपल्या जीवनातील प्रारब्ध, संचितबाबत पूर्वकल्पना देऊन सततच्या घटनाक्रमातील मिळणाऱ्या फलाबाबत आवश्यक ती सावधानता वा जागृतावस्था देण्यास साहाय्यभूत ठरते. ज्यामुळे आपणांस प्राप्त बाबी मिळविण्यासाठी वेळप्रसंगी आपला संयम कसा साधावा याची जाणीव होते. उदा. एखाद्यास लग्न उशिरा होण्याचे योग आहेत, परंतु त्याच्या मनात सतत लग्नं लवकर होण्याबाबत विचार चालू असतील तर जीवनातील इतर घडामोडीत लक्ष लागत नाही. सदान्कदा तो लग्न वेळेत न होणे ही आपली समस्या मानून बराच कालापव्यय करीत असतो. अशा कित्येक विषयांचे वेळापत्रक भविष्यकाळात लपलेले आहे, ते तात्काळ मिळावे या अपेक्षेने आपण तळमळत असतो. त्या तळमळीस उपाय केवळ ज्योतिषशास्त्रच देऊ शकते ही बाब अनुभूतीत येते.

ज्योतिष शास्त्रातील अभ्यासात एखाद्या जातकाची म्हणजे ज्याच्याविषयी ज्योतिष पाहावयाचे आहे, त्याच्या जन्मवेळी जन्मस्थळाशी आकाशीय स्थितीत ग्रहांचे ग्रहअंश, सदर वेळी पूर्व क्षितिजावरील उदित होणारी राशी, इत्यादींचे आरेखन म्हणजेच १२ भाव आलेखित ज्योतिष कुंडली होय. ज्योतिष कुंडलीत प्रामुख्याने ब्रह्मांडाच्या गोलाकार आकारातील पृथ्वीसापेक्ष ३६० अंशात जातक वा ज्याची कुंडली निरीक्षण करावयाचे आहे तो जन्म घेतेवेळेचे ग्रह व नक्षत्र कोणत्या अंशावर आहेत त्याचा शोध घेतला जातो. म्हणजेच प्रत्येक ग्रह त्याच्या एका ठरावीक स्वभावानुसार असतो, परंतु भ्रमणात सम, विषम मित्र शत्रू स्वभावातील ग्रहांच्या मालकी क्षेत्रातून जात असताना त्याच्या स्वभावात होणारे बारकावे सदर ग्रहांसंबंधित जातकास अनुभवास येतात. अवकाशीय राशी क्षेत्र वा ग्रह, त्याच्यावर दृष्टी टाकणारे ग्रह, त्यांच्या मार्गी वा वक्री भ्रमणात समोरील ग्रहांवर वा राशी क्षेत्रांवर प्रभावाने अंमल करीत असतात, जसे की वरिष्ठांनी डोळे वटारले की एखाद्या व्यक्तीची शोचनीय स्थिती होते, साधारण त्याचप्रमाणे अवकाशातील ग्रहांचे भ्रमणामुळे त्या त्या स्वभाव भावांचा अनुभव जातक घेत असतो.

अवकाशात सूर्य हा केंद्रस्थानी असून त्याच्याभोवती सर्व ग्रह ठरावीक काल्पनिक अंडाकार भ्रमण माíगकेने भ्रमण करीत असतात. परंतु आपण अभ्यासक पृथ्वीवर असल्यामुळे पृथ्वी भ्रमण करीत असताना वर्तुळाकार भ्रमण माíगकेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य फिरत असल्याचा भास होतो. त्याअनुषंगाने पृथ्वी ज्या राशीत भ्रमण करीत आहे त्या समोरील राशीत सूर्य असल्याचे संबोधले जाते. उदा. सूर्य दर १५ जानेवारीस असणाऱ्या मकरसक्रांतीत मकर राशीत प्रवेश करतो. म्हणजेच त्यावेळी पृथ्वी स्वत: मकर राशीसमोरील कर्क राशीत प्रवेश करीत असते.

आकाशीय आकार ग्रहांच्या वर्तुळाकार भ्रमणामुळे गोलाकार मानला जातो. सदर वर्तुळात ३६० अंशाची भ्रमण कक्षेची १२ भागात विभागणी केली जाते म्हणजेच प्रत्येक भाग ३० अंशाचा होतो. त्यातील प्रथम राशी मेष असून बारावी राशी मीन आहे. साधारणपणे वसंत ऋतू एप्रिल महिन्याच्या दरम्यान सुरू होतो. त्यावेळेस सृष्टीत आनंदी वातावरण असते. त्या दरम्यान झाडांना नवीन पालवी फुटत असते व निसर्गात नवचतन्य आल्याचे आपण अनुभवत असतो, त्यादरम्यानच्या कालावधीत सूर्य १६ एप्रिलपासून मेष राशीत प्रवेश करतो व ती सुरुवातीची चार अंशापर्यंतची स्थिती सूर्यासाठी चांगली असून ज्योतिषी भाषेत सूर्य उच्चीचा मानला जातो. म्हणून कदाचित मेष राशीला राशी गणनेत प्रथम स्थान प्राप्त झाले असावे.

साधारणपणे सूर्य रोज एक अंश चालतो. त्यानुसार एक राशी अंतर कापावयास ३० दिवस लागतात. एका राशीतून दुसऱ्या राशीतील सूर्याच्या प्रवेशास संक्रांत म्हणतात. साधारण इंग्रजी वर्षांच्या प्रत्येक महिन्याच्या १४ तारखेपासून १६ तारखेपर्यंतच्या कालावधीत सूर्याच्या संक्रांती होत असतात. त्यावरून एखाद्याच्या जन्मतारखेवरून त्याच्या पत्रिकेतील सूर्य अंदाजे किती अंशावर असेल त्याचे ठोकताळे मांडता येतात. सूर्य रोज एक अंश चालतो म्हणजेच पृथ्वी स्वत भोवती फिरत २४ तासानंतर साधारण एक अंश पुढे सरकत असते. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची वर्तुळाकार भ्रमण माíगका नसून लंबगोलाकार माíगका असून प्रतलाच्या उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुवांकडे झुकलेल्या स्थितीमुळे आपणास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण झाल्याचे वर्षभरात दिसून येते.

आकाशीय ३६० अंशात २७ नक्षत्रे असून प्रत्येक नक्षत्र म्हणजे एकापेक्षा अनेक तारकापुंज असून ही तारकापुंजे एका ठिकाणी स्थिरच असतात. त्यांच्या विशिष्ट स्थितीमुळे आकृतीबंध तयार होतो, त्या आकाराच्या अनुषंगाने नक्षत्र ओळखता येतात. परंतु सदर नक्षत्रे वर्तुळीय कक्षेत १३ अंश २० कला (२० कला म्हणजे एकतृत्तीयांश अंश जसे की, एक अंश म्हणजे ६० कला) इतके क्षेत्र व्याप्त असते. परंतु राशी ३० अंशाच्या असल्यामुळे काही नक्षत्रे दोन राशीमध्ये विभागली जातात. साधारणत: एका नक्षत्राचे चार भाग असून प्रत्येक भाग तीन अंश २० कलांचा असून त्यास चरण म्हणतात. प्रत्येक नक्षत्राचे अनुक्रमे प्रथम चरण, द्वितीय चरण, तृतीय चरण व चतुर्थ चरण पूर्ण होऊन त्यानंतर दुसऱ्या नक्षत्राचे चार चरणाचे क्रम सुरू होतात. एका राशीत एकूण नऊ चरणे असतात म्हणजेच सव्वादोन नक्षत्रांची मिळून एक राशी होते. परंतु राशीतील चरण क्रमांक वेगळे असतात. त्यामुळे काही राशीत प्रथम चरण एका राशीत तर इतर तीन चरण दुसऱ्या राशीत असतात. काही राशीत प्रथम दोन चरणे एका राशीत तर इतर दोन चरणे पुढील राशीत; तर काही नक्षत्रांचे प्रथम तीन चरणे एका राशीत तर शेवटचे चरण पुढील राशीत असते. उदा. मेष राशीत शेवटच्या चरणात कृत्तिका नक्षत्राचे प्रथम चरण येत असेल तर कृत्तिका नक्षत्राचे इतर चरणे क्र. दोन, तीन व चौथे चरण वृषभ राशीत येते. तर वृषभ राशीत शेवटचे दोन चरण हे मृगशीर्ष नक्षत्रांचे प्रथम व द्वितीय चरण येत असून मृगशीर्ष नक्षत्राचे इतर चरण तीन व चरण चार हे मिथुन राशीत सुरुवातीची दोन चरण असतात. तसेच मिथुन राशीतील शेवटची तीन चरणे ही पुनर्वसू नक्षत्राची प्रथम, द्वितीय व तृतीय चरणे असून चतुर्थ चरण हे पुढील कर्क राशीत प्रथम चरण म्हणून समाविष्ट होते.

या राशींपकी काही राशी अग्नीतत्त्व, वायुतत्त्व, जलतत्त्व वगरे विभागल्या गेल्या आहेत. त्यामुळे सदर प्रत्येक राशीतील संबंधित चरणात येणारे भ्रमणातील ग्रह स्वभावानुसार व चरणास प्राप्त वातावरणात ग्रहांची तत्त्वे जशी प्रतीत होतात त्याचा सांगोपांग विचार करून भविष्य कथन केले जाते. राशीतील अग्नीतत्त्व व चरण बाबत असणारे गुणधर्म व सदर ग्रहांवर इतर ग्रहांनी टाकलेल्या दृष्टी प्रभावाने मिळणारी विभिन्न फळे व अनुभव सदर जातकास मिळत असतात वा भविष्य कथनात विस्तारतात. एखादी व्यक्ती मृत्यूसमयी कोणते नक्षत्र आहे, त्रिपाद आहे वा द्विपाद आहे त्याचा प्रामुख्याने विचार या नक्षत्र चरण विभागणी अनुसार पाहिला जातो.

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशी ३० अंशाची असून प्रत्येक राशीतील स्वभाव गुणानुसार त्या त्या राशींची एक एका ग्रहास मालकी दिली आहे, त्यास राशी स्वामी म्हणतात. त्यामध्ये रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र व शनी या सात ग्रहांमध्ये त्या त्या राशींचे स्वामित्व दिले आहे. त्यापकी रवी आणि चंद्र या ग्रहांना एक एक राशी दिली असून त्यापकी चतुर्थ क्रमांकावरील कर्कराशी चंद्राच्या स्वामित्वाखाली येते व पाचव्या सिंह राशीचे स्वामित्वही सूर्याकडे दिलेले आहे. तसेच क्रमांक एक राशी मेष व क्रमांक आठ राशी वृश्चिक या दोन राशींचे स्वामित्व मंगळ ग्रहाकडे दिले आहे. क्रमांक दोन वृषभ व क्रमांक सात तूळ या दोन राशींचे स्वामित्व शुक्र ग्रहाकडे दिलेले आहे. क्रमांक तीन मिथुन व क्रमांक सहा कन्या या दोन राशींचे स्वामित्व बुध ग्रहांकडे आहे. क्रमांक नऊ धनु राशी व क्रमाक १२ मीन या दोन राशींचे स्वामित्व गुरु ग्रहाकडे असून राहिलेले राशी क्रमांक १० मकर व राशी क्रमांक ११ कुंभ या दोन राशींचे स्वामित्व शनी ग्रहाकडे दिलेले आहे.

तसेच ३६० अंशात स्थिर असलेल्या २७ नक्षत्रांकडेदेखील उपरोक्त सात ग्रहे (सूर्य, चंद्र मंगल, बुध, गुरु, शुक्र व शनी) व दोन छायाग्रहे (राहू व केतू) अशा एकूण नऊ ग्रहांमध्ये स्वामित्व बहाल केलेले आहे. म्हणजेच प्रत्येक ग्रहाकडे  प्रत्येकी तीन-तीन नक्षत्रांचे स्वामित्व येते. सदर नक्षत्रांचे स्वामित्व वाटताना ग्रहांचे क्रम व वाटप वरील प्रमाणे केलेले आहे. सदर नऊ ग्रहांपकी राहू आणि केतू हे छायाग्रह आहेत म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्या भ्रमण माíगका ज्या ठिकाणी छेदतात त्या िबदूमध्ये चुंबकीय बल असते त्याचा परिणाम इतर ग्रहांप्रमाणे असतो, वास्तविक सदर छायाग्रहांची शक्ती इतर ग्रहांपेक्षा अधिक असते म्हणून ज्योतिषसंशोधकांनी त्या िबदूंना ग्रहांचा दर्जा दिलेला असल्याचे प्रतीत होते.

ज्योतिषशास्त्रात २८ नक्षत्रांपकी अभिजीत नक्षत्र वगळून इतर २७ नक्षत्रं विचारात घेतात. सदरची २७ नक्षत्रे व बारा राशी ३६० अंशात विभागली असल्यामुळे प्रत्येक नक्षत्र विस्तार हा १३ अंश २० कला, तर राशीविस्तार ३० अंश आहे. राशी आणि त्या राशींमधील नक्षत्राचा अंशात्मक विस्तार वरील तक्ता तथा नमुना कुंडलीनुसार समजून घ्यावा.

सदर कुंडली १२ खणांची (रकाने) असून प्रत्येक खण हा भाव म्हणून संबोधतात. हा एक प्रकारे ब्रह्मांडाचा नकाशाच असून प्रत्येक भाव ही एक राशी आहे. तिचा अंशात्मक विस्तार ३० अंशाचा असून त्यामधील लिहिलेली संख्या ही राशींच्या संख्येने व्यक्त केली जाते प्रथम भाव, म्हणजे जातकाचे जन्मावेळी पूर्व दिशेला उदित होणारी राशीची संख्या लिहिली जाते. उपरोक्त कुंडलीतील प्रथम भावातील दर्शवलेली राशी मेष असून द्वितीय भावात वृषभ राशी येते. परंतु जन्म समयी पूर्व दिशेला उदित होणारी रास प्रथम खणात म्हणजेच भावात येते. त्यामुळे तिथे असणारा राशी विस्तार हा त्या त्या राशीचा असेल. म्हणजे एखाद्याच्या जन्म वेळी पूर्व दिशेला उदित होणर्ाी राशी मेष असेल तर वरील तक्त्याप्रमाणे कुंडली तयार होऊन ग्रह संबंधित राशी त्या खणात लिहिली जाते. परंतु एखाद्याचा जन्म इतर राशीत असेल तर वरील तक्त्यात क्रम त्या राशीप्रमाणे बदललेला असेल. म्हणजे समजा पूर्व दिशेस उदित होणारी राशी मिथुन असेल तर वरील तक्त्यात मेष राशीच्या ठिकाणी मिथुन राशीत दाखवलेला नक्षत्र विस्तार क्रमाने दाखविला जाईल. साधारणत: सकाळी जन्म घेणाऱ्या जातकाच्या कुंडलीतील प्रथम भाव हा सूर्य ज्या राशीमध्ये आहे त्या राशीचा प्रथम भावात येतो. प्रथम भावातील राशीस लग्न रास म्हणतात. लग्न रास व त्यामध्ये असणाऱ्या ग्रहांमुळे सदर जातकाच्या शरीर रचनेचा अंदाज बांधता येतो. आणि चंद्र ज्या राशीमध्ये असतो त्या राशी स्वभावावरून जातकाच्या मनाचा कल काय असू शकतो हे स्पष्ट होते. तसेच इतर बरेच ग्रहांचा, राशींच्या तत्त्वांचा, स्वभावाचा, स्थितीगत नक्षत्रावरून आणखीन सूक्ष्मतम चिंतन करून फलाभ्यास सांगता येतो. उपरोक्त कुंडलीत प्रथम भावात मेष राशी दर्शवली असून त्या पुढे वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळा, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन आहेत. सदर राशींचा क्रम संख्या १- मेष, २-वृषभ, ३-मिथुन, ४-कर्क, ५-सिंह, ६-कन्या, ७-तूळ, ८- वृश्चिक, ९- धनु, १०- मकर, ११- कुंभ, आणि १२- मीन असा संख्यात्मक खुणांनी सदर भावात क्रमांक लिहिला असेल तर नमूद संख्या ही त्या त्या राशींशी संबंधित आहे हे मानावे. तसेच प्रथम भाव वा द्वितीय वा आणि कोणता भाव, येथे भावाचा क्रम बदलत नाही; परंतु जातकाचा जन्म होताना पूर्व दिशेला उदित होणाऱ्या राशीच्या संबंधित वरील क्रमांक लिहिला जातो. उदारणार्थ पूर्व दिशेला उदित होणारी राशी तुला असेल प्रथम भावात ‘७’ हा क्रमांक लिहिला जातो त्यानुसार द्वितीय भावात वृश्चिक राशी इत्यादी क्रमानुसार लिहिल्या जातात.

३६० अंशाचा विचार करता प्रथम राशी ही मेष आहे. त्या राशीचा शून्य अंश ते ३० अंशांपर्यंतचा विस्तार असून त्यापुढील रास वृषभेचा विस्तार ३० अंश ते ६० अंशांपर्यंतचा आहे. पुढे मिथुन क्रमांक ३ ही रास ६० अंशांपासून ९० अंशांपर्यंत विस्तारित आहे. त्याचप्रमाणे पुढील राशी त्या त्या रकान्यात लिहिल्या जातात. म्हणजेच कुंडलीतील प्रत्येक भाव उलटेसुलटे त्रिकोण व चौकोन नसून ३६० अंशातील १२ विभागणीतील प्रत्येकी ३० अंशाचे भाव आहेत. जातकाच्या जन्माच्या वेळी उदित होणाऱ्या राशीमुळे प्रथम भावात दर्शवणारी लग्न रास व त्या पुढील राशींचा क्रम दाखवतो. तसेच दहाव्या भावात दर्शवणारी रास ही जन्मत: आपल्या डोक्यावरील ऊध्र्व भागात असणारी रास असून क्रमांक चार भावात व्यक्त होणारी रास ही पाताळात म्हणजे जातक भारतात जन्म होताना अमेरिकेत साधारणत असणारी रास होय. क्रमांक ७ मध्ये दर्शवणारी रास ही मावळतीस पश्चिम दिशेस असणारी रास होय. म्हणजेच प्रथम भाव, द्वादश भाव वा अष्टम भावापर्यंत सूर्य सदर भावात दर्शविला असेल तर जातकाचा जन्म दिवसाचा आहे, म्हणजे साधारणत: सूर्य उगवताना जातकाचा जन्म असेल तर सूर्य प्रथम वा व्दादश भावात दिसून येईल; परंतु पहाटेचा, रात्रीचा असेल तर चतुर्थ अथवा द्वितीय वा तृतीय भावात दिसून येईल. साधारणत: दर दोन तासांनी पूर्व दिशेला उदित होणारी रास बदलत असून त्या पुढील क्रमांकाची रास उदित होत असते त्या वेळेला अगोदरची उदित झालेली रास ऊध्र्व दिशेकडे सरकत मावळतीकडे मार्गक्रमण करत असते.

राशींच्या ३० अंशाच्या विस्तारात आणखीन भरपूर गुपिते दडलेली आहेत. त्याचा प्रामुख्याने शोध घेणे या लेखन प्रपंचात अवघड आहे, परंतु त्याचे विश्लेषण करता म्हणजेच ३० अंशाचे विविध पद्धतीने विभागणी करून षडवर्ग कुंडल्या बनवून प्रश्नांसंबंधित उत्तरांचा शोध घेतला जातो. ‘लग्ने देहाचारो होरायामर्थसम्पदो विपद:  द्रेष्काणे कर्मफलं सप्तांशे बन्धुसंख्या च जातकफलं नवांशे व्दादशभागे विचिन्तयेत्पत्नीम् ित्रशाशे निधनं वै यवानाचाय्रे: सदा ह्य़ुत्कम्’ (मानसागरी तृतियाध्याय) लग्नाने शरीर, आचार, विचार, वर्तणूक तथा तत्संबंधित बाबीं, होराने धनप्राप्ति, द्रेशकाणने केलेल्या कृत्यांची फले या कार्यसिद्धि, सप्तांशसाने बंधुभगिनी, नवमांशाने सर्व फलं, द्वादशांने स्त्रीचा तथा ित्रशांशने मृत्यूचा विचार केला जातो, असे यावनाचार्याचे मत आहे. त्या षडवर्ग कुंडल्यांमधील चíचत वा प्रामुख्याने वापरातील नवमांश कुंडलीचा प्राथमिक विचार करुया.

साधारणत: विवाहसंबंधित समस्यांसाठी नवमांश कुंडली तपासली जाते. म्हणजे नवमांशाने अचूक निदान करणे अनुभवातीत दिसून आलेले आहे. परंतु म्हणून प्राथमिक कुंडली गौण मानली जात नाही. साधारणत नवमांश कुंडली म्हणजे राशीच्या ३० अंशाची नऊ भागात विभागणी करणे, म्हणजेच प्रत्येक भाग ३ अंश २० कलांचा असतो. वरील विवेचनातील नक्षत्र भागात आपण त्याचा चरण म्हणून उल्लेख केलेला आहे. जसे राशी क्रम मेष राशीपासून क्रम मोजतात त्या प्रमाणे नक्षत्रे देखील अश्विनी नक्षत्रपासून मोजली जातात. तसेच नक्षत्रे व राशींचे स्वामित्व प्रामुख्याने ग्रहांना दिलेले आहे त्या ग्रहांमधील तप्तता, वायू मंडळ, शीतलता इत्यादी भाव प्राचीन ऋषीमुनींनी अनुभवातून मनुष्यागणिक स्वभाव वैशिष्टय़ानुसार ग्रह, नक्षत्रांचे शोध, बोध घेऊन स्पष्ट केले आहेत. त्यामुळे प्रदीर्घ अभ्यासाअंती राशी व त्यातील चरणावर स्थित ग्रहांमुळे जातक जीवनात कसा व्यक्त होईल याचा तंतोतंत उलगडा प्राचीन कालापासून होत आलेला आहे. अद्यापि संशोधक, ज्योतिष अभ्यासक त्यावर सतत चिंतन करीत असतात.

नऊ ग्रहांपकी राहू आणि केतु या कथित ग्रहांची चुंबकीय शक्ती दृश्य ग्रहांपेक्षा अधिक असल्याचे ज्योतिष शास्त्रात मानले जाते. त्यामुळे ज्योतिषीय अभ्यासक प्राचीन काळापासून राहू आणि केतू या ग्रहांना प्रामुख्याने स्थान देत आले आहेत. आजच्या काळात कालसर्प योग नावाने राहू-केतूचा पत्रिकेतील स्थानावरून होणारे विपरीत परिणामांचा उल्लेख होऊ घातला आहे, आणि त्यावर विशेष प्रकाश पडणे अद्यापि बाकी असल्यामुळे त्यावर भाष्य करणे उचित ठरणार नाही.

तसेच नवमांश कुंडलीचा अभ्यास पाहता प्रत्येक चरणाचा अंशात्मक विस्तार त्या राशीतील निश्चित असलेला नवमांश रास कोणती असेल ते स्पष्ट होते. साधारणत फलकथन करताना जातकाच्या कुंडलीतील स्थित ग्रह कोणत्या नवमांशात आहे, कोणत्या राशीत आहे, वा त्या ग्रहांवर इतर कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे, ग्रहाची अंशात्मक स्थिती काय आहे, ग्रह वा प्रश्नांसंबंधित बाबी कुंडलीतल्या कोणत्या भावासंबंधित आहे, प्रश्नासंबंधित काल, परिस्थिती, ग्रहांचे वर्तमान गोचरीय भ्रमण किती कालावधीसाठी आहे वा सूर्य आणि चंद्र यांचे शरीर व मन या दृष्टीने कुंडलीतील अंशात्मक स्थिती काय आहे, चंद्राच्या नक्षत्र विस्तारातील स्थितीमुळे कोणती विमशोत्तरीय महादशा, दशा कोणत्या या सर्वाची सांगड घालून फलकथन केले जाते.

ज्योतिषीय अभ्यासातून पत्रिकेचा दर्जा काय आहे याचे ज्ञान होते. काही अभ्यासक अमुक एका नक्षत्रातील ठरावीक ग्रहांमुळे जातकाच्या आयुष्यात कोणत्या वर्षी काय घडेल याचे तंतोतंत आडाखे यशस्वीरीत्या मांडू शकतात. ठरावीक राशीतील स्थित ग्रहांच्या मत्री वा शत्रुत्वामुळे मिळणारे फलकथन नक्की करतात. विवाहाच्या वेळी पत्रिकेतील कुंडल्या जुळवून सुखी संसारात हातभार कसा लावता येईल याचे यशस्वी उदाहरणे दिसून येतात. परंतु ज्योतिषीय अभ्यास अर्धवट असल्यास चुकीचे आडाखे बांधून नको त्या गोष्टी घडल्यामुळे ज्योतिष शास्त्र समाजात बदनामदेखील होत आले आहे.
योगेश दळवी – response.lokprabha@expressindia.com