प्रीती पटेल response.lokprabha@expressindia.com

पोलादपूरहून साधारण २५ किमी अंतरावर वसलेले कुडपण गाव तेथील भिवाची काठी सुळका आणि खडशीचा धबधबा या प्रेक्षणीय स्थळांमुळे प्रसिद्धीस आले आहे. कुडपण गाव हे महाबळेश्वर ते खेडदरम्यान घाटमाथ्यावर वसले आहे. गावाच्या तीन वाडय़ा असून पोलादपूरहून येणाऱ्या रस्त्यावरील त्याच्या क्रमामुळे त्यांना कुडपण एक, कुडपण दोन आणि कुडपण तीन असेही संबोधले जाते. कुडपण एक म्हणजेच कुडपण बुद्रुक अथवा मोऱ्यांचे कुडपण तर कुडपण तीन म्हणजे कुडपण खुर्द अथवा शेलार कुडपण. कुडपण दोनला मधले कुडपण अथवा बौद्धवाडी म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येकडील या भागातून येणारे पावसाचे पाणी कुडपण एक गावाच्या पाठीमागून खडशीच्या धबधब्याच्या रूपात भिवाची काठी नामक सुळक्याच्या शेजारील दरीत कोसळते. याच दरीत या प्रवाहाला अनेक ओहोळ येऊन मिळतात आणि पुढे कोकणातील वडगावात पोहोचता पोहोचता याचे रूपांतर होते ते जगबुडी नदीत.

municipality keeping eye after removing the encroachment on Belpada hill
पनवेल : बेलपाडा टेकडीवरील अतिक्रमण हटविल्यानंतर पालिकेची नजर
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…

कुडपण एक गावाच्या पाठीमागून सह्याद्रीची एक डोंगररांग नैर्ऋत्येकडे पसरली आहे. तर पूर्व-पश्चिम धावणारी दुसरी डोंगररांग पूर्वेकडे कुडपण तीन, वरची बिरमाणी, करत हातलोट गावाकडून दक्षिणेकडे वळते ती थेट रघुवीर घाटापर्यंत. या दोन सह्यधारांच्या मधील प्रदेशातून वाहते ती जगबुडी नदी. तीन बाजूंनी उंच डोंगररांगांनी वेढल्याने या डोंगरांतून वाहत येणारे अनेक ओहोळ नदीच्या पाण्यात भर घालत असतात. त्यामुळे पावसाळी दुथडी भरून वाहणाऱ्या या नदीचे पात्र तितकेच रुंद आहे. उन्हाळय़ात नदीप्रवाह आटत असला तरी वळणावळणावरील सखल भागात पाणी साठून राहते. त्यामुळे या भागात नदीपात्रात बारमाही पाणी असते.

खेडकडून कोकणातील वडगाव साधारण ३५ किमी अंतरावर आहे. जगबुडी नदीला डाव्या हाताला ठेवत डोंगरदऱ्यांतून असंख्य वळणे घेत जाणाऱ्या अरुंद रस्त्यावरून प्रवास करत वडगाव गाठायला तास-दीड तास लागतोच. त्यात एसटीच्याही ठरावीक फेऱ्या त्यामुळे मालदे, विहळी, वडगाव, कळमाणी, बिरमाणी, कांदोशी, किंजळे, धवडे, अस्थान, नांदिवली येथील ग्रामस्थांचे या भागातून बाहेर पडण्याचे प्रमाणही कमीच.

नदीच्या दोन्ही पात्रांवर छोटी छोटी गावे वसलेली, त्यातच येथील ग्रामस्थांचे खेडपेक्षा अधिक येणेजाणे हे घाटमाथ्यावरील गावात. त्यामुळे या दोन्हीकडच्या डोंगररांगांवर अनेक घाटवाटांचे जाळे विणले गेले. कुडपणच्या तीन वाडय़ांतून तीन वेगळय़ा वाटा वडगावात उतरतात. त्यातील निगडे घाट अधिक वापरात आहे. तर आजही कोकणातील वडगाव, काळमणी वगैरे गावातील ग्रामस्थ महार खिंड वाटेचा वापर शेलार कुडपणात जाण्यासाठी करतात. पुढे हातलोट गावातून उतरणारी गर्द राईने  झाकोळलेली घाटवाट म्हणजे हातलोट घाट, जो कोकणातील बिरमणी गावात उतरतो. या वाटेवर खोदीव पायऱ्या असून घाटमाथ्यावर वाटेच्या सुरुवातीला तसेच वाटेच्या मध्ये पाण्याची खोदीव टाकीदेखील आहेत. याच वाटेवर पक्की सडक तयार करवून जगबुडीच्या खोऱ्याला वर महाबळेश्वरशी जोडण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. मधुमकरंद गडाच्या पाठीमागील नाळेतून उतरणारी कोंड नाळ कठीण श्रेणीत मोडते, त्यामुळे जरा कमीच वापरली जाते. कांदोशी मार्गे दाभे, झाडाणी, उचाट (कांदाटी खोरे) यांना जोडणाऱ्या अंगठेसरी, नाळी, तेल्या मारो, फणस नाळ या वाटा तशा अजूनही वापरात असल्या तरी वाटांवर राबता तुरळकच. अस्थान धवडे भागातून पूर्वी गुरांना चारण्यासाठी घाटमाथ्यावरील माळावर नेले जात असे. त्यामुळे येथे चार-पाच वाटा वापरात होत्या; सद्य:स्थितीत मात्र धावडा आणि अस्थान सरी या दोनच वाटा वापरात आहेत. आंबिवली ते वळवण गावांना जोडणारा आंबिवली घाट मात्र आजही भरपूर वापरला जातो.

वडगावच्या डावीकडील डोंगररांग ओलांडून पश्चिमेकडील गावात जाता येते. पांडवांचे पाणी आणि वारसदार अशा दोन घाटवाटा वडगावला कोतवालाशी जोडतात. ही दोन्ही गावे कोकणात असून सह्याद्रीच्या उपरांगेने एकमेकांपासून दुरावली आहेत. यातील पांडवांचे पाणी वाटेवर डोंगरमाथ्यावरील िखडीत खडकात खोदलेली पाण्याची टाकी आहेत. पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधलेली पाण्याची टाकी हीच आहेत, असा गावकऱ्यांचा समज आहे. या िखडीतून एक वाट महीपत गडावर जाते. ही वाट ज्या दरवाजाने गडावर प्रवेश करते त्या दरवाजाला कोतवाल दरवाजा म्हणून ओळखतात. 

या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेल्या गडकोटांची एक शृंखलाच या भागात पाहायला मिळते. कुडपण एक गावाच्या पाठीमागून र्नैऋत्येकडे पसरलेल्या डोंगररांगेवर महीपत- सुमार- रसाळ अशा तीन किल्ल्यांची साखळी पाहायला मिळते, तर पूर्व-पश्चिम पसरलेल्या धारेवर मधुमकरंदगड, पर्बत, चकदेव ते थेट रघुवीर घाटावर नजर ठेवणारा महिमंडणगड असे चार किल्ले पाहायला मिळतात.

दळणवळणाच्या सुविधांची वानवा असल्यामुळे शेती आणि पशुपालन हेच येथील ग्रामस्थांचे उपजीविकेचे साधन. अधूनमधून थोडय़ाफार प्रमाणात ससे, पिसई आणि रानडुक्करांची शिकारही केली जाते. भरपूर पावसामुळे भातशेती, डोंगरउतारावर नाचणी, वरी इत्यादी पिके येथे घेतली जातात. नदीकाठच्या  वाडीवस्तीवर राहणारे ग्रामस्थ प्रामुख्याने शेतीवर विसंबून आहेत, तर जनावरांना चरायला मुबलक चारा बारमाही मिळत असल्यामुळे घाटमाथ्यावर पशुपालन आणि दुग्धजन्य पदार्थाची विक्री हे उत्पन्नाचे साधन ठरले आहे. कुडपण परिसरातील धनगर वाडय़ांवर राहणारे धनगर आजही कुमठेमार्गे प्रतापगडवाडा कुंभरोशी येथे दूधविक्रीकरिता दररोज पायी जातात.

घाटमाथ्यावरील कुडपण, घोणसपूर, दाभे तुरुक,  झाडणी, उचाट, वळवण, मेट शिंदी, इत्यादी वाडीवस्ती तसेच सह्यधारेवरील धवडे, अस्थान, वाडी बेलदार, रसाळवाडीतल्या या धनगर वाडय़ांवर केव्हाही गेलात तर हंडाभर ताक देऊन स्वागत होते. कोकणातील कांदोशी आणि घाटावरील उचाट या गावांना जोडणाऱ्या नाळेची वाट, तेली मारो, फणस नाळ या ट्रेकदरम्यान हंडाभर ताक आणि वाटीभर लोण्याचा पाहुणचार आम्ही अनुभवला आहे. महीपत- रसाळ- सुमार ट्रेकच्या वेळी वाडी बेलदारमधून सकाळी निघालो तेव्हा दुपारच्या जेवणासाठी १० किलोचा दही-पोह्यांचा डबा आम्हाला भरून दिला होता. येथील आणखी एक खासियत म्हणजे तवस म्हणजेच जम्बो काकडी. बाजारपेठ दूर असल्यामुळे प्रत्येक घराच्या परसबागेत मिरची, वांगी, भेंडी, तोंडली, कारली लावलेली दिसतात. तसेच कुंपणावर तवसाचा वेल चढवलेला असतो. त्याला नेहमीच मोठ-मोठाल्या तवस लागलेल्या असतात. उन्हाळय़ात कोणाच्याही पडवीत जेवणासाठी विसावलात तर तुमच्या ताटात गार पाणीदार तवस नक्कीच असणार. अतिशय खडतर जीवन जगणारी ही कोकणी माणसं मनाने फार प्रेमळ आहेत. गावात पोहोचताच तुमची मायेने विचारपूस होते. पाहुणचार होतो. राहण्याची-जेवणाची सोय आग्रहाने केली जाते.

पोलादपूरहून साधारण २५ किमी अंतरावर वसलेले कुडपण गाव तेथील भिवाची काठी सुळका आणि खडशीचा धबधबा या प्रेक्षणीय स्थळांमुळे प्रसिद्धीस आले आहे. कुडपण गाव हे महाबळेश्वर ते खेडदरम्यान घाटमाथ्यावर वसले आहे. गावाच्या तीन वाडय़ा असून पोलादपूरहून येणाऱ्या रस्त्यावरील त्याच्या क्रमामुळे त्यांना कुडपण एक, कुडपण दोन आणि कुडपण तीन असेही संबोधले जाते. कुडपण एक म्हणजेच कुडपण बुद्रुक अथवा मोऱ्यांचे कुडपण तर कुडपण तीन म्हणजे कुडपण खुर्द अथवा शेलार कुडपण. कुडपण दोनला मधले कुडपण अथवा बौद्धवाडी म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वरच्या र्नैऋत्येकडील या भागातून येणारे पावसाचे पाणी कुडपण एक गावाच्या पाठीमागून खडशीच्या धबधब्याच्या रूपात भिवाची काठी नामक सुळक्याच्या शेजारील दरीत कोसळते. याच दरीत या प्रवाहाला अनेक ओहोळ येऊन मिळतात आणि पुढे कोकणातील वडगावात पोहोचता पोहोचता याचे रूपांतर होते ते जगबुडी नदीत.

कुडपण एक गावाच्या पाठीमागून सह्याद्रीची एक डोंगररांग नैर्ऋत्येकडे पसरली आहे. तर पूर्व-पश्चिम धावणारी दुसरी डोंगररांग पूर्वेकडे कुडपण तीन, वरची बिरमाणी, करत हातलोट गावाकडून दक्षिणेकडे वळते ती थेट रघुवीर घाटापर्यंत. या दोन सह्यधारांच्या मधील प्रदेशातून वाहते ती जगबुडी नदी. तीन बाजूंनी उंच डोंगररांगांनी वेढल्याने या डोंगरांतून वाहत येणारे अनेक ओहोळ नदीच्या पाण्यात भर घालत असतात. त्यामुळे पावसाळी दुथडी भरून वाहणाऱ्या या नदीचे पात्र तितकेच रुंद आहे. उन्हाळय़ात नदीप्रवाह आटत असला तरी वळणावळणावरील सखल भागात पाणी साठून राहते. त्यामुळे या भागात नदीपात्रात बारमाही पाणी असते.

खेडकडून कोकणातील वडगाव साधारण ३५ किमी अंतरावर आहे. जगबुडी नदीला डाव्या हाताला ठेवत डोंगरदऱ्यांतून असंख्य वळणे घेत जाणाऱ्या अरुंद रस्त्यावरून प्रवास करत वडगाव गाठायला तास-दीड तास लागतोच. त्यात एसटीच्याही ठरावीक फेऱ्या त्यामुळे मालदे, विहळी, वडगाव, कळमाणी, बिरमाणी, कांदोशी, किंजळे, धवडे, अस्थान, नांदिवली येथील ग्रामस्थांचे या भागातून बाहेर पडण्याचे प्रमाणही कमीच.

नदीच्या दोन्ही पात्रांवर छोटी छोटी गावे वसलेली, त्यातच येथील ग्रामस्थांचे खेडपेक्षा अधिक येणेजाणे हे घाटमाथ्यावरील गावात. त्यामुळे या दोन्हीकडच्या डोंगररांगांवर अनेक घाटवाटांचे जाळे विणले गेले. कुडपणच्या तीन वाडय़ांतून तीन वेगळय़ा वाटा वडगावात उतरतात. त्यातील निगडे घाट अधिक वापरात आहे. तर आजही कोकणातील वडगाव, काळमणी वगैरे गावातील ग्रामस्थ महार खिंड वाटेचा वापर शेलार कुडपणात जाण्यासाठी करतात. पुढे हातलोट गावातून उतरणारी गर्द राईन झाकोळलेली घाटवाट म्हणजे हातलोट घाट, जो कोकणातील बिरमणी गावात उतरतो. या वाटेवर खोदीव पायऱ्या असून घाटमाथ्यावर वाटेच्या सुरुवातीला तसेच वाटेच्या मध्ये पाण्याची खोदीव टाकीदेखील आहेत. याच वाटेवर पक्की सडक तयार करवून जगबुडीच्या खोऱ्याला वर महाबळेश्वरशी जोडण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. मधुमकरंद गडाच्या पाठीमागील नाळेतून उतरणारी कोंड नाळ कठीण श्रेणीत मोडते, त्यामुळे जरा कमीच वापरली जाते. कांदोशी मार्गे दाभे, झाडाणी, उचाट (कांदाटी खोरे) यांना जोडणाऱ्या अंगठेसरी, नाळी, तेल्या मारो, फणस नाळ या वाटा तशा अजूनही वापरात असल्या तरी वाटांवर राबता तुरळकच. अस्थान धवडे भागातून पूर्वी गुरांना चारण्यासाठी घाटमाथ्यावरील माळावर नेले जात असे. त्यामुळे येथे चार-पाच वाटा वापरात होत्या; सद्य:स्थितीत मात्र धावडा आणि अस्थान सरी या दोनच वाटा वापरात आहेत. आंबिवली ते वळवण गावांना जोडणारा आंबिवली घाट मात्र आजही भरपूर वापरला जातो.

वडगावच्या डावीकडील डोंगररांग ओलांडून पश्चिमेकडील गावात जाता येते. पांडवांचे पाणी आणि वारसदार अशा दोन घाटवाटा वडगावला कोतवालाशी जोडतात. ही दोन्ही गावे कोकणात असून सह्याद्रीच्या उपरांगेने एकमेकांपासून दुरावली आहेत. यातील पांडवांचे पाणी वाटेवर डोंगरमाथ्यावरील खिंडीत खडकात खोदलेली पाण्याची टाकी आहेत. पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधलेली पाण्याची टाकी हीच आहेत, असा गावकऱ्यांचा समज आहे. या खिंडीतून एक वाट महीपत गडावर जाते. ही वाट ज्या दरवाजाने गडावर प्रवेश करते त्या दरवाजाला कोतवाल दरवाजा म्हणून ओळखतात. 

या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेल्या गडकोटांची एक शृंखलाच या भागात पाहायला मिळते. कुडपण एक गावाच्या पाठीमागून नैर्ऋत्येकडे पसरलेल्या डोंगररांगेवर महीपत- सुमार- रसाळ अशा तीन किल्ल्यांची साखळी पाहायला मिळते, तर पूर्व-पश्चिम पसरलेल्या धारेवर मधुमकरंदगड, पर्बत, चकदेव ते थेट रघुवीर घाटावर नजर ठेवणारा महिमंडणगड असे चार किल्ले पाहायला मिळतात.

दळणवळणाच्या सुविधांची वानवा असल्यामुळे शेती आणि पशुपालन हेच येथील ग्रामस्थांचे उपजीविकेचे साधन. अधूनमधून थोडय़ाफार प्रमाणात ससे, पिसई आणि रानडुकरांची शिकारही केली जाते. भरपूर पावसामुळे भातशेती, डोंगरउतारावर नाचणी, वरी इत्यादी पिके येथे घेतली जातात. नदीकाठच्या  वाडीवस्तीवर राहणारे ग्रामस्थ प्रामुख्याने शेतीवर विसंबून आहेत, तर जनावरांना चरायला मुबलक चारा बारमाही मिळत असल्यामुळे घाटमाथ्यावर पशुपालन आणि दुग्धजन्य पदार्थाची विक्री हे उत्पन्नाचे साधन ठरले आहे. कुडपण परिसरातील धनगर वाडय़ांवर राहणारे धनगर आजही कुमठेमार्गे प्रतापगडवाडा कुंभरोशी येथे दूधविक्रीकरिता दररोज पायी जातात. घाटमाथ्यावरील कुडपण, घोणसपूर, दाभे तुरुक,  झाडणी, उचाट, वळवण, मेट शिंदी, इत्यादी वाडीवस्ती तसेच सह्यधारेवरील धवडे, अस्थान, वाडी बेलदार, रसाळवाडीतल्या या धनगर वाडय़ांवर केव्हाही गेलात तर हंडाभर ताक देऊन स्वागत होते. कोकणातील कांदोशी आणि घाटावरील उचाट या गावांना जोडणाऱ्या नाळेची वाट, तेली मारो, फणस नाळ या ट्रेकदरम्यान हंडाभर ताक आणि वाटीभर लोण्याचा पाहुणचार आम्ही अनुभवला आहे. महीपत- रसाळ- सुमार ट्रेकच्या वेळी वाडी बेलदारमधून सकाळी निघालो तेव्हा दुपारच्या जेवणासाठी  १० किलोचा दही-पोह्यांचा डबा आम्हाला भरून दिला होता. येथील आणखी एक खासियत म्हणजे तवस म्हणजेच जम्बो काकडी. बाजारपेठ दूर असल्यामुळे प्रत्येक घराच्या परसबागेत मिरची, वांगी, भेंडी, तोंडली, कारली लावलेली दिसतात. तसेच कुंपणावर तवसाचा वेल चढवलेला असतो. त्याला नेहमीच मोठ-मोठाल्या तवस लागलेल्या असतात. उन्हाळय़ात कोणाच्याही पडवीत जेवणासाठी विसावलात तर तुमच्या ताटात गार पाणीदार तवस नक्कीच असणार. अतिशय खडतर जीवन जगणारी ही कोकणी माणसं मनाने फार प्रेमळ आहेत. गावात पोहोचताच तुमची मायेने विचारपूस होते. पाहुणचार होतो. राहण्याची-जेवणाची सोय आग्रहाने केली जाते.