आषाढी विशेष
मराठी माणसाला दोनच तुकाराम माहीत होते. एक सोळाव्या शतकात देहूमध्ये राहणारा, नाठाळाचे माथा हाणू काठी असा रोखठोक व्यवहार करणारा.. दुसरा तुकाराम म्हणजे संत तुकाराम चित्रपटातला विष्णूपंत पागनीसांचा तुकाराम.. त्यात आता भर पडली आहे, चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या तुकाराम चित्रपटातील जितेंद्र जोशी यांनी साकारलेल्या तुकारामाची…
तुकाराम म्हणजे एक संत इतकेच लहानपणापासून शिकवले गेले होते आणि हे जे िबबवले गेले होते तेवढेच मला माहीत होते. इतपतच तुकाराम माझ्यासाठी मर्यादित होता. शाळेत तुकारामाचे, ज्ञानेश्वराचे अभंग शिकताना हे अभ्यासासाठी आहे असेच सांगणारे शिक्षक भेटले. त्यामुळे पाच मार्काला त्याचा अभंग शिकवला जायचा. मग तो पूर्णपणे समजायचा नाही (खरे तर ते समजण्याचे वयही नसायचं किंवा ते शिक्षकांना समजवता येत नसायचं). मग तुकाराम ऑप्शनलाच टाकला जायचा. आपल्याकडे अनेक ठिकाणी प्रवचनं होतात, भागवत सप्ताह, ज्ञानेश्वरी सप्ताहदेखील होतात. पण तुकारामाचा सप्ताह कधी कोठे आयोजित केलेला माझ्या पाहण्यात तरी आला नव्हता. पण ज्ञानोबा माउली तुकाराम या गजरातून तो जाणवायचा. ज्ञानेश्वरांचे दाखले दिले जातात. ज्ञानेश्वरी लिहिली, िभत चालवली, रेडय़ाच्या तोंडून वेद वदवले वगरे. पण तुकारामाचा उल्लेख आला की आठवतो तो तुकारामावरील पूर्वीचा चित्रपट. त्यामध्ये तुकाराम कसे दानशूर होते आणि पुष्पक विमान कशा पद्धतीने आले आणि घेऊन गेले, त्यांनी गाथा बुडवली आणि ती वर कशी आली यावरच केंद्रित झाला होता. या व्यतिरिक्त तुकाराम काय आहे तो तसा फारसा पाहिला-ऐकला जायचा नाही आणि िबबवलादेखील गेला नाही.
माझे घर काही वारकरी संप्रदायातलं नाही. त्यामुळे माझ्यापर्यंत तुकाराम पोहोचला नव्हता. पण माझ्याकडे अध्यात्म होतं का? तर होतं. घरचे संस्कार होते. आईचे वडील भजन रचायचे. आजी राममंदिरात जायची. मीदेखील जायचो. राममंदिरानंतर विठ्ठल मंदिरात जायचो. प्राजक्ताची फुलं वेचणं आणि विठ्ठलाच्या चरणी अर्पण करणं इतपतच ते होतं. पुण्यात आमचं घर वारीच्या मार्गावर होतं. मध्यमवर्गीय म्हणावं अशीदेखील आमची परिस्थिती नव्हती. तरीदेखील घरी वारीच्या आधीपासून महिना दोन महिना पसे साठवले जात असत. वारीसाठीचं ते बजेटच होतं म्हणा ना. छोटेखानी असेल पण ते होतं. २५ वर्षांपूर्वी २५ रुपयेदेखील खूप होते. मग या पशातून वारी पुण्यात आली की राजगिरा चिक्की, केळी आणली जायची. वारी आमच्या घरावरून जात असे तेव्हा मामा आणि मी वारकऱ्यांना ते द्यायचो. काही वारकरी येऊन मागून घ्यायचे. पण आमची धडपड असायची ती भजन करत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या झोळीत हे नेऊन टाकण्याची. कारण ते लोक आपल्या भजनात मग्न असायचे. ती न मागणारी माणसं होती. त्यातून जे काही संस्कार होत गेले ते सारे आपसूकच झाले. वारीबाबत जी आपापल्या परीने काही तरी मदत करायची परंपरा होती, त्या भावनेतून हे होत होते.

सावकाराच्या घरी जन्माला आलेला, सुखात वाढलेला तुकाराम, वारीचे संस्कार झालेला तुकाराम, तरुण वयात जबाबदारी त्याच्यावर आली होती. ते करत असताना दुष्काळ आला. तेव्हाच त्याला जाणवलं जी आपत्तीत कामाला येत नाही ती कसली संपत्ती? तुकारामाच्या आयुष्यातला तो ट्रिगर पॉइंट होता.

sangli lok sabha marathi news, sangli politics marathi news
सांगली: मविआतील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी दबावाचे राजकारण
What Sharad Pawar Said About Raj Thackeray?
‘राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याने सामान्य माणूस संभ्रमात’, शरद पवार म्हणाले, “मी पण सामान्य माणूस”
Baba Jumdev
विश्लेषण : विदर्भात एका ‘बाबां’बद्दल दुसऱ्या ‘बाबां’चे वादग्रस्त वक्तव्य… अनुयायांत संताप आणि भाजपला ताप!
Gudi Padwa 2024 how to make dalimbi usal recipe In Marathi
गुढीपाडव्यासाठी पारंपरिक आणि स्पेशल “डाळिंबी उसळ” मन आणि जीभेची तृप्ती करणारी रेसिपी

कालांतराने मुंबईत आलो. स्ट्रगल सुरू झाला. एक दोन सिनेमे झाले, नाटके झाली. ‘हमीदाबाईची कोठी’ करताना चंद्रकांत कुलकर्णीनी मला ‘तुकाराम’बद्दल विचारलं. माझी प्रतिमा काही समाजमान्य कवी नाही की अष्टपलू नट म्हणून नाही. हातात आलेलं काम मनापासून करणं, त्यात आनंद शोधणं अशा वृत्तीचा मी मनुष्य आहे. अशा परिस्थितीत ‘तुकाराम’ माझ्याकडे आला. माझ्या लक्षात आलं की मला वाचलं पाहिजे. त्यात चंद्रकांत कुलकर्णींची भूमिका अशी होती चमत्कारविरहित ‘तुकाराम’ करायचा. मग हा ‘तुकाराम’ काय होता याचा शोध घ्यायला सुरूवात केली. मग ‘तुकाराम’ जाणून घेण्यासाठी वाचन आलं. नेमाडे आले, दिपुंचं ‘पुन्हा तुकाराम’ वाचलं. तुकाराम जाणून घ्यायचा तर अवश्य वाचावं असं हे पुस्तक. त्यातून तुकारामाचा उलगडा होत गेला. अर्थात अजित दळवी आणि प्रशांत दळवी यांनी लिहिलेली संहिता  इतकी पक्की होती की मला फारसा त्रास पडला नाही.
पण तरीदेखील अनेकांना आक्षेप आहेत की बालपणापासून तुकाराम का दाखवला? त्याच्या घरातील इतर पात्रं का दाखवली? त्यांना हवा होता तसा तुकाराम कदाचित त्यांना दिसला नसेल. पण एक समजून घ्यावं लागेल की हा चित्रपट संत तुकारामाचा नसून ती तुकाराम या माणसाची कथा होती. तो कसा घडत गेला, सावकाराच्या घरी जन्माला आलेला, सुखात वाढलेला तुकाराम, वारीचे संस्कार झालेला तुकाराम, तरुण वयात जबाबदारी त्याच्यावर आली होती. ते करत असताना दुष्काळ आला. तेव्हाच त्याला जाणवलं जी आपत्तीत कामाला येत नाही ती कसली संपत्ती? तुकारामाच्या आयुष्यातला तो ट्रिगर पॉइंट होता. तोच माझ्याही व्यक्तिगत आयुष्यातलादेखील आहे. मी तुकारामाशी माझी तुलना करतोय असं कुणाला वाटेल, पण तशी तुलना होऊच शकत नाही. तुकाराम समजून घायला एक आयुष्यदेखील कमी पडेल. पण त्या ट्रिगर पॉइंटनंतर तुकारामाचं आयुष्य बदललं. त्याने आपल्याकडे जे काही आहे ते दुसऱ्याला दिलं. तुकारामाला वेड लागलं असं लोक म्हणत. हातातील सारी संपत्ती त्याने देऊन टाकली होती. निरिच्छ झाला होता. आपल्या परिवाराविषयी, बायकापोरांविषयी त्याला विरक्ती आली. पण त्याने आपल्या परिवाराची व्याप्ती वाढवली होती. स्वत:ची भूमिका मांडणारे अभंग त्याने लिहिलेच, पण लोकांनी तुकारामाबद्दल काय म्हटलं असतं तेदेखील तुकारामाने मांडलं आहे. विठ्ठलाच्या भक्तीचे अभंगदेखील आहेत, पण थेट विठोबाला प्रश्न विचारणारे अभंगदेखील आहेत. तुकारामाचा विद्रोह या सर्वातून दिसून येतो. तुकारामाचा हा विद्रोह नेमका काय आहे हे तुकाराम करत असताना माझ्या लक्षात आले.

विद्रोह करणारा जो माणूस असतो, तो आपला विद्रोह समाजासाठीच करत असतो. समाजातील ठेकेदारांची तमा न बाळगता हा विद्रोह त्याला करावा लागतो. पण विद्रोह करणारी व्यक्ती जर द्रष्टी असेल तर त्या विद्रोहाने समाजाला योग्य दिशा मिळते. समाजातील अनिष्ट प्रथांवर ती व्यक्ती बोट ठेवत असते. तुकारामांना संत ही पदवी त्यावेळी नव्हती. खरे तर प्रस्थापित मंडळींच्या विरुद्ध आवाज उठवला होता. त्यांनी लिहिलं ते उपेक्षित समाजाची बाजू घेऊन. त्यावेळी वृत्तपत्रे नव्हती की चॅनेल नव्हते, प्रसार व प्रचार या मौखिक परंपरेतून आलेले होते. ते टिकून राहिले.
 तुकाराम सजग होते, त्यांना अध्यात्माचं जितकं ज्ञान होतं तेवढंच माणुसकीचं आणि शास्त्राचं म्हणजे विज्ञानाचं ज्ञानदेखील होतं. ते त्यांच्या अभंगातून दिसून येतं. कधी कधी संदर्भ जुने वाटतात. पण तुकाराम संदर्भाच्या आणि काळाच्या पलीकडे जाऊन उभे राहतात. माणसाच्या भावभावनांबद्दल, षडरिपुंबद्दल, ज्या गोष्टीमध्ये आपण गुरफटले गेले आहोत त्या सगळ्याबद्दल ते बोलतात. समाजातील सर्वच स्तरावरील माणसं त्यामध्ये अडकलेली असतात, त्या गोष्टीमध्ये न अडकता भक्तीने प्रेरित होऊन तुकाराम कार्य करत होते. आपण समाजासाठी अशा प्रकारे प्रेरित होऊन काही तरी करणं अपेक्षित आहे, याची जाणीव मला तुकाराम केल्यानंतर होत गेली.

तुकाराम केल्यानंतर माझ्यात नेमका काय बदल झाला, तर देवाकडे जसा मी पूर्वी भाबडेपणाने पाहायचो तसा आता पाहत नाही. माझी श्रद्धा कमी झाली नाही. पण माझी संतांविषयी असलेली आपुलकी वाढीस लागली. आता माझा देवापेक्षा, संतावर विश्वास वाढीस लागला.

तुकाराम केल्यानंतर माझ्यात नेमका काय बदल झाला. तर सर्वात मोठा बदल म्हणजे, देवाकडे जसा मी पूर्वी भाबडेपणाने पाहायचो तसा आता पाहत नाही. श्रद्धा कमी झाली का? नाही. पण माझी संतांविषयी असलेली आपुलकी वाढीस लागली. आता माझा देवापेक्षा, संतावर विश्वास वाढीस लागला. स्वत:च सर्व विसरून समाजासाठी काम करणारी माणसं असतात, ती माणसंच समाजाला आधार देत असतात. राजकीय व्यवस्था असावी लागते वगरे सर्व मला मान्य आहे. कधी कधी व्यवस्थेतील त्रुटींबद्दलदेखील आरडाओरड होते. ते खरंदेखील आहे. पण तुकाराम म्हणा, अन्य कोणीही संत म्हणा त्यांनी जे काही केलं आहे, त्यातील एक टक्का तरी आपण काम केलं तर काय बिघडलं? आपल्या आजूबाजूच्या संपूर्ण समाजाची जबाबदारी घेऊ शकत नसलो, तरी सर्वप्रथम स्वत:ची, स्वत:च्या परिवाराची आपल्या आसपास असणाऱ्या माणसांची जबाबदारी घेऊ शकतो. तेवढी आपली शारीरिक, बौद्धिक, आíथक कुवत आहे. निदान स्वत:ची जबाबदारी घेण्याइतपत आपण समर्थ आहोत का? याचा पुन्हा एकदा नीटपणे तपास करून पाहायला पाहिजे, हे तुकाराम केल्यानंतर माझ्या प्रकर्षांने लक्षात आले.

एखादा माणूस देवळात जात नसेल, वारीत जात नसेल पण समाजासाठी काही तरी करीत असेल तर माझ्यासाठी तो माणूस मोठा आहे. तुकारामामुळे मी या निष्कर्षांप्रत येऊन पोहोचलो आहे.

तुकाराम साकारल्याने माझ्यात काय बदल झाला तर माझ्यातील काही दुर्गुण काही प्रमाणात तरी कमी झाले आहेत. एक संवेदनशील माणूस म्हणून माझ्या परीने जे वाटतं ते मी केलं आहे.
तुकोबांनी अंधश्रद्धेवर कोरडे ओढले. आपण अंधपणाने भक्ती करतो. वारीत जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं तर पुण्य लाभतं असं म्हटलं जातं. मला विचाराल तर, मला विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवावंसं वाटतं, कारण त्या पायांवर अनेक मोठमोठय़ा माणसांनी आपला माथा टेकवला आहे, ती ऊर्जा तिथं आहे म्हणून. पण वारीचं जे पुण्य आहे ते आळंदी अथवा देहूहून निघायचं आणि पंढरपूरला जायचं यातच मिळतं का? मला वारीपेक्षा महत्त्वाची वाटतात माणसं, जी वारीसाठी स्वयंसेवक म्हणून आहेत का? नाही. कारण त्याला डॉक्टर इंजिनीअर व्हायचं असतं. त्यामुळे तुकारामाचा अभ्यास करून काय गुण मिळणार, हा प्रश्न निर्माण होतो. पण तुकाराम अभ्यासासाठी नसून गुणांचे गणित नाही, तो समजून घेण्यासाठी शिकलो. माणसाने भक्तीकडे सजगपणे पाहावं हे तुकाराम साकारताना लक्षात आलं. तुकारामांना स्पर्श करताना मला प्रकर्षांने जाणवलं ते म्हणजे भक्ती आंधळेपणाने करू नये. भक्ती स्वत:च्या कल्याणासाठी असेल तर ती भक्ती नाही. एखादा माणूस देवळात जात नसेल, वारीत जात नसेल पण समाजासाठी काही तरी करीत असेल तर माझ्यासाठी तो माणूस मोठा आहे. तुकारामामुळे मी या निष्कर्षांप्रत येऊन पोहोचलो आहे. कारण मदत ही या प्रक्रियेचा पहिला भाग आहे. सहानुभूती हा शब्द दया या नावाने आपण गुळगुळीत केला आहे. सह-अनुभूती हा त्यातला भावच आपण हरवून बसलो आहे. पूर्वी हे सह-अनुभूतीचे प्रमाण जास्त होते. आपल्या पूर्वजांनी अनेक आवरणाखाली ते आपल्याला शिकवलं आहे.
आज खरं तर तुकाराम गाथेची गरज आहे असं वाटू लागलं आहे. आता असं झालं आहे की माणूस विचलित होऊन पशाच्या मागे, करिअरच्या मागे धावतोय.  विद्रोहाची तर आहेच आहे. तुकारामांच्या शब्दात सांगायचं तर ‘कोणाही जिवाचा न धरावा मत्सर, मर्म सर्वेश्वर पूजनाचे’. तुम्ही पूजा करा अथवा न करा, कोणाचाही मत्सर करू नका. सर्वावर प्रेम करा. सर्व संतांनी हेच सांगितलं आहे. तुकारामांनी त्याहीपुढे समाजाचे कान उपटले आहेत. ‘पूूजनी अर्चनी होती पोरे, मग कशाला लागती नवरे’ असं ते थेटपणे म्हणतात. देवावर विसंबून राहिलात आणि स्वत: काहीच केलं नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. तुकारामाची एक एक ओवी जरी वाटून खाल्ली तरीसुद्धा खूप सुदृढ समाज तयार होईल, असं मला वाटतं. तुकाराम साकारताना आणि आता मी निष्कर्षांवर आलो आहे.
तुकारामाने वैज्ञानिक सत्यदेखील सांगितलं आहे. आजची पिढी विज्ञानाच्या जवळ जाणारी आहे. मग संत आजच्या पिढीच्या जवळपास का पोहचत नाहीत? त्याचं असं आहे की आपल्याकडे अशी एक समजूत आहे की वय झालं की मगच प्रवचनाला जायचं. तसं नाही, ते आताच शिकवावं लागलं. माझी मुलगी तीन वर्षांची आहे, ती थोडी कळत्या-सवरत्या वयात आली की मीच तिला हे समजावून सांगेन. शालेय शिक्षणात आपण तुकारामाला गुणांच्या बेरजेत बसवले आहे. खरं तर तुकारामाची शिकवण माणूस सर्वगुणसंपन्न बनवणारी आहे. समजा, दहावीच्या मुलाला तुकारामाची गोडी लागली तर त्याला त्याचा अभ्यास करायची मुभा आहे का? नाही. कारण त्याला डॉक्टर इंजिनीअर व्हायचं असतं. त्यामुळे तुकारामाचा अभ्यास करून काय गुण मिळणार, हा प्रश्न निर्माण होतो. पण तुकाराम अभ्यासासाठी नसून गुणांचे गणित नाही, तो समजून घेण्यासाठी आहे, अशी परिस्थिती निर्माण केली तर.. खरं तर तुकाराम असा अभ्यासण्याची गरज आहे. महत्त्वाचं म्हणजे आजचे दाखले देऊन तुकाराम समजावून सांगणारी माणसं हवी आहेत. कारण आपल्याकडे संत अशा पद्धतीने शिकवलंच जात नाहीत. तुकारामाची गरज खरी या नव्या पिढीला आहे.
माझी आई रोज एका वहीत राम राम लिहिते. त्यामुळे तिला मन:शांती मिळत असेल तर आक्षेप नाही, पण तुम्ही त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. ‘वदनि कवळ घेता नाम घ्या श्री हरिचे’ हे आपण म्हणतो, त्याचा अर्थ काय आहे. देवादिकांची पूजा करणाऱ्या माणसांपेक्षा, शिर्डीला पायी जाऊन येताना गाडीने येणाऱ्या माणसांपेक्षाही, स्वत:च्या घरात आलेल्या माणसाला दोन घास भरविणाऱ्या माणसाची गरज आहे. चंद्रोदय झाल्यावर दारू पिणारी माणसे मी पहिली आहेत. त्यातून त्यांना कोणतं पुण्य मिळतं? त्यापेक्षा तुकाराम गाथा घेऊन बसा, एक तरी ओवी अनुभवा, वाचू नका, पोपटपंची करू नका, ती ओवी जगण्यात आणा. तर त्याचा उपयोग आहे. तरुणांना तुकाराम त्यांच्या भाषेत सांगायची गरज आहे.
समाजाला दिशा देणारा माणूस द्रष्टा हवा. तुकाराम गाथा वाचत असताना ते तुम्हाला जागोजागी दिसतं. तुकारामाने विठोबाला शिव्या द्यायलादेखील कमी केलं नाही. तुम्हाला आंधळेपणा आधी काढावा लागेल. तुकाराम करताना मला आजही अभिमान वाटतो की चंद्रकांत कुलकर्णीनी तो वेगळ्या पद्धतीने मांडला. तुकारामाचा सर्वात पहिला चमत्कार कोणता तर त्याच्या घराण्याकडे अनेक लोकांची कर्जाची कागदपत्रं होती. ती तुकारामाने बुडवून टाकली. आज सरकार म्हणतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. कोणाच्या जिवावर म्हणते? आज कोणता आमदार स्वत:चं असं कधी देऊन टाकतो? तुकारामाने हे पूर्वीच करून दाखवलं होतं. तुकोबाचा दृष्टिकोन खूप विशाल होता. तुकारामाची ही दूरदृष्टीची जाणीव मला तुकाराम साकारताना सातत्याने होत होती.
आपण मुद्दाम काय करतो की संतांना एकदा देवत्व बहाल करतो. असं केलं की, ते देव होते आपण साधी माणसं आहोत, असं म्हणून हात झटकायला आपण रिकामे होतो. तुकारामाच्या बाबतीत आपण हेच समजून घेत नाही. तुकाराम काय होता? तुकाराम साधा मनुष्य होता, पण बुद्धिवादी होता पण स्यूडो इंटलेक्च्युअल नव्हता. तो गाथा प्रसिद्ध करून मंदिर बांधून राहिला असता. पण त्याने स्वत:च्या कुटुंबाची व्याप्ती वाढवली होती. त्याला जे आकलन झालं होतं, ते समाजाला सांगण्यासाठी स्वत:च्या कोशात राहिला नाही.

शालेय शिक्षणात आपण तुकारामाला गुणांच्या बेरजेत बसवले आहे. समजा, दहावीच्या मुलाला तुकारामाची गोडी लागली तर त्याला त्याचा अभ्यास करायची मुभा आहे का?  तुकाराम अभ्यासासाठी नसून गुणांचे गणित नाही, तो समजून घेण्यासाठी आहे, अशी परिस्थिती निर्माण केली तर..?

तुकाराम केल्यावर आणखी एक गोष्ट जाणवली की काहीच वाया जात नाही. मी आज एखादी गोष्ट करतो आणि त्याची मला पावती मिळत नाही. पण काही पावत्या अशा असतात त्या तुम्हाला कालांतराने मिळत असतात. त्वरित उत्तर कदाचित मिळत नसतं. काळाच्या ओघात जे टिकतं ते फिरून वर येणारच. तुकोबांच्या गाथेसारखे आहे. तुम्ही केलेली कोणतीही चांगली गोष्ट असो ती आपोआप वर येणारच येणार, त्याला दुसरा पर्यायच नाही.
तुकाराम केल्यामुळे माझ्यात पूर्ण बदल झाला, असं मी म्हणणार नाही. माझ्यात लहानपणापासून होत्या अशा काही गोष्टी अधोरेखित झाल्या. आपण एखाद्यासाठी काही केलं, परोपकार केले तर ते त्याच्यासाठी नाही तर माझ्या आत्मिक समाधानासाठी आहे. जे घडतंय त्याचा मी एक भाग आहे, हे तुकारामाने मला जाणवून दिलं.