विण्डोजप्रेमींसाठी खुशखबर म्हणजे लवकरच विण्डोज टेन येत आहे. अर्थात मायक्रोसॉफ्टने विण्डोज टेनचे डेमो व्हर्जन लोकांना उपलब्ध करून दिल्यामुळे टेनचे साधारण स्वरूप कसे असेल याचा अंदाज लोकांना आला असला तरीही विण्डोज टेनबाबत उत्सुकताही तेवढीच आहे.
आता अवघ्या काही दिवसांतच म्हणजेच २९ जुलै रोजी मायक्रोसॉफ्ट विण्डोजचे नवीन रूप जगासमोर आणणार आहे ते म्हणजे विण्डोज टेन. जगभरात घरोघरी विण्डोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जात असल्यामुळे विण्डोजच्या नवीन व्हर्जनबद्दल साऱ्या जगात उत्सुकता आहे. अर्थातच विण्डोज टेनचे डेमो व्हर्जन लोकांना खुद्द मायक्रोसॉफ्टने उपलब्ध करून दिल्यामुळे अनेकांना विण्डोज टेनचे साधारण स्वरूप कसे असेल, याबाबत अंदाज आलाच आहे.
कोर्टाना : अ‍ॅपलने काही वर्षांपूर्वी आयफोन फोर एस बाजारात आणला होता. त्यामध्ये सीरी नावाचे पर्सनल असिस्टंट अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले होते. त्या काळी त्याची खूप चर्चाही झाली. आता त्याच धर्तीवर आधारित असे कोर्टाना नावाचे पर्सनल असिस्टंट अ‍ॅप्लिकेशन विण्डोज टेनसोबत आपल्याला उपलब्ध होणार आहे. हे अ‍ॅप्लिकेशन विण्डोज फोन एटवर चालणाऱ्या मोबाइलधारकांना नवीन नाही. पर्सनल असिस्टंट अ‍ॅप्लिकेशन म्हणजे आपण या कोर्टानाला प्रश्न विचारायचे आणि ती आपल्याला योग्य उत्तर देते. समजा, तुम्ही तिला सांगितले की, कोर्टाना, टेल मी अ जोक- की तुमचे वेब ब्राउजर वापरून हे अ‍ॅप्लिकेशन जोक शोधून काढेल आणि तुम्हाला तो वाचून दाखवेल. याच अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून आपण आपल्या मीटिंग्जचे टाइम, अलार्म म्हणून साठवू शकता कुणालाही ठरावीक वेळेत ई-मेल पाठवू शकता, इत्यादी. आता ही कोर्टाना सीरीपेक्षा उपयुक्त ठरेल की नाही हे काही काळातच कळेल. परंतु मध्यंतरीच्या काळात व्हॉइस डिटेक्शन टेक्नॉलॉजीमध्ये बरेच काम झाले आहे, त्यामुळे याचे रिझल्ट सीरीपेक्षा लाभदायक ठरतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. हे कोर्टाना अ‍ॅप्लिकेशन आपल्या होम स्क्रीनवर खाली सर्च बॉक्सच्या स्वरूपात उपलब्ध असेल. त्यामुळे आता सर्च करण्यासाठीचा सर्च बॅक्स आपल्याला स्टार्ट मेन्यूमध्ये पूर्वीसारखा शोधावा लागणार नाही.
व्हच्र्युअल डेस्कटॉप : आताच्या विण्डोजमध्ये एक बाब म्हणजे व्हच्र्युअल डेस्कटॉप आपण जर एकाच वेळी अनेक अ‍ॅप्लिकेशन्सवर काम करत आहात आणि आपल्याला एका अ‍ॅप्लिकेशनवरून दुसऱ्या अ‍ॅप्लिकेशनवर जायचे असेल तर आपण ं’३ +३ुं वापरून शिफ्ट करू शकतो किंवा टास्कबारवर शोधून त्याद्वारे अ‍ॅक्सेस करू शकतो, परंतु आता यामध्ये आपल्याला व्हच्र्युअल डेस्कटॉप विण्डोज आणि टॅब बटन वापरून आपण टास्क व्ह्य़ूवर जाऊ शकता. आपल्या सोयीसाठी आपण अ‍ॅण्ड डेस्कटॉप बटणाचा वापर करून एका नवीन डेस्कटॉप स्क्रीनवर चालू अ‍ॅप साठवू शकता आणि गरज लागली की सहज अक्सेसही करू शकता.
एज ब्राउजर : विण्डोज टेनमध्ये आपल्याला मिळणारे आणि एक महत्त्वाचे फीचर म्हणजे यात असणारे नवीन ब्राउजर इंटरनेट एक्स्प्लोरर आपणा सर्वाच्या परिचयाचे आहे, पण एक नवीन फीचरसह असणारे ब्राउजर विण्डोज टेन आपल्याला उपलब्ध करून देणार ते म्हणजे एज ब्राउजर यामध्ये असणाऱ्या काही फीचर्सपैकी एक म्हणजे रीिडग मोड आपण इंटरनेटवर एखादी महत्त्वाची माहिती वाचत असाल तर या रीडिंग मोडमध्ये बाकी स्क्रीन अ‍ॅनिमेशन ऑफ होते आणि आपल्याला वाचावयाचा कंटेण्ट आपण सहजतेने वाचू शकतो. शिवाय आपल्याला एखादी माहिती कुणाला सेंड करायची असेल तर त्यातील ठरावीक भाग आपण आपल्या सोयीने हायलाइटदेखील करू शकतो, यामुळेच मोझीला आणि क्रोमपेक्षा हे ब्राउजर उत्तम ठरू शकेल, अशी आशा मायक्रोसॉफ्टला वाटत आहे.
इनबिल्ट अ‍ॅप्स : आपल्याला या विण्डोज टेनसोबत मिळणारी उत्तम बाब म्हणजे इनबिल्ट अ‍ॅप्लिकेशन्स. विण्डोज टेनसोबत आपल्याला स्काइप प्री-इनस्टॉल्ड असते, ज्यामुळे आपल्याला व्हिडीओकॉल्स करणे सोयीचे होते. याखेरीज गुगलच्या स्ट्रीट व्ह्य़ूला उत्तर म्हणून मायक्रोसॉफ्टने स्ट्रीटसाइड अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे, तसेच सर्व प्रकारच्या नोट्ससाठी वन नोट अ‍ॅप्लिकेशनही आपल्याला उपलब्ध होते. मायक्रोसॉफ्टच्या वन ड्राइव्ह आपण क्लाउड स्टोअरेज म्हणून वापरत असाल तर त्याच्याच विविध अ‍ॅप्लिकेशनद्वारे कोणत्याही डिव्हाइसवरून आपण डेटा सहज अ‍ॅक्सेस करू शकता यासाठीदेखील फोटो व्हय़ूअर आणि म्युझिक अ‍ॅप आपणांस मदतगार ठरतात.
विण्डोज टेनसाठी कुणासाठी मोफत?
– विण्डोज सेव्हन आणि एट, एट पॉइंट वन वापरणाऱ्यांसाठी मायक्रोसॉफ्ट विण्डोज टेनचे अपडेट मोफत उपलब्ध करून देणार आहे, त्यासाठी आपल्याला आपल्या डिव्हाइसवरून मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवर अपडेटसाठी रजिस्टर करावे लागणार आहे.
– ४ इंच ते ८० इंचाच्या सर्व विण्डोज डिव्हाइसेससाठी विण्डोज टेन उपलब्ध होऊ शकणार आहे.
वरील सर्व फीचर्स हे विण्डोजने उपलब्ध करून दिलेल्या डेमो व्हर्जनमधील आहेत. मुळात २९ तारखेला विण्डोज लाँच झाल्यावर आपल्याला अनेकविध नवनवीन बाबी पाहावयास मिळतील, कारण हे डेमो व्हर्जन साधारण १०-१२ लाख लोकांनी वापरून त्यावर आपापल्या प्रतिक्रिया, तक्रारी विण्डोजकडे नोंदविल्या आहेत, ज्या विचारात घेऊन २९ जुलैला सर्वसमावेशक असे विण्डोज टेन आपल्यासमोर येणार आहे. जर आपण विण्डोज युजर असाल तर विण्डोज टेनसाठी रजिस्टर करायला वेळ दवडू नका. कारण नया है यह..!
प्रशांत जोशी – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व टेकफंडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Windows ten
First published on: 24-07-2015 at 01:08 IST