१. एका आयताचे क्षेत्रफळ १०० चौरस मीटर असून त्या आयताची परिमिती ५८ मीटर आहे. तर आयताची लांबी व रुंदी किती?

२. एका एकत्र कुटुंबात एकूण २४ माणसे आहेत. त्यांची आजच्या वयाची सरासरी २० वर्षे आहे. आणखी पाच वर्षांनी त्या कुटुंबात एकाही व्यक्तीची वाढ झाली नाही असे गृहीत धरले तर त्यांच्या वयाची सरासरी किती असेल?

३. अजिंक्यने एका मालिकेत ५६, ८७, ७८, ०, १२, ४५ आणि ‘अ’ अशा धावा केल्या. मालिकेतील त्याच्या धावांची सरासरी ५० असेल तर त्याने शेवटच्या सामन्यात काढलेल्या धावा (अ) किती?

राहुलचे सध्याचे वय ४२ वर्षे आहे. पाच वर्षांनतर त्याची आणि त्याच्या वडिलांच्या वयाची सरासरी ६० वर्षे होणार असेल, तर राहुलच्या वडिलांचे सध्याचे वय किती?

उत्तरे :
१) आयताची लांबी २५ मीटर व रुंदी ४ मीटर
२) वयाची सरासरी २५ वर्षे
३) शेवटच्या सामन्यात काढलेल्या धावा ७०.
४) राहुलच्या वडिलांचे सध्याचे वय ६८ वर्षे