22 July 2019

News Flash

इदं न मम

बागेतल्या एका बाकावर विसावलो होतो. रिवाजानुसार तासभर गोल गोल चकरा मारून झाल्या होत्या. नाव नाना-नानी पार्क; पण आसपास फक्त नानाच नाना दिसत होते. नावापुरतीसुद्धा एकही नानी पार्कमध्ये...

अंतर-ज्ञान

माझा अतिअभ्यासू सन्मित्र प्राध्यापक मनोहर नाकावर घसरलेला जड आणि जाड चष्मा डोळ्यांवर ढकलून मला म्हणाला, ‘‘तो टीव्ही आधी बंद कर आणि मला सांग, तू बरॅक ओबामाला ओळखतोस?’’

परिभक्षक

राष्ट्रीय स्तरावरच्या वजनदार नेत्याच्या लेकीच्या घरी पाहुणचार झोडण्याचा योग आला. सुरुवातीला चहा आला. लेकीच्या पतिदेवांनी दर्पोक्ती केली, ‘इतमिनानसे पिओ. इस में एक भी चीज देसी नहीं है.’

स्वातंत्र्य

एका आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संशोधन केंद्राचे संचालक म्हणजे एक बडं प्रस्थ आहे. खूप बिझी असतात. तरीही दर तिमाहीला प्रत्येक संशोधकाच्या कामाचा सखोल आढावा ते स्वत:च घेतात. एका भारतीय रिसर्च

खो-खो

नवीन टीव्ही घेतला. जुना नीट चालत होता. पण शेजारणीनं घेतला म्हणून आम्ही एल-ई-डी आणि एच-डी या अगम्य पदव्या प्राप्त केलेला टीव्ही आणला. बिनडोक मालिकाच पाहायच्या तर डबल ग्रॅज्युएट टीव्हीची...

बुटमार्क

अजूनही बरेच विवाह अ‍ॅरेंज्ड मॅरेज पद्धतीने जुळवले जातात. आमच्या शेजारची उपवर कन्या सध्या हेच दाखवणे-बघणे कार्यक्रम करतेय.

नॉन-व्हेज दूध

अमेरिकेत मुक्काम असताना एकदा बायकोच्या मत्रिणीला भेटायला गेलो. अर्थातच बायकोसकट. ३० वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झालेली ती कट्टर जैनधर्मीय मत्रीण अजूनही

कचरा

चंदू माझा बालमित्र. त्याच्या घरी दोन दिवसांकरता राहायला गेलो होतो तेव्हाची गोष्ट. त्यानं नवीन वॉटर फिल्टर घेतला होता.

ओळख

मी बुचकळ्यात पडलो. अमेरिकन नागरिक जाता-येता ‘ओह, शिट्!’, ‘ओह, शिट्!’ करत असतात हे माहीत होतं.

घमघमाट

एका बहुराष्ट्रीय कंपनीचा प्रॉडक्ट मॅनेजर माझ्या हातात एक प्लास्टिकची बाटली सरकवत म्हणाला, ‘‘हे आमचं नवीन उत्पादन. बाथ सोप.’’

आरोग्यभान

स्थळ : अमेरिका. लोणकढी तुपाचा अमेरिकन साइझचा सातवा चमचा तिसऱ्या पुरणपोळीवर खसाखसा घासत टॉम कपाळावर आठय़ा चढवून म्हणाला, ‘‘तुम्ही इंडियन लोक खूपच फॅटी आणि हाय-कॅलरी पदार्थ खाता.’’

जीन्स

माझा परमोच्च मित्र एकदा टेबलावर ग्लास आदळून करवादला, ‘‘माझी मुलगी सदान्कदा घुश्शात असते. जरा काही मनाविरुद्ध झालं की थयथयाट करते.’’

चिनी माता

आमचा अमेरिकेतील शेजारी त्र्यंबक धांदरफळे ऊर्फ टॉम डॅडफॉल्स मला स्थानिक विभागातल्या प्राथमिक शाळेत घेऊन गेला. निमित्त होतं शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं. अमेरिकन चिल्लीपिल्ली हा सोहळा कसा साजरा करतात हे पाहण्याची

गुलाम

तुम्ही कधी गिफ्ट पेपरमध्ये गुंडाळलेली फुल साइझची छत्री पाहिलीय का? मी तर ती हातात धरून विमानप्रवास केलाय. हातात घ्यावी लागली, कारण ती सूटकेसमध्ये मावत नव्हती.

बिनपायांचे!

दोनदा बेल वाजली तरी मी दरवाजा उघडला नाही. शेवटी बायको म्हणाली, ‘‘कोण आलंय बघा तरी.’’ पण घरमालकिणीनं बजावून सांगितलं होतं, ‘‘या एरियामध्ये थेफ्ट आणि डॅकॉयटीज् वाढल्या आहेत. डोअर ओपन करूच

वानप्रस्थ

एका घरगुती समारंभाचं निमंत्रण देण्यासाठी दूरचे नातेवाईक- श्रीयुत पाटील यांच्या घरी मी गेलो होतो. ते ऑफिसात गेल्याचं श्रीमती पाटील म्हणाल्या.

मेरा भारत..

पायजमे सूटकेसमध्ये टाकायचं राहून गेल्यामुळे स्थानिक यजमान मला ‘ए फॉर अ‍ॅपलपासून झी (झेड कधीच बाद झालाय!) फॉर झिप’पर्यंतच्या सर्व जीवनोपयोगी वस्तू एकाच छपराखाली मिळणाऱ्या घराजवळच्या सुपरमार्केटमध्ये घेऊन गेला. अमेरिकेत

भ्रमगाथा

आमच्या कंपनीच्या मॉस्कोमधल्या एजंटांच्या कार्यालयात मी बसलो होतो. दोन-तीन महिने खोळंबलेलं एक दणकट सरकारी कंत्राट मंजूर झाल्याचा फोन आला. मी प्रचंड खूश झालो. तोंडावाटे शीळ बाहेर पडली. शिट्टीतून ‘एक-दो-तीन’

आमच्या काळी..

माझ्या शालेय कालखंडात झटपट क्रिकेट नव्हतं. निवांतपणे पाच दिवसांच्या टेस्ट मॅचेस् होत असायच्या. मध्ये एक दिवस सुट्टी. म्हणजे एकूण सहा दिवस एकेका सामन्याचा उत्सव चालायचा. अशा ऐसपस क्रिकेट सामन्याचं

विश्वपुरम

हल्ली माझा गोंधळ उडालाय. माझा बालमित्र चंदू काही दिवसांपूर्वी एका चर्चासत्राला गेला होता. कारण काही नाही. केवळ अनेक वर्षांपासूनची पुण्यनगरी सवय म्हणून. तिथं एक स्थानिक तज्ज्ञ एकविसाव्या शतकाचं अर्थशास्त्र

सुबत्ता

अरिवद सेवानिवृत्त झाला. अर्धागिनीची अजून पाच र्वष बाकी असल्यामुळे तो एकटाच अमेरिकेला मेहुण्याच्या घरी महिन्याभराच्या मुक्कामाला गेला. हातपाय धुऊन बठकीच्या खोलीत आला तेव्हा दिग्विजयी भाचा त्याच्या गावठी पिताश्रींना तावातावानं

यावे त्याच्या वंशा!

रात्री दीडच्या सुमाराला माझ्या स्वीडिश पाहुण्यानं मला विचारलं, ‘‘यलगॉन कुठे आहे?’’ पाहुण्याला तासाभरापूर्वी मी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर रिसीव्ह केलं होतं. गाडी ताजमहाल हॉटेलच्या दिशेनं पळत होती. पाहुण्यानं विमानात मान टेकून

शुचिर्भूत

‘‘आपण सकाळी केलेली अंघोळ संध्याकाळच्या पूजेला चालते, तर संध्याकाळी केलेली अंघोळ सकाळच्या पूजेला का चालू नये?’’ अमिताचा हा प्रश्न ऐकून सासू ‘आ’ वासून बघतच राहिली.

आम अ‍ॅडमी

शा लिवाहन शके १९३४ च्या वैशाख मासात अ‍ॅडमसेन नावाचा एक नॉर्वेसुपुत्र भारतात येऊन गेला. नॉर्वेकराची पहिलीच भारतभेट. यापूर्वी त्यानं यूरोपच्या बाहेरही पाऊल टाकलेलं नव्हतं. पहिल्या दिवशीच्या स्वागत भोजनसमयी त्याच्या भारतीय