सर आर्थर कोनन डॉयल या स्कॉटीश लेखकाचा मानसपुत्र असणारा लंडनस्थित गुप्तहेर शेरलॉक होम्स याच्या रहस्यकथा माहीत नसणारा वाचक शोधूनही सापडणार नाही. उत्कंठावर्धक, तर्कसुसंगत आणि क्षणोक्षणी कलाटणी घेणाऱ्या या रहस्यकथांचे गारूड १०० वर्षांहून अधिक काळ वाचकांच्या मनावर कायम आहे. वरकरणी काहीसं विचित्र व्यक्तिमत्त्व असणारा होम्स  हा अतिशय हुशार, चाणाक्ष, साहसी आणि डोकेबाज गुप्तहेर आहे. एखाद्या गुतांगुतीच्या गुन्हेगारीच्या केसचा ज्या जलद गतीने तो मागोवा घेतो की, त्याच्या तर्कशुद्ध विचारसरणीपुढे वाचक थक्क होऊन जातो. यामुळेच गुन्हेगारी पाश्र्वभूमीवर घडणाऱ्या या कथा गंभीर न वाटता वाचकाची उत्सुकता शिगेला पोचवणाऱ्या आहेत.
शेरलॉक्स होम्स वाचकांच्या भेटीला प्रथम आला तो ‘अ स्टडी इन स्कार्लेट’ या कादंबरीतून- १८८७ साली. पुढे अनेक कथा, दीर्घकथा, चित्रपट अशा माध्यमातून तो भेटतच राहिला.
स्कार्लेट म्हणजे रक्ताचा लाडभडक रंग. अर्थात, गुन्ह्य़ाचा रंग. डॉ. जॉन वॉटसन या आपल्या मित्राला होम्स आपल्या व्यवसायाची ओळख करून देताना म्हणतो, ‘‘मी एका खुनाच्या तपासाचा शोध घेण्यात व्यस्त आहे-‘अ स्टडी इन स्कार्लेट’.
रहस्यकथांमध्ये जाड भिंग हे गुन्ह्य़ाच्या तपासातील महत्त्वाचे साधन म्हणून वापरले गेले ती पहिलीच साहित्यकृती म्हणजे ‘अ स्टडी इन स्कार्लेट.’ लष्करातील माजी वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या डॉ. वॉटसनच्या नजरेतून आपण घटना पाहत पुढे सरकतो. होम्सच्या रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भूगोल, साहित्य अगदी मानसशास्त्रातील अगाध ज्ञानापुढे वॉटसन थक्क होतो. एका मध्यरात्री एका पडिक बंगल्यात झालेला मि. ड्रेबर याचा खून व हाती आलेले विस्कळीत पुरावे यांच्या आधारावर खुनाचा शोध सुरू असतानाच ड्रेबरचा सहकारी मि. स्टँगरसन याचाही खून होतो. त्यातूनच उलगडला जातो या दोन्ही खुनांमागील रहस्यकथेचा सनसनाटी प्रवास.
कादंबरीच्या दुसऱ्या अंकातून आपण फ्लॅशबॅकमध्ये जातो तो थेट परीकथेप्रमाणे भासणाऱ्या सॉल्ट लेक व्हॅलीमध्ये. जॉन फेरीयर आणि त्याची मुलगी ल्युसी या पात्रांची या भागात ओळख होते. जेफरसन होप या सूडाने पेटलेल्या तरुणाचा आणि ड्रेबर-स्टँगरसन यांच्या खुनामागील कारणाचा हळूहळू उलगडा होतो. होम्सची कुशल कार्यपद्धती आणि त्याचे तर्कशुद्ध विचार यांची सांगड घालताना आर्थर डॉयल यांनी आपल्या निरीक्षणातून मानवी स्वभावाच्या विविध छटा, मानवी वृत्ती व भावनिक गुंतागुंत यांचेही यथार्थ दर्शन घडवले आहे. त्यामुळेच कदाचित या रहस्यकथा व त्यांचा सूत्रधार शेरलॉक होम्स आज अजरामर झाले आहेत. मूळ इंग्रजी कथेतील थरार तितक्याच क्षमतेने अनुवादातही उतरवण्याचा  यशस्वी प्रयत्न झाला आहे. अर्थात याचे श्रेय जाते अनुवादक प्रवीण जोशी यांना.      
‘अ स्टडी इन स्कार्लेट’- सर आर्थर कोनन डॉयल, अनुवाद- प्रवीण जोशी, कनक बुक्स, पृष्ठे- १०६, मूल्य-१०० रु.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
loksatta kutuhal artificial intelligence introduction of computer vision
कुतूहल : संगणकीय दृष्टी म्हणजे काय?
article about poet robert frost
बुकबातमी : उत्सवाच्या पलीकडचा रॉबर्ट फ्रॉस्ट!