अमित एकटाच खेळत बसला होता. तेवढय़ात ‘चित्राचा सराव करून बघ रे. स्पर्धा जवळ आलीय ना!’ आईच्या स्वयंपाकघरातून सूचना सुरू झाल्या.
‘शी बाबा, आत्ता कुठे खेळायला सुरुवात केली होती. जराही मनाप्रमाणे खेळू देत नाही. सारखी कशासाठी तरी मागे लागते,’ अमित फुरंगटून म्हणाला.
‘अरे, पण या स्पध्रेत तर तू स्वत:हून भाग घेतला होतास. आईने कुठे जबरदस्ती केली होती?’ कुठून तरी एक अनोळखी आवाज आला. अमितनं आजूबाजूला पाहिलं तर कपाटावर चिकटवलेला बाल गणेश त्याच्याशी बोलत होता.
‘बाप्पा तू खरंच माझ्याशी बोलतो आहेस?’ अमितनं आश्चर्यानं विचारलं. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.
‘तुझ्या नाकावरच्या रागाला माझ्याकडे काही औषध आहे का ते बघत होतो. पण स्वारी एवढी का चिडलीय? ते तर कळू दे.’ बाप्पा म्हणाला.
‘ही मोठी माणसं सतत हे केलं का, हे असंच का नाही केलं, हे इथे का ठेवलं, हे करू नको अशा सूचनांचा भडिमार करत असतात. मनसोक्त खेळूही देत नाहीत. मला अमित असण्याचा अगदी कंटाळा आलाय,’ अमितनं त्याच्या नाराजीचं कारण सांगितलं.
‘मग तुला आई-बाबांसारखं मोठ्ठं व्हायला आवडेल का? ते तुला रागावतात किंवा एखादी गोष्ट करण्यापासून थांबवतात त्यापाठीमागे तुला त्रास होऊ नये असा हेतू असतो की नाही? त्यांनाही  कधी कधी त्यांच्या मनाप्रमाणे करता येत नाही. म्हणजे बघ हं, तुला बागेत फिरायला नेण्याचं आणि आईस्क्रीम खाऊ घालण्याचं वचन बाबांना ऑफिसमधील कामामुळे पाळता आलं नाही की तुझा हिरमुसलेला चेहरा पाहून त्यांना वाईट वाटतं. आई सकाळपासून सतत काही ना काही कामात गुंतलेली असते आणि ती जरा शांत बसली की तू हे हवंय ते हवंय असा धोशा लावतोस. बरोबर ना? ती रागावते, पण उठून तुला हवी ती गोष्ट देते ना?’ बाप्पानं अमितला समजावलं.
‘ठीक आहे. मग त्यापेक्षा मला झाड व्हायला आवडेल. म्हणजे मला कोणी ओरडणार नाही. अभ्यासाचं टेन्शन नाही.’ आपल्याला मस्त पर्याय सुचला यावर अमित खूश झाला.
‘हं तुझा पर्याय चांगला आहे. पण झाडाला त्याचे अन्न आई बनवून देत नाही. ते त्याला स्वत:चे स्वत: बनवावे लागते. दिवस-रात्र, ऊन-वारा-पाऊस सहन करत त्याला एकाजागी उभे राहावे लागते. सर्वाना फळं-फुले देऊ शकतो याचा झाडाला आनंद असतो. पण काही खोडकर मुले दगड मारून फळे पाडतात तेव्हा झाडाला ते मुकाटय़ाने सहन करावे लागते. काही माणसे त्यांच्या स्वार्थासाठी झाडे तोडतात. म्हणजे झाडांच्या जिवाला धोका हा असतोच. झाडाची ही बाजू तुला माहीत आहे ना? शिवाय कंटाळा आला म्हणून तू आजचे काम उद्यावर ढकलू शकतोस. पण झाडाला असं करता येईल का? सर्वाना ऑक्सिजन देण्याचं काम त्याला अव्याहत करावंच लागतं. त्यानं तसं केलं नाही तर काय होईल याची तर कल्पनाही करता येत नाही ना!’ बाप्पा म्हणाला.
‘नको रे बाबा, तसंही एकाच जागी उभं राहणं हे अतिशय कंटाळवाणं आहे. त्यापेक्षा मला पक्षी होऊन गगनात विहार करायला आवडेल किंवा एखादा प्राणी होऊन जंगलात मनसोक्त भटकायला आवडेल,’ अमितनं उत्साहानं सांगितलं.
‘पशु-पक्ष्यांचे जीवनही तू समजून घे. एक एक काडी जमवून पक्षी घरटं बांधतात. सोसाटय़ाचा वारा, पाऊस, फटाके यांच्यापासून त्यांना धोका असतो. माणसे स्वत:च्या घरात राहण्यासाठी पक्ष्यांना एकतर थारा देत नाहीत. पक्षी पाळले तर ते िपजऱ्यात डांबून ठेवतात. म्हणजे त्यांचं खाणं-पिणं एकूणच जगणं माणसाच्या मर्जीवर अवलंबून असतं. त्यांना स्वच्छंदपणे भरारी घ्यायला परवानगी नसते आणि जंगलातील प्राण्यांची कथा यापेक्षा वेगळी नाही. प्रचंड प्रमाणात जंगलतोड होत असल्याने त्यांना स्वत:चा जीव मुठीत धरूनच राहावं लागतं.’’ बाप्पाचे बोलणे ऐकून अमित विचारात पडला.
‘उपद्रवी किडा-मुंगी कोणालाच आवडत नाहीत. म्हणजे त्या पर्यायांवर तर माझी फुलीच,’ अमित म्हणाला.
‘मग आता कोण व्हावंसं वाटतं आहे?’ बाप्पानं विचारलं.
‘मी तुझ्यासारखा बाप्पा झालो तर! तुझी तर नेहमी मजाच असते. पेढे काय, मोदक काय!’ अमितने बाप्पाला निरागसपणे विचारलं. बाप्पा अमितकडे बघून हसला.
‘खूप जबाबदारीचं काम असतं हं हे. तुझ्यासारख्या अनेकांच्या मागण्यांचा अभ्यास मलाही करावा लागतो. त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तुमचा रोषही पत्करावा लागतो,’ बाप्पाने स्वत:ची बाजू सांगितली.
‘बापरे! म्हणजे तुझ्या कामांची यादी तर मोठीच असते,’ अमित भुवया उंचावून म्हणाला.
‘आणि कधीही न संपणारी!’ बाप्पाने अमितचे वाक्य पूर्ण केले.
‘एकूण काय! नेहमीच स्वत:च्या मनासारखं होतं असं नाही. तर कधीतरी इतरांच्या मनासारखं केलं पाहिजे हे मला आता पटलं आहे. आई-बाबा माझे किती लाड करतात. छान छान खाऊ, खेळणी, गोष्टीची पुस्तकं सर्व काही आणून देतात. तेव्हा मी त्यांचे नक्कीच ऐकेन. मला आई-बाबांचा शहाणा अमितच राहायचं आहे. अमित म्हणूनच काही तरी वेगळे करण्याचा मी प्रयत्न करेन,’ अमित समजूतदारपणे म्हणाला.
‘तथास्तु’ असे म्हणून बाप्पा अदृश्य झाला.

चेंडूची  हनुमानउडी
nandinithattey@gmail.com
ज मिनीवर आपटल्यावर चेंडू उसळतो, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण मोठा चेंडू छोटय़ा चेंडूला जास्त उसळायला मदत कशी करतो, ते आपण या प्रयोगात पाहणार आहोत.

Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित
pune girl suicide marathi news
पुणे: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या; शरीरावर मारहाणीचे व्रण
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
seat sharing formula of mahayuti and mahavikas aghadi
युती-आघाडीचे पहले आप! परस्परांच्या हालचालींवर लक्ष, जागावाटप रखडल्याने उमेदवारी याद्या लांबणीवर

साहित्य :  एक फुटबॉलसारखा जड मोठा चेंडू आणि एक टेबल टेनिसच्या चेंडूसारखा हलका छोटा चेंडू.

कृती : प्रथम दोन्ही चेंडू एकाच उंचीवरून खाली सोडून ते जमिनीवर आपटल्यावर किती उसळतात, ते नीट पाहा.
मग जड मोठा चेंडू एका हातात धरून दुसऱ्या हाताने त्याच्यावर छोटा हलका चेंडू ठेवा. दोन्ही चेंडू एकमेकाला चिकटलेलेच राहतील अशा रीतीने ते खाली सोडा.
मोठा चेंडू जमिनीवर आपटताच त्याच्या डोक्यावर ठेवलेला छोटा चेंडू वेगाने जोरदार उसळी घेईल.
हाच प्रयोग वेगवेगळ्या उंचीवरून चेंडू सोडून, तसेच अधिक जड आणि कमी जड असणारे वेगवेगळे चेंडू घेऊन पुन:पुन्हा करून पाहा.

वैज्ञानिक तत्त्व : चेंडू खाली आपटल्यावर वर उसळण्यासाठी त्याला ऊर्जा लागते. चेंडू विशिष्ट उंचीवर धरल्यामुळे त्या उंचीनुसार त्याच्यामध्ये स्थितीजन्य ऊर्जा साठवली जाते. या ऊर्जेमुळेच तो वर उसळी घेतो.
जड चेंडूच्या डोक्यावर जेव्हा आपण हलका चेंडू धरतो तेव्हा त्या दोन्ही चेंडूंची एकत्रित स्थितीजन्य ऊर्जा ही हलक्या चेंडूच्या स्थितीजन्य ऊर्जेपेक्षा कितीतरी जास्त असते. चेंडू एकावर एक धरल्यामुळे खाली आपटल्यावर मोठय़ा चेंडूच्या गतिजन्य ऊर्जेचा काही भाग वरच्या हलक्या चेंडूला मिळाल्याने तो आधीपेक्षा कितीतरी जास्त उसळतो. चेंडूंच्या वजनांमधील फरकामुळे हलक्या चेंडूची उसळी स्पष्टपणे लक्षात येईल इतकी जास्त असते.    

डोकॅलिटी
jyotsna.sutavani@gmail.com
बालमित्रांनो, आपण गुढीपाडवा नुकताच साजरा केला. या आठवडय़ात रामनवमी येत आहे. रामायणानुसार लंकाधिपती रावणाचा वध करणे हे श्रीरामांचे महत्त्वाचे जीवनकार्य होते. राम-लक्ष्मण बंधूंना लंका विजयाच्या या महान कार्यात पशु-पक्ष्यांचे सहकार्य लाभले. रामायण कथेतून ही नावे तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहेतच. आजच्या कोडय़ाचा हाच विषय आहे. नावे ओळखण्यासाठी तुम्हाला सूचक माहिती दिलेली आहे.
१) सीतेला पळवून नेत असताना रावणाशी लढणारा गृध (गिधाड).
२) सीतेच्या शोधार्थ अष्टदिशांना वानरांना पाठवणारा श्रीरामांचा स्नेही, वानरराजा.
३) वाली पुत्र. रावणाकडे शिष्टाईसाठी गेलेला श्रीरामांचा दूत.
४) सप्त चिरंजीवांपकी एक. आपल्या शेपटीने लंका पेटवणारा.
५)विश्वकम्र्याचे पुत्र. लंका पार करण्यासाठी समुद्रावर सेतू बांधणारे स्थापत्यविशारद.
६) लंकेचा समुद्र फक्त पवनपुत्रच उल्लंघून जाऊ शकतो, असे खात्रीने सांगणारा.
७) सीता रावणाच्या अंत:पुरात बंदिवान आहे, असे सांगणारा दिव्यदृष्टी असलेला गृधराज.
८) सेतू बांधताना ह्या चिमुकल्या जीवानेही आपल्या परीने कामाचा वाटा
 उचलला होता.    
ससुल्या
muktakalanubhuti@gmail.com
साहित्य : पांढरा, केशरी, हिरवा कागद (कार्डपेपर), क्रेयॉन्स, कात्री, गम, काळा पेन इ.
कृती : दिलेल्या आकृत्या पांढऱ्या कागदावर मधोमध दुमडून एका बाजूस काढा. आकृती क्र. १ साधारण आयताकृती आकारात बसवा. जेवढा लहान-मोठा ससा हवाय त्याप्रमाणे ठरवा. (साधारण ६ इंच ७ १० इंचाच्या कागदात हातभर मोठा ससा बनेल.) डोक्याच्या व कानाच्या भागांसाठी साधारण लहान आकाराचा कागद घेऊन मध्यावर दुमडा. एका बाजूस आकृती काढून कापा. शेपटी व धड एकमेकांना जोडा. मग डोके व लांब कान जोडा. केशरी रंगाच्या चौकोनाच्या गुंडाळ्या करा व लांब कान जोडा. केशरी रंगाच्या चौकोनाच्या गुंडाळ्या करा व गाजराचा आकार (चण्याच्या पुडीप्रमाणे) बनवा.  हिरव्या रंगाच्या (आकाराप्रमाणे लहान-मोठे) चौकोनाचे गुंडाळी करून केशरी रंगाच्या गुंडाळीत गाजराचे पान वाटेल असे अडकवा किंवा चिकटवा. कात्रीने कातरून पाने अलगद वेगळी करा. झाला आपला गाजर खाणारा कागदी ससुल्या तयार!