धाविक या पक्ष्याचा नमुना थॉमस सी. जेर्डन या ब्रिटिश पक्षीशास्त्रज्ञाने गोदावरी आणि पेन्नार नदीच्या खोऱ्यातून १८४८ मध्ये गोळा केला. या पक्षीशास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ या पक्ष्याला जेर्डन्स कोर्सर असे म्हटले जाते. जेर्डनच्या मते, हा पक्षी आंध्रप्रदेशमधील नेल्लोर, कडप्पा, भद्राचलम्, अनंतपूर आणि महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे दिसत असे. आणि या जिल्ह्यांच्या मर्यादित भागात दिसत असल्याने तो प्रदेशनिष्ठ असावा असा त्याचा निष्कर्ष होता. कालांतराने त्याचा हा निष्कर्ष बरोबर असल्याचे दिसून आले. १८७१ सालापर्यंत या निष्कर्षांसंदर्भात खात्रीलायक नोंदी मिळाल्या. त्यानंतर मात्र तो कोणालाही दिसला नाही. त्यामुळे १९०० साली या पक्ष्याचा समावेश नामशेष यादीत करण्यात आला. या पक्ष्याला जगातील अति संकटग्रस्त पक्षी प्रजातींपकी एक समजले जाते. भारतीय टपाल खात्याने १९९८ साली या पक्ष्याच्या सन्मानार्थ एक तिकीट प्रकाशित केले आहे.
धाविक पक्षी हे फक्त आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये सापडतात. जगात धाविक पक्षी आणि त्याच्या भाईबंदांच्या सुमारे १७ जाती सापडतात. हे सर्व पक्षी ग्लरिओलिडी कुटुंबातील असून, भारतात यांच्या ६ जाती सापडतात. त्यांची विभागणी धाविक (Courser) आणि पाणिभगरी ( Pratincole) अशा दोन गटांत केली गेली आहे. धाविक पक्षी मध्यम आकाराचे, उंच पायांचे, कीटकभक्षी आहेत आणि ते माळरानावर राहतात. तर पाणिभगऱ्या छोटय़ा पायांच्या, कीटकभक्षी आहेत आणि पाण्याजवळ राहतात. धाविक पक्ष्यांना त्यांचे हे मजेशीर नाव त्यांच्या धावण्याच्या सवयीमुळे मिळाले असावे. जवळ धोका असल्याची चाहूल लागल्यास हा पक्षी उडून जाण्यापेक्षा धावणेच जास्त पसंत करतो. पण गरज पडल्यास हा अतिशय चांगले उड्डाणही करू शकतो.
जेर्डनचा धाविक इतर दोन धाविक पक्ष्यांपेक्षा सवयीच्या आणि राहणीमानाच्या बाबतीत थोडा वेगळा आहे. तो इतरांप्रमाणे दिवसा फिरणारा नसून रात्री भटकतो. बाकीचे धाविक पक्षी ओसाड माळरानात राहतात, तर हा झुडपी जंगले पसंत करतो. याचे साधम्र्य भारतातील धाविक पक्ष्यांपेक्षा आफ्रिकेत सापडणाऱ्या धाविक पक्ष्यांशी जास्त वाटते. याचा एक अर्थ असा होतो की हा पक्षी अतिप्राचीन असावा. जेव्हा भारत आफ्रिकेशी जोडलेला होता त्यावेळी यांची एकच जात असावी, पण जेव्हा भारतीय उपखंड आफ्रिकेशी वेगळा झाला तेव्हा यांच्या नव्या जातींचा उदय झाला असावा. पण याचे भक्कम पुरावे आपल्याकडे नाहीत.  
असा हा वेगळा पक्षी आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील रेड्डीपल्ली या गावात १९८६ साली पुन्हा सापडला. त्यानंतर या पक्ष्यावर Bombay Natural History Society या संस्थेने काही वर्ष अभ्यास करून माहिती मिळवली. या माहितीत असे दिसून आले की, हा पक्षी फक्त आंध्रप्रदेशातील झुडपी जंगलातच सापडतो. त्यामुळे हा प्रदेशनिष्ठ असावा, हा निष्कर्ष खरा ठरला. हा ज्या प्रकारच्या परिसरात वावरतो तिथे विरळ झुडपे व झाडोरा असतो; ज्यामध्ये अंजन, करवंद आणि बोराची झुडपे आणि खुरटे गवत उगवते. याचे मुख्य अन्न हे वाळवी आणि इतर छोटे किडे आहेत. अभ्यासात असेही दिसून आले आहे की, जिथे वाळवीची वारुळे जास्त प्रमाणात आहेत तिथेच हा पक्षी जास्त दिसून येतो. या पक्ष्याच्या विणीच्या हंगामाबाबत फार कमी माहिती उपलब्ध आहे. याचे एक अंडे अन्रेस्ट मिटन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने १९१७ मध्ये आंध्रप्रदेशातून जमा केले होते. तसेच जेर्डनचा धाविक पूर्वी दोन राज्यांतील ५ जिल्ह्यांमध्ये सापडायचा, तो आता फक्त कडप्पा जिल्ह्यातील श्री लंकमल्लेश्वर अभयारण्य आणि नेल्लोर येथील श्री पेनूनसुला नरसिंहास्वामी अभयारण्य, पलकोंडा आणि वेलकोंडा डोंगररांगांमध्ये अस्तित्वासाठी झगडत आहे. असे समजले जाते की, आता यांची संख्या ५० पेक्षा कमी राहिली आहे. याचे मुख्य कारण आहे ते झुडपी जंगलाचा ऱ्हास. मोसंबीच्या बागांसाठी आणि शेतीसाठी झुडपी जंगले मोठय़ा प्रमाणात तोडली जात आहेत. अर्निबध गुरेचराई, वणवे आणि इतर विकासकामे यांमुळे या दुर्मीळ पक्ष्याचा अधिवास संपत चालला आहे. जिथे २००४ साली शेवटचा कोर्सर पहिला गेला तिथे आता तेलगु-गंगा कालवा बनवण्यात आला आहे. हा कालवा या परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला, पण धाविक पक्ष्यासाठी मात्र तो एक शाप ठरला आहे. त्यामुळे धाविकांच्या आपणास ज्ञात असलेल्या काही जागांपकी अगदी मोक्याची जागा नष्ट झाली आहे. इथले पक्षी आता दुसरीकडे गेले असावेत किंवा नष्ट झाले असावेत. या पक्ष्याचे मुख्य कार्य हे झुडपी जंगलांचे वाळवीपासून संरक्षण करणे असावे. हा धाविक जर नष्ट झाला तर वाळवीच्या प्रकोपाने या परिसरातील नसíगक संतुलन बिघडू शकते. आणि ते जर बिघडले तर त्याचा फटका आजूबाजूच्या शेतांवर व शेतकऱ्यांवर निश्चितच होईल. हे सर्व पाहता माणसाच्या विकासापुढे धाविक पक्ष्याची धाव मात्र कमी पडली, असेच म्हणावे लागेल.
(छायाचित्र सौजन्य : सिमॉन कुक)

डोकॅलिटी
ज्योत्स्ना सुतवणी jyotsna.sutavani@gmail.com  
बालमित्रांनो, आजच्या कोडय़ाचा विषय आहे योगासने. शरीर निरोगी राहण्यासाठी आणि मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी योगासने उपयुक्त ठरतात, हे आपल्याला माहीतच आहे. एका गटात तुम्हाला आसनांची चित्रे आणि दुसऱ्यात सदर आसनांची नावे ज्यावरून दिली गेली आहेत ती सूचक चित्रे देत आहोत. त्यांच्या योग्य जोडय़ा लावून आसनांची नावे ओळखायची आहेत.

Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
puppy rescue
माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video


 

 

 

 

 

कावळोबा
साहित्य : काळा, पांढरा कार्डपेपर, पांढरा आणि काळा क्रेयॉन, कात्री, गम, दोरा इ.
ती : साधारण ६ इंच ७ ९ इंचाच्या काळ्या कागदाला मधोमध दुमडून आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे वरील बाजूस कापून घ्या. दुसऱ्या काळ्या चौकोनी कागदाची फॅन फोल्डमध्ये शेपटी बनवून घ्या. त्यावर पांढऱ्या रंगाच्या क्रेयॉनने शेडिंग करून मग धडाला चिकटवा. आणखीन एका काळ्या चौकोनी कागदाला दुमडून साधारण (४.५ इंच ७ ६ इंच) मध्यापासून खालीपर्यंत अर्धगोलाकारात कापून घ्या. त्या कागदाचे जवळजवळ अर्धवट कापून पंख बनवून कावळ्याच्या धडाला शेपटीप्रमाणे पांढऱ्या क्रेयॉनने शेडिंग करून चिकटवून घ्या. पांढऱ्या कागदाची चोच बनवा व त्यावर काळ्या क्रेयॉनने शेडिंग करून डोक्याच्या भागावरील टोकावर चिकटवा. आता आपले कावळोबा उडण्यास तयार. पंखांना दोऱ्याने बांधा. खिडकीवर लटकवा. अशा प्रकारे वेगवेगळे पक्षी तयार करता येतील.