पद्मभूषण ताराबाई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ यांनी आदिवासी मुलांसाठी सुरू केलेले शैक्षणिक प्रयोग केले ते ‘कोसबाड’मध्ये. मोडक आणि वाघ यांच्या या प्रयोगांची दखल महाराष्ट्रभर घेतली गेली. याच ठिकाणच्या विद्यालयात काम केलेल्या शिक्षकाचे हे पुस्तक आहे. अध्यापनाच्या काळात आलेले अनुभव, शिकायला मिळालेल्या गोष्टी आणि मुलांचा चौकसपणा वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न असे या पुस्तकाचे एकंदर स्वरूप आहे. शिक्षणतज्ज्ञ गिजुबाई बधेका, अनुताई आणि ताराबाई यांच्याविषयीच्या काही आठवणीही या पुस्तकातून वाचायला मिळतात. जेन गुडाल पासून हॉथॉर्न या अमेरिकन लेखकांपर्यंत अनेकांच्या पुस्तकांची ओळख आणि त्यांचा दृष्टिकोन सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
‘दृष्टी’ – प्रदीप राऊत, सम्यक प्रकाशन, ठाणे, पृष्ठे- ११७, मूल्य- १२० रुपये.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 26, 2014 1:03 am