28 January 2020

News Flash

वेगळ्या अहिल्याबाई

अहिल्याबाई होळकरांची मराठीमध्ये अनेक चरित्रं आहेत. मग पुन्हा या नव्या चरित्राचे वेगळेपण ते काय? लेखकाने सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे की, होळकर घराण्याविषयीचे बरेच ग्रंथ निरक्षीर

| November 10, 2013 12:02 pm

अहिल्याबाई होळकरांची मराठीमध्ये अनेक चरित्रं आहेत. मग पुन्हा या नव्या चरित्राचे वेगळेपण ते काय? लेखकाने सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे की, होळकर घराण्याविषयीचे बरेच ग्रंथ निरक्षीर न्यायाने पाहिले गेलेले नाहीत. त्यामुळे लेखकाने ते पाहून प्रस्तुत चरित्र लिहिले आहे. याचबरोबर लेखकाने अहिल्याबाईविषयी अनेक व्याख्याने दिली आहेत. अहिल्याबाई यांचा रीतसर अभ्यास करून इतिहासकार गो. स. सरदेसाई आणि वासुदेवशास्त्री खरे यांनी अहिल्याबाईंविषयी लिहिलेल्या टीकात्मक लेखनाचा समाचार यात घेतला आहे. त्यामुळे हे चरित्र लहान असले तरी वेगळे आहे.

अवलियांची व्यक्तिचित्रे
रूढ संकेतांना झुगारून, संकेतमान्य गोष्टींपेक्षा वेगळं काहीतरी..भन्नाट म्हणावं असं करणाऱ्या व्यक्तीला अवलिया असं रूढार्थानं म्हटलं जातं. या पुस्तकात अशाच नऊ व्यक्तींची ओळख करून दिली आहे. क्रिकेट, संगीत आणि राजकारणातील ही मंडळी आहेत. क्रिकेटमधील व्यक्तींची संख्या अधिक आहे, हे संझगिरी यांचे पुस्तक म्हटल्यावर ओघानेच आले. प्रभात स्नफ स्टोअरचे मुकुंद आचार्य, गायक तलत मेहमूद, प्रसिद्ध अभिनेते देव आनंद, फिल्मी दुनियाचे दादामुनी अशोककुमार, क्रिकेटपटू डेनिस कॉम्प्टन, सर गॅरी सोबर्स आणि बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश आहे. या सर्वच व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात स्वत:चे बळकट स्थान निर्माण केले. चांगले-वाईट पायंडे पाडले. त्यांची संझगिरी यांनी रेखाटलेली व्यक्तिचित्रे वाचनीय म्हणावी अशी आहेत.
‘अफलातून अवलिये’ – द्वारकानाथ संझगिरी, मैत्रेय प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १६०, मूल्य – १७५ रुपये.

कादंबरीमय चरितकथा
कृष्णराव गांगुर्डे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक आदरणीय नाव. हिंदूुमहासभेशी ते निगडित होते. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सहवास मिळाला. या तिन्ही महामानवांच्या विचारांचा गांगुर्डे यांच्यावर चांगलाच परिणाम झाला. त्यांचे काम लोकांसमोर यावे, या हेतूने त्यांच्या मुलानेच त्यांच्या जीवनावर आधारित ही चरित्रात्मक कादंबरी लिहिली आहे. म्हणजेच हे वस्तुनिष्ठ चरित्र नाही. तरीही गांगुर्डे यांच्या जीवनाची साधारण कल्पना या कादंबरीतून येऊ शकते.
‘ध्येय-पथिक’ – विश्वास गांगुर्डे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, पृष्ठे – २३३, मूल्य – २०० रुपये.

First Published on November 10, 2013 12:02 pm

Web Title: book review in short
Next Stories
1 शिक्षणाबद्दलची व्यापक भूमिका
2 कहाणी.. एका निमिषाची
3 दिवाळी.. नेमेचि आणि असामान्य!
Just Now!
X