22 February 2020

News Flash

काऊ बेल्स

‘काऊ बेल’ याचा शब्दश: अर्थ बघितला तर तो गाईच्या गळ्यात बांधायची घंटा असा होतो. कुरणात चरायला गेलेल्या गाईंच्या गळ्यात घंटा बांधल्या तर त्यांच्या किणकिणीमुळे त्यांचा

| April 26, 2015 12:20 pm

‘काऊ बेल’ याचा शब्दश: अर्थ बघितला तर तो गाईच्या गळ्यात बांधायची घंटा असा होतो. कुरणात चरायला गेलेल्या गाईंच्या गळ्यात घंटा बांधल्या तर त्यांच्या किणकिणीमुळे त्यांचा माग घेणे सोपे जाईल या कल्पनेतून काऊ बेल्सचा उगम झाला. अशा घंटांना जरी ‘काऊ बेल्स’ म्हणत असले तरी शेतकरी त्यांच्या शेळ्या, मेंढय़ा, बल आदी गुरांच्या गळ्यातदेखील त्या बांधतात. स्वित्र्झलड ही काऊ बेल्सची भूमी समजली जाते.
एप्रिल-मे महिना आला की हल्ली बऱ्याच भारतीय पर्यटकांना युरोपला जाण्याचे वेध लागतात. मग कोणत्या देशांना भेटी द्यायच्या, तेथून काय काय खरेदी करायची याचे बेत सुरू होतात. त्याचवेळी स्वित्र्झलडला गेलो की तिथले सोव्हिनियर म्हणून एखादी काऊ बेल खरेदी करायची असे ठरते. काऊ बेल म्हटलं की सहसा आठवते ती ‘दिलवाले दुल्हनिया’मधली काजोलने स्वित्र्झलडला घेतलेली भलीमोठी घंटा! पण एक शोभेची वस्तू किंवा स्वित्र्झलडची आठवण यापलीकडे त्या घंटेविषयी कोणाला फारशी माहिती नसते.
‘काऊ बेल’ याचा शब्दश: अर्थ बघितला तर तो गाईच्या गळ्यात बांधायची घंटा असा होतो. कुरणात चरायला गेलेल्या गाईंच्या गळ्यात घंटा बांधल्या तर त्यांच्या किणकिणीमुळे त्यांचा माग घेणे सोपे जाईल या lr22कल्पनेतून काऊ बेल्सचा उगम झाला. अशा घंटांना जरी ‘काऊ बेल्स’ म्हणत असले तरी शेतकरी त्यांच्या शेळ्या, मेंढय़ा, बल आदी गुरांच्या गळ्यातदेखील त्या बांधतात. स्वित्र्झलड ही काऊ बेल्सची भूमी समजली जाते. तेथील लोकांसाठी आल्प्स पर्वतराजीमध्ये फिरताना तिथे चरणाऱ्या गाईंच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज कानावर पडणे हे एखाद्या स्वर्गीय सुखासारखे असते. या देशात घंटागृहातील घंटा कायम घणघणत असतात. तर कुरणांत चरत असलेल्या गुरांच्या गळ्यात बांधलेल्या घंटा कायम किणकिणत असतात.
स्वित्र्झलडमध्ये गाईंना खूप महत्त्व आहे यात काहीच आश्चर्य नाही. त्यांच्या अर्थव्यवस्थेत दुभत्या जनावरांचा मोठा वाटा असून तिथे गाई आणि काऊ बेल्स यासंबंधीच्या काही रूढी आणि परंपराही प्रचलित आहेत. त्यांच्या संस्कृतीत आणि संगीतात काऊ बेल्सना फार महत्त्वाचे स्थान आहे. स्विस लोकसंगीतात काऊ बेल्सच्या आवाजाचा अतिशय सुंदर वापर केलेला दिसून येतो. गाईंच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्या कुरणातल्या दुष्ट शक्तींना दूर करतो व तिथे त्यांच्या गाई निर्वघ्निपणे चरू शकतात अशी तेथील लोकांची समजूत आहे. या सर्वामुळे गाई आणि काऊ बेल्सशी निगडित काही उत्सव आजही तिथे साजरे केले जातात.
वसंत ऋतूचे आगमन होते आणि आल्पाईन देशांतील लोक त्याच्या स्वागतासाठी सज्ज होतात. भूतलावरचा बर्फ वितळला की झाडांना पालवी फुटते आणि कुरणात हिरवेगार गवत उगवते. अनेक देशांत यावेळी उत्सव साजरे केले जातात. पर्वतराजींच्या कुशीत वसलेल्या गावांतील लोक आपल्या गाईंना वाजतगाजत आल्प्समधील कुरणांत चरायला घेऊन जातात. यावेळी तिथे लहान-मोठय़ा आकाराच्या काऊ बेल्स बनवल्या जातात. गावातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या गाईच्या गळ्यात त्यातली सर्वात मोठी घंटा बांधली जाते. आणि ही गाय मिरवणुकीच्या अग्रभागी असते. इतर गाईंच्या दूध देण्याच्या प्रमाणावर त्यांच्या गळ्यातील घंटेचा आकार ठरतो. घंटेबरोबरच गाईंच्या िशगांना फुलांच्या माळा बांधून त्यांना नटवले जाते.
ज्या काळात काऊ बेल्स या अगदी दुर्मीळ होत्या त्या काळात स्विस लोकांच्या काऊ बेल्ससंबंधीच्या समजुती व त्यावरून तयार झालेल्या अनेक दंतकथांमुळे त्यांना खूपच महत्त्व प्राप्त झाले. अशा वेगवेगळ्या कहाण्यांमधून ‘काऊ बेल्स’ हा शब्द सतत लोकांच्या कानांवर पडू लागला. अशीच एक कथा ऐकली.. स्वित्र्झलडमधील एका गुराख्याच्या मुलाची. त्या मुलाच्या गाईच्या गळ्यात बांधलेली घंटा एके दिवशी हरवते. खूप शोधूनसुद्धा ती सापडत नाही तेव्हा तो रडायला लागतो. त्याला रडताना बघून तिथे एक परी येते व त्या घंटेच्या बदल्यात त्या मुलाला सोन्याचे नाणे, सोन्याची साखळी अशा किमती वस्तू देऊ करते. मुलाला अशा मौल्यवान वस्तूंपेक्षा त्याच्या गाईची घंटा जास्त प्रिय असते. तो परीला म्हणतो, ‘‘मला माझ्या गाईच्या गळ्यातली घंटा शोधून दे. मला दुसरे काहीही नको.’’
त्याचे उत्तर ऐकून परी खूश होते. मुलाच्या सच्चेपणाचे आणि त्या घंटेवरच्या प्रेमाचे तिला कौतुक वाटते. थोडय़ाच वेळात ती मुलाची घंटा शोधून आणते. ती घंटा जेव्हा परीच्या हातातून त्या मुलाच्या हातात जाते तेव्हा ती सोन्याची झालेली असते. मुलगा त्या घंटेकडे बघतच राहतो. तो ती सोन्याची घंटा परीला परत देण्यासाठी वर बघतो तर तिथे परी नसतेच. ही कथा ऐकून मला आपल्याकडच्या लाकूडतोडय़ा आणि त्याच्या कुऱ्हाडीची गोष्ट आठवली. lr24पूर्वीच्या काळी या देशातील शेतकरी आपल्या गाईंच्या गळ्यात मोठमोठय़ा घंटा बांधत असत. शेतकरी जेवढा जास्त पसेवाला; तेवढी घंटा मोठी असे. या घंटांवर सुंदर चित्रे व नाजूक कलाकुसर केलेली असे. गंमत म्हणजे कोणाच्या गाईची घंटा सर्वात सुंदर व मोठी याबाबत एकमेकांशी स्पर्धा करताना काही वेळा या घंटांची किंमत गाईच्या किमतीपेक्षा जास्त होत असे. बहुतेक सगळ्या ‘काऊ बेल्स’ या जाड पत्र्यापासून बनवलेल्या असून त्यावर दुसऱ्या धातूचा मुलामा दिलेला असतो. मुलामा दिल्यावर ती चकचकीत पृष्ठभागाची घंटा तशीच ठेवली जाते किंवा त्यावर निरनिराळी चित्रे काढली जातात. या घंटांच्या कडीमध्ये सजवलेली कातडी किंवा कापडी पट्टी अडकवलेली असते. पत्रा ठोकून ठोकून या घंटा बनवलेल्या असल्याने त्यातून येणारा आवाज अगदी नादमधुर असतो. मुलाम्यामुळे त्या आवाजाच्या गोडव्यात आणि घंटेच्या रूपात भरच पडते. काऊ बेल्सवरचे आणि त्यांच्या पट्टीवरचे चित्र त्या- त्या भागातील संस्कृतीप्रमाणे आणि भौगोलिक स्थानाप्रमाणे बदलते. काही संस्कृतींमध्ये असे मानले जाते की, या पट्टय़ांमुळे गुरांना एक प्रकारचे संरक्षण मिळते. पूर्वी गाईंच्या गळ्यात पोर्सलिनच्या घंटा बांधत असत. नंतर त्याची जागा धातूच्या घंटांनी घेतली. आज घोडे, उंट, हत्ती, रेनडियर्स अशा प्राण्यांच्या गळ्यातही घंटा बांधल्या जातात; पण त्यांचे आकार थोडय़ाफार फरकांनी वेगळे असतात.
अशा घंटा म्यानमार, इंडोनेशिया, कोरिया, भारत या देशांतील खेडय़ांमधून हस्तकलेची वस्तू म्हणून बनवल्या जातात. स्वित्र्झलडप्रमाणेच नॉर्वे, फिनलंड, स्विडन या देशांतही जनावरांच्या गळ्यात विशिष्ट प्रकारच्या घंटा बांधायचा प्रघात आहे. नॉर्वेच्या पश्चिम किनाऱ्यावरील मोई या गावी मोएन नावाच्या एका माणसाने स्विस काऊ बेल्सच्या धर्तीवर काही घंटा तयार केल्या. त्याने लोखंडी पत्र्यापासून या घंटा बनविल्या व त्यावर पितळेचा पातळ मुलामा दिला. त्यामुळे या घंटांना एक वेगळेच रूप आणि नाद मिळाला. विशेष म्हणजे मोएनने नॉर्वेजियन लष्कराच्या प्रॅक्टिस रेंजवरील वापरलेली काडतुसे वितळवून त्याचा या घंटांवर मुलामा देण्यासाठी वापर केला. शेतकऱ्यांसाठी बनविलेल्या या घंटा पुढे मदानी खेळांतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वापरल्या गेल्या. आज युरोपमधील हिवाळी खेळांच्या स्पध्रेच्या वेळी या ‘मोएन बेल्स’ हमखास दिसतात.
सर्व नॉíडक देशांत पाळलेल्या रेनडियर्सच्या गळ्यात घुंगरासारखी दिसणारी घंटा बांधलेली असते. त्यासाठी बहुतेक वेळा चामडी पट्टी घेऊन त्यावर ही घंटा बसवलेली असते. रेनडियरच्या पाठीवर बांधण्यासाठी एक चामडी पट्टा केलेला असतो आणि त्यावर अनेक घंटा लावलेल्या असतात. फिनलंडमधील एक रेनडियर फार्म बघायला गेलो असता तिथल्या रेनडियरच्या पिल्लांच्या गळ्यात रंगीबेरंगी दोऱ्यात अडकवलेल्या घंटा बघितल्या. त्या पिल्लांचे वय ओळखण्यासाठी त्यांच्या जन्मदिवसानुसार वेगवेगळ्या रंगांच्या दोऱ्या होत्या. त्या घंटांमधून अतिशय सुंदर आवाज येत होता. गळ्यात बांधलेल्या घंटांचा आवाज करत इकडेतिकडे बागडणारे ते छोटे रेनडियर्स बघायला फारच मजा आली. अशा रेनडियर्सच्या घंटांना ‘रूडाल्फची घंटा’, ‘सांताक्लॉजची घंटा’ किंवा ‘घसरगाडीची घंटा’ असेदेखील म्हणतात. त्यांना नाव काहीही असले तरी त्या घंटांमध्ये काहीतरी जादू असते. असे म्हणतात, की रेनडियर्सनी ओढणाऱ्या बर्फावरील घसरगाडीतून जेव्हा सांताक्लॉज नाताळची भेट देण्यासाठी घराघरातून जातो तेव्हा तो त्या- त्या घरात अशी एक छोटीशी घंटा ठेवून येतो.
अशा वेगवेगळ्या प्राण्यांच्या गळ्यात बांधण्यासाठी अनेक आकारांच्या आणि प्रकारच्या काऊ बेल्स बनवणे हा आज स्वित्र्झलडमधला मोठा उद्योग बनला आहे. या घंटा आज स्वित्र्झलडची खासियत झाल्या आहेत. त्यामुळेच चीज आणि चॉकलेटसाठी प्रसिद्ध असलेल्या या देशाची ‘गळ्यात घंटा अडकवलेली गाय’ ही प्रातिनिधिक खूण बनली आहे.
तर अशी आहे ही स्वित्र्झलडच्या काऊ बेल्सची कहाणी!    
   

First Published on April 26, 2015 12:20 pm

Web Title: cowbells
Next Stories
1 नृसिंह मंदिरे : एक शोध
2 .. प्रादेशिक बातम्या देत आहेत!
3 विलास सारंगांचे लेखक असणे..