News Flash

फर्ग्युसनचे दिवस (भाग १)

६५ मध्ये पुण्यात मुख्य अशी कॉलेजेस् म्हणजे चार-दोनच. फर्ग्युसन, एसपी, गरवारे आणि पूर्व भागात वाडिया. साधारणपणे न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमधला मुलगा फर्ग्युसनमध्ये जाई, तर नूतन

| April 26, 2015 12:17 pm

६५ मध्ये पुण्यात मुख्य अशी कॉलेजेस् म्हणजे चार-दोनच. फर्ग्युसन, एसपी, गरवारे आणि पूर्व भागात वाडिया. साधारणपणे न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमधला मुलगा फर्ग्युसनमध्ये जाई, तर नूतन मराठी lok02विद्यालयातील मुलगा हा एसपी कॉलेजला जाणार हे जवळजवळ विधिलिखितच असे. बाकी एम. ई. एस. म्हणजे गरवारे किंवा वाडिया हे पर्याय होते; नाही असं नाही. पण मॅट्रिकनंतर मुलांनी अ‍ॅडमिशन कुठे घेतली, या चच्रेत कायम फग्र्युसन किंवा एसपी हीच दोन कॉलेजं असायची. शिक्षणात १० + २ + ३ हा आकृतिबंध अजून यायचा होता. शाळेत ११ वीला मॅट्रिक, नंतर कॉलेजमध्ये पहिलं वर्ष हे प्री-डिग्री, नंतर इंटर सायन्स. त्या परीक्षेच्या मार्कावर इंजिनीयिरग किंवा मेडिकलची अ‍ॅडमिशन ठरायची. नंतर बी. एस्सी.ची दोन वष्रे असा आकृतिबंध होता. आमची शाळा रमणबाग; त्यामुळे फग्र्युसन वाटय़ाला आलं. सायकलवरून शनवारपेठेमधून उताराने ओंकारेश्वरजवळचा मुठा नदीवरचा कॉजवे.. मग सायकल हातात धरून वृद्धेश्वर मंदिराचा घाट चढून यायचं.. पुढे शिरोळे रोडवरून फग्र्युसनचं मेन गेट.
त्यात अडचणी दोन होत्या. एक म्हणजे वडिलांनी कॉलेजला जाणार म्हणून घेऊन दिलेले बूट. कोणतीही वस्तू घ्यायची म्हणजे ती टिकाऊ आणि दणकटच पाहिजे, हा त्यावेळचा मध्यमवर्गीय खाक्या. माझे वडील वसंतराव हे स्वातंत्र्यसनिक. ४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत ते साडेचार वष्रे येरवडा जेलमध्ये होते. ना. ग. गोरे, एस. एम. जोशी आदी नेतेही त्यावेळी येरवडा जेलमध्येच होते. त्यामुळे वडिलांना नेहमी जेलमध्ये कैदी ज्या वस्तू तयार करतात त्याबद्दल अप्रूप असे. मला जे बूट दिले गेले ते जेलमध्ये कैद्यांनी तयार केलेले. एकदम दणकट. त्याचे जे बाह्य़ स्वरूप होते ते बघून कोणत्याही १६-१७ वर्षांच्या मुलाला ते बूट घालताना लाज वाटेल असेच होते. शिवाय ते बूट चावायचेसुद्धा. चालताना त्यांचा सौम्य आवाजही येई. सायकल चालवताना चमत्कारिक जड जड वाटे. एरवीची माझी चालही थोडी बदललेली वाटे. साधारणपणे रस्त्यावर डांबर टाकणारे कामगार ज्या प्रकारचे बूट वापरत असत, त्या जवळ जाणारा तो बुटाचा प्रकार होता. एकदा धीर करून वडिलांजवळ थोडा तक्रारीचा सूर लावला. त्यावर त्यांचे म्हणणे एकच, की घालून घालून एकदम फिट्ट होतील. पण ते तसे कधीच फिट्ट नाही झाले.
दुसरी अडचण अशी होती की, ६५ मध्ये माझे आजोबा- आईचे वडील न. वि. ऊर्फ काकासाहेब गाडगीळ हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. ते मोठे विद्वान, पं. नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळातले मंत्री, लोकप्रिय नेते, साहित्यिक.. त्यामुळे सतत नीट वागावे लागे. त्यात नातवाचे हे असले बूट! त्यामुळे सगळ्यांचे लक्ष जणू माझ्या बुटांकडेच आहे असं वाटून मला संकोच वाटत असे. पण चीनच्या ६२ च्या आक्रमणामुळे  शासनाने सर्व विद्यार्थ्यांना एनसीसीचं प्रशिक्षण दोन वष्रे अनिवार्य केलं होतं. सगळ्यांना आठवडय़ातून तीन वेळा सकाळी साडेसहा ते साडेआठ ग्राऊंडवर एनसीसीचा युनिफॉर्म घालून परेडसाठी जावेच लागे. तेव्हा जे बूट सगळ्यांना घालावे लागत, त्या एनसीसीच्या बुटांच्या घराण्यात आणि मला तुरुंगातून आणलेल्या बुटांच्या lr03घराण्यात विलक्षण साम्य निघालं. अशा रीतीने अखेर सगळ्यांच्या चालीला माझी चाल मॅच झाली. हळूहळू वडिलांच्या आणि माझ्या जाण्या-येण्याच्या वेळा कॉलेजमुळे बदलत गेल्या आणि जेलच्या बुटांचा विषयही संपला.
प्री-डिग्री सायन्सला त्यावेळी इंग्लिश भाषा हा विषय अनिवार्य होता. आणि मराठी/ िहदी/ संस्कृत किंवा नागरिकशास्त्र यांपकी एक विषय घ्यायला लागायचा. या विषयांत पास होणे फक्त जरुरीचे असे. एकुणात हे मार्क गृहीत धरत नसत. माझ्या वाटय़ाला आले नागरिकशास्त्र आणि अर्थातच इंग्रजी. या वर्गाना विद्यार्थ्यांची उपस्थिती यथातथाच असे. पण दोन शिक्षकांचे वर्ग याला अपवाद होते. एक इंग्रजीचा. या विषयाच्या आमच्या मॅडम होत्या- नंतर ‘एकेक पान गळावया’, ‘दुस्तर घाट’, ‘तेरुओ’ अशा पुस्तकांनी प्रसिद्ध झालेल्या कथालेखिका गौरी देशपांडे! त्यांच्या इंग्रजी कविता ‘इलस्ट्रेटेड वीकली’मध्ये येत असत. त्यामुळे त्यांच्या वर्गात एकदम हाऊसफुल्ल गर्दी. त्यांच्या बिनधास्त, उंच आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वावर विद्यार्थी एकदम खूश असत. वर्गातली त्यांची एन्ट्री अतिशय ड्रॅमॅटिक असे. तास सुरू होण्याआधी दोन-तीन मिनिटे त्यांना कुणीतरी बाईक किंवा स्कूटरवरून आणून सोडणार.  मग त्या केसांचा बॉब, जीन्स आणि कुडत्यात थेट अगदी वर्गापर्यंत येणार. वर्गाच्या उंबरठय़ावर आल्यावर कधी कधी एखादी सिगारेट खिशातून लायटर काढून पेटवणार. मग तासाची वेळ घडय़ाळात बघून सिगारेट टाकून झपाटय़ाने वर्गात प्रवेश. सगळी पोरं स्तिमित होऊन मॅडमची एंट्री पाहतच राहायची आणि इंग्रजी शिकण्याकडे त्यामुळे जरा दुर्लक्षच व्हायचं. त्या शिकवायच्या मात्र मनापासून आणि मस्तच.
मॅडमभोवती वलय असण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं घराणं. त्यांची आई म्हणजे प्रसिद्ध लेखिका, संशोधक इरावती कर्वे (१९०५-१९७०) आणि भारतरत्न धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) हे त्यांचे आजोबा. इरावती कव्र्याविषयी मी तेव्हा फक्त ऐकून होतो. पण गौरी मॅडमना बघितलं की मला त्यांचे आजोबा आठवायचे. त्यांची आमच्या शाळेतली एन्ट्री आठवायची. ते १०५ वष्रे जगले. १९५८ मध्ये आमच्या छोटय़ा शाळेत.. म्हणजे शनवारातल्या नवीन मराठी शाळेत धोंडो केशव कर्वे यांचा १०० वा वाढदिवस साजरा झाला, तेव्हा आम्ही चौथीत होतो. धोंडो केशव एकदम साधे, उंचीने बुटके आणि कमालीचे कृश होते. दाढी वाढवलेली. lr04डोक्याला टोपी. डोळ्यांवर गोल चष्मा. एखाद्या ध्यानस्थ ऋषीसारखे दिसायचे. १०० व्या वाढदिवशी काठी टेकत शाळेच्या हॉलमध्ये झालेली त्यांची ती एन्ट्री. त्यांनी समोर बघून नमस्कार केल्यावर िवगेत बसलेल्या शाळेच्या विष्णू या सेवकाने दोरीला नेमका झटका दिला आणि वर असलेल्या मंडपीतून धोंडो केशव यांच्यावर पुष्पवृष्टी सुरू झाली. त्या क्षणी जे चतन्य आमच्यात पसरले ते अद्भुत होते, अविस्मरणीय होते. १८५७ च्या बंडानंतरच्या वर्षांत जन्मलेल्या आजोबांची एन्ट्री आम्ही १९५८ मध्ये बघितली.. आणि त्यांच्या नातीची १९६५ मध्ये. वेगवेगळ्या वयांत अनुभवलेल्या दोन पिढय़ांच्या या दोन सार्वजनिक चतन्यमय एन्ट्रय़ा. दोन्ही तितक्याच प्रभावी आणि परस्परावलंबी. फरक फक्त काळांत, बदलत गेलेल्या समाजजाणिवांचा आणि त्यांच्या अन्वयार्थाचा.
पावसाळा संपत आला की वर्गाच्या ट्रिपा निघत. लोकप्रिय ठिकाण म्हणजे पहाटे लोकलने निघून लोणावळ्याला जाणे आणि रात्री परत! वर्गात जेव्हा ट्रिपचे प्लॅिनग सुरू झाले तेव्हा अनेकांचे म्हणणे पडले की, गौरी मॅडमना विचारू की- त्या येतात का! पण विचारणार कोण? आमच्यापकी मग विजय ऊर्फ छब्या अभ्यंकरने कसे कोण जाणे, पण त्यांना तयार केले. मग चिंब पावसात लोणावळा! मॅडमनी बरोबर भरपूर खायला आणलेले. सोबत त्यांची मुलगी ऊर्मिलाला पण आणले होते. ती तेव्हा चार-पाच वर्षांची असेल. विजय आता अमेरिकेत बाल्टिमोरला असतो. त्याचं तिथे मोठं हॉस्पिटल आहे. इंटर सायन्सनंतर सगळे पांगले आणि पावसात चिंब भिजलेल्या ट्रिपच्या आठवणी तेवढय़ा उरल्या. पण विजय कधी इकडे आला की (तसा तो सवाई गंधर्व महोत्सवासाठी दोन-तीन वर्षांआड येतोच.) आता पासष्टीच्या पुढे असलेली आमची त्या ट्रिपची गँग हमखास भेटतेच.
६५ नंतर गौरी मॅडमशी संबंध आला तो थेट ८५ मध्ये. तोपर्यंत त्या मराठीमधील आघाडीच्या कथालेखिका झाल्या होत्या. नेहमी त्या परदेशीच असायच्या. दरम्यान, पं. सत्यदेव दुबे यांच्या पुढाकारामुळे आणि वसंत देव, शांता गोखले, कुमुद मेहता, प्रिया आडारकर यांसारख्या सिद्धहस्त भाषांतरकारांमुळे मराठीमधली नाटकं िहदी आणि इंग्रजीत जायला लागलेली होती. ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’ िहदी-इंग्रजीमध्ये उपलब्ध झाली. १९६७ पासून ८३ सालापर्यंत राजिंदर पॉल हा रंगकर्मी दिल्लीला ‘एनअ‍ॅक्ट’ नावाचे इंग्रजी नाटय़विषयक मासिक चालवायचा. त्याची स्वत:ची िपट्रिंग प्रेस होती. ‘एनअ‍ॅक्ट’च्या अंकात भारतभरच्या सगळ्या रंगभूमींविषयी लेख, माहिती असायची. मुख्य म्हणजे प्रत्येक अंकात भारतीय भाषांत लिहिलेल्या एका नाटकाचे भाषांतर छापलेले असायचे. तेंडुलकर, कर्नाड, मोहन राकेश आणि बादल सरकार यांची नाटके ही प्रथम देशभरात माहिती झाली ती ‘एनअ‍ॅक्ट’ मासिकामुळे. ७० च्या दशकातील भारतीय रंगभूमीला या मासिकाच्या व्यासपीठाचा खूप उपयोग झाला. नंतर महेश एलकुंचवार, गो. पु. देशपांडे यांची नाटके त्यात छापली गेली. ‘मिकी आणि मेमसाहेब’ या माझ्या पहिल्या नाटकाचे प्रिया आडारकर यांनी केलेले भाषांतर याच मासिकात १९८२ मध्ये छापून आले. कुमुद मेहता, शांता गोखले, ज्ञानेश्वर नाडकर्णी, पुष्पा भावे, प्र. ना. परांजपे, अविनाश सप्रे आदी यात मराठी नाटकांवर लिहीत असत. नवीन मराठी नाटके देशात माहिती होण्यात या मासिकाचा, त्यातल्या लेखकांचा आणि मुख्य म्हणजे भाषांतरकारांचा मोठा वाटा आहे. असे निष्ठेने मन:पूर्वक काम करणारे भाषांतरकार लाभले म्हणूनच मराठी नाटके भारतभर माहिती झाली. अन्य भाषांमध्ये पोहोचली. ८५ मध्ये कोलकात्यात सीगल् बुक्सचा प्रकाशक नवीन किशोर याने त्याच्या सीगल् फौन्डेशनतर्फे भारतीय भाषांमधून लिहिलेल्या नाटकांच्या इंग्रजी अनुवादांची पुस्तके छापण्याचा प्रकल्प फोर्ड फौंडेशनच्या अर्थसाहाय्यातून राबविला. या प्रकल्पाचे सल्लागार होते प्रसिद्ध समीक्षक शमिक बंडोपाध्याय. या प्रकल्पात तेंडुलकर, मोहन राकेश, बादल सरकार, एलकुंचवार, गो. पु. देशपांडे, हबीब तन्वीर यांची नाटके इंग्रजीत आली. शमिक बंडोपाध्याय यांनी ७८ मध्ये कोलकात्यात झालेला आमचा ‘महानिर्वाण’चा प्रयोग पाहिला होता. या प्रकल्पासाठी त्यांना ‘महानिर्वाण’ आणि ‘बेगम बर्वे’ या माझ्या नाटकांचे इंग्रजी भाषांतर हवे होते. ‘बेगम बर्वे’चं भाषांतर शांता गोखले करीत होत्या, तर ‘महानिर्वाण’च्या भाषांतरासाठी गौरी मॅडमची आठवण झाली. श्री. पु. भागवतांकडून त्यांचा पत्ता काढला. त्या परदेशी होत्या. पण भाषांतरासाठी ‘हो’ म्हणाल्या. पण त्यांच्या काही अटी होत्या. एक म्हणजे त्यांना प्रयोग बघण्यात रस नव्हता, आणि भाषांतर त्या व्यवसाय म्हणून करीत असल्याने त्यांनी रक्कम सांगितली. रकमेबद्दल प्रश्न नव्हता; पण त्यांनी प्रयोग बघावा असं मला वाटत होतं. कारण त्याचं दिग्दर्शन माझंच होतं. ते मात्र त्यांनी धुडकावले. परदेशातून त्या भाषांतराचा खर्डा घेऊन आल्या आणि त्यांचा निरोप आला की, मी फलटणजवळच्या िवचुर्णी या गावी त्यांनी बांधलेल्या घरी दोन-तीन दिवस जाऊन राहायचं. भाषांतराच्या खडर्य़ाचं वाचन करून पक्का खर्डा तयार करायचा.
मी िवचुर्णीला जाण्याआधी त्यांचा मला पत्ता सांगण्यासाठी म्हणून फोन आला. त्या म्हणाल्या, ‘पुण्याहून क्वार्टर गेटपासून रोज सकाळी एका वृत्तपत्राची टॅक्सी फलटणला निघते. तिने फलटणच्या एसटी स्टँडजवळ या. नंतर रिक्षा, नाहीतर टांग्याने िवचुर्णी रस्त्याला लागा. गावाजवळ छोटा बंधारा आहे. त्यामुळे छोटा तलाव तयार झालाय. त्यात सध्या पाणी असतं. पाण्याच्या पलीकडे घर आहे. तलावाजवळ आलात की समोरच्या तीरावर बघा. आकाशाच्या पाश्र्वभूमीवर काठीसारखी एक उंच बाई तुम्हाला दिसेल. ती मी! माझ्याजवळ छोटी नाव आहे. तुम्ही त्या तीरावरून हात हलवून खूण केलीत की मी नाव वल्हवत तुम्हाला न्यायला येईन. पोहायला येतं ना? तसं पाणी फार खोल नसतं. आमचा कोरडवाहू, दुष्काळी भाग आहे.’
त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी पुण्यावरून गेलो. आकाशाच्या पाश्र्वभूमीवर बाईंची उंच आकृती उभी होती. मग वल्हवत नाव जवळ आली. दोन दिवसांत त्यांनी माझ्याकडून आम्ही प्रयोग कसा करतो ते नीट  समजावून घेतले. त्यानंतर भाषांतराचा खर्डा पक्का झाला आणि ‘महानिर्वाण’चं ‘Dread Departure’ या नावे इंग्रजी पुस्तक १९८९ मध्ये प्रसिद्ध झालं. त्याच्या दोन आवृत्त्याही खपल्या. नंतर मी ललित कला केंद्रात असताना एक-दोन वेळा बाई अचानक त्यांच्या नातवाला घेऊन सहज म्हणून येऊन गेल्या. मग त्या आजारी असल्याचं कळलं. िवचुर्णीच्या तलावाकिनारी गगनिकेच्या क्षितिजावर दिसलेली, स्वत:च्या विचारांवर ठाम असलेली, अत्यंत पारदर्शक व्यक्तिमत्त्व लाभलेली, स्वानुभवातून झिरपलेली जीवनदृष्टी आपल्या लेखनातून फुलवणारी, स्वत:च्या मर्जीप्रमाणे जगणारी ही बिनधास्त, विचारवंत, उंच बाई २००३ मध्ये कायमची दृष्टीआड झाली.             
सुरुवातीला मी दोन शिक्षकांच्या वर्गात हाऊसफुल्ल गर्दी असे असं म्हटलंय. पकी एक वर्ग होता गौरी मॅडमचा आणि दुसरा असायचा मराठीचा.. स. शि. भावेसरांचा. तो वर्ग आता अजून १५ दिवसांनी भरेल.      

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2015 12:17 pm

Web Title: days of fergusson college
Next Stories
1 आणीबाणी
2 आणीबाणी
3 ‘ओ.. बाबाजान’
Just Now!
X