12 August 2020

News Flash

अर्थ साक्षरतेचा नववर्ष संकल्प

व्हाट्सअपसारख्या अ‍ॅप्लिकेशनवर गुढीपाडव्याला फिरणाऱ्या मेसेजेसची संख्या आणि रस्त्यावर उतरणारी तरुणाई बघता िहदू नववर्ष जनमानसात आता स्थिरस्थावर झाले आहे

| April 6, 2014 01:18 am

व्हाट्सअपसारख्या अ‍ॅप्लिकेशनवर गुढीपाडव्याला फिरणाऱ्या मेसेजेसची संख्या आणि रस्त्यावर उतरणारी तरुणाई बघता िहदू नववर्ष जनमानसात आता स्थिरस्थावर झाले आहे, पण आíथक नववर्षांचे काय? चार-दोन अर्थसाक्षर मित्रमंडळी आणि करभरणा करणारे सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) मित्र यांच्याकडून आलेले काही विनोदी संदेश सोडले तर नवीन आíथक वर्षांच्या सुरुवातीबद्दल फारशी कुणाला काही आस्था नसते.
आíथक वर्षअखेरीबद्दल बहुतांश नोकरदार वर्ग जागरूक असतो. कार्यालयातील वाढलेले काम, ३१ मार्चची डेडलाइन या व अशा अनेक कारणांनी या मंडळींना आíथक वर्षांची अखेर नीट समजते. आणि हे केवळ शहरी भागातील निरीक्षण नाही. जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमधील सरकारी नोकरांनादेखील ‘इअर एंड’चे महत्त्व आहेच. शासनाने राबवलेल्या कल्याणकारी योजना जानेवारी ते मार्च या काळात ज्या जोमाने राबवल्या जातात ते पाहता ग्रामीण भागातील जनतेलादेखील ३१ मार्चचे महत्त्व कळलेले आहे. ३१ मार्चपर्यंत आपले काम झाले नाही तर सप्टेंबर-डिसेंबपर्यंत ते निश्चितच होणार नाही, असे सांगणारे ग्रामस्थ बघण्यात येतात. आíथक वर्षअखेर समजणाऱ्या जनतेने वर्षांची सुरुवात एवढी थंडपणे का दुर्लक्षावी हे पचत नाही. कदाचित झाले एकदाचे काम, अशी एक मानसिकता असावी. वर्षअखेरीस करावे लागणारे काम वर्षांची अखेर आपल्या मनावर कोरून ठेवते व वर्षांच्या सुरुवातीला काहीच काम नसल्याने वर्षांची सुरुवात काहीशी थंड आणि सुस्त होते, असे म्हटले तरी चालेल.
वर्षअखेरीस काम करणारे आपण वर्षांच्या सुरुवातीला इतके आरामात असतो, की आपल्या हातून एक सुवर्णसंधी निसटून जाते आहे, याचे भान आपल्याला राहत नाही. या सुरुवातीला खरे तर नवीन अर्थविषयक संकल्प सोडायला हवेत. एक साधे उदाहरण घेऊ या. महिन्याच्या जमा-खर्चाची जंत्री मांडण्याची सवय आपल्यापकी फार थोडय़ा मंडळींना आहे. आता सेवानिवृत्त जीवन जगणाऱ्या मंडळींना घरात दिनदíशकेवर सगळे खर्च लिहायची सवय होती. काही जण साध्या वह्यांमध्ये जमा-खर्च लिहीत असत. महिनाअखेर शिल्लक किती, त्यातील किती पसे गुंतवले गेले इत्यादी तपशील या वह्यांमध्ये मिळत असे. अशा काही वर्षांच्या वह्या बघितल्या की ती वही लिहिणाऱ्या कुटुंबाच्या (व्यक्तीच्या नव्हे) आíथक जीवनप्रवासाचा एक चित्रपट पाहतो असेच वाटते. जमा-खर्चाच्या या वह्या आपल्यासमोर आरशासारख्या उभ्या राहतात. आपल्या पशाचे काय झाले हे आपल्याला सांगतात. तरुणाईने नवीन वर्षांच्या सुरुवातीला हे करून बघायला काहीच हरकत नाही. त्यासाठी तुम्ही कमावते असणे गरजेचे नाही. महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणांनाही हे करणे शक्य आहे.
आपण जर कमावते असू तर वर्षांच्या सुरुवातीलाच आपले गुंतवणूक नियोजन करायला हवे. जमा-खर्चाबरोबर गुंतवणुकीचे भान वर्षांच्या सुरुवातीलाच आले तर वर्षअखेरीस कुठल्यातरी निरुपयोगी गुंतवणुकीत पसे घालून कर वजावट मिळवणे टाळता येईल. आताच आपली आíथक परिस्थिती काय आहे, याचा एक ढोबळ अंदाज वर्षांच्या सुरुवातीला आला, तर गुंतवणूक कोणत्या दिशेने करायची आहे ते ठरवणे सोपे जाते. एकदा दिशा समजली की त्या मार्गात येणारे सर्व पर्याय तोलूनमापून आपल्या गरजांना पूरक असे पर्याय निवडता येतात. आताच या योजनेवर काम सुरू केले तर पुढील सहा महिन्यांत आपल्या पदरी एक उत्तम गुंतवणूक नियोजन पडू शकते.
नवीन वर्षांचा संकल्प म्हणून जमा-खर्च मांडणे आणि गुंतवणूक व कर नियोजन केले म्हणजे झाले, असे मात्र नाही. नवीन वर्ष म्हणजे नवीन विचारदेखील अंगीकारले पाहिजेत. ‘अर्थ साक्षरता’ ही काळाची गरज आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि इतर संस्था असे कार्यक्रम करत असतात. थोडा वेळ काढून असा एखादा शिक्षणक्रम करायचा प्रयत्न करायला हवा. खरोखरच वेळ नसेल तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळावर education – certifications – nse certifications – ncfm modules या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर कोर्स मटेरियल उपलब्ध आहे. या परीक्षा आणि सर्टिफिकेशनसाठी जरी पसे मोजावे लागत असले तरी त्याचे कोर्स मटेरियल पीडीएफमध्ये मोफत उपलब्ध आहेत. ‘फायनांशियल मार्केट – बिगिनर्स गाइड’ पासून सुरुवात करायला काहीच हरकत नाही. वाचताना थोडा कंटाळा येईल, पण हळूहळू वाचून समजून घेतल्यास दोन महिन्यांत एक विषय समजून घेणे शक्य आहे. विशेषत: महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी यात विशेष रस घेऊन हे विषय समजून घेतले तर भविष्यात नवीन करिअर पर्यायदेखील उपलब्ध होतील.
नवीन वर्ष असे खरे तर काही नसते. असते ती केवळ एक सोय- माणसाच्या भावनिक, सामाजिक, आíथक व्यवहारांचे नीट व्यवस्थापन व्हावे म्हणून केलेली. या सोयींमध्ये आपण आपली सोय बघितली तरच या नवीन वर्षांला काही अर्थ आहे. नाहीतर मागील पानावरून पुढे चालू एवढेच आपले जीवन उरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2014 1:18 am

Web Title: determination of new years financial literacy
Next Stories
1 मर्मबंधातली ठेव
2 चित्ती असू द्यावे समाधान
3 आवडनिवड: कृष्णा किंबहुने
Just Now!
X