08 August 2020

News Flash

आप-ण!

आता नका पुसू, कोणी आणला वात? आपलेच ओठ अन् आपलेच दात!

| February 2, 2014 01:01 am

आता नका पुसू, कोणी आणला वात?
आपलेच ओठ अन् आपलेच दात!
 
आपलीच टोपी, आपलाच माथा
आपल्याच कमरेत आपल्याच लाथा
आपलेच नरडे, आपलेच हात
आता नका पुसू, कोणी आणला वात?
 
आपणच प्रजा, आपणच राजा
कुछ भी करो, सारीच मज्जा
आपणच बाहेर, आपणच आत!
आता नका पुसू, कोणी आणला वात?
 
आपणच कायदा, आपणच न्याय
आपण म्हणू तीच उगवती हाय
कोण नाय बोल्तो? टाकू काय आत?
आता नका पुसू, कोणी आणला वात?
 
सारेच भ्रष्ट, सारेच वाईट
आपणच तेवढे नेरोलॅक व्हाइट
कोण नाय बोल्तो? पाडू काय दात?
आता नका पुसू, कोणी आणला वात?
 
याला म्हणू पप्पू अन् त्याला म्हणू फेकू
काहीही बकू अन् खो खो खोकू
त्यांच्या त्या बाता अन् आपली मात्र बात
आता नका पुसू, कोणी आणला वात?
झुंडीहाती झेंडा आणि मेणबत्ती
झुंडीचा ससा मग बनतो बघा हत्ती
हत्तीवरच्या राजाला देईल कोण मात!
आपलेच ओठ आणि आपलेच दात!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2014 1:01 am

Web Title: dha cha ma 6
टॅग Politics
Next Stories
1 प्रतिज्ञा- एक पुर्नभेट!
2 सावर(णी) रे!
3 काही ऐतिहासिक निरीक्षणे
Just Now!
X