मानवी मन ही प्रत्यक्ष न दिसणारी गोष्ट! माणसाच्या वर्तनभावात महत्त्वाची भूमिका बजावतं ते मन. माणसाचा मनोव्यापार त्याच्या वर्तणुकीवर परिणाम करीत असतो. त्याचं जगणं, कृती ठरवत असतो. या पाश्र्वभूमीवर ‘संवाद मनाचा, मनाशी’ हे डॉ. अद्वैत पाध्ये यांचं पुस्तक माणसाचं मन उलगडून दाखवतं. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करताना आलेले नानाविध अनुभव, मानसिक रोगांविषयीच्या गैरसमजुती यांवर प्रकाश टाकणारे लेखन डॉ. पाध्ये यांनी केले आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, त्या अनुषंगाने येणाऱ्या समस्या, त्यांना सामोरे जाताना किंवा अशा गर्तेत सापडलेल्या व्यक्तीला एक माणूस म्हणून कसे समजून घ्यावे, त्याच्या मनाचा विचार कसा करावा अशा अनेक मुद्दय़ांवर लेखक यात भाष्य करतात. पुस्तक वाचताना माणसाच्या मनाचं विश्वदर्शन घडतं. आपल्याला सहज, साध्या वाटणाऱ्या गोष्टींमागे कोणता मनोव्यापार दडलेला असतो, हे वाचून वाचकाला थक्क व्हायला होतं.
माणसाचे वर्तन समजून घ्यायचे असेल तर त्याचं मन वाचता यायला हवं. समोरच्या माणसाचं मन वाचायला शिकलं की त्याच्याशी होणारी आपली वर्तणूकही तितकीच प्रगल्भ होते, ती अधिक माणुसकीच्या जवळ जाणारी ठरते, असे या पुस्तकातून जाणवते. म्हणूनच म्हटले आहे- ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण..’
‘संवाद मनाचा, मनाशी’- डॉ. अद्वैत पाध्ये, नवचैतन्य प्रकाशन, पृष्ठे- १५६, किंमत- १६० रुपये.

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क