डॉ. संजय ओक sanjayoak1959@gmail.com

बदलत्या काळानुसार आपल्या चालण्या-बोलण्याच्या पद्धती बदलत आहेत. हल्ली फोन, एसएमएस किंवा प्रत्यक्ष संभाषणातही एक उद्वचन अगदी हमखास ऐकायला मिळते. ‘Take Care…l अर्थात ‘काळजी घ्या हं स्वत:ची!’ बोलणाऱ्याच्या मनातले भाव कोणते का असेनात, संभाषणाच्या गाडीचे शेवटचे स्टेशनचे असते : ‘Take Care.’ कधी कधी मी बुचकळ्यात पडतो : Take Care म्हणजे नेमके काय करावयाचे?

Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

स्वत:चाच विचार केला, अंग चोरून काम केले तर स्वार्थीपणाचा शिक्का आपल्यावर बसण्याची धास्ती! आत्मक्लेश कमी करावयाचे तर आपण आत्मकेंद्रित झाल्याचा आळ यायचा. आणि आजच्या करोनाच्या काळात तर जीव तोडून काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कोणीतरी मनापासून म्हणावे- ‘Take Care’ अशीच आजची अवस्था आहे. दिवस कसा सुरू झाला हे मला रात्री उशीवर डोके टेकवताना खरोखरच स्मरत नाही. ही बाब केवळ वैद्यक क्षेत्राचीच आहे अशी माझी संकुचित भावना नाही, तर पोलीस, तंत्रज्ञ आणि महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकारी साऱ्यांनाच आज आवर्जून सांगावयाची वेळ आली आहे- ‘‘बाबांनो, स्वत:ची काळजी घ्या!’’

वास्तविक पाहता मानव मूलत: स्वत:वर प्रेम करणारा सजीव आहे. ती त्याची सर्वात प्रभावी प्रेमकहाणी असते. चार्ल्स बुकोवास्की याने म्हटले आहे, ‘If you have the ability to love, love  yourself  first.’ माणूस जेव्हा स्वत:च्याच प्रेमात पडतो, तेव्हा तो आपसूकच स्वत:ची काळजी घेऊ लागतो. प्रेमात पडणे आणि गुरफटणे यातला फरक आपण लक्षात ठेवावयास हवा. माणसाने स्वत:मध्ये गुंतवणूक करावी, गुंतून पडू नये. स्वत:चे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ही त्याची प्राथमिकता असावी. त्याच्या संगोपन आणि वर्धनासाठी पैसा आणि वेळ खर्च करायलाच हवा. Self care is giving the world the best of you, instead of what’s left of you. जगाला द्यायचे आहे ना, तर मग ते खरे सोने द्या; उरलेले खरकटे नको. हा स्वार्थ नाही, तर परमार्थासाठी स्वत:चा केलेला सोपान आहे. आज दुर्दैवाने आपण सर्वात जास्त आपल्या स्वत:कडेच दुर्लक्ष करतो आणि त्याची परिणती उरलेसुरले तेवढेच इतरांसाठी वापरण्यात होते. आयुष्य रसरसून जगणे आवश्यक आहे; गळा आवळून

त्याचा रस शोषण्यात काय अर्थ आहे? रोज सकाळी दात घासायची टूथपेस्ट संपायला आली की दाबून, चेपटून तिची उरलीसुरली शेवटची जान काढण्यापेक्षा ती बदलणे श्रेयस्कर नाही का?

.. मग हे करण्यासाठी थोडी विश्रांती घेतली तरी ते योग्यच आहे. सतत काम केल्यावर कधी कधी आपल्याला आपल्याच क्षमतेबद्दल संशय निर्माण होतो. कधी कधी मला माझ्या हातून होणाऱ्या शस्त्रक्रिया एकसुरी, बेचव वाटू लागतात. मी थोडासा ब्रेक घेता होतो आणि स्वत:च्या कौशल्याविषयी निर्माण होणाऱ्या शंका विरतात. त्यांची जागा आत्मविश्वास घेतो. हा स्वत:वर नव्याने ठेवलेला विश्वास मला प्रावीण्याकडे घेऊन जातो.

कोणाला एक कप साधा चहा द्यायचा असेल तरी आधी किटली भरावी लागते. मधुघट रीते झाले तर मधु मागणाऱ्याला विन्मुख पाठवावे लागते. You can’t pour from an empty cup.

आज ठिकठिकाणाहून डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन्स, पोलीस दमल्याची वार्ता कानी येते.  demoralization, depression  यांच्या जोडीला नवा शब्द कानी येतो..   Burn out Syndrome. मला या साऱ्या प्रामाणिक सहकाऱ्यांना उंच पर्वतराजींमध्ये राहणाऱ्या गरुडाची गोष्ट सांगावीशी वाटते.

आकाशाच्या अथांग विस्तारात आपले लक्षणीय पंख पसरवून अमर्याद विहार करणारा पर्वत-गरुड वयोमानानुसार थकतो तेव्हा अतिउंच अशा ढोलीचा आश्रय घेतो. विजनवास  पत्करतो. अन्नपाणी त्यागतो. आणि एकेक जुने, जीर्णशीर्ण पंखाचे पीस आपल्या धारदार चोचीने उचकटून टाकतो. पिसे गेलेला तो पक्षीराज एकटा, निपचित बसून राहतो.. दिवस सरतात. महिने उलटतात. आणि त्याच्या पंखांवर नवी पिसे येतात. त्याच्या पंखांना पूर्वीपेक्षा नवा जोम, नवी उमेद आणि नवी भरारी प्राप्त होते आणि एके दिवशी तो पुन्हा आकाशात विहार करू लागतो.

..मला थकलेल्या, मरगळलेल्या माझ्या सहकाऱ्यांना एवढेच म्हणायचे आहे.. ‘टेक केअर!’