विनायकराव एक मध्यमवयीन गृहस्थ. बँकेत नोकरी वगरे करणारे. पत्नीदेखील सरकारी नोकरीत. दोन मुले. तसं सामान्यपणे बघितलं तर सुखी चौकोनी कुटुंब असायला हवं होतं, पण तसं नव्हतं.
विनायकराव मला सांगत होते, ‘डॉक्टर, मला रात्रभर झोप येत नाही हो. एकटा हॉलमध्ये झोपतो, म्हणजे दुसरा काही पर्यायच नाही माझ्याकडे म्हणून. पत्नी आत येऊच देत नाही. त्यासाठी मुलीला स्वत:जवळ झोपवते. मुलगा आणि मी बाहेर. दिवसासुद्धा कशात मन लागत नाही. सतत अस्वस्थ वाटत राहतं.
बँकेतील कामातसुद्धा चुका व्हायला लागल्या आहेत. बँकेतल्या लेडीज स्टाफशी बोलायलासुद्धा भीती वाटते. आमच्या ब्रॅन्च मॅनेजरही नेमक्या एक स्त्रीच आहेत.’
‘पण, असं काय झालं आहे की तुम्हाला इतकी भीती वाटावी?’
‘डॉक्टर कसं सांगू तुम्हाला. मुलं थोडी मोठी झाल्यापासून बायकोचा लंगिकसंबंधाबाबतीत अगदी असहकार चालू आहे. इच्छा व्यक्त केली तरी मला िलगपिसाट वगरे संबोधने लावली जातात. आता या वयात करायची ही गोष्ट आहे का? वगरे बोलते. एकदा तर मुलांसमोर अपमान केला. आता पस्तीस-चाळीस म्हणजे काय वृद्ध वय आहे का? आणि आपल्या जोडीदाराकडे इच्छा व्यक्त करणं हा काय गुन्हा आहे का? मी मानतो की, दोघांची इच्छा असेल तरच हा आनंद आपण उपभोगू शकतो. पण या गोष्टीला वयाची मर्यादा वगरे नसते, शारीरिक बळ कमी झाल्याने मर्यादा येते. पण मला ज्या प्रकारे बहिष्कृत केलं गेलंय त्यामुळे माझ्या मनात माझीच प्रतिमा अगदी काळवंडून गेलीय. म्हणूनच मला बँकेतल्या लेडीज स्टाफचीही भीती वाटू लागली आहे की, न जाणो माझ्या हातून काही गरकृत्य घडलं तर?’
‘मला तर अगदी जीवनात हरल्यासारखं वाटतंय. आज इतकी वष्रे मी हे सारं सहन करत आहे. माझे फिजिशियनही म्हणाले की, मानसिक ताणामुळेच मला मधुमेह, रक्तदाबसारख्या दोन्ही विकारांचा बळी व्हावे लागले आहे. पण काय करू, कोणाला सांगू, लोक काय म्हणतील, या भीतीपायी मी आजवर फक्त सहनच करत आलो आहे. कधी कधी स्वत:ला संपवायचे विचारही येतात. पण पुन्हा मुलांचा विचार येतो. लोक काय म्हणतील, असं वाटतं आणि विचार परतवून लावतो. काहीतरी करा हो, डॉक्टर.’
‘पण तुमच्या पत्नी येतील का मला भेटायला? कारण औषधांनी तुमचं आलेलं नराश्य कमी होईल, पण मूळ समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याशी बोलण्याची, त्यांचे सहकार्य मिळण्याची गरज आहे.’ मी म्हणालो.
‘डॉक्टर, मला नाही वाटत ती येईल. आमच्या दोघांच्या चांगल्या परिचयातील मित्रांनी, त्यांच्या पत्नींनीसुद्धा समजवायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. हो, एकदा स्त्रीरोगतज्ज्ञांकडे मात्र आली होती. त्यांनी सर्व तपासण्याही केल्या. सर्व नॉर्मल होत्या. म्हणून मग त्यांनी समजावलं. पण आता ती त्या डॉक्टरांचे, त्या माझ्या मित्राचे तोंडही बघायला तयार होत नाही. तरी मी एक प्रयत्न करून बघतो.’
त्याच वेळेला मला माझ्याकडे आलेल्या एका दुसऱ्या गृहस्थांची आठवण झाली. अगदी अशीच समस्या होती. एक मुलगा होता दहा वर्षांचा. त्यांच्या पत्नी येण्यास तयार नव्हत्या म्हणून त्या वेळेला मी स्वत: घरी जाऊन समुपदेशन केलं होतं, पण त्यांनी असहकार आंदोलनच पुकारलं होतं. अनेक प्रयत्न करूनही काही फरक पडला नाही, तेव्हा मी त्यांना एवढंच म्हटलं होतं की, वैवाहिक जीवन हे सहजीवन असतं. ते दोघांनी मिळून आनंदानं जगायचं असतं. दोघांची वर्तुळं वेगळी ठेवून दोघांचं एक सामायिक वर्तुळ करायचं असतं. पण एक वर्तुळ तसा प्रयत्न करायला किंवा ते तत्त्व समजूनच घेण्यास तयार नसेल तर सहजीवन सुसह्य न राहता दु:सह्य ठरतं. मग दुसऱ्या वर्तुळाला निर्णय घेणं आवश्यक असतं. दुसरी गोष्ट ही की, अशा वेळी लोक काय म्हणतील याचा विचार हा अविचार किंवा अविवेक आहे. लोक फक्त समस्येबाबत, तिच्या परिणामांबाबत प्रतिक्रिया देतात. त्या प्रतिक्रिया नानाविध असू शकतात. त्यामुळे आपली समस्या मात्र दूर होत नसते. त्यामुळे माझा निर्णय दुसऱ्यांना आवडलाच पाहिजे, असा मनाशी अविवेक न ठेवता माझा निर्णय माझ्यासाठी दूरदृष्टीने योग्य हवा, हा विवेक बाळगा.
त्यानंतर एक-दोन वर्षांनी ते मला भेटायला आले तेव्हा अत्यंत आनंदी होते. त्यांनी ते वैवाहिक जीवन घटस्फोट घेऊन संपवले होते व नंतर मुलाशी बोलून, दुसऱ्या पत्नीला पूर्ण कल्पना देऊन ते दुसऱ्या खऱ्या अर्थाच्या सहजीवनाचा आनंद उपभोगत होते, जे त्यांच्या देहबोलीतूनच जाणवत होते. विवेकपूर्ण निर्णय घेतल्याने मिळालेले समाधान व आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता..
विनायकरावांना आधी अँटिडिप्रेसंट औषधं सुरू करणं गरजेचं होतं. ते सुरू केल्यावर त्यांच्या मानसिक, शारीरिक लक्षणांमध्ये चांगलाच फरक झाला. ज्यामुळे ते आश्वस्त झाले की, काहीतरी योग्य घडतंय. आता वेळ आली होती मूळ समस्येला हात घालण्याची. त्या दृष्टीने त्यांच्या पत्नीस समुपदेशनास आणण्याचा त्यांनी व मी खूप प्रयत्न केला. पण  त्यांच्या पत्नीकडून ‘समस्या मला नाही, त्यांनाच आहे, त्यांनाच काय ते समजवा’, असंच सातत्याने उत्तर आल्याने काहीच करता आलं नाही.
मुलांशीही बोललो तेव्हा त्यांनीसुद्धा आई वडिलांशी चुकीचं वागते, त्यांना उगाचच ओरडते, अपमान करते असं सांगितलं. अर्थात, त्याचं कारण त्यांना ठाऊक नव्हतं.
तेव्हा विनायकरावांना मी मला आठवलेली ही जुनी केससुद्धा सांगितली आणि त्यापासून त्यांनी काही बोध घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली; परंतु विनायकरावांची समाजाविषयीची भीड काही कमी झाली नाही. शेवटी आज अनेक वर्षांनंतर विनायकराव अजूनही नराश्यावर औषधं घेतच आहेत. त्यात मधुमेह, रक्तदाबाच्या औषधांची भर पडली आहे. मुले या वातावरणास कंटाळून शिक्षण, नोकरीनिमित्ताने बाहेर राहत आहेत. सहजीवन कधीच संपलंय, घराचं घरपणही संपलं आहे, दाखवण्यापुरतंच ते उरलं आहे एवढंच!
समाज काय म्हणेल? लोक मला हसतील या अविवेकापायी ते जीवनाचा आनंद, घराचे घरपण सर्वच हरवून बसले, उरला तो फक्त देखावा. शिवाय विविध विकार मागे लागले ते वेगळेच. त्याऐवजी समाज काय म्हणायचे ते म्हणो, परंतु माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करूनही जोडीदार ‘जोड’ देण्यास तयारच नसेल तर असलं ‘कुढणारं’ सहजीवन जगण्यात, चालू ठेवण्यात काय अर्थ? त्यापेक्षा वेगळी वाट चोखाळू या. मुलांचा विचार घेऊन पुढचं पाऊल टाकुयात. परंतु अविवेकापायी त्यांनी समस्येचा योग्य प्रकारे सामना  केला नाही. ते मुलांना घेऊन वेगळीकडे राहू शकले असते. अगदी दुसरा विवाह वगरे जरी केला नसता तरी! पण ‘समाजाची भीड’ या अविवेकामुळे ‘भीड भिकेची बहीण’ अशी अवस्था झाली.
आज लोक काय म्हणतील, हा अविवेक वर उल्लेखलेल्याच समस्येत नाही, तर अशा अनेक समस्यांबाबत (वैवाहिक) हेच होते व ‘कुढत सहजीवन’ चालू राहाते. म्हणजे प्रत्येकाने घटस्फोट घ्यावा, वेगळं व्हावं असा याचा अर्थ नाही. प्रत्येकाचेच जोडीदार इतकेच असहकार करणारे असतील असे नाही. पण समस्येचा विवेकाने सामना करून ती सोडवण्यासाठी आपल्या हातातील साम, दंड, भेद वापरणे काही गर नाही.
सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ व्हाइस रॉ यांनी म्हटलंच आहे की, ‘तुम्ही वस्तुस्थितीला सामोरे गेलात तरच त्याबाबत काही करू शकाल. तुम्ही जर ती टाळायला गेलात तर अधिक विद्रूप बनून ती तुमची वाट अडवते. प्रत्येक वास्तव, ज्याच्यापासून तुम्ही दूर पळू बघता, ते भविष्यात तुम्हाला अशा विचारांनी ग्रासून टाकेल की मी हे करायला हवं होतं, मी का केलं नाही?’ असं तुम्हाला वाटेल.
विवेकाने विचार केला तर तुम्ही योग्य वैद्यकीय उपचार घेणं, नियमित व्यायामाचे वेळापत्रक बनवणं, पथ्यं पाळणं, हे करू शकता. तुमच्या मुलांचे चांगले मित्र बनू शकता, ‘क्षमस्व’ या लहान, पण महान शब्दाचा उच्चार करण्याचं धर्य गोळा करू शकता. पण त्यासाठी विवेकाने सामोरे जाणे महत्त्वाचं!
ं६िं्र३स्र्ंिँ८ी1972@ॠें्र’.ूे

Can a woman ever retire from housework
समुपदेशन : बाई रिटायर्ड होते?
thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री