म्हणून तारे चमचमतात
आपल्या पृथ्वीच्या भोवती वातावरण नावाचा एक थर असतो. या ताऱ्यांचा प्रकाश वातावरणातून आपल्यापर्यंत पाहोचतो. या वातावरणात वेगवेगळं तापमान किंवा वेगवेगळी घनता असते. सोप्या शब्दांत सांगायचं तर या वातावरणामुळे ताऱ्यांचा प्रकाश एक प्रकारे अडथळत आपल्यापर्यंत येतो. त्यामुळे आपल्याला तो सलग दिसत नाही. त्यामुळे हे तारे चमचमल्यासारखे दिसतात. सूर्याचा प्रकाश मात्र खूप प्रखर असल्यामुळे त्याला या अडथळ्यांमुळे काहीही होत नाही आणि तो आपल्याला असा चमचमल्यासारखा दिसत नाही.
ढगांचा गडगडाट वीज चमकल्या नंतर का ऐकू येतो?
प्रकाशाचा वेग हा आवाजापेक्षा खूप जास्त असतो. ढग आपल्यापासून खूप लांब असतात. वीज चमकली की त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत लवकर पोचतो, त्यामुळे तो आपल्याला लगेच दिसतो. पण आवाजाचा वेग मात्र कमी असल्यामुळे गडगडाट आपल्यापर्यंत पोचायला वेळ लागतो आणि त्यामुळेच तो नंतर ऐकू येतो.
 चंद्र प्रकाशमान दिसतो..
आपल्याला चंद्राचा प्रकाश वाटतोय तो खरं तर त्याचा नसतोच मुळी. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि त्यामुळे चंद्र आपल्याला असा प्रकाशित दिसतो. आता पृथ्वीला स्वत:चा प्रकाश असतो का? तर नाही. पण आपण चंद्रावर गेलो तर आपल्याला पृथ्वीसुद्धा चंद्रासारखी दिसेल. कारण सूर्याच्या प्रकाशामुळे तीही प्रकाशित दिसेल.
पावसाळ्यात कपडे उशिरा  वाळतात; कारण..
कपडे वाळतात ते त्यांच्यातल्या पाण्याचं बाष्पीभवन म्हणजे वाफ होण्यामुळे. पण ही वाफ होण्यासाठी बरीच कारणं असतात. एक तर त्या वेळेचं तापमान. तापमान जेवढं जास्त तेवढा हा वाफ होण्याचा वेग जास्त. त्यामुळं उन्हाळ्यात कपडे लवकर वाळतात आणि हिवाळ्यात त्यांना वेळ लागतो; पण कपडे वाळण्यात आणखी एक कारण महत्त्वाचं असतं ते म्हणजे आद्र्रता. आद्र्रता म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्या हवेतील पाण्याचे सूक्ष्म थेंब.  पावसाळ्यात हवेत खूप आद्र्रता असते. त्यामुळेच कपडय़ांतल्या पाण्याची वाफ होऊन जे सूक्ष्म थेंब बाहेर पडतात त्यांना हवेत जागा लागते आणि पावसाळ्यात अशी जागा कमी असते त्यामुळं कपडे वाळायला वेळ लागतो. उन्हाळ्यात त्यांना जागाच जागा असते, त्यामुळं कपडे लवकर वाळतात.
झाडांची पानं का गळतात?
झाडांच्या पानांमधून बाष्पीभवनाद्वारे पाणी बाहेर जातं. एरवी मुळांतून पाणी झाडं आत घेतात, त्यांचं अन्न तयार करतात आणि जास्तीचं पाणी पानांच्या छिद्रांमधून बाहेर टाकतात. पण उन्हाळ्यात इतकं पाणी बाहेर टाकणं झाडांना परवडत नाही. त्यामुळंच मग त्यांची पानं गळायला लागतात. नंतर जेव्हा पावसाळ्यात भरपूर पाणी उपलब्ध होतं तेव्हा पुन्हा त्यांना छान पालवी फुटायला लागते.
उन्हाळ्यात पांढरे कपडे वापरणं का चांगलं?
काळा रंग किंवा एकूणच गडद रंग प्रकाश आणि उष्णता शोषून घेतात. त्यामुळे उन्हाळ्यात अशा रंगांचे कपडे घातले तर आपल्याला आणखी गरम होतं. ते हिवाळ्यात घालायला काही हरकत नाही. पांढरा रंग मात्र उष्णता परावíतत करतो, त्यामुळे उन्हाळ्यात पांढरे कपडे घालणंच चांगलं. त्यातही कॉटनचे कपडे असतील तर जास्त चांगलं, कारण ते उष्णता शोषत नाहीत.
झाडांची पानं हिरवी का असतात?
झाडांच्या पानांमध्ये क्लोरोफिल नावाचा एक घटक असतो. त्याच्यामुळे पानांना हा हिरवा रंग येतो. हा घटक प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी आवश्यक असतो. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर झाडांना त्यांचा खाऊ तयार करण्यासाठी हा घटक मदत करतो. सूर्याचा प्रकाश आणि पाणी यांचा वापर करून झाडं आपला खाऊ तयार करतात. अर्थात, पानांमध्ये फक्त क्लोरोफिलच नसतं, तर अन्य घटकसुद्धा असतात. त्यांच्यामुळे झाडांची पानं कधी लाल, निळी अशीसुद्धा दिसतात.
———
डोकॅलिटी
ज्योत्स्ना सुतवणी -jyotsna.sutavani@gmail.com
बालमित्रांनो, आकाशातला चंद्र हा आपला रोज भेटणारा सवंगडी. हा विविध वेळेला विविध आकारांत दिसत असतो. चंद्राच्या या विविध आकारांना ‘कला’ असे म्हणतात, हे तुम्हाला माहीत आहेच. अमावास्या-पौर्णिमा-अमावास्या या प्रवासात भारतातून दिसणाऱ्या चंद्रकलांचा क्रम तुम्हाला माहीत आहे का? हाच आजच्या कोडय़ाचा विषय आहे. सोबत दिलेल्या चित्रांमधून योग्य तो क्रम लावायचा आहे.
उत्तर :
अमावास्या-पौर्णिमा-अमावास्या
प्रवासातील क्रम
५-१-७-४-६-३-८-२-५

आर्ट कॉर्नर : चमचमता  चतूर मॅग्नेट
अर्चना जोशी -muktakalanubhuti@gmail.com
साहित्य : लाल व पिवळा कार्डपेपर, कात्री, गम, टिकल्या, स्केचपेन, पेन्सिल, मॅग्नेट, डबल साइड टेप.
कृती : लाल कागदाला दोन भागांमध्ये दुमडून घ्या. आपल्या हाताच्या दोन ५ आकार ठसा बनवा व कात्रीने हळुवार कापा. चतुराचे डोळे, धड, शेपटी पुन्हा दुमडीच्या पद्धतीने पिवळ्या कागदाला लांबट दुमडून एकत्र कापा. डोळे काळ्या स्केचपेनने बनवा व पंखाप्रमाणे इतर सशोभन  करा. मागील बाजूस डबल साइड टेपच्या आधारे मॅग्नेट चिकटवा. हे मॅग्नेट तुमचे कपाट, फ्रिज, टेबलाची शोभा वाढवेल.     

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

मनाली रानडे – manalirandade84@gmail.com
बालमित्रांनो, आजचे आपले शब्दकोडे जरा वेगळे आहे. शब्द ओळखण्यासाठी सूचक शब्दांच्या ऐवजी चौकटीत काही चित्रे दिलेली आहेत. या चित्रांची इंग्रजीत असलेली नावे ओळखून शब्दकोडे पूर्ण करायचे आहे.

उन्हाळ्याची सुट्टी
अनुजा तातावार

परीक्षा संपली एकदाची
सुट्टी लागली उन्हाळ्याची
नाही शाळा, नाही अभ्यास
दिवसभर खेळायचाच तास

पहाटेच्या गार वाऱ्यात
थोडं फिरून येऊ
धावायला नि पोहायला
मस्त मजेत जाऊ

आमरस अन् पोळीचं
जेवण करू छान
पुस्तकातल्या गोष्टींमधे
हरपून जाईल भान

कॅरम, पत्ते, बुद्धिबळाचे
डाव मग मांडायचे
दुपारच्या कडक उन्हात
बाहेर नाही हं निघायचे
संध्याकाळी मैदानात
भरपूर खेळायचे
पकडा पकडी, क्रिकेट, बॉल
यातच रंगून जायचे
लवकर या घरी
म्हणून, नाही कुणी रागावणार
खेळायचा हक्क तुमचा
आम्हीसुद्धा जाणणार

खेळून दमून आल्यावर
टरबूज, खरबूज आहेच तयार
खाल्ल्याबरोबर पोटात मग
वाटेल कसं थंडगार

बाबांसोबत फेरफटका
रात्रीच्या जेवणानंतर
अलगदच उतरेल मग
झोप कशी डोळ्यांवर

उन्हाळ्याची सुटी
अशीच मजेत घालवायची
एकदाच मिळते वर्षांतून
मस्त धमाल करायची!