बाललैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटना हे आजचं चिंताजनक वास्तव आहे. या समस्येचा सांगोपांग अभ्यास करून त्याची उकल करण्याचा प्रयत्न ‘जपूयात निरागस बालपण’ या पुस्तकातून डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले यांनी केला आहे. डॉ. नलबले यांच्या गाठीशी बालकांवरील लैंगिक अत्याचारांची अनेक प्रकरणं हाताळण्याचा, बालकांना त्यातून बाहेर काढण्याचा अनुभव असल्याने त्यांचं या पुस्तकातील लेखन स्वाभाविकपणे प्रश्नांची उत्तरं शोधण्याकडे वळलेलं आहे. पुस्तकातील प्रकरणं चार प्रमुख भागांत विभागलेली आहेत. अत्याचारांचे प्रकार, काही गंभीर सामाजिक समस्या व रूढी, अत्याचार होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाय आणि अत्याचाराची घटना घडल्यास उपाययोजना म्हणून करण्याच्या बाबी असे चार भाग असून, विविध प्रकरणांत चर्चा केलेले मुद्दे उपयुक्त ठरणारे आहेत. पोक्सो कायद्याची साध्या-सोप्या पद्धतीने माहिती देणारं एक स्वतंत्र प्रकरण पुस्तकात समाविष्ट आहे. शाळकरी मुलांशी या विषयावर कसा संवाद साधावा, त्यासाठी विविध मोबाइल अ‍ॅप्सची मदत कशी घेता येईल, यावरील प्रकरण हे या पुस्तकाचं एक वैशिष्टय़ आहे. पालकांनी मुलांवर विश्वास दाखवणं, त्यांच्यांशी संवाद वाढवणं, अशा प्रकारात मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आवश्यकता व ते कसे साध्य करता येईल, यावर नलबले यांनी चर्चा केली आहे. चांगला-वाईट स्पर्श, मासिक पाळी, लैंगिक शिक्षण अशा अनेक मुद्दय़ांवर त्यांनी संवादी शैलीत लेखन केलं आहे.

अवघ्या ८८ पानांचं हे लहानसं पुस्तक बाललैंगिक अत्याचारासारखी समस्या समजून घेऊन त्याचं निराकरण करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

‘जपूयात निरागस बालपण’-

डॉ. मीनाक्षी नलबले भोसले,

रोहन प्रकाशन,

पृष्ठे- ८८ , मूल्य- १०० रुपये