किडनी फेल्युअर, मूत्राशयाशी संबंधित आजार, कर्करोग अशा प्रकारच्या आजारांनी सामान्य माणूस त्रासून जातो. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या आजारांची शास्त्रीय माहिती नसल्याने मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठीच ‘किडनीविषयी बोलू काही’ हे  डॉ. दिलीप बावचकर यांचं पुस्तक महत्त्वाचं आहे. किडनीसंबंधीच्या विविध विकारांची, उपचार पद्धतींची, गरजूंना उपचारांसाठी मदत करणाऱ्या दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, इ. सर्व बाबींची इत्थंभूत माहिती त्यातून मिळते. किडनी प्रत्यारोपण नेमकं कशा प्रकारे केलं जातं, त्यातील तांत्रिक गुंतागुंत, त्यासाठी करावी लागणारी कायदेशीर बाबींची पूर्तता, कॅव्हेट डोनेशन, ब्रेन डेथसारख्या संकल्पना, इ. ची सखोल माहिती हे पुस्तक देते.  पुस्तकातील डायलिसिस, किडनीची संरचना, इ. बाबतच्या विविध आकृत्या, चित्रे यांमुळे गुंतागुंतीचे मुद्दे समजून घेण्यास मदत होते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हे पुस्तक मोलाचे आहे.

‘किडनीविषयी बोलू काही..’

– डॉ. दिलीप बावचकर

राजहंस प्रकाशन,

पृष्ठे – १८३, मूल्य – २५० रुपये.