तुरुंगातील कैद्यांकडे समाज साधारणपणे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहतो. कैद्यांबद्दल फारसं चांगलं बोललं जात नाही. मात्र कैद्यांच्या आयुष्याकडे, त्यातल्या घटितांकडे मानवी दृष्टीने पाहणे आवश्यक आहे, हाच दृष्टिकोन गिरिजा कीर ‘कुणा नामदेवाची चित्तरकथा’ या कादंबरीतून ठसवतात. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या येरवडा तुरुंगातील कैद्यांसाठी अनेक वर्ष लेखिकेने काम केले आहे. यादरम्यान कैद्यांचे आयुष्य त्यांनी जवळून पाहिले. फक्त पाहिलेच नाही, तर सहृदयतेने त्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच ही कादंबरी जन्म घेते. अशाच एका कैद्याच्या घरी जाऊन, तिथे राहून त्याच्या कुटुंबीयांशी त्यांनी संवाद केला. एखाद्या कैद्याकडे त्याचे कुटुंबीय कसे पाहतात, त्यांच्याशी असणारे नातेसंबंध यातून रेखाटले आहेत. कादंबरीचा नायक असलेला नामदेव हा खरं तर कलासक्त व्यक्ती. लहानपणापासूनच शिल्पकला, चित्रनाटय़ यांत रस असलेला. त्यामुळे त्याने कलेचंच शिक्षण घेतलं. चांगली नोकरी, संसार हे सारं सामान्य माणसासारखं सुरू असताना अचानक त्याचं आयुष्य कलाटणी घेतं. एका गुन्ह्यची शिक्षा म्हणून सात वर्षांसाठी तुरुंगात रवानगी होते. त्यानंतर नामदेवच्या आयुष्यात घडणाऱ्या नाटय़मय घडामोडींनी कादंबरी पुढे सरकते. खोटय़ा गुन्ह्यची शिक्षा भोगावी लागलेल्या एका कलासक्त व्यक्तीची काय घुसमट होते, त्याच्या कुटुंबीयांची कशी परवड होते याचं परिणामकारक चित्रण या कादंबरीत आलं आहे. कैदी, गुन्हे, शिक्षा, न्यायालयीन घडामोडी या बाबी चितारणाऱ्या मराठी कादंबऱ्यांचे प्रमाण अल्प आहे, त्यामुळेही या कादंबरीचे मोल वाढते.

  • ‘कुणा नामदेवाची चित्तरकथा’ गिरिजा कीर
  • भरारी प्रकाशन,
  • पृष्ठे : १३७, मूल्य : २०० रुपये.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’