News Flash

पडसाद :यात लव्ह जिहाद आहेच कुठे?

लेखिका आणि त्यांचे पती लग्नानंतरसुद्धा आपापल्या धर्माचे पालन करीत आहेत. मग यात ‘लव्ह जिहाद’ आहे कुठे, असे त्यांचे म्हणणे आहे.

(संग्रहित छायाचित्र)

यात लव्ह जिहाद आहेच कुठे?

‘लोकरंग’मध्ये (१४ फेब्रुवारी) ‘लव्ह जिहाद आणि व्यक्तिस्वातंत्र्य’ हा मुमताज शेख यांचा लेख वाचला. या लेखात मुस्लीमद्वेष हा संघ व भाजपचा जुना कार्यक्रम आहे, त्यातून कधी धर्मवापसी, तर कधी ‘लव्ह जिहाद’ हे कार्यक्रम आणले जातात, असे मत लेखिकेने मांडले आहे. त्यांचे हे मत देशात लोकशाही टिकावी असे ज्यांना वाटते त्यांना पटेल असेच आहे. त्यांनी स्वत: आंतरधर्मीय लग्न केले आहे. लेखिका आणि त्यांचे पती लग्नानंतरसुद्धा आपापल्या धर्माचे पालन करीत आहेत. मग यात ‘लव्ह जिहाद’ आहे कुठे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या लेखाला सलाम.

– राजन म्हात्रे, मुंबई

उभयपक्षी समजूतदारपणा हवा..

‘लव्ह जिहाद आणि व्यक्तिस्वातंत्र्य’ हा मुमताज शेख यांचा आणि समीना दलवाई यांचा ‘प्रेम, कुटुंब आणि करंटेपणा’ हा लेख वाचला. या लेखांत जे अनुभव सांगितले आहेत ते नक्कीच विविध अफवा पसरवून लव्ह जिहादचा टाहो फोडणाऱ्यांना सत्य परिस्थिती सांगणारे आहेत. हिंदू धर्मात बऱ्याच अंशी असे विवाह स्वीकारले जातात, परंतु मुस्लीम समाजात अशा विवाहांना तीव्र विरोध होतो, हे वास्तव आहे. दोन्ही बाजूंचे काही घटक या घटनांसंबंधी अतिरंजित अफवा पसरवून सत्य जाणून न घेता अथवा दोघांच्याही संमतीने विवाह झालेला असताना या घटनांतून आपली राजकीय पोळी भाजून घेतात.

– सुनील समडोळीकर, कोल्हापूर.

..तरच लोकशाही टिकेल!

‘लोकरंग’मधील (१७ जानेवारी) डॉ.  राजेश घासकडवी यांचा ‘सायलेंट मेजॉरिटी’ आणि सूरज येंगडे यांचा ‘लोकशाही : अमेरिकेतली आणि भारतातली’ हे दोन्ही लेख वाचकाला अंतर्मुख करणारे आहेत. देशातील प्रचंड गरिबी, शिक्षणाचा अभाव, जातिभेद, इ. प्रश्न सुटल्याशिवाय खरी लोकशाही अनुभवता येणार नाही. राजकीय नेत्यांनी पक्षपात न करता सार्वजनिक हिताचे निर्णय घेतले तरच या देशात लोकशाही टिकून राहील.

– अ. वा. कोकजे

अस्वस्थ करणारा लेख

डॉ.  संजय ओक यांच्या ‘मोकळे आकाश’ या सदरातील ‘नि:शब्द तळ्याकाठी’ (लोकरंग- २४ जानेवारी) हा लेख वाचला आणि खूपच अस्वस्थ वाटले. डॉ. ओक हे करोना भयपर्वाचे पहिल्या फळीतील कॅप्टन. खरेच इतके भयानक आहे सर्व? अद्याप या आजाराने गाठले नसले तरी हा लेख वाचल्यावर भीतीच वाटली. ही भीती कशी टाळता येईल याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन करायला हवे. डॉ. ओक यांनी सुरुवातीला उल्लेखिलेले वाक्य अद्यापि मनात रुतूून आहे.

– वैद्य संजयकुमार छाजेड, मालाड, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 12:21 am

Web Title: lokrang readers response letter abn 97 4
Next Stories
1 कूटचलनाची चाल!
2 बुद्धिबळातून प्रज्ञाभानाकडे..
3 रफ स्केचेस् : बंद फाइलमधील चित्रं!
Just Now!
X