|| कौस्तुभ केळकर- नगरवाला

 

satej patil kolhapur lok sabha marathi news
“…तर रात्री बारा वाजता काठी घेऊन तेथे यायला बंटी पाटील तयार”, सतेज पाटील यांचा इशारा
state vice president of the Congress Vishal Patil warned Mahavikas Aghadi about rebellion
सांगलीच्या रक्तातच बंड, आता माघार नाही – विशाल पाटील
Jitendra Awhad on supriya sule
“सुप्रिया सुळे सारखं दादा-दादा करायच्या, तेव्हा मला राग यायचा”, जितेंद्र आव्हाडांची उघड नाराजी; म्हणाले…
MP Udayanraje Bhosale reacts on being in touch with Sharad Pawar
सातारा: तुतारीचे काय, त्या आमच्या वाड्यातही वाजतात- उदयनराजे

जिगरी मतर सदाभौ यांस,

दादासाहेब गावकरचा दंडवत.

तुमी आमच्यावर डावूट घेऊन ऱ्हायलाय बरं का! आजून बी गावच्या वेशीवर आलेला पाहुना आमच्यासाटी देवासारका आसतुया. या शीजनला पान्याचं वांदं हाईती, पर पाहुन्याला तोशीस लागू देनार न्हाई आमी.

तुमी कंदी बी या गावकडं.. घर तुम्चंच हाय. आता सौताच्या गाडीतून येनार आसशीला, आन् पोरासोरांच्या हातावर खाऊ ठय़ीवनार आसशीला, तर तेवढं करू नगा. यापरीस प्रत्येकाला येक बिश्लेरीची बोटल द्या. आन् तुम्च्या वैनीसायबाला बिश्लेरीच्या धा लिटरच्या दोन हांडय़ा.

यंदाच्या साली पाऊस चांगला जाला म्हना की! पर मार्च-येप्रिल आला की पानी संपून जातंया. आमी आजून बी प-प साठीवतो. गुंज गुंज सोनं जमा करतू. पर पानी साटवून ठेवन्याचा मातर कटाळा करतु. धो-धो पडनाऱ्या पावसाचं पानी डोळ्यासमोर व्हावून जातं. सरकार त्येच्या बाजूनं हुईल तेवढं करीलच; पन् आमचा जिम्मा अजून आमी पूर्न करीत न्हाई. आम्च्या सुभान्यानं त्याच्या श्येतात शेततळं क्येलंया. मस पानी हाय त्येच्याकडं. उतरंडीच्या जमिनीला चर खनून त्येबी पानी साटवून ऱ्हायलंय त्ये बेनं.

आमीबी तसंच करनार म्होरल्या साली. यंदाच्याला नुस्ता आळस क्येला आन् तुम्च्या वैनीसायबानं आम्ची बिनपान्यानं.. ‘तळं राखील त्योच पानी चाखील’ खरं. या पापी संसारातून मुक्ती मिळनं  टँकरमुक्तीसारकंच डिफिकल्ट हाये सदाभौ.

बाकी तुम्च्या पुन्या-मुंबचं कवतिक सांगू नगा. आमच्या नानूच्या घरला गेलो हुतो पुन्याला- मागच्या म्हयन्यात. लई सुदारलाय गडी. येकदम शाजूक तुपातली मऱ्हाटी भासा. मदून मदून फाडफाड विंग्रजी. त्याच्या शोशायटीत चाळीस मोटारगाडय़ा हाईती. दोन पोरं रोज रामपारी बादली बादली पान्यानं गाडी धुवाया येतात. पाचशे रूप परित्येक मोटरीला. पशाची न्हवं, पान्याची चन हाय ही. आमास्नी न्हाई परवडनार.

आवं, तिकडं नगरला बी त्येच. दुकान उघिडलं की परित्येक दुकानदार बादलीभर पानी म्होरल्या रस्त्यावर मारतु. का रं बाबा? धूळ उडत न्हाई त्यानं.. गार वाटतंया म्हनं. आमाला कसं पटनार? तुमी इचारनार. आमी न्हाई धुत्ल्या गाडय़ा, न्हाई भिजीवलं दुकानाम्होरचं रस्तं. तरीबी इथल्लं पानी तुम्च्या गावाला गावनार हाये का? बरूबर हाये तुम्चं. न्हाई गावनार. पर तुमीबी पानी जपून वापरून ऱ्हायला की आमाला पान्याची लडाई लडायला बळ मिळतं गडय़ा.

बाकी एग्झ्मशीझन हिथंबी जोरात हुता. दहावी-बारावीच्या परीक्षा आता झाल्या बरं का. शाळा-कालिजाच्या आजून संपायच्या हाईत.

सदाभौ, च्याप्टर पोरास्नी लई डिमांड आसती या शीजनमंदी. मार्च-आक्टूबरचं लई पावसाळं पाह्यलेलं असत्यात त्येन्नी. सौताला पास न्हाई हुता आलं, पर दोस्ताला पास करन्यासाटी जीवाचा आटापीटा करत्यात. खाल्च्या मजल्याहून दुसऱ्या मजल्यावरच्या नेमक्या खिडकीत दगड मारून चिट्टी पोचवुतो गडी. असा नेम फकस्त दोनच लोकान्ला जमतुया. येक महाभारतातला अर्जुन आन् दुसरी आमच्या गावातली पोरं. पेपर लिवनारं पोरगं बी अर्धा किलु रद्दी घडी करूनॉ आपल्या कापडामंदी झाकून ठेवतंया. न्हाईतर डायरेक्ट सुपरवाईजरला हग्या दम द्य्नार. सदाभौ, आता येवढी जोरदार तयारी आसंल तर आख्खं गाव पास व्हायला हवं की नगं? पन कसंच काय! दरवर्सीचं वारकरी ठरल्यालं. बाप्ये झाल्ये तरी दहावीचा विंग्रजी सुटत न्हाई आजून.

आसं कॉपी करून शाळा-कालिजातली परीक्षा पास हुता येईल, पर जिंदगीच्या पेपरमंदी हमेशा फ्येलच हुनार.

आम्चं येक दोस्त हाये- शिरपती नावाचं. सिक्षनपद्दतीवर कदीच भरूसा नव्हता गडय़ाचा. कसाबसा आटवीपत्तुर शिकला गडी. मंजी ढकलला. रानात राब राब राबायचा. कसंबसं पोटापुरतं मिळायचं. धा वर्सापूर्वी नगरला गेल्ता. आनं येताना झेरॉक्क्ष मसीन घिवून आला. बायकूचं दागीनं गहान ठेवलं त्येच्यापाई. साळंभाईर येक गाळा घेत्ला आन् धपाधप झेरॉक्क्ष सुरू. या शीझनमंदी परसाकडं जायला बी फुरसत नसती गडय़ाला. चतकोर, हातभर, मायक्रू टाइपच्या झेरॉक्क्ष रेडी ठिवतू. मोटाली जाडजूड बुकं तळहातावर मावत्याती.

सदाभौ, तुमी प्येपरला जाताना आदी देवळामंदी जात आसशीला, पर आम्च्या गावच्या पोरांसाटी शिरपती हाच देव जनू. समद्य इद्यार्थी पयलं त्येच्या दर्सनाला. पोरास्नी समदं मटिरीयल पुरवतू तो. शिरपतीची बायकू दरसाली एक्झम शीजन झाल्यावर नवा दागिना करती. हाच गडी आपल्या सिक्षनपद्दतीवर जीव वोवाळून टाकतूया आताशा. आमी त्येला म्हन्लं, दोस्ता, तू  काय बरूबर करत न्हाईस गडय़ा. तू पोरास्नी कॉप्या पुरवतूस. काय म्हनून ऱ्हायलं त्ये बेनं ठावंय? दारूचा गुत्ता चालवनाऱ्यानं कष्टमरला गिपचीप दारू द्यावी. त्येच्या संसाराचा इस्कोट झाला तरी फिकीर करू नय. आपुन आपला धंदा इमानेइतबारे करावा.

काय बोलनार?

आमी म्हन्तू, येवढं एक्शपेरीमेन्ट क्येले- अजून एक शेवटला उपाय करा की राव! त्ये ‘वोपन टेक्श्ट एक्झम’ चालू करा. मंजी प्येपरला सेजारी बुकं, गाइडं ठिवून पेपर लिवायचा. े कॉपी चॅप्टर कायमचं संपल. समदं पास. तवा आम्च्या गावचं मास्तर म्हन्लं, तरीबी वाईच अवगड हाये. आवं, कंच्या प्रश्नाचं उत्तर पुस्तकात कुटं हाये, ेबी त्येन्ला गावनार न्हाई.  प्रश्न, पेज नंबर अशा कॉप्या पुरवशीला तवा कुटं ती पास हुनार. सदाभौ,  ‘कॉपी’ नावाचं इष पोरान्च्या रक्तात मिसळलंया. कितीबी डायलिशीश करा, कॉपीमुक्त परीक्षा अवगडच हाये.

सदाभौ, आमचं आबासायेब त्याकाळचं मॅट्रिक झालेलं. पावकी, दीडकी समदं हमेशा जिभंच्या टोकावर. पाडं पाठ. मोटाला हिशोब शून्य मिन्टात करायचं. कंचीबी लिखापढी न करता. त्येन्ला मस शिकायचं हुतं, पर न्हाई जम्लं.

आमास्नी चांगलं शिकाया मिळावं म्हून

राब राब राबलं. आमच्या परीनं आमी परयत्न क्येला. तसं आमी तुम्च्यासारकंच मिड्लक्लाशवालं.

विंजीनेर, डाग्दर न्हाई, पर बी. ए. झाल्यालो. मराठी शाहित्य हा ईषय घिवून. लई खुश झाल्तं आबासायेब तवा.

आमी आटवीत आसतानाची गोष्ट.

एक्झ्म शीझन. सुभान्याच पुडच्या बेंचवर. लई रडाया लागलं म्हून माझं प्येपर पासं केलं त्येला. कुलकर्नी मास्तरनी बरूबर पकडला आमा दोगास्नी. आधी त्येंनी सोलून काडला, मंग घरला आबासायेबान्नी.

‘‘पोरा, शून्य मार्क पडलं तरी चालंल. त्ये तुज्या मेहनतीचं आसाया हवं. त्ये सांगाया लाज वाटनार न्हाई. पर नक्कल करून शंबर बी गावलं तरीबी माजी मान खालीच जानार.’’

वाघासारकं आम्चं आबासायेब.. आम्चं हात हातात धरून ढसाढसा रडलं. तवापासून आत्तापत्तुर येका अक्षराची कॉपी न्हाई केली कंदी.

आमची ल्येक बी कम्प्लेंट करीत हुती परवाच्याला. साळतलं येक मास्तर क्लास घेतु. त्येच्याकडच्या पोरान्ला आदीच प्येपर गावतुया. मी हयोच किस्सा सांगिटला तिला. ती म्हन्ली, ‘‘कॉपी करनं आपल्या रक्तात न्हाई. तुमी बिनधास्त ऱ्हावा. जे काही मार्क मिळत्याल त्ये माजं सौताचं आसतील. म्हेनतीनं मिळवल्यालं.’’

हे ऐकलं आन् आम्चं बी आबासायेब जालं. डोळ्यातून पानी. कॉपीमुक्त परीक्षा. आमची लेक पयल्या नंबरानं पास जाली. तिकडं निकाल कायबी लागू द्यात.

सदाभौ, भविश्यात परत्येकाला आपल्या आवडीचं, लायकीचं काम कराया मिळंल अशी हमी देईल ती शिक्क्षन पद्दत समद्यात ब्येष्ट. आसं जालं तरच परत्येकाला आपापल्या फील्डमंदी सक्सेश गावनार, आन् देस बी फुडं जानार. हुशारी मार्कात तोलून ऱ्हायलोय आपून तोवर ही हागणदारी आशीच चालू ऱ्हानार. सदाभौ, जिंदगीत रोजच परीक्षा आसती. कदी पास, कदी फेल. फेलपणा बी पचवीता यायला हवा. दुसरं बेणं पुडं जाया लाग्लं की आम्च्या पोटामंदी मुरडा. त्येनं आटविलेलं रगत, घेतल्यालं कश्ट आमाला दिसनार न्हाईत. आमी आपलं फकस्त त्येचं पाय खेचनार. दुसऱ्याच्या सक्सेशचं दिलदार कवतिक जवा आमाला जम्येल तवाच आमी सक्सेशफुल होवू.  आसलं मूल्यसिक्षण आपल्या शिश्टीमनं द्योयाला हवं.

सदाभौ, लोकशाहीची मोटी एक्झॅम येवून ऱ्हायलीया. चपटीच्या मोहापाई, खिसा गरम करून ह्य़ेच्या-त्येच्या नावानं बोटाला शाई लावनं, ही कॉपीच जाली की राव!

चांगला मानूस.. आपला मानूस कशाची बी आपेक्षा न ठिवता शंशदेत पाठवशीला तवाच आपला रिझल्ट चांगला लागंल.

न्हाइतर निक्काल लागनार.

सदाभौ, अभ्यासाला लागा बिगीबिगी.

ब्येष्ट लक.

तुमाला.. आमाला आन् समद्या देसाला बी!

तुम्चा जीवाभावाचा दोस्त..

 

दादासाहेब गावकर

kaukenagarwala@gmail.com