वैद्यकीय क्षेत्रात सभा-संमेलने-परिषदा बक्कळ. आजचा दिवसही तसाच. नागपुरातला समारंभ. पण आजच्या परिषदेचा विषय मात्र सर्वथव वेगळा.. अंतर्मुख करावयास लावणारा.. kMarketing strategies in health care sectorl- अर्थात वैद्यकीय व्यवसायातील मार्केटिंगच्या योजना! वरवर पाहता काहीसा मन खट्ट करणारा. वैद्यक व्यवसाय- जो उदात्त परंपरा म्हणून गणला गेला.. जेथे चरकाने आणि सुश्रुताने साऱ्या जगाला संहिता दिली.. जेथे मानवाचे कूळ थेट अश्विनीकुमारांशी जोडले गेले.. जेथे चतुर्भुज धन्वंतरीने देवांचा आरोग्यदेव होण्याचे भाग्य मिळविले.. त्या वैद्यकाचे थेट मार्केटिंग? आणि तेही केवळ सेवेपुरते मर्यादित न राहता अगदी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशप्रक्रियेच्या सोपस्कारापर्यंत विस्तारावे, ही कल्पना मला सुरुवातीला अस्वस्थ करून गेली. पण काही काळ विचारमंथन केले, आजूबाजूला काय घडते आहे याचा कानोसा घेतला आणि लक्षात आले की, मार्केटिंग तंत्राने वैद्यकात आपले जाळे घट्ट विणले आहे. त्याला स्वीकारा-नाकारायचा पर्याय आता खुला नाही. फक्त त्याचे स्वरूप कसे असावे, याची दिशा मात्र ठरवणे शक्य आहे. वैद्यक क्षेत्रातील अनुभवी, जाणकार, मार्केटिंग तंत्रातील तज्ज्ञ, कायदा सल्लागार आणि सामान्यजनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन एका मंचावरून त्याची रूपरेषा ठरविण्याची वेळ आज आली आहे, हे निश्चित.
वैद्यकाने गेल्या काही दशकांत वृत्ती, व्यवसाय, प्रॅक्टिस, धंदा, उद्योग अशी अनेक रूपे पालटली आहेत. या क्षेत्रातील उदात्तीकरणाची तत्त्वे अक्षय असली तरी आता ती क्षीण झाली आहेत. निर्मलता कालबाह्य नसली, तरी काल-परवाची वाटते आहे. आता कार्पोरेट हॉस्पिटल्स, फ्रँचायझी हे परवलीचे शब्द बनले आहेत. नìसग होम्स संकल्पनेलाही घरघर लागली आहे. मॅटíनटी होम्समधील ममता लोप पावून, स्त्रीरोगतज्ज्ञ ती बंद करून मोठय़ा पंच-सप्ततारांकित रुग्णालयांत पगारी मनसबदार होणे पसंत करू लागले आहेत. तंत्रज्ञान जन्मापूर्वीपासूनच पाचवीला पुजले जात आहे आणि ते शेवटच्या श्वासार्प्यत आपले आयुष्य व्यापून टाकते आहे. तंत्रज्ञानाबरोबर त्याचे मोलही आले आहे आणि वैद्यकीय सेवेला किमतीची लेबले लागली आहेत. वैद्यक-विम्याने सशुल्क सेवेवर शिक्कामोर्तब केले आहे. व्यवसायात पराकोटीची स्पर्धा आली आहे. आणि या स्पध्रेने रुग्ण-वैद्य नात्याला व्यावसायिक करारमदाराचे रूप दिले आहे. जेव्हा सेवा देणारे योजक वाढतात, तेव्हा रुग्ण हा ‘रुग्ण’ न राहता ‘ग्राहक’ बनतो आणि वैद्य हा सेवेचा पुरवठादार.  मग- आमचीच सेवा सर्वोत्कृष्ट आणि किफायतशीर कशी, हे सांगण्याची अहमहमिका सुरू होते आणि त्यातूनच जन्माला येते वैद्यकीय मार्केटिंग! पूर्वी ज्या प्रसूतिगृहात आजी बाळंत झाली, त्याच दवाखान्यात घरातल्या लेकी-सुना जायच्या. हे अव्यक्त मार्केटिंग होते. विश्वासाचे नाते होते. ते शेजाऱ्यांना सांगोवांगी सांगितले जायचे आणि शेजारच्या कुटुंबांचाही राबता त्या दवाखान्यात सुरू व्हायचा. हा सारा विश्वासाचा वायदा होता. आता हॅण्डबिले सकाळच्या वृत्तपत्रांतून पान उघडल्यावर खाली पडतात. ठळक चौकटीत जाहिरात खुणावते. रस्त्याच्या खांबांवर, लोकलच्या डब्यांत ती अंगावर येते. उं१ी & उ४१ी अशी ‘उ’ची भलामण होते. इंटरनेट, फेसबुक, ट्विटर आपल्याला वैद्यकसेवेची आश्वासने देतात. ग्रुप इन्शुरन्स, सवलतीचे हेल्थ चेकअप्स, वयोवृद्धांसाठी शिबिरे, डोळ्याच्या विकारांचे कॅम्पस्, मोफत चष्मावाटप, डायबेटीस- ब्लडप्रेशरचे निदान. वैद्यकात अशी जाहिरातबाजी वेगवेगळ्या झुली पांघरून ग्राहकांना सामोरी जात आहे. त्यांतून नसलेले आजारपण झाल्याचा भास होऊ लागतो. ‘लहानपणच्या चुकीमुळे आपणास दौर्बल्य तर आले नाही ना?’ हा प्रश्न मला तरुणपणातच नव्हे, तर माझ्या येऊ घातलेल्या वार्धक्यातही धास्तावून सोडतो आणि मार्केटिंगचे हे तंत्र वैद्यकविश्वात चुकीच्या पद्धतीने हाताळले गेले असाच माझा समज होतो.
सखोल विचार केला तर लक्षात येईल की, चांगली वैद्यक जाहिरात ही माहिती देण्याचे माध्यम होऊ शकते. समाजाचे प्रबोधन करू शकते. दोलायमान अवस्थेत मन सापडलेल्या रुग्णास आधार देऊ शकते. कर्करोगात लवकर निदान करण्यासाठी प्राथमिक अवस्थेत वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी प्रवृत्त करू शकते.  एखाद्या व्याधीसाठी उपचारप्रक्रियेचे वेगवेगळे विकल्प सुचवू शकते. ती जशी स्पध्रेला खतपाणी घालते, तशीच वैद्यकीय व्यावसायिकांना आपापल्या क्षेत्रात निष्णात आणि ‘अप टू डेट’ ठेवण्यासाठी मदतनीसही होऊ शकते. नव्या रोबोटिक तंत्राची तोंडओळख करून देऊ शकते. प्रबोधनाचे माध्यम होते. वैद्यकीय महाविद्यालयांत ‘ई-लìनग’वर जोर देण्यासाठी संचालकांना प्रवृत्त करू शकते.  सिगारेटच्या पाकिटावर ती वैधानिक इशारे द्यायचीच; पण आता ही व्यसने म्हणजे मृत्यूला आमंत्रण- हा रोखठोक इशाराही देते.
मार्केटिंगचे कोणते माध्यम कसे प्रभावीपणे वापरावयाचे, हे ठरवण्याचे काम त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे. डॉक्टरचे नाही. मग समाजातील कोणता स्तर, वर्ग त्यात अपेक्षित ग्राहक आहे, याचा विचार करून माध्यम, भाषा, दृक-श्राव्यता ठरते. यासाठी पुरेसा धनसंचय (एकूण उलाढालीच्या तीन ते पाच टक्के) वेगळा ठेवावा लागतो आणि जाहिरात तयार करणाऱ्या कंपनीला वैद्यकीय नीतिमत्ता पूर्णपणे अबाधित राखण्याची जाणीव करून देऊन पुरेसे स्वातंत्र्यही देणे आवश्यक ठरते.
प्रबोधन करणे मी समजू शकतो. एका हातात शंख घेतलेल्या धन्वंतरीनेही ते केलेच आहे. संभाव्य धोक्यांची जाणीव करून देणेही इष्ट. पण भरमसाठ आश्वासने देणे, वैद्यकविश्वात कधीतरीच घडणाऱ्या चमत्कारांचे दाखले देणे आणि सेवेचा पशाशी उघडानागडा संबंध जोडणे मला धोकादायक आणि अशोभनीय वाटते. मार्केटिंग आणि मेडिसीन यांची सांगड घालताना रुग्ण हा ‘क्लायंट’ होऊ नये आणि ‘कस्टमर’ म्हणून कधीच गणला जाऊ नये. ‘क्लायंट’ हा कायद्याचा वारसदार, तर ‘कस्टमर’ हा सशुल्क व्यावहारिक रिटेल ग्राहक. विमानातून उतरताना हवाईसुंदरी आणि वैमानिकाने दारात उभे राहून निरोप देताना ‘पुन्हा आमच्याच कंपनीची सेवा घ्या..’ म्हणणे म्हणजे कस्टमर रिलेशनशीप. तोच नियम रुग्णाला डिस्चार्ज देताना हॉस्पिटलचा मॅनेजर ‘पुनरागमनाय च’ म्हणून राबवू शकेल का? याचे उत्तर नकारार्थी आहे. पण रुग्ण घरी गेल्यावर दोन दिवसांनी घरी फोन करून त्याच्या तब्येतीची विचारपूस करणे, त्याला योग्य सल्ला देणे, हे ‘इनडायरेक्ट मार्केटिंग’ आहे आणि हे स्वागतार्ह आहे.
..नागपूरहून घरी आलो. टीव्ही लावला. आईच्या डोळ्याचे ऑपरेशन होऊन पट्टी काढण्यापूर्वी तिने हाक मारली, ‘बेटा..’ आणि डॉक्टरने आणि तिच्या मुलाने दोघांनी ‘ओ’ दिली. मला बरे वाटले. त्यात मार्केटिंग होते, पण k Human touch आणि Modern technique दोहोंचाही अंतर्भाव होता. वैद्यक आपली आद्यकर्तव्ये विसरले नव्हते.

lighting on trees for decoration, lighting on trees thane marathi news
ठाणे, कल्याण- डोंबिवली, मिरा भाईंदरमध्ये वृक्षांचा गळा घोटण्याचे कार्य सुरूच, उच्च न्यायालयाच्या नोटीस नंतरही शहरात वृक्षांवर विद्युत रोषणाई
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
There are no sports events and cultural programs in Nagpur here is the reason
नागपुरात क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम नाही, जाणून घ्या कारण…