29 January 2020

News Flash

पैसे, महागाई आणि गुंतवणूक

‘पाच हजार रुपये मिळत वर्षअखेरीस इस्टेटीकडून.. चन होती चन. काय समजलीस?’ आणि ‘२५ हजार रुपये महिना पुरत नव्हते, म्हणून मग संध्याकाळी शिकवण्या घ्यायला सुरुवात करावी

| February 23, 2014 01:02 am

‘पाच हजार रुपये मिळत वर्षअखेरीस इस्टेटीकडून.. चन होती चन. काय समजलीस?’ आणि ‘२५ हजार रुपये महिना पुरत नव्हते, म्हणून मग संध्याकाळी शिकवण्या घ्यायला सुरुवात करावी लागली..’ हे दोन उद्गार पंधरा मिनिटांच्या अंतराने ऐकले की थक्क व्हायला होते. पाच हजारांत एकत्र कुटुंबात चन करणारे नव्वदीच्या घरातील सुरकुतलेल्या चेहऱ्याचे नानासाहेब आपल्या जमीनदारीच्या दिवसांची १९५० की १९६० सालातील आठवण सांगत असतात. त्यांच्या सुखद आठवणी ऐकून झाल्यावर काही वेळातच दुसरीकडे शिंदेकाकी जानेवारी महिन्यात गणिताच्या शिकवण्या सुरू करण्यामागचे खरे कारण हळूच सांगतात. दोन्ही घटना आणि दोन्ही व्यक्तींचा खरे तर एकमेकांशी काहीही संबंध नाही, पण सतत पळणारा काळ पशाचे घसरत जाणारे मोल जाता जाता अधोरेखित करून जातो.
पशाचे घसरणारे मोल म्हणजेच महागाई किंवा महागाईचा थेट परिणाम म्हणजेच पशाची कमी कमी होत जाणारी किंमत. महागाई समजून घ्यायला १९५० सालात आम्ही १० रुपयांत भाताचे पोते विकत घेत असू, म्हणणाऱ्या आजोबांकडे जायची गरज नाही. गेल्या वर्षी आपल्या कुटुंबाला एका महिन्याकरिता लागणारे तांदूळ, गहू, डाळी आणि तेल यांच्यासाठी किती खर्च येत असे आणि आज किती खर्च येतो, यातला फरक एखादी गृहिणी झटकन् सांगेल. हा फरक म्हणजेच महागाई. वस्तू आणि सेवांच्या किमतीतील वाढ म्हणजेच महागाई. इतकी साधी आणि सोपी अर्थशास्त्रीय व्याख्या असलेली ही महागाई गुंतवणुकीच्या जगात कशाला हवी, ते आता बघू.
भविष्याची चिंता गुंतवणूक करायचे एक प्रमुख कारण असते. येणारा उद्या आजच्यापेक्षा थोडा जास्त चांगला असावा, अशी एक माफक अपेक्षा असते. कुणी मुलांच्या शिक्षणासाठी पसे गुंतवतो, तर कुणी म्हातारपणी सेवानिवृत्त जीवनाची तजवीज करण्यासाठी पसे गुंतवतो. कारण काहीही असले, तरी सगळ्या गुंतवणुका उज्ज्वल उद्यासाठी केल्या जातात. पण हे करत असताना फार कमी वेळा महागाईचा विचार केला जातो. माझी मुलगी आज तीन वर्षांची आहे. उच्च शिक्षण घ्यायचे तर आज दहा लाख रुपये सहज खर्च होतात. माझ्या मुलीला उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर मला आतापासून पसे साठवणे आवश्यक आहे. पण पुढील १३ वर्षांत केवळ दहा लाख साठवून चालणार नाहीत. माझे उच्च शिक्षण केवळ एक लाख रुपयांत झाले. पण आज त्याकरिता दहा लाख रुपये खर्च होत आहेत. कारण एकच- महागाई. पुढील १३ वर्षांत मुलीच्या शिक्षणाची तजवीज करताना या महागाईचा विचार न करणे परवडणारे नाही. महागाईचा दर सहा टक्के असेल तर आजच्या उच्च शिक्षणासाठी १३ वर्षांनी १० लाखाच्या ऐवजी  साधारणत: १९ लाख रुपये लागतील. हाच नियम सगळ्याच बाबतीत लागू पडेल. आज एखाद्या कुटुंबाचा मासिक खर्च रुपये २५ हजार असेल आणि त्या कुटुंबाने आपली जीवनशैली कायम ठेवली तरी पुढील वर्षी २५ हजार रुपयांत महिनाभराचा खर्च भागणार नाही. महागाई १० टक्के असेल तर त्याच कुटुंबाला पुढील वर्षी महिनाभर घर चालवायला किमान रुपये २७,५०० लागतील.     
भविष्यकालीन आíथक उद्दिष्टे ठरविताना महागाईचा निकष लावायलाच हवा. उद्दिष्टे व्यवस्थित माहीत असतील तरच योजना चांगली आखता येते. महागाई केवळ दीर्घकालीन आíथक उद्दिष्टांवरच परिणाम करते असे नाही. एखादी सेवानिवृत्त व्यक्ती म्हणेल, माझ्यावर आज कोणतीच जबाबदारी नाही. माझ्या आजच्या जमा पुंजीमधून मला नीट जगता येईल इतके व्याज मला मिळते आहे, तर कशाला महागाईची काळजी करू? पण गेल्या तीन-चार वर्षांत ज्याप्रमाणे महागाईचा दर चढा राहिला आहे, त्याप्रमाणे जर तो आणखी काही काळ राहिला तर उद्या त्याच पशावर मिळणाऱ्या व्याजात जगणे कठीण होईल. उदाहरणार्थ, आज ३० लाख रुपयांच्या जमा पुंजीवर ७ टक्के करोत्तर व्याजदराने रुपये २.१ लाख व्याज मिळते. ठेवीदाराला हे व्याज जेमतेम पुरते अशी स्थिती असेल तर पुढील वर्षी महागाई वाढेल आणि वार्षकि खर्च रुपये २.२ लाखांची मर्यादा ओलांडेल तेव्हा जमा आणि खर्चाची तोंडमिळवणी करणे फार कठीण होईल.
कोणतीही गुंतवणूक करताना महागाईकडे लक्ष देण्यामागे आणखी एक कारण आहे. आपण गुंतवणूक करतो म्हणजे आज पसे खर्च करून त्यापासून मिळणारा आनंद न घेता तोच आनंद भविष्यात कधीतरी मिळेल अशी अपेक्षा ठेवतो. उदाहरणार्थ, आज माझ्या पर्समध्ये एक हजार रुपये आहेत. या पशात एखाद्या रविवारी मी सिनेमा बघू शकते आणि हॉटेलात जेऊ शकते. पण तसे न करता ते पसे मी एक वर्षांच्या बँकेच्या मुदत ठेवीत ठेवते. त्यावर मला ९ टक्के व्याज मिळते. वर्षअखेरीस माझ्या पर्समध्ये १,०९० रुपये असतात. एक वर्षांनंतर जर सिनेमाचे तिकीट आणि हॉटेलमधील जेवण यावर माझे १,२०० रुपये खर्च झाले तर मला बँकेत पसे ठेवून काहीच उपयोग झाला नाही, असे  म्हणावे लागेल. येथे एका वर्षांत महागाईचा दर २० टक्के होता आणि तो मला मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त होता. त्यामुळे मला नुकसान सहन करावे लागले.
एखाद्या मुदत ठेवीत पसे ठेवत असताना करोत्तर सत्य उत्पन्न किती मिळते, ते जरूर बघा. मुदत ठेवीवर व्याजदर ९ टक्के असेल आणि तुम्ही २० टक्के कर भरणारे करदाते असाल तर करोत्तर उत्पन्न ७.२ टक्के इतकेच असेल. त्याच वर्षांत महागाईचा दर ९ टक्के असेल तर ७.२ – ९ =  – १.८ टक्के.  १.८ टक्क्य़ांच्या आधी वजा चिन्ह आहे, म्हणजेच तुम्हाला १.८ टक्के तोटा होतो आहे. मुदत ठेवीवर अतिरेकी प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी हा हिशोब समजून घेतला तर त्यांना कळेल की, उच्च महागाई दराच्या जमान्यात ते एका ट्रेडमिलवर धावत आहेत. कितीही धावलात तरी पुढे जाण्याची शक्यता नाहीच. मागे पडण्याचीच शक्यता आहे. १९९८ ते २००२ या कालावधीत बऱ्याच व्यक्तींनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यावेळी काहीजणांना चांगले पसेदेखील मिळाले. आणि त्या काळात ही मंडळी व्याजावर मिळणाऱ्या उत्पन्नात फार सुखी होती. त्यातील काही मंडळी मुदत ठेवींच्या प्रेमात पडली आणि अशा बऱ्याच मंडळींना आज व्याजाचे उत्पन्न अपुरे वाटते आहे. ही मंडळी वर उल्लेख केलेल्या ‘ट्रेडमिल’चे उत्तम उदाहरण आहेत.
गुंतवणुकीच्या जगात महागाईकडे दुर्लक्ष करणे यासारखी मोठी चूक नाही.                                            

First Published on February 23, 2014 1:02 am

Web Title: money inflation and investment
Next Stories
1 लेख अपूर्ण वाटला
2 ऋतुराज आज वनी आला…
3 पन्नाशी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची!
Just Now!
X