मकरंद देशपांडे

वयाच्या २९ व्या वर्षी मला संत श्री साधू वास्वाणी यांच्या जीवनावर आधारित नाटक लिहून दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. तोपर्यंत समाजातला धर्मा-धर्मामधील राग पाहिला होता. बाबरी मशीद पाडली गेली होती. दंगे झाले होते. माणसं मारली गेली. घरं पेटवली गेली. माणसंही पेटवली गेली. श्रीकृष्ण आयोगाने नमूद केलंय, की पोलीसदेखील मारले गेले. कित्येक जखमी झाले. मनाला प्रश्न पडला होता, की सृष्टीच्या तारकधारकाच्या ठिकाणाच्या वादावरून शहराचे तारकधारक पोलीसही मारले गेले आणि भक्तही! का? या प्रश्नाचं उत्तर कलियुगात कसं मिळणार! प्रश्नाला उत्तर नाही, उलट आणखीन प्रश्नच सापडले.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
soil dumping in Pavana
पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या पात्रात राडारोडा, महापालिकेकडून दंडात्मक कारवाई
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी

मी पाल्र्याच्या घरी होतो. बाबरी मशीद पाडली गेली होती आणि ‘पृथ्वी थिएटर’ला लेखनावर कार्यशाळा घेण्यासाठी स्कॉटलंडचे नाटककार जॉन (आडनाव विसरलो) आले होते. ते दंग्यात अडकू नयेत म्हणून मी माझी स्कूटर काढली. अंधेरीच्या ब्रिजवरून पश्चिमेला आलो, तर तेव्हा कोणीतरी ओरडला की, ‘पुढे प्रेत आहे! एक घोळका धावत येतोय!’ मी तसाच स्कूटर घेऊन ‘पृथ्वी’ला गेलो. जॉननी मला बाथरूममध्ये विचारल्याचं आठवतंय, ‘‘मकरंद, बट व्हाय?’’ त्यांनीही प्रश्न विचारला! त्याचं उत्तर मी दिल्याचं आठवत नाही. कारण मला त्यांना स्कूटरवर बसवून सुखरूप हॉटेलवर सोडायचं होतं.

१९९२ सालच्या गणपती उत्सवासाठी ‘हॅप्पी होम अ‍ॅण्ड स्कूल फॉर द ब्लाइंड’ या वरळी येथील शाळेसाठी संजना कपूर लहान मुलांना घेऊन नाटक बसवणार होती. मी तिला ‘कैलाश का गणपती’ नाटक लिहून दिलं.

गणपती विकत घ्यायला गेलेल्या एका वडील आणि मुलाला एक मूर्तीच खूण करते आणि घरी घेऊन जायला सांगते. तो गणपती त्यांच्याकडून जे पाहिजे ते करवून घेतो. खरं तर मूर्तीनिवडीवर हे भाष्य होतं. म्हणजे गणपती घ्यायला आलेला भक्त हा मूर्तीचं रूप, रंग, लहान-मोठा, त्याचं वाहन बघून मग निवड करतो. पण या एकांकिकेत मूर्तीच ठरवते, की ती कोणाच्या घरी जाणार आणि मग झालेला गोंधळ, मज्जा आणि आरती-प्रसाद!

नाटकात काम करणारी मुलं ही सहा ते बारा वर्षे वयोगटातली. काही मुलं Semi Sight वाली- म्हणजे धूसर दिसणारी, तर काहींना फक्त काळोख. संजनानं खूप प्रेमानं आणि मेहनतीनं ती एकांकिका बसवली. मी संगीतवृंदाकडून तालीम करून घेतली. ढोलक वाजवणारी मुलं, गाणारीही मुलं. गणपतीच्या आरत्या संगीतबद्ध केल्या होत्या शाळेच्या सरांनी, त्यांनाही दृष्टी नव्हती.

‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या उक्तीप्रमाणे अंधारातून प्रकाशाकडे असा तो अनुभव होता. त्या नाटकात जितू नावाचा मुलगा तर सराईतपणे स्टेजवर फिरायचा. डोळस मोठे कलाकारसुद्धा स्टेजवरच्या सेटला अडखळताना मी पाहिले आहेत, पण जितू कधीही पडला नाही. खरंच त्यांना अंधारात दिसत होतं आणि प्रकाशातलं जग मात्र अंधार पसरवत होतं.

माझ्या मनात काळ्या-पांढऱ्या विचारांचा बुद्धिबळाचा खेळ चालू होता. बलवान राजाला वाचवण्यासाठी वजीर, उंट, हत्ती, घोडे आणि प्यादीही लढत होती. दोन्हीकडे, दोन्हीकडच्या राजांना होणाऱ्या नुकसानाची, नासधुशीची कल्पना होती का? की कल्पना असूनही हिंसात्मक युद्ध चालू होतं? पुन्हा प्रश्न!

या पाश्र्वभूमीवर ‘हॅप्पी होम अ‍ॅण्ड स्कूल फॉर द ब्लाइंड’च्या मुख्याध्यापिका मेहेर मॅडमनी माया बी. रामचंद यांना माझं नाव सुचवलं आणि साधू वास्वाणी यांच्या जीवनावर नाटक करायची संधी मिळाली.

मायाजी- ज्या स्वत: पंचाहत्तरीच्या घरात होत्या वयाने, पण धडाडी व्यक्तिमत्त्व मनाने! त्यांनी माझ्यासमोर बरीच पुस्तकं ठेवली. हे नाटक अभ्यास करून लिहायचं होतं. मी पुण्याला गेलो. साधू वास्वाणी संस्कार करून घेतले. मग साधारण आठ दिवस एका रूममध्ये राहून अभ्यास केला. जवळ जवळ सगळी पुस्तकं वाचली आणि मग नाटक लिहायला सुरुवात केली.

त्यांची जीवनी डोक्यात होती. म्हणजे जन्म सिंध प्रांतातल्या हैदराबादचा, पुढे शालेय शिक्षण, डिग्री कुठे घेतली, प्रोफेसर म्हणून कोलकात्यात येणं, १९४९ साली पाकिस्तानातून हिंदुस्थानात.. वगैरे वगैरे. तुम्ही गुगल केलंत तर जास्तीत जास्त माहिती मिळेल. मला त्यात नाटक आणायचं होतं, म्हणजे स्टेजक्राफ्ट हा लेखनातच आणायचा होता. मी ठरवलं, थांवरदास वास्वाणींचा जन्म झाला त्या रात्री आकाशात एका ताऱ्याचा जन्म झाला आणि ध्रुव तारा त्याची गोष्ट सांगू लागतो.

नाटक ‘थांवरदास ते साधू वास्वाणी’ आणि ‘शिशुतारा ते चमकणारा तारा’ अशा दोन भागांत दाखवलं गेलं. कारण माझं म्हणणं होतं की, असं व्यक्तिमत्त्व हे Cosmic intervention शिवाय होऊ शकत नाही. ते उपनिषदांत पारंगत झाले, तरी बायबल आणि कुराणावरही विश्वासपूर्वक बोलायचे. त्यांचं म्हणणं होतं की, ‘धर्म खूप, पण विचारधारेचा आत्मा एक!’

मी क्रिएटिव्ह लिबर्टी घेतली आणि त्यांच्या हिंदुस्तान-पाकिस्तानच्या यात्रेबरोबर जगातल्या घडामोडीसुद्धा दाखवल्या. उदाहरणार्थ, १९१० साली बर्लिनमध्ये झालेल्या जागतिक धर्मसभेत साधू वास्वाणी आपल्या गुरू प्रमोथोलाला सेन यांच्याबरोबर गेले होते आणि जगाच्या शांतिबद्दल बोलले होते. पण ऐकलं गेलं नसावं. कारण १९१४ ला पहिलं महायुद्ध झालं. संत हे नेहमी हिंसक वातावरणात निर्माण होत असावेत असं दाखवण्याचा माझा उद्देश होता. साधू वास्वाणींच्या आश्रमात नेहमीप्रमाणे प्रसाद वाटला जायचा.

पण तेव्हा नवनिर्मित पाकिस्तानात मोहम्मद अली जिनांच्या मृत्यूनंतर तो वाटला गेला असं बोललं गेलं आणि वास्वाणींना तिथून हिंदुस्थानात यावं लागलं.

ध्रुव तारा त्या नवीन ताऱ्याला हिंदुस्तानची दिशा दाखवतो. मग तो नवीन तारा हिंदुस्तानात राहतो आणि एकच गोष्ट सांगतो की, ‘ताऱ्याला धर्म नाही. तो आकाशात खूप दूरवर असूनही दिसतो. आपण जमीन विभाजित करू शकतो, पण आकाश नाही.’

नाटकाचं शीर्षक ‘यात्री’ ठेवलं होतं. कारण ते स्वत:ला सगळ्या धर्माचे सेवक समजायचे. गांधीजींच्या अहिंसा चळवळीचे ते समर्थक होते. गांधीजींनी सुरू केलेल्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरचा पहिला लेख साधू वास्वाणींनी लिहिला होता. भारत सरकारने साधू वास्वाणींच्या मरणोपरांत त्यांच्या नावाने २० पैशाचा स्टॅम्प काढला होता.

अशा महत्त्वपूर्ण जीवनावर नाटक लिहिणं हे आव्हान होतंच; पण ते सादर करायचं होतं क्रॉस मैदानावर, कारण बघायला पाच ते दहा हजार लोक येणार होते. ते ऐकल्यावर मी खात्री करून घेतली होती, की कोणत्याही क्रिकेटच्या खेळपट्टीवर खांब उभा केला जाणार नाहीये ना!

स्टेज किती मोठं लागेल, त्याची लांबी-रुंदी काय असेल, हे सगळं मला ठरवायचं होतं. म्हणजे मला थोडं Architec वा इंजिनीअिरगचं डोकं वापरायचं होतं. कारण त्या स्टेजवर २५ नट फिरणार होते. खाली संगीतपीठ बनवलं होतं. हा एक वेगळाच अनुभव माझ्यासाठी होता. कारण क्रॉस मैदानावर या आधी मी खूप मॅचेस् खेळलो होतो आणि आता त्याच ग्राऊंडला स्टेज बनवायचं होतं. खरचं शेक्सपीअर म्हणतो ते खरं आहे, All World is a Stage!

साधू वास्वाणी साकार करणार कोण, या प्रश्नाचं उत्तर मी मनात म्हटलं- आपण शोधण्यापेक्षा त्यांना आपल्यापर्यंत पोहचू दे! जसं पुस्तकाबद्दल म्हटलं जातं, की एखादं पुस्तक वाचक निवडत नाही, तर पुस्तकच आपला वाचक निवडतं!

पृथ्वी थिएटरमध्ये बाहेर प्लॅटफॉर्म परफॉर्मन्स संपत आला होता आणि मी पोहचलो. बघतो तर खूप गर्दी. पुढे बसलेल्या, मागे उभे राहिलेल्या प्रेक्षकांची गर्दी आणि त्या गर्दीतही दिसणारा सॉक्रेटीस! सॉक्रेटीस विषाचा प्याला पितो असे शेवटचे दृश्य होते. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. एका नटात एवढी ताकद, की ओपन एअरमध्ये आपल्या अभिनयाचा परिणाम साधला.

दुसऱ्या दिवशी त्याला शोधत सांताक्रूज, पूर्व येथील Lunar या छोटय़ाशा कॅफेमध्ये गेलो. तिथे विचारपूस केली असता कळलं, की तो येईल इथे, पण कधी ते सांगता येणार नाही. तेव्हा अचानक एका दाढीवाल्या तेजस्वी व्यक्तीनं मला म्हटलं की,‘‘कम विथ मी.’’ आणि तो पुढे चालत निघाला. रिक्षा केली. रिक्षात माझं नाव विचारलं. मात्र बाकी काही संभाषण नाही. पण मी सॉक्रेटीसबद्दल बोललो तेव्हा तो म्हणाला, ‘‘ते मी लिहिलंय.’’ या रायटरचं नाव- राज सुपे! (याच्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या लेखात सांगेन.) तो घेऊन गेला मला रेल्वे क्वॉर्टर्स, बिल्डिंग नं.- १५६ मध्ये! पहिल्या मजल्यावर एका फ्लॅटचा दरवाजा उघडला. आत तसा अंधारच होता. राज सुपेंनी आत जाऊन त्या नटाला बोलावलं. खिडकी उघडली. तो नट लुंगी सावरत माझ्यासमोर आला. मी उभा होतो. माझी उंची पाच फूट दहा इंच, पण तरीही मला त्याच्याकडे पाहताना मान उंच करून पाहावं लागत होतं. तो सहा फुटी नट म्हणजे- के. के. मेनन! मी त्याला एवढंच म्हटलं की, ‘‘तू खूप मोठा नट आहेस.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘म्हणून घरी बसलोय!’’

केके शोच्या तारखेला बाहेरगावी जात असल्याकारणाने ‘साधू वास्वाणी कोण करणार?’ हा प्रश्न तसाच राहिला. पण एवढय़ा ताकदवान नटाला आपण सोडू नये म्हणून मी केकेला म्हटलं, ‘‘तू नाटकात काम करू नकोस, पण मदत म्हणून तालमीला येत जा.’’ त्याला कदाचित नवीन नटांना मार्गदर्शक म्हणून रोल आवडला असावा. केकेने सगळ्या नटांकडून चोख तालीम करून घेतली.

मी साधू वास्वाणींची भूमिका पाच नटांमध्ये विभागली.. बालपण, शाळा, कॉलेज, प्रोफेसर आणि साधू वासवानी! अनुराग कश्यप त्यात कॉलेज जीवनातील ‘थांवर वास्वाणी’ झाला होता. अनुरागला मी काहीही सांगितलं, की तो ऐकायचा. पुढे जाऊन तो लेखक-दिग्दर्शक होईल असं खरंच वाटलं नव्हतं. पण हीच तर गंमत आहे. आपल्याला दिलेलं काम चोख करताना माणूस म्हणूनही आपण घडत असतो आणि जीवनाबद्दल लिहायला आधी माणूसच बनावं लागतं. मग ते लेखन काल्पनिक का असेना!

पूजा लाढाने- जी आता खूप छान एडिटर आणि स्क्रीन रायटर आहे (‘एक हसीना थी’, ‘अंधाधून’, ‘एजंट विनोद’)- साधू वास्वाणींच्या आईची भूमिका केली होती. ती बऱ्यापैकी गायचीसुद्धा.

मी कास्टिंग हे नेहमीच जे त्या-त्या वेळेस भेटतील वा आधीच कधीतरी, कुठेतरी भेटलेले असतील अशांचं करायचो. ठरवलेला नट शोधून कधीच नाटक लिहिलं नाही वा केलं नाही.

नाटकाला संगीत हवं आणि ते लाइव्ह हवं असं मला वाटलं आणि संगीतकक्ष असा तयार केला, की आजचे संगीतकार भारावून जातील. जॅझ सिंगर संध्या दिनशॉ, इंदोरचे व्हायोलीन व फ्ल्यूट वादक रतिश आणि महेश तागडे (जे आज मराठी मालिकांचे यशस्वी निर्माते आहेत.) वारकरी संप्रदायाचे एकतारीवर गाणारे अण्णा, साइड रीदम आणि जलतरंग वाजवणारे प्रदीप आणि (बहुतेक) चार गाणाऱ्यांचा कोरस!

प्रयत्न असा होता, की संगीत हे नुसतं भौगोलिक न राहता यात्रेचं असावं आणि साधू वास्वाणी हे जगाचे होते. शो संपला तेव्हा ट्रस्टच्या काही सभासदांनी मला सांगितलं की, ‘जितना आप ने नाटक में बताया उतना तो हमें भी पता

नहीं था।’

हीच तर नाटक या माध्यमाची गंमत आहे. माहिती (असलेलीही) पुन्हा नव्याने, पण परिणामकारकपणे प्रेक्षकांना दाखवता येते. कारण नाटक हे केवळ घटनांचं नसतं, तर ते घटना घडताना घडणाऱ्या मनातल्या घडामोडींचं असतं. जय नाटक!

mvd248@gmail.com