स्थळ : न्यूयॉर्कमधील युनोचे मुख्यालय. दिनांक : १९ नोव्हेंबर २०१४. कार्यक्रम : जागतिक पातळीवर ‘शांतता आणि नि:शस्त्रीकरण’ या क्षेत्रातील कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम. पुरस्कार प्रदान सोहळा झाल्यानंतर पुरस्कारविजेते जयंथा धनपाल यांनी उत्तरादाखल केलेल्या छोटेखानी भाषणाची सुरुवात अशी होती : ‘सगळे आयुष्य शांतता आणि नि:शस्त्रीकरण यासाठी व्यतीत केल्याने त्या दोन्हीतील गुंतागुंत मला माहीत आहे. तरीही माझ्या उर्वरित आयुष्यात हे जग अण्वस्त्रमुक्त झाल्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरलेले मला पाहायला मिळणार आहे; नक्की! हा कुणाला भाबडा आशावाद वाटेल. परंतु मला या आशावादामागील वास्तव प्रेरणा स्पष्ट दिसत आहेत. म्हणून मी इथे उपस्थित असणाऱ्या सर्वाना नि:शस्त्रीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याची आग्रहाची विनंती करतो आहे.’ भाषणाच्या अशा आशावादी सुरुवातीनंतर ७५ वष्रे वयाच्या धनपाल यांनी पुढच्या १५ मिनिटांत महत्त्वाच्या मुद्दय़ांची तर्काधिष्ठित, बिनतोड मांडणी केली.
जयंथा धनपाल हे श्रीलंकेचे नागरिक. उच्चविद्याविभूषित धनपाल यांनी लंडन, बीजिंग, वॉिशग्टन, नवी दिल्ली आणि जिनिव्हा येथील श्रीलंकेच्या दूतावासांमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्यांची नेमणूक श्रीलंकेचे अमेरिकेतील राजदूत म्हणून झाली. धनपालांनी अण्वस्त्र प्रसारबंदी कराराच्या (एनपीटी) १९९५ साली झालेल्या पुनरावलोकन परिषदेच्या अध्यक्षपदाची धुराही समर्थपणे सांभाळली. त्यासाठी त्यांचे जगभर भरपूर कौतुकही झाले. युनोचे तत्कालीन प्रमुख कोफी अन्नान यांच्या विनंतीवरून इ. स. १९९८ मध्ये युनोच्या नि:शस्त्रीकरण विभागाची नव्या धोरणांप्रमाणे पुनर्रचना करण्यासाठी धनपाल यांना पाचारण करण्यात आले. निवृत्तीपर्यंत ते या खात्याचे प्रमुख झाले. त्याशिवाय ते ‘बुलेटिन ऑफ द अ‍ॅटॉमिक सायंटिस्ट’ या नियतकालिकाच्या बोर्ड ऑफ स्पॉन्सर्सचे सदस्य, ‘स्टॉकहोम पीस रिसर्च इन्स्टिटय़ूट’ (रकढफक) च्या गव्हìनग बोर्डचे सदस्य आणि इ. स. २००७ पासून ‘पग्वाश’ (शांतता) चळवळीचे अध्यक्ष आहेत.
जग अण्वस्त्रमुक्त होईल या आशावादामागील भूमिका मांडताना धनपाल म्हणतात, ‘बíलनची िभत पाडून- म्हणजे शीतयुद्ध संपून २५ वर्षे आणि १९३ देशांसोबत शांतता राखू पाहण्याचे काम चिकाटीने करणाऱ्या युनोची स्थापना होऊन ७० वष्रे होत आली आहेत. अशावेळी जगापुढील सर्वात महत्त्वाचे प्रश्न असे आहेत :
४ ‘इंटरगव्हर्नमेंट पॅनेल फॉर क्लायमेट चेंज’ (आयपीसीसी) चा पाचवा मूल्यांकन अहवाल स्पष्ट शब्दांत धोक्याची सूचना देतो आहे. हरितगृह परिणाम, वसुंधरेचे तापमान वाढणे, त्याचे पर्यावरणीय परिणाम, इत्यादी पर्यावरणीय बदल मुख्यत: जीवाश्म इंधन जाळणाऱ्या मानवी कृतींमुळे होत आहेत. त्यावरील उपाय वेळीच अमलात आणले नाहीत तर जग भयंकर संकटाच्या खाईत जाईल. ४ आíथक विषमता जगात सर्वत्र वेगाने वाढते आहे. दारिद्रय़ाने सर्वात जास्त पिचलेली जगातील १०० कोटी माणसे केवळ एक टक्का आíथक वाटय़ावर गुजराण करीत आहेत. त्याचवेळी जगातील सर्वात श्रीमंत १०० कोटी माणसे ७२ टक्के आíथक वाटा वापरत आहेत. या विषमतेमुळे तरुणांच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत आहे. जगाच्या लोकसंख्येत ही तरुण मंडळी २६ टक्के आहेत. त्यातून अनेक ठिकाणी तणाव निर्माण होत आहे. ४ धार्मिक मूलतत्त्ववाद आणि दहशतवाद जगभर वाढत आहे. त्याची परिणती अनेक िहसक घटनांमध्ये होते आहे. ४ इस्रायलसारखी काही राष्ट्रे दहशतवादाचे आंतरराष्ट्रीय कायदे पायदळी तुडवत आहेत. ४ सध्या जगभरातील सुमारे पाच कोटी लोक युद्ध व िहसा यामुळे निर्वासित झालेले आहेत. ४ भूक, दारिद्रय़, अनारोग्य आणि मानवी अधिकारांची पायमल्ली यामुळे मानवी जीवन विस्कटले आहे.

आपल्या भाषणात पुढे ते म्हणतात की, या महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांची सोडवणूक अण्वस्त्रे करू शकणार आहेत का? जरा विचार करून मला उत्तर द्या. सध्याच्या परिस्थितीत अनेक देश विविध मार्गानी अण्वस्त्रे मिळवू शकतील. कदाचित ही अण्वस्त्रे दहशतवादी गटांच्याही हाती पडू शकतील. अण्वस्त्रे वापरून ‘मर्यादित’ युद्ध झाले तरी मानव आणि संसाधनांची प्रचंड हानी होईल. त्यातून होणारे जागतिक पर्यावरणीय बदल कदाचित अपरिवर्तनीय ठरतील. या जगाचे अण्वस्त्रांपासून रक्षण करण्याची आपली नतिक जबाबदारी आहे. या सर्व बाबी माहीत असूनही आज अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड आणि फ्रान्स हे एनपीटी कराराचे पाच सदस्य देश आणि इस्रायल, भारत, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया हे एनपीटी कराराचे सदस्य नसणारे चार देश असे एकूण नऊ देश अण्वस्त्रधारी आहेत. या देशांकडे सुमारे १६ ते १७ हजार अण्वस्त्रे आहेत. या अण्वस्त्रधारी राष्ट्रांना जागतिक न्यायालयात आरोपीच्या िपजऱ्यात उभे करणाऱ्या रिपब्लिक ऑफ मार्शल आयलंड्स या देशाचे धनपालांनी आपल्या भाषणात कौतुक केले.
प्रशांत महासागरातील ऑस्ट्रेलियाचा उत्तर-आग्नेय किनारा, उत्तर गोलार्धातील मार्शल आयलंड्स हा देश, हवाई बेटे याच रेषेवरून पुढे गेल्यावर अमेरिका हा देश लागतो. मार्शल आयलंड्सची ही बेटे दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी अमेरिकेच्या स्वाधीन केली होती. त्यावर १९८६ पर्यंत अमेरिकेची एकछत्री हुकूमत होती. तिचा फायदा घेऊन अमेरिकेने बिकिनी अटॉल आणि मार्शल आयलंड्सच्या अन्य बेटांवर १९४६ ते १९५८ दरम्यान ५८ अण्वस्त्र चाचण्या केल्या. बिकिनी अटॉल या बेटावर केलेल्या अण्वस्त्र चाचणीचे कोडनेम होते ‘कॅसल ब्राव्हो.’ ही चाचणी १ मार्च १९५४ रोजी झाली. तिच्यासाठी हे बेट निर्मनुष्य केले गेले. परंतु तेथून १५० कि. मी. अंतरावरील रोनगेलाप अटॉल या छोटय़ा बेटावरील लोकांसाठी त्या दिवशी दोनदा सूर्योदय झाला. एकदा नेहमीचा सूर्य पूर्वेला उगवला आणि दुसऱ्या वेळी आकाशात आगडोंब उसळवणारा सूर्य पश्चिमेकडून प्रकटला. १५ मेगा टन शक्तीचा हा हायड्रोजन बॉम्ब हिरोशिमा शहरासाठी वापरलेल्या बॉम्बच्या तुलनेत तब्बल एक हजारपट जास्त शक्तिशाली होता. त्यातून निघालेली मश्रूम छत्री ३० कि. मी. उंचीची होती. या चाचण्यांची रोनगेलाप अटॉल बेटावरील जनतेला मुळीच कल्पना नव्हती. या बेटावरील लोकांना, त्यातही विशेषत: लहान मुले आणि तरुण स्त्रियांना किरणोत्साराचा खूप त्रास झाला. अनेकांना थायरॉइड ग्रंथींचे आणि अन्य अवयवांचे कर्करोग झाले. त्याचवेळी समुद्रात मासेमारी करणाऱ्या जपानी कोळ्यांनाही याचा त्रास झाला. अमेरिकेने १९४६ सालापासून केलेल्या चाचण्यांच्या किरणोत्साराने हा देश जगातील सर्वाधिक प्रदूषित बनला आहे.
रोनगेलाप अटॉल बेटावरील बाधित जनतेला सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी ‘ग्रीन पीस’ या संस्थेने १९८५ साली रेनबो वॉरिअर ही बोट वापरली. त्यानंतर ही बोट मोरुरोआ अटॉल बेटावर होऊ घातलेल्या फ्रान्सच्या गुप्त अण्वस्त्र चाचण्यांना शांततामय मार्गाने विरोध करण्यासाठी न्यूझीलंडकडे रवाना झाली. तेथे फ्रेंच सीक्रेट सíव्हसने घातपाताने ही बोट बुडवली. प्रथम फ्रान्सने विश्वामित्री पवित्रा घेत काखा वर केल्या. सारे पुरावे बाहेर आल्यानंतर मात्र फ्रान्सचे तत्कालीन पंतप्रधान लॉरेंट फाबियुस यांनी या कृत्याची जबाबदारी स्वीकारली. DGSE या सीक्रेट सíव्हस संघटनेच्या दोन संबंधित एजंटांवर आरोपपत्र दाखल केले गेले. त्यांनी प्रथम गुन्हा नाकबूल केला. नंतर मात्र त्यांना दहा आणि सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. परंतु त्यांची दोन वर्षांत सुटका झाली. आजही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अण्वस्त्रविरोधी आणाभाकांना न जुमानता एकटय़ा अमेरिकेत अण्वस्त्रांच्या आधुनिकीकरणासाठी येत्या दहा वर्षांत ३५,५०० कोटी डॉलर खर्च होतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
अण्वस्त्र चाचण्यांच्या या पाश्र्वभूमीमुळे मार्शल आयलंड्सने नऊ अण्वस्त्रधारी देशांवर अण्वस्त्रांच्या नि:शस्त्रीकरणाच्या प्रयत्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप ठेवला आहे. यासंदर्भात एनपीटी कराराच्या पाच सभासद देशांनी आणि बाकी चार अण्वस्त्रधारी देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचे पुरावे सादर केले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय २०१५ सालात अपेक्षित आहे.
अल्बर्ट आइनस्टाईन आणि बटरड्र रसेल यांच्या नावाने १९५५ साली प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्याच्या उद्दिष्टांनुसार काम करणाऱ्या ‘पग्वाश’ चळवळीचा मोठय़ा आदराने उल्लेख करताना धनपाल म्हणाले, ‘पग्वाश आणि इतर शांतता चळवळींच्या नागरी दबावामुळेच अण्वस्त्र चाचण्यांवरील र्सवकष बंदी करार आणि इतर महत्त्वपूर्ण करार होऊ शकले आहेत.’
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन सन्यप्रमुख आणि नंतर दोनदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेल्या आयसेनहॉवर यांनी अमेरिकेतील संरक्षण कारखानदारीच्या कधीही न शमणाऱ्या नफ्याच्या लालसेबाबत ५० वर्षांपूर्वी दूरदृष्टीने एक धोक्याची सूचना देऊन ठेवली होती. त्यांच्या मते, ‘या कारखानदारीने नफ्याच्या लालसेपोटी जगभरात युद्धे चालू ठेवली आहेत. त्यांच्यापुढे अनेक हातांचे शांततेचे प्रयत्न तोकडे ठरत आहेत.’ संरक्षण कारखानदारीच्या कधीही न शमणाऱ्या नफ्याच्या लालसेसंदर्भात धनपाल यांनी ऑक्टोबर २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘डोन्ट बँक ऑन द बॉम्ब’ या अहवालाचा कौतुकाने उल्लेख केला आहे. हा अहवाल नेदरलँडमधील ‘पॅक्स’ (शांतता) आणि ‘आयकॅन’ (ICAN) या दोन अशासकीय संघटनांनी मोठय़ा कष्टाने आणि अभ्यासू वृत्तीने तयार केला आहे. या अहवालाचा हवाला देऊन ते म्हणतात, ‘जगातील विविध बँका, विमा कंपन्या, पेन्शन फंड योजना अशा एकूण ४११ आस्थापनांनी अण्वस्त्रनिर्मितीशी संबंधित २८ कंपन्यांमध्ये जानेवारी २०११ पासून सुमारे ४० हजार २०० कोटी डॉलर गुंतवले आहेत. या गुंतवणुकीपकी १७ हजार ५०० कोटी डॉलरची गुंतवणूक तर अमेरिकेतील नऊ मोठी आस्थापने आणि फ्रान्समधील बीएनपी परिबास बँक या जगातील सर्वात श्रीमंत अशा दहा आस्थापनांची आहे. या गुंतवणुकीत आशियातील दुसऱ्या क्रमांकावर भारतीय आयुर्वमिा महामंडळ आहे.’
घरातील कर्ती व्यक्ती अचानक मरण पावल्यास कुटुंबावर आकाश कोसळल्यासारखी परिस्थिती उद्भवू नये म्हणून विम्याचा पर्याय पुरवणाऱ्या आयुर्विमा महामंडळाने आकाशातून सहस्र सूर्याएवढी आग ओकून लाखो माणसांना ठार मारू शकणाऱ्या अण्वस्त्रनिर्मितीमध्ये गुंतवणूक करावी हे काहीसे विरोधाभासी आहे. या अहवालात अण्वस्त्रनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांतील गुंतवणुकीचा प्रत्येक देशातील आस्थापनांचा तपशील स्वतंत्र साइटवर दिला आहे. (भारतासाठी पुढील साइट आहे-http://www.dontbankonthebomb.com/wp-content/uploads/2014/11/India-Country-Profile-20141022.pdf) त्यानुसार अण्वस्त्रनिर्मितीशी संबंधित उद्योगांत गुंतवणूक करण्याबाबत कसलाही अडसर न मानणारी धोरणे स्वीकारली आहेत. २४ आस्थापनांनी अशी गुंतवणूक भारतात केली आहे. त्यामध्ये भारतीय आयुर्वमिा महामंडळ, सर्वसाधारण विमा महामंडळ, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, यूटीआय म्युच्युअल फंड, हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कार्पोरेशन बँक (HDFC), स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक,Yes बँक, कोटक मिहद्रा बँक यांचा समावेश आहे. यापकी आयुर्वमिा महामंडळाने या काळात लार्सन अँड टुब्रो इंडिया या कंपनीत २७३.७ कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. लार्सन अँड टुब्रो ही तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम आणि उत्पादन या क्षेत्रांतील अग्रगण्य कंपनी भारतीय नौदलासाठी पाच आण्विक पाणबुडय़ा तयार करण्याच्या प्रकल्पात १९७० पासून सहभागी आहे. हा प्रकल्प सुमारे ३०० कोटी डॉलर खर्चाचा आहे. या पाणबुडय़ा छोटय़ा अणुभट्टीतून तयार होणाऱ्या ऊर्जेवर चालतील. त्यातील प्रत्येक पाणबुडीवर ७०० कि. मी. दूरवरच्या लक्ष्यावर अण्वस्त्रांचा अचूक मारा करू शकतील असे १२ अग्निबाण असतील. या प्रकल्पातील ‘आकाश’ अग्निबाण सोडण्याची यंत्रणा विकसित करण्याचे काम लार्सन अँड टुब्रो करते आहे. यातील काही घटकांना भारतीय संरक्षण दल (http://www.army-technology.com/projects/akashsurfacetoairmis/) आणि लार्सन अँड टुब्रोची वेबसाइट (http://www.larsentoubro.com/lntcorporate/LnT_Offerings/Offering.aspx?res=P_CORP_BOFF_CEPS_IDEF&sbu=75 ) दुजोरा देते.
जग अण्वस्त्रमुक्त होण्यातील या आणि अशा अनेक अडचणी माहीत असूनही जयंथा धनपाल यांचा आशावाद टिकून आहे. या आशावादाची कारणे सांगताना स्वत: साक्षी असलेल्या तीन महत्त्वाच्या घटनांचे ते दाखले देतात : १. श्रीलंकेला साडेचारशे वष्रे पारतंत्र्याच्या जोखडात बंदिस्त करणारा वसाहतवाद संपूर्ण जगातूनच हद्दपार झाला आहे. यासाठी अिहसेवर विश्वास असणाऱ्या महात्मा गांधी, मार्टनि ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला या नेत्यांच्या कार्याची आठवण ते कृतज्ञतेने जागवतात. २. अमेरिकेतील आणि दक्षिण आफ्रिकेतील वंशभेद मानणाऱ्या व्यवस्था नागरी दबावांखाली ढासळल्या आहेत. ३. जगातील शीतयुद्धाचा अंत झाला आहे. त्याचे मूíतमंत प्रतीक म्हणून तोडलेली बर्लिनची भिंत बोलकी आहे.
मानवाला नव्या बदलांसाठी कायम प्रेरणा देणाऱ्या या ऐतिहासिक घटना घडू शकल्या आहेत. म्हणूनच जयंथा धनपाल यांच्यासारख्या ७५ वर्षांच्या तरुणाची आशा शांततामय सुखी जीवनाच्या आपल्या आशाही पल्लवित करते. जोडीला अमेरिकन जोखडातून १९८६ मध्ये स्वतंत्र झालेला मार्शल आयलंड्स हा छोटा देश जगातील नऊ अण्वस्त्रधारी राष्ट्रांवर जनशत्रू असल्याचे आरोप करून त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयातील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो. आणि एक रेनबो वॉरिअर बोट बुडवली तर इंद्रधनुवर पांढऱ्या कबुतराचे शांती प्रतीक मिरविणाऱ्या दुसऱ्या रेनबो वॉरिअर बोटीचे आगमन होते. मित्रांनो, याचा अर्थ काळरात्र संपते आहे. मुलाबाळांवर प्रेम असणाऱ्या तमाम नागरिकांनो, जागे व्हा. शांतीचा उष:काल होतोय! कारण अण्वस्त्रमुक्त जगाच्या स्थापनेसाठी चाललेल्या शांतता चळवळीत आपलाही सूर लागला पाहिजे!

Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी