संध्याकाळी वा भल्या पहाटे घराघरातून ऐकू येणाऱ्या शिट्टय़ांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. वातावरणातील हवेचा दाब आपल्याला जमिनीतील पाणी खेचण्यासाठी कसा वापरता येतो ते आपण lok03पाण्याच्या पंपाविषयी समजावून घेताना पाहिले. अशाच प्रकारे वायू व वाफेच्या दाबाचा वापर करून जगभरातल्या गृहिणींचा कायम दुवा घेत असलेल्या प्रेशर कुकरबद्दल आज माहिती घेऊ या.
१६७९ मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ डेनिस पेपिनने स्वयंपाकाला लागणारा वेळ कमी करण्याच्या प्रयत्नात हे यंत्र तयार केले आणि त्याला नाव दिले ‘स्टीम डायजेस्टर’. पुढे १८६४ मध्ये जॉर्ज गटब्रॉडने जर्मनीत ओतीव पोलादाचा वापर करून अशा प्रकारच्या प्रेशर कुकरचे उत्पादन सुरू केले.
घरगुती वापरासाठी उपयुक्त असा पहिला प्रेशर कुकर आल्फ्रेड व्हीशरने १९३८ मध्ये न्यूयॉर्कमध्ये तयार केला. दाबनियंत्रित शिजण्याच्या क्रियेमागचे शास्त्र सामान्यपणे अन्न शिजण्याची क्रिया, पाणी किंवा इतर उपयुक्त द्रव पदार्थाच्या बरोबरच होते. शिजवायचे अन्न पाण्यात अथवा पाण्यावर ठेवून त्याला बाहेरून उष्णता देऊन गरम केले जाते. कुठल्याही घट्ट झाकण नसलेल्या शिजण्याकरता वापरलेल्या भांडय़ामधील पाणी १०० अंश सेल्सियस तापमानाला उकळू लागते. आणि त्यानंतर त्याला दिलेल्या उष्णतेमुळे त्याची वाफ होऊ लागते. त्यामुळे पाण्याचे तापमान वाढत नाही, ते १०० अंश सेल्सिअसलाच राहते. जेव्हा हेच पाणी घट्ट झाकण असलेल्या भांडय़ामध्ये गरम केले जाते, तेव्हा उकळू लागलेल्या पाण्याची वाफ भांडय़ातच जमा होऊन त्या वाफेचा दाब आतील पाण्यावर येऊ  लागतो. हा दाब जर १ बार (किलोग्रॅम प्रतिवर्ग सेंटिमीटर) किंवा १५ पी.एस.आय. (पौंड प्रतिवर्ग इंच) इतका झाला तर पाण्याचा उत्कलन बिंदू १२१ अंश से.पर्यंत जातो. त्याने काय होते, तर उघडय़ा भांडय़ात १०० अंश से.च्या वर न जाऊ  शकणारे पाण्याचे तापमान १२१ अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकते. (जसजसे आपण समुद्रसपाटीपासून वर जातो तसतसे वरच्या पातळीवर जात असताना वातावरणाचा दाब कमी कमी होत गेल्यामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू कमी होत जातो. कुठलाही द्रव पदार्थ उकळताना जेव्हा त्याची वाफ होते तेव्हा त्याच्या वरच्या प्रतलावरील मोकळे झालेले रेणू (Molecules) बाहेरील कमी दाबाच्या वातावरणात मिसळू लागतात.) पाण्याचे वाढीव तापमान तसेच वाफेचा वाढलेला दाब आणि तापमान यामुळे आतील अन्नाला अधिक उष्णता मिळते. आतील पाण्याचे आणि वाफेचे तापमान समान होते. जेव्हा दाबाची पूर्वनियोजित पातळी गाठली जाते तेव्हा त्या भांडय़ावरील दाबनियंत्रकाकडून (pressure regulator) तशी सूचना मिळते आणि  नंतर आपण कमी उष्णता देऊनसुद्धा ती दाबाची पातळी कायम ठेवू शकतो. दाब न वाढवल्यामुळे पाण्याचेही तापमान वाढत नाही. या पातळीला पोचल्यानंतर तयार होत राहणारी वाफ बाहेर सोडली जाते. पाण्याची आणि वाफेची उष्णताधारण क्षमता (heat capacity) हवेपेक्षा जास्त असल्यामुळेच शिजवताना पाणी वापरले जाते आणि ते जर दाब वाढवून शिजवले तर कमी वेळात आणि कमी इंधनात शिजते.
दाब आणि तापमान यांचा संबंध या आलेखात अधिक तपशिलात दिला आहे.
आपल्या वापरातील प्रेशर कुकर असा आहे.
भांडे (POT)- यात शिजवण्याचे अन्न आणि पाणी ठेवले जाते. बहुतेक वेळा हे भांडे अ‍ॅल्युमिनियम धातूचे असते. हल्ली हेच स्टेनलेस स्टीलमध्येही बनवले जाते. स्टेनलेस स्टीलची उष्णतावाहकता (thermal conductivity) अ‍ॅल्युमिनियमपेक्षा कमी असल्याने आतमध्ये सर्वत्र समान उष्णता पसरते आणि इंधनबचतही होते.
झाकण (COVER)- हे भांडय़ावर आतील बाजूने विशिष्ट जागेवरच घट्ट बसते. याचे आणि भांडय़ाचे दांडे एकावर एक आले की एक छोटासा आवाज येतो की, आपल्याला ते जागेवर बसल्याचे कळते. हा आवाज झाकणाला योग्य ठिकाणी जखडवणाऱ्या पातळ खिट्टीचा असतो.
हवाबंद करणारी रबरी चकती (Sealing Ring)- उच्च दर्जाच्या रबरापासून बनवलेली ही चकती झाकण आणि भांडे यामधील बारीक बारीक फटी भरून काढते आणि कुकरला हवाबंद (airtight) बनवते.
दाबनियंत्रक (pressure regulator)- यातून आतील दाबाची पूर्वनिर्धारित पातळी गाठली गेली की हा lr12टोपीसदृश दिसणारा भाग वर उचलला जातो आणि आतील वाफ बाहेर सोडली जाते. ती दाबाने आणि वेगाने बाहेर येत असताना शिट्टी वाजते. हा नियंत्रक बहुतेक वेळा त्याच्या वजनामुळेच ठरावीक दाब तयार झाल्यानंतरच उचलला जातो. काही वेळा त्यात स्प्रिंग बसवलेली असते.
अतिदाब बूच (Overpressure plug)- आतील दाब काही कारणाने प्रमाणाबाहेर वाढला तर हे बूच आपोआप निघते. मळसूत्रा (Screw)ची अंतर्गत रचना असलेले हे बूच ठरावीक दाबापर्यंतच टिकेल असे तयार केलेले असते.
असा हा वापरण्यास सुरक्षित प्रेशरकुकर आजच्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग बनला आहे यात काहीच नवल नाही.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू