रंगनाथ पठारे लिखित ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या महाकादंबरीच्या एका प्रकरणातील संपादित अंश..

‘आरं, मी उल्फीऽऽ उल्फी! पिराजी सातपाटलाची कोल्हाटीण.’ त्याला मारून अज्जात बेपत्ता झालेली. त्याला लुटून, मारून फरार झालेली. हीच बाई या अंग्रेज बहादूर याची बायको? हे कसे असू शकते? जिचा तपासच लागला नाही, ती उल्फी? इतकी ढोली, गोलमटौल? जगण्यातल्या सुखाच्या चरबीचे किती थर तिच्या अंगप्रत्यंगावर दिसताहेत. उंदरांना गिळून पुष्ट होणाऱ्या सर्पिणीसारखी ही बाई. आयुष्यभरात किती पुरुषांना उंदीर करून तू गिळले आहेस! तो धंदाच असतो या बायांचा. प्रत्येक ठिकाणी लुटणे आणि गिळणे. माझ्या बहाद्दर चुलत्याला मारून, गिळून आणखी किती जणांचे जगणे गिळून तू या अंग्रेज बहाद्दूर साहेबाकडे पोहोचलीस? अन् आता या झग्यात आणि तोकडय़ा केसांत म्हातारी होऊन तू किती आत्मविश्वासाने एक र्कुेबाज साहेबीण म्हणून मला नम्र करू पाहतेस? माझ्या दैत्यासारखी ताकद असलेल्या चुलत्याचा खून केलेला आहेस तू. हलकट कोल्हाटीण.

shiv sena shinde faction candidate in nashik
नाशिकमध्ये शिंदे गटाचा मार्ग मोकळा; गोडसे की बोरस्ते ?कोणाला उमेदवारी? 
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
Letter to Vijay Shivtare
“माझा नेता पलटूराम निघाला, आता..”; विजय शिवतारेंना कार्यकर्त्यांनी लिहिलेलं खरमरीत पत्र व्हायरल
Maharashtra Man Beaten To Death
कोल्हापुरात रोहित शर्मा आऊट होताच जल्लोष केल्याने डोकं फोडलं, क्रिकेट रसिकाचा उपचारादरम्यान मृत्यू

‘सायबांनी मला सांगातलं का असा असा सातपाटील. म्हनलं, नाव सांग नीट. सांगातलं त्यानी. तव्हा मी त्याला सांगातलं का आसं करतानी आसं. मला त्याला भेटायचंय. पिराजी मेला तव्हा लय लहाना व्हतास तू. मपल्या जालनच्या शिणेचा.’

शंभुराव स्तब्ध होता. आतल्या आत उकळत होता. त्याच्या मनात उकळून होणाऱ्या भावनांच्या वाफेला या अंग्रेज बहादूर साहेबाच्या किल्ल्यात बाहेर पडायला जागाच नाहीय, या जाणिवेने तो क्षुब्ध होता.

‘तुला वाटत आसन का म्याच तुपल्या चुलत्याला मारलं.’

‘त्यात चुकीचं काय?’

‘बराबर ह्य़े ना! मी कुढं म्हनते तसं. तुम्हाला तसंच वाटन म्हणूनच तव्हा पिराजी म्हनला का लगीच बस घोडय़ावर आन् निघ..’

तिने तिची कहाणी सुरू केली. पिराजीचे येणे. विषबाधा. तिला निघायला सांगणे. त्यासाठी निकराला येणे. पुढचा तिचा प्रवास. अँथनी ब्लॅकस्मिथ याची भेट. तिची कहाणी ऐकत असताना हळूहळू त्याला जाणवत गेले की ही बाई जे सांगते आहे, त्यात कसलीही खोट नाही. ते ती तिच्या बेंबीच्या देठापासून सांगत आहे. हे सगळे कोल्हाटणीचे कौशल्य आहे असे त्याने मनात आणून पाहिले, पण ते टिकाव धरू शकले नाही. तिच्या स्वरातील प्रामाणिकतेने सगळ्या गोष्टींवर मात केली. तिचे कोल्हाटय़ाची पोर असणे, तिचा बाप, मारवाडी, तिचे एकाकीपण आणि त्यात पिराजीची भेट; अशा कैक गोष्टी. आभाळातून पाणी पडते आणि खाचखळग्यातून असंख्य धारांमधून वाहात एकत्र होऊन एखाद्या बेलाग कडय़ाशी जमा होऊन तिथे प्रचंड प्रपातासारखे कोसळू लागते, तसा तिच्या सांगण्याचा प्रवाह अखेरच्या टप्प्यात कोसळत राहिला आणि तिच्या हृदयातील आर्त कोमल भावनांच्या ओलीत भिजून परोपरी शुद्ध होत गेला. किंवा तो आधीपासूनच तसा होता आणि त्याचे तसे असणे शंभुराव यास उत्तरोत्तर दृगोचर होत गेले.

गेली चाळीसबेचाळीस वर्षे जे तिच्या मनात साचलेले होते, ते आता मोकळे झाले होते. तशी तिच्या पूर्वायुष्याबद्दल ती तिचा नवरा अँथनी ब्लॅकस्मिथ -देशी भाषेत अंतोनी बलाकसिमित- याच्याशी कैक बोलली होती. पण आपण पिराजी यास मारले नाही. त्याला लुटले नाही. त्यानेच मरताना आपल्याला आणि आमच्या मुलाला घोडय़ावर बसून दिशा सापडेल तिकडे तातडीने जायला सांगितले. त्यात या माणसाची भेट झाली आणि आयुष्य रेघेला लागले. ते पुरते बदलले. पिराजीने जे जगणे तिला दिले होते त्याच्याविषयीची कृतज्ञता तिच्या मनात कायम आहे. या आणि अशा गोष्टी एका अतक्र्य योगायोगाने भेटलेल्या पिराजीच्या पुतण्यास तिला सांगता आल्या, याची तिला विशेष खुशी होती. त्याला ते खरे वाटो वा न वाटो; त्याने तिच्या भौतिक जगण्यात कोणताही बदल होणार नव्हता. पण या मनात साचलेल्या कुरूपाचा अनपेक्षित निचरा होताना तिला फार सुख वाटत होते. ते तिच्या चय्रेवर स्पष्ट दिसत होते. बाकी, ती तिच्या सातासमुद्रापलीकडच्या जगण्यात अगदी खूश होती. तिला कशाचीही ददात नव्हती.

‘जालन काय करितो?’

‘आरं त्यो तुपल्याच शिनेचा ना! एखाद्या दोन वर्सानी लहान आसन. चांगलं चाललंय त्याचं. लेकरं झाले. संसार झाला. त्याची बायकू तिकडचीच. गोऱ्या लोकातली.’

‘सायबापसून तुला काय लेकरं नाय झाले?’

‘नायी झाले. सायब लय मोठय़ा दिलाचा मानूस. त्यानी जालनलाच आपला ल्योक मानला. तिकडंच त्याचं शिक्शान झालं.’

‘काय का आसानी; चांगलं झालं तुपल्यावालं.’

तिला अचानक आठवलं : चाळीसबेचाळीस वर्षांआधी त्या रात्री घोडय़ावर बसून ती साल्पीच्या पठारावरून निघाली असताना पिराजी तिला सोबत धन घेऊन जा असे सांगत होता. ते तिने नेले नव्हते. ते कुठे होते, ते तिला माहीत होते. आता एवढय़ा वर्षांनंतर ते तिथे राहिलेले असेल किंवा कदाचित नसेलही. पण असेल समजा; तर त्याने जमिनीत पुरून राहण्यापेक्षा या त्याच्या पुतण्याच्या हाती लागावे. तिने ती जागा, तिची खूण त्याला सांगितली. म्हणाली, ‘असेल तुझ्या नशिबात तर मिळेल तुला ते.’

त्याला वाटले, ही स्त्री इतक्या मोकळेपणी आपल्याशी बोलतेय, पुरलेल्या धनाचे सांगतेय, कारण ती आता त्या कशातही गुंतलेली नाहीय. तर मग आपणही तिला अधिक का न सांगावे? तो म्हणाला, ‘तू सोडलेला घोडा आणखी कोणी तरी नेला होता. पण तिथून सुटून तो पुन्हा पठारावर येऊन उभा राहिला होता. तो काहीही न खाता-पिता फक्त उभा राहिला होता. तो पिराजीचा घोडा होता आणि तो त्याची वाट बघत उभा राहिला होता. पिराजी मेला म्हणून हासुद्धा जीव द्यायला निघाला होता. कोणीही काहीही दिले तरी खात नव्हता अन् पित नव्हता. अखेर विठोबा त्याच्याजवळ गेला आणि त्याने त्याच्याशी त्याच्या भाषेत बोलून, त्याला थोपटून, गोंजारून त्याचे मन वळवले. तो खाऊपिऊ लागला. पण त्याला ठेवायचा कोणी? जयाजीदादा त्याला ठेवायला तयार नव्हता. मी तो माझ्याकडे घेतला. आमच्या वाटण्या झाल्या तेव्हा तो आणि विठोबा माझ्याकडे आले. ते खूप उमदे जनावर होते. वीसेक वर्षांआधी तो म्हातारा होऊन वारला. पिरातात्या वारला अन् तू गेलीस, त्यानंतर जयाजीने तुमच्या वस्तीला खणती लावली होती. ती अर्थातच धन शोधण्यासाठी. तिथे त्याला काहीही सापडले नसावे. मी तेव्हा कर्ता नव्हतो, पण मला ते आवडले नव्हते.’

तिला अनेक गोष्टी आठवल्या. जयाजीचे मूर्ख लघळपण, ते दिसल्यावर पिराजीचे त्याला बेदम ठोकणे, मुक्या-बहिऱ्या विठोबातली जगावेगळी मानुषता आणि कोमलपण. जालनला लागलेला त्याचा लळा. जयाजीविषयी काही विचारावे असे तिला वाटले नाही. रखमाजीच्या मुलांपैकी फक्त त्याच्याशीच तिचा संपर्क आलेला होता. पण त्याच्याविषयी तिला कुतूहल उरलेले नव्हते. तिच्या भूतकाळातील असंख्य कटू आठवणींपैकी तो एक क्षुद्र ठिपका मात्र होता. पण विठोबाची मूकबधिर माधुरी तिला आठवली. तिने त्याच्याबद्दल विचारले. ‘तो आहे? कसा आहे?’ शंभुराव म्हणाला, ‘तो आहे. तो माझ्यासोबत असतो. मी त्याला गडी म्हणून मानत नाही. त्याचे गायीम्हशींचे खिल्लार आणि तो; हेच त्याचे जगणे आहे.’ हे सांगताना शंभुराव याच्या मनात कळ उठली. आपण त्या भल्या माणसाचा स्वत:साठी उपयोग केला. आपल्याला प्रिय असलेल्या स्त्रीशी केवळ एक सोय म्हणून आपण त्याचे तिच्याशी लग्न लावून दिले.

‘त्याचं लगीन झालं?’ तिने विचारलं.

‘झालं. त्याचा त्याचा संसार आहे. तो सुखाचा आहे,’ म्हणताना त्याच्या मनात आणखी एक कळ उमटली.

‘तुझी माझी भेट झाली ही केवळ देवाची कृपा.’ ती म्हणाली.

तिने नोकरवजा इसम- स्टियुवर्ट यास संकेत केला. म्हणाली, ‘Ask Tony to come in.’

टोनी उर्फ अँथनी तातडीने आत आला. ती म्हणाली. ‘You have arranged photographer,  pressume. ‘

‘Off course I did. ‘

‘Ask him to get in. Shambhurao is indeed Jaalanls cousin. I want to be photographed with him. I shall have that as a souvenir.l

‘May I find a place in there?’ टोनी गोड हसला.

‘Of course you will. In the first, only he and me together. You can join us in the next’

‘O.K. O.K. No problem.’

टोनी आणि उल्फी यांच्यातील हे आंग्लभाषेतील संभाषण शंभुराव यास कळण्याचा जराही संभव नव्हता. तरीही तिचे अधिकारवाणीने बोलणे, त्याचे तिच्यासमोर नम्र, खेळकर असणे, हे त्याला नवे आणि सुंदर वाटले. स्वत:च्या जगण्यात देऊबाई आणि तो- यांच्या नात्यात पुरुष म्हणून स्त्रीसमोर नम्र होणे त्याने अनुभवले होते. पण ते सारे अस्फुट आणि म्हणूनच गम्य नव्हते. शब्दांचा आकार धारण न केलेला भावनांचा तो उत्सव त्याला माहीत होता. पण शब्द आणि कृती यांच्या अंगाने व्यक्त होताना त्यामागील मेळाच्या दीर्घसुंदर जलाचे भान त्याला या दोघांच्या संभाषणातून आले. ते येताना शब्द अनावश्यक झाले. शब्द आणि भाषा यांच्या अतीत अधिक उच्च भाषा असते, हे त्याला विठोबाशी संवाद साधताना नेणिवेत कुठे तरी कळले होते. आता त्याला त्याचा प्रत्यय आला होता. तो त्याला तितका कळला होता असे नव्हे. पण काही तरी असे झाले की त्यामुळे त्याचे हृदय ओले झाले होते.