‘लोकरंग’मधील कै. प्रल्हाद केशव अत्रे यांच्या ‘कऱ्हेचे पाणी- खंड ६’मधील पुनमुद्र्रित लेख वाचला. वाचून सखेद आश्चर्य वाटले, म्हणून हा पत्रप्रपंच. लेखात परिच्छेद क्रमांक १ व २ मध्ये बेळगावच्या साहित्य संमेलनाविषयी लिहिले आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? विख्यात पत्रपंडित व ज्येष्ठ लेखक कै. गजानन त्र्यंबक ऊर्फ भाऊसाहेब माडखोलकर. मात्र, अत्रे आणि माडखोलकर यांच्यातील वैर व कटुता यावेळी लक्षात घ्यायला हवी. त्याची ठळक कारणे खालीलप्रमाणे आहेत :
१. १९३० साली माडखोलकर यांच्या दोन कादंबऱ्या एकदम प्रसिद्ध झाल्या. ‘मुक्तात्मा’ आणि ‘भंगलेले देऊळ.’ या कादंबऱ्यांविषयी अत्रे यांनी अत्यंत वाईट पद्धतीची टीका केली होती. ‘मुक्तात्मा नव्हे, भंगात्मा’ आणि ‘भंगलेले देऊळ नव्हे, भंगलेल्या लेखकाचे देऊळ’ अशी अश्लाघ्य टीका त्यांनी ‘मराठा’मध्ये त्वरित लिहिली. कारण खांडेकर, फडके आणि माडखोलकर ही मराठी कादंबरीच्या त्रिमूर्तीची निर्मिती केवळ दोन कादंबऱ्यांमुळे झाली, हे अत्रे यांना पचवणे जड गेले.  
त्यांच्या या संकुचित वृत्तीमुळे पुढे ‘मराठा’मध्ये ‘विनोबा हे वानरोबा’, ‘तर्कतीर्थ नव्हे, नर्कतीर्थ’ तसेच देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या थोर क्रांतिकारकाचे त्यांच्या वहिनीशी संबंध होते, असे हीन आणि किळसवाणे लेखन त्यांनी केले. म्हणूनच शिवाजी पार्कसमोर त्यांची गाडी थांबवून सावरकरभक्तांनी त्यांना चोप दिला. शिवाजी पार्कमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लाखांच्या सभा घेणाऱ्या अत्र्यांना मार बसताना लोकांनी त्याच शिवतीर्थावर पाहिले.
२. नागपुरात आचार्य अत्रे यांनी ‘मराठा’ वृत्तपत्राची आवृत्ती काढली. त्यावेळी त्यांचा मुक्काम श्याम हॉटेलमध्ये राहिला. ‘मराठा’च्या पहिल्या अंकात पहिल्याच पानावर अग्रलेख आला होता. त्याचे शीर्षक होते- ‘माडखोलचा माडोबा कोकणात पळणार’! तर ‘तरुण भारत’च्या अग्रलेखाचे शीर्षक होते- ‘दै. मराठाचे स्वागत’! अर्थात दैनिक ‘मराठा’चा ११ महिन्यांतच गाशा गुंडाळला गेला. त्यामुळे नागपूर आवृत्तीचा शेवटचा अग्रलेख होता- ‘आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा’! थोडक्यात, माडखोलकरांच्या ‘तरुण भारत’पुढे ‘मराठा’ने ११ महिन्यांत नांगी टाकली.
या सर्व गोष्टींच्या रागामुळे बेळगाव साहित्य संमेलनाचा उल्लेख ‘लोकरंग’मधील या लेखात आहे; परंतु बेळगाव-कारवारसहित संयुक्त महाराष्ट्राचा उद्गाता आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग. त्र्यं. माडखोलकर होते, याचे अत्रे यांना जाणीवपूर्वक विस्मरण झाले असे दिसते. १९८५ साली लेखन आणि वाणी म्यान करणाऱ्या उपऱ्याला हे पत्र लिहिण्याची दुर्बुद्धी झाली, ती यामुळेच.
– प्रियदर्शन माडखोलकर, नागपूर.                                    

उत्सवाचा सोस सोडावा लागेल
कवी नारायण कुळकर्णी कवठेकर यांचा ‘संमेलनांची वर्तुळे’ हा लेख वाचला. या विषयावर याआधी बरेचसे उलटसुलट विचारमंथन घडलेले आहे. तरीही तीच चर्चा नव्याने करणे गरजेचे आहे. जात, धर्म आणि पंथाच्या विषारी व अतिरेकी प्रभावाने मोठय़ा प्रमाणात संशय बळावल्यामुळे आपल्यात उभी फूट पडलेली आहे. त्यातूनच आलेल्या असुरक्षिततेमुळे पुन्हा नाइलाजाने का होईना, जात आणि धर्माच्या चौकटीचाच आधार घेण्याची प्रवृत्ती बळावत आहे. या साऱ्यांचा परिणाम देशाच्या एकत्रित विकासावर झालेला आपण पाहतो.
दुभंगलेला समाज प्रगतिपथाकडे जाऊ शकत नाही. अशा समाजात विवेकवादाची कास धरली जात नाही. याचं एक साधं उदाहरण आज आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत, ते म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधी कायद्याला वेगवेगळ्या पातळ्यांवरून होणारा विरोध. परवा माझ्या गावात एका बाईचं धडावेगळं शीर सापडलं. तिचं डोकं अन्यत्र फेकलेलं होतं. खूप दिवसांनी पोलिसांनी शोधून काढलं, की तो अंधश्रद्धेचा बळी होता. अशी असंख्य धडावेगळी शरीरं आपल्या आजूबाजूला सडत आहेत आणि त्याचवेळेला आपण जातीपातीच्या भिंती पक्क्या करीत आहोत.
नारायण कुळकर्णी कवठेकर म्हणतात- वेगवेगळ्या प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणारी संमेलने ही साहित्य, साहित्यिक आणि साहित्यव्यवहार यांना पूरक आणि पोषक ठरतात. मान्य आहे. त्याचबरोबर हेदेखील मान्य आहे की, जाती-धर्माच्या संमेलनामध्ये त्यांच्या त्यांच्या समस्यांवर चर्चा आणि विचारमंथन होऊ शकते. व्यापक समाजहितासाठी अशी छोटी छोटी संमेलने म्हणूनच आवश्यक आहेत. पण अशी संमेलने जाती-धर्माच्या अस्मिता टोकदार करण्यासाठी भरवली जात असतील तर? अनेक ठिकाणी आपलं राजकीय वजन वाढवून घेण्यासाठी आणि संमेलनाच्या व्यासपीठावरून आपली रंगसफेदी करून पापं धुऊन टाकण्यासाठी सर्व प्रकारच्या माफियांनी सध्या अशी संमेलनं वेठीस धरलेली आहेत. त्यामुळे अशा संमेलनांकडून आपण व्यापक समाजहित आणि उदारमतवादी विचारांची अपेक्षा कशी काय ठेवू शकतो?
‘माझ्या धर्माचा नाही, माझ्या पंथाचा नाही, माझ्या जातीचा नाही, तो माझा शत्रू!’ अशी मनोधारणा त्यातून निर्माण होत असेल तर आपल्याला कोण वाचवू शकतो? साहित्यव्यवहाराची सूत्रे साहित्यबाह्य़ संस्था आणि व्यक्तींकडे गेल्यामुळे आणि त्यांना त्यांचा असा स्पष्ट अजेंडा डोळ्यांसमोर असल्यामुळे त्यांच्या सोयीप्रमाणे आणि विचाराप्रमाणे संमेलने भरवली जात आहेत. अर्थात यामध्येदेखील सुधारणा होऊ शकते. त्यासाठी आपल्याला ‘उत्सवा’चा सोस सोडावा लागेल व साहित्यव्यवहारातल्या मंडळीना स्वत:कडे संमेलनाचं नेतृत्व घ्यावं लागेल.    
सायमन मार्टिन, वसई.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Unveiling of Ram Garjana song by MLA Sanjay Kelkar
लोकसभा निवडणुक काळात भाजपाची राम गर्जना, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ‘राम गर्जना’गीताचे अनावरण
Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत