आवडती पुस्तके
१. अघोरी – बाबूराव बागूल
२. खेळ – नामदेव ढसाळ
३. पडघवली – गो. नी. दांडेकर
४. तुंबाडचे खोत – श्री. ना. पेंडसे
५. लेखाजोखा – सतीश तांबे
६. दासशूद्रांची गुलामगिरी – कॉ. शरद पाटील
७. चतुरंग – दिलीप पुरुषोत्तम चित्रे
८. बिपीन बुकलवार आणि आक्काचे अजब इच्छासत्र   – भा. रा. भागवत
९. सोन्याचे मडके    – अनुवाद – जी. ए. कुलकर्णी
१०. धर्मानंद – जयवंत दळवी
नावडती पुस्तके
आवडत्या पुस्तकांपेक्षा नावडती पुस्तकेच लवकर आठवतात; पण आज आवडणारी पुस्तके उद्या नावडती होण्याची शक्यताही असतेच. कोणतेही पुस्तक आपले सार्वकालीन आवडते असणे हे त्या कलाकृतीच्या महानतेचे वा वाचक म्हणून आपण संपृक्त झाल्याचे लक्षण आहे असे मला वाटते. म्हणून नावडती पुस्तके येथे नमूद करणे कठीण जाते आहे.