‘लोकरंग’ (१५ फेब्रुवारी) मधील गिरीश कुबेर यांचा ‘तो अवघा घसरतची गेला’ हा लेख वाचला. या लेखात दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दारुण पराभवाची कारणमीमांसा केलेली आहे. या लेखातले काही मुद्दे मात्र न पटणारे आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारतभेटीवर आले असता जाहीर भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा उल्लेख ‘बराक’ या त्यांच्या प्रथमनावाने केला यात गैर असे काहीच नाही. आज भारत अन् अमेरिका प्रजातंत्र राबवीत असलेली दोन सर्वात मोठी राष्ट्रे आहेत. शिवाय भारताच्या प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाला हजर राहून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मैत्रीचा हात पुढे केलेला आहे. त्यामुळे मोदींकडून त्यांचा एकेरी उल्लेख ‘इतना तो बनता है!’
राहता राहिली गोष्ट दिल्ली निवडणुकीतील ‘आप’च्या दणदणीत यशाची! देशाचे प्रश्न आणि दिल्लीच्या समस्या यांत फरक आहे. त्यामुळे आपल्या समस्या सोडविण्यासाठी दिल्लीच्या सर्वच स्तरांतील मतदारांना भाजपच्या तुलनेत ‘आप’ अधिक आश्वासक वाटला, असेच म्हणावे लागेल.
– सुनील वराडपांडे, भोपाळ