श्रीकांतराव आता निवृत्त होऊन काही महिने झाले होते. आतापर्यंत आयुष्य कसं घडय़ाळ्याच्या काटय़ाशी बांधलेलं असायचं. अमुक वाजता उठायचं, अमुक वाजेपर्यंत आवरायचं, अमुक वाजता नाश्ता वगरे आटोपून ऑफिससाठी बाहेर पडायचं. ठरावीक वाजताची लोकल ट्रेन पकडायची, ठरावीक वाजता काम संपलं/ कामाचे तास संपले की, बाहेर पडायचं. बाहेर पडायच्या आधी सहकाऱ्यांबरोबर चहा, नाश्ता झालेलाच असायचा. मग ठरावीक लोकल पकडून घरी.

मग काय घरी आल्यावर आवरलं की, रोजचं वर्तमानपत्र, पत्नी-मुलांबरोबर गप्पाटप्पा, टीव्ही, मग जेवण की ठरावीक वाजता झोप. सुट्टीच्या दिवशी कधी कोठे बाहेर, कधी नातेवाईक, नाहीतर घरी तंगडय़ा पसरवून पेपर वाचणं, टीव्ही बघणं, आराम करणं, असं व्यवस्थित घडीचं आयुष्य चाललेलं होतं. घरीपण सर्व ठीक होतं. मुले हुशार होती, त्यांनी स्वत:च्या गुणवत्तेवर स्वत:ची व्यवसायक्षेत्रे निवडली होती. श्रीकांतरावांनी पुढची स्वत:ची, स्वत:च्या कुटुंबाची आíथक घडी व्यवस्थित राहावी म्हणून सर्व तजवीज आधीच करून ठेवली होती आणि तशीही पत्नीची नोकरी अजून काही काळ चालणारच होती. त्यामुळे तशी सर्व आघाडय़ांवर नििश्चतता होती. आता निवृत्त झाल्यावर या रामरगाडय़ातून सुटका होणार, घडय़ाळ्याची संगत सुटणार याचा कोण आनंद झाला होता श्रीकांतना!

Can a woman ever retire from housework
समुपदेशन : बाई रिटायर्ड होते?
Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
Kailash Gahlot ED custody
अरविंद केजरीवालांनंतर आता आपच्या आणखी एका मंत्र्याच्या मागे ईडीचा ससेमिरा; कोण आहेत कैलाश गेहलोत?
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

त्यामुळे निवृत्त झाल्यावर अगदी ‘आरामात’ जीवन व्यतीत करणं सुरूझालं होतं. उठण्याची वेळ नाही, झोपण्याची वेळ नाही. घडय़ाळच जणू निवृत्त झालं होतं. पण आता सहा महिने होत आल्यावर आधीचा आनंद मावळायला लागला होता. बेचनी वाढू लागली हाती. रिकामं घर दिवसभर खायला उठत होतं. अतिआरामामुळे झोपपण येईनाशी झाली होती. एकटय़ाने काय खायचं, जेवायचं, त्यामुळे भूकपण लागेनाशी झाली होती. काहीच करण्यात, बोलण्यात उत्साह वाटत नव्हता.

संध्याकाळी घर माणसांनी भरलं की, थोडा वेळ बरं वाटायचं. पण नंतर त्यांचा छान चाललेला वेळ, कामं ऐकून आपल्या जीवनात काहीच अर्थ नाही, असं वाटायचं. निराशेनं मन काळवंडू लागलं होतं. कशाला जगायचं, कशासाठी जगायचं, असे विचार यायचे. संध्याकाळी सगळे घरी आले की मग छोटय़ा कारणावरून चिडचिड करायचे. एकदा अशाच मन:स्थितीत जिना उतरताना ते पडले आणि मांडीच्या हाडाला फ्रॅक्चर झालं. मग काय ऑपरेशन, अंथरुणाला खिळून राहिले.

ते हॉस्पिटलमध्ये असताना तिथल्या डॉक्टरांनी त्यांची मानसिक अवस्था बघून मला बघायला बोलावलं होतं. त्या वेळेस त्यांचं नराश्य खूपच वाढलं होतं. ‘आता मी परावलंबी होणार. आधीच माझ्या जीवनाला काही अर्थ नव्हता, आता माझ्यामुळे सर्वाना खूप त्रास होणार. त्यापेक्षा आता मला मरण आलेलंच बरं’ असे विचार मनात डोकावू लागले होते. मधूनमधून तर थोडं चालायला यायला लागलं की, ‘मी सरळ उडी मारून जीव देणार’ अशी अविवेकी विचारांची गाडी भरकटू लागली होती.

म्हणून मग मी आधी त्यांना अ‍ॅण्टिडीप्रेसंट औषधं सुरू केली व त्यांच्या पत्नीला काही हलकीफुलकी विनोदी, काही सकारात्मक विचारांची पुस्तकं त्यांना वाचून दाखवण्यास किंवा वाचायला देण्यास सांगितलं.

काही दिवसांनी मग मी त्यांना भेटावयास त्यांच्या घरी गेलो असता त्यांच्या चेहऱ्यात मला आमूलाग्र बदल जाणवला. सुहास्य वदनाने त्यांनी माझं स्वागत केलं, ‘‘डॉक्टर, तुमच्या औषधांनी मला बरं वाटलंच. पण तुम्ही सांगितलेल्या पुस्तकांनी तर माझ्या विचारांची दिशाच बदलून टाकली. माझ्या आयुष्याचे शेवटचे दिवस मला अतिशय भकास, काळे दिसत होते. पण हा वानप्रस्थाश्रमही सुरस असू शकतो, आयुष्याच्या कथेचा शेवटही सुंदर असू शकतो, हे मला आता कळलं.’’

‘‘श्रीकांत, तुम्ही निवृत्त आयुष्याची जी कल्पना केली होती किंवा या शेवटच्या भागांचं जे चित्र तयार केलं होतं ते अविवेकी होतं. घडय़ाळ्याच्या काटय़ांशी संबंध तोडताना, धावपळीतून मुक्त होणं म्हणजे पाय पसरून आराम करणं असा अविवेकी अर्थ लावला. त्यामुळे तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या भागांची कथा भरकटू लागली, दिशाहीन झाली. कामातला बदल म्हणजेच आराम! आतापर्यंत तुम्ही एक प्रकारचे काम, एका ठिकाणी करत होता, त्याऐवजी एकतर तेच काम दुसऱ्या ठिकाणी किंवा पूर्ण वेगळं काम दुसऱ्या ठिकाणी करणं असा अर्थ होतो किंवा कामांच्या धबडग्यात ज्या छंदांना वेळ देता आला नाही त्या छंदांना वेळ देऊ शकता, सामाजिक कार्यात वेळ व्यतीत करू शकता.’’

‘‘हो डॉक्टर, आता बरं होईपर्यंत, व्यवस्थित चालू लागेपर्यंत तर वाचनात मन रमवणार आहे आणि नंतर कोणत्या तरी सेवाभावी संस्थेला थोडा वेळ, थोडा वेळ माझ्या गाण्याच्या छंदासाठी देईन, गाणं शिकेन असं म्हणतो आहे. माझ्या आयुष्याचे अपघातपूर्व व अपघातोत्तर असे दोन विभाग झाले आहेत. खरंच शेवट इतका सुंदर होऊ शकतो हे आधी कळलं असतं तर मी सुरुवातीपासूनच साऱ्याचा आनंदाने अनुभव घेतला असता. निवृत्त आयुष्य कंटाळवाणं होऊ लागल्यावर ‘माझ्याच बाबतीत असं का?’ असं मी मलाच विचारत असे. अपघात झाल्यावर तर ‘मीच का?’ हे विचार अधिक प्रकर्षांने येऊ लागले. पण या पुस्तकांनी, तुमच्याशी त्या दिवशी बोलल्यावर माझा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. ज्या अडचणीला म्हणजे अपघाताला ‘मीच का?’ असं म्हणत होतो, त्यालाच आता मी वरदान मानतो आहे. अपघात झाला म्हणून माझं भरकटलेलं जहाज पुन्हा किनाऱ्याकडे येण्यास मदत मिळाली. निवृत्ती म्हणजे आराम या माझ्या अविवेकी विचारांना बदलण्याची जणू संधीच मिळाली!’’

‘‘उं’ं्रे३८ आणि  डस्र्स्र्१३४ल्ल्र३८ मध्ये बदलणं सोपं नसतं, पण तुमच्या विचारात तुम्ही केलेल्या बदलामुळे हे शक्य झालं. सुरवंटाला फुलपाखरू बनण्याची एवढी तीव्र इच्छा असते की, तो कोषात जायलादेखील तयार होतो. कधीकधी आयुष्यातील प्रसंग आपल्याला असेच कोषात गुरफटवतात. पण आपल्या विचारांची दिशा योग्य असेल तर आपण म्हणतो पुढच्या यशाची रंगतदार भरारी अनुभवता येण्यासाठी आज ही परिस्थिती आहे. यातून बाहेर येण्यासाठी मी विचारांना विवेकी वळण देईन म्हणजे सुंदर गिरकी घेऊन मी बाहेर येईन. खरंच तुम्ही विचारांची दिशा बदललीत आणि तुम्हाला सुंदर निवृत्तीचा महामार्ग सापडला!’’