संजय पवार यांनी ‘इथे सुबक नक्षलवादी बनवून मिळतील’ (लोकरंग, २३ नोव्हेंबर) या लेखाची सुरुवात ‘प्रभु भला कीन्ह मोहि सिख दीन्ही। मरजादा पुनि तुम्हरी कीन्ही॥ ढोल गँवार शूद्र पसू नारी। सकल ताडना के अधिकारी॥’ या संत तुलसीदासकृत ‘रामचरितमानस’मधील चौपाई उद्धृत करून केली आहे. या लेखात ते lok13म्हणतात- ‘‘..नेहमीप्रमाणे तुलसीदासाचा ‘ताडना’ म्हणजे ‘तारणे’ असा असलेला खरा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावून ‘ताडना’ म्हणजे ‘बडविणे’ असं पसरवून तुलसीदास व रामचरितमानस नाहक बदनाम केलंय, असा युक्तिवाद काही लोक करतात. अशिक्षित, शूद्र, पशू, नारी यांना ‘ताडना’ म्हणजे ‘तारणे’ समजू शकतो; पण मग ‘ढोल’ कसा ‘तारणार’ आणि कशासाठी?’’
खरी गंमत पुढेच आहे. ‘लोकसत्ता’मधीलच दुसऱ्या एका लेखात- ‘..न व्हावे उदास’ (संपादकीय पान, २१ नोव्हेंबर) – डॉ. सदानंद मोरे म्हणतात – ‘‘स्त्रियांना मारझोड करणे हा पुरुषजातीचा जणू जन्मसिद्ध हक्क असल्याची समजूत विचारात घेतली, की तुलसीदासांनी स्त्री-शूद्रांचा उल्लेख ढोरांच्या म्हणजे जनावरांच्या बरोबरीने का केला असावा हे लक्षात यावे. त्यांच्यातील समान गुणधर्म म्हणजे ते सर्व ताडनाचे अधिकारी म्हणजे, मारहाण करण्याच्या लायकीचे समजले गेले!’’
तेव्हा प्रश्न असा उपस्थित होतो की, संत तुलसीदासांना ‘ढोल’ म्हणायचे आहे की ‘ढोर’?
या शब्दाचा खरा अर्थ आणि तुलसीदास यांना अभिप्रेत असलेला नेमका अर्थ समजावून घेण्याआधी या चौपाईचा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे. रावणाच्या तावडीतून सीतामाईला सोडवण्यासाठी लंकेवर स्वारी करण्यासाठी समुद्राने वाट द्यावी म्हणून राम त्याला विनंती करतात. पण समुद्र गर्वाने फुगून गेल्यामुळे त्यांचे काही ऐकत नाही. शेवटी, निर्वाणीचा प्रयास म्हणून समुद्राला अद्दल घडविण्यासाठी राम धनुष्यावर बाण चढवितात, तेव्हा समुद्राची घाबरगुंडी उडते आणि तो शरण येतो. त्यावेळेस समुद्राने केलेल्या विनवणीची ही चौपाई आहे.
हा संदर्भ लक्षात घेतला तर आपल्या पत्नीच्या सुटकेसाठी आतुर झालेल्या रामाला जर ‘महिला या बडवून काढण्याच्या लायकीच्या असतात’ असे समुद्र शहाजोगपणे सांगायला लागला तर रावणाआधी रामानेच समुद्राला बडवला असता! याचे कारण तुलसीदासांना ‘ताडना’ या शब्दांतून ‘शिकवून शहाणे करणे’ (हिंदी भाषेत ‘सीख देना’) हाच एकमेव अर्थ अभिप्रेत आहे. हिंदी भाषेने आणि तिच्या बोलीभाषांनी हा शब्द मूळ संस्कृत भाषेतून घेतला आहे आणि त्याचा मूळ अर्थ ‘शिकवून शहाणे करणे’ असाच आहे.
शेवटी, तुलसीदासांना अभिप्रेत असलेला शब्द कोणता? तर तो ढोरसुद्धा नाही आणि ढोलसुद्धा नाही! तर तो शब्द मुळात ‘धेड’ म्हणजे ज्याला नीट काही समजत नाही अशा अर्थाचा आहे. याचाच मूर्ख आणि अज्ञानी असा अर्थविस्तार होऊ  शकतो. समुद्र विनवणी करीत असल्यामुळे त्याच्या तोंडी ‘मी मूर्ख आहे, अज्ञानी आहे, मला शिकवून शहाणे करा!’ हीच वाक्ये शोभून दिसतात आणि वरच्या चौपाईमध्ये समुद्र तसेच म्हणताना दिसतो, ‘मला ‘सीख’ म्हणजे शिकवण दिली, ते बरेच केले!’
मग ‘धेड’ या शब्दाचा ‘ढोर’ आणि ‘ढोल’ असा अपभ्रंश कसा झाला? हा पाठभेद ज्यांना स्त्री-शूद्रांना बडविण्यासाठी तुलसीदासांची
हमी हवी होती अशा तथाकथित विद्वान आणि उच्चवर्णीयांनी जाणीवपूर्वक निर्माण केला आणि पोसला, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

national science day celebration 2024
हम सायन्स की तरफ से है
morarji desai drink urine
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई खरंच ‘शिवांबू’ प्राशन करायचे? जाणून घ्या
jayant patil and ajit pawar
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”
Sameer Wankhede on aryan Khan arrest
आर्यन खानच्या अटकेनंतर जातीवरून केलं लक्ष्य, भ्रष्टाचाराचे झालेले आरोप; समीर वानखेडे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा संबंध…”