पन्नाशीची उमर जाहली
मिशीमधले पिकले बाल
डोळ्यांनाही अंधुक दिसतेlok01
मंदावलेली दुडकी चाल

सुरकतलेला देह बापडा
गुडघ्यांमधूनी येती वांब
कपाळाच्या आणिक भाळी
रोजच आता टायगर बाम

पूर्वी होतो बाळ तरीही
रुबाब कसला किती प्रभाव
कित्येकांच्या पँटी फाटण्या
काफी होते केवळ नाव

शाखांवरती बसूनी तेव्हा
किती अरण्ये इथे वाचली
किती सोसले वणवे आणिक
किती वादळे इथे टाचली

शानही होती मस्ती होती
आगही होती रगही होती
हुंकारातूनी लाट सुनामी
श्वासांमध्ये धगही होती

उठता सहजी एक तर्जनी
थर्थरायची सफेद सदने
गुरगुरलो साधे तरीही
कापत होती सगळी गगने

आताशा या कंठामधूनी
डरकाळी ती फुटत नाही
स्ट्रेप्सील चघळली सत्तेची
आवा२२२ज आता तो सुटत नाही

कसे जाहले कधी जाहले
कळले नाही कोणी केले
भगव्या अंगावरचे पट्टे
फिक्कट झाले सफेद साले

म्हणूनी आता जरी सांगतो
व्याघ्रकुळाचा आहे बच्चा
‘अले लबाडा’ म्हणती सारे,
‘घेऊ का ले गालगुच्चा?’

शिकार करण्या जंगलात या
बसता कोठे दबा धरूनी
सावज येते समोर, पुसते,
‘फोटो काढताय?’ पोझ देऊनी

पन्नाशीची उमर गाठता
होतील आपुले ऐसे हाल
कधी वाटले नव्हते ऐसे
सिंहासनाचा खिळा लागूनी
उतरेल अंगावरची खाल..
पन्नाशीची उमर गाठता
होतील आपुले ऐसे हाल..
lok02