एक नवं क्यालेंडरअन् त्याची बारा पानंएवढं काय असतं त्यातकी त्याचं गावं गाणं?तेच दिवस त्याच रात्रीतेच दहा ते पाच!त्याच त्या प्रश्नांचातोच तो नाच!हॅप्पी नवं साल म्हणूनका त्याचं होतं सोनं?एवढं काय असतं त्यातकी त्याचं गावं गाणं?शुभेच्छांच्या वर्षांवानंभिजला मोबाइलत्यानं का आयुष्याचंफेसबुक हिरवं होईल?कशासाठी लुटता मग तीएसेमेसची वाणं?एवढं काय असतं त्यातकी त्याचं गावं गाणं? बाहेर बघा धुकं कितीकेवढी पडलीय थंडी!कुठून येईल ऊब इथंआपली फाटकी बंडी अच्छे दिन कसले लेको?..पोकळ आश्वासनं!एवढं काय असतं त्यातकी त्याचं गावं गाणं?वाचा वाचा पेपर आजचापाहा काय छापलंयजग कसं स्वत:चस्वत:वर कोपलंय!अशा वेळी कसं सुचतंफिदीफिदी हसणं?एवढं काय असतं त्यातकी त्याचं गावं गाणं? कडू कारलं बनून कोणीरडत असेल असंनक्की समजा मित्रों त्याचंपित्त उठलंय खासंकिंवा त्याचा उठला असेलदुखरा मूळव्याधकिंवा रात्री बायकोशीझाला असेल वादत्याशिवाय का कोणी असंगातं रडगाणं?त्याशिवाय का कोणी म्हणतंकशास गावं गाणं?नवं वर्ष म्हणजे अखेरअसतं तरी काय?नवं वर्ष येतानाआणतं तरी काय?शुभेच्छांच्या शब्दांचाअसतो काय अर्थ?वगळल्या भावना तरसारंच असतं व्यर्थ!एकदा हे समजलं कीसोपं होतं कळणंएकदा हे समजलं कीमाणूस गातो गाणं!स्वप्नं आणि आकांक्षांचेहोतात जुने पंखआयुष्याला होतच असतोनिराशेचा डंखतेव्हा असं पुन्हा पुन्हागावं लागतं गाणंआपलंच आपल्यालाहे असतं समजावणं की -एक नवं क्यालेंडरअन् त्याची बारा पानंभाग्यवान विजेत्यालागावेल त्यात सोनं..