News Flash

सुबत्ता

अरिवद सेवानिवृत्त झाला. अर्धागिनीची अजून पाच र्वष बाकी असल्यामुळे तो एकटाच अमेरिकेला मेहुण्याच्या घरी महिन्याभराच्या मुक्कामाला गेला. हातपाय धुऊन बठकीच्या खोलीत आला तेव्हा दिग्विजयी भाचा

| March 17, 2013 01:01 am

अरिवद सेवानिवृत्त झाला. अर्धागिनीची अजून पाच र्वष बाकी असल्यामुळे तो एकटाच अमेरिकेला मेहुण्याच्या घरी महिन्याभराच्या मुक्कामाला गेला. हातपाय धुऊन बठकीच्या खोलीत आला तेव्हा दिग्विजयी भाचा त्याच्या गावठी पिताश्रींना तावातावानं सांगत होता, ‘‘मी िहदुस्तानात का म्हणून परतायचं? इथं सुबत्ता आणि स्वच्छता आहे. बघताय ना गेले चार महिने? तिथं काय आहे? गरसोयी, तडजोडी, टंचाई आणि गलिच्छपणा.’’
मेहुणा मान खाली घालून गप्प बसला. तितक्यात दिग्विजयपत्नीनं तिच्या सासऱ्यांना विचारलं, ‘‘पपा, आज भाजी कोणती हवी?’’
पपाराव अरिवदकडे चोरटी नजर टाकत पुटपुटला, ‘‘कोणतीही. चॉइस काय आहे?’’
सून म्हणाली, ‘‘राजमा, भेंडी-अनारदाणा, गोबी-मटार, दम आलू, पालक-पनीर, छोले आणि मेथी-मश्रूम.’’
अरिवदच्या तोंडाला पाणी सुटलं. पपारावनं फर्माइश केली, ‘‘मेथी-मश्रूम.’’
‘‘ओके! आणि आमटी कोणती हवी? दाल फ्राय, दाल महारानी, मलई कोफ्ता, मूग दाल, कढी पकोडा, माकी दाल, की दाल मखनी?’’
‘‘दाल मखनी.’’
अरिवद प्रथम खूश झाला. पण नंतर चमकला. वास्तविक त्याचा मेहुणा खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ होता. तरीही भाजीप्रमाणेच आमटीसाठीही त्यानं सातांपकी शेवटचाच ऑप्शन निवडला होता. म्हणजे त्यानं पहिल्या सहा पदार्थाची नावंही धडपणे ऐकण्याची तसदी घेतली नव्हती. का बरं?   सून स्वयंपाकघरात गेली. भाचा बाथरूममध्ये गेला. अरिवदनं जिभल्या चाटून झाल्यावर आवंढा गिळला आणि विचारलं, ‘‘तक्रार का करत असतोस रे सदानकदा? सून चिक्कार लाड करतेय की. मला तर शेरे पंजाब हॉटेलात गेल्यासारखं वाटलं. आमच्या घरी तुझी बहीण असं काही विचारत नाही रे. तिच्या मनात येईल ते शिजवते.’’
मेहुणा सुस्कारा सोडून पुटपुटला, ‘‘तेच ठीक आहे.’’
‘‘असं कसं? तुला बघ पाच-सहा डिशेसचा ऑप्शन मिळाला. तुझा चिरंजीव खरंच नशीबवान निघाला. हल्ली अशा सुगरण मुली नसतात रे. रीमाला तर हे सगळे पदार्थ करता येतात म्हणजे आश्चर्यच आहे.’’
‘‘आश्चर्य कसलं त्यात? आमटीभाजीची भांडी डीपफ्रिजमधून बाहेर काढून तर ठेवायची.’’
‘‘असं कसं? भांडय़ात पदार्थ शिजवायला तर लागतो ना?’’
‘‘सगळे पदार्थ आधीच बनले आहेत. सकाळी कपूर आला होता ना? तो देऊन गेला.’’
‘‘काय देऊन गेला?’’
‘‘एका सातमजली डब्यात सात भाज्या आणि दुसऱ्यात सात आमटय़ा. दर दिवशी एकेक मजला खाली करायचा. पहाटे फ्रीजबाहेर काढलेली भांडी जेवण्याच्या वेळेला मी ओव्हनमध्ये सरकवतो आणि आतला पदार्थ डिफ्रॉस्ट झाला की जेवून घेतो. तू आज काय घेणार? रुमाली रोटी, व्हाइट ब्रेड, ब्राउन ब्रेड, नान, रोटी, कुलचा की पराठा? तुला जे हवं ते फ्रीझमधून काढून ठेवायला सांगतो.’’
अरिवदनं गरगरणारं डोकं गच्च धरून विचारलं, ‘‘सात दिवसांचं रेडिमेड जेवण? एकदम?’’
‘‘मग? वेळ कोणाला आहे इथं? रीमा आणि दिग्विजय दिवसभर घराबाहेरच असतात. रात्री दमून येतात.’’
‘‘आत्ता आलं लक्षात. कपूराघरचं जेवण आलंय म्हणून रीमा पंजाबी पदार्थच ऑफर करत होती तर.’’
‘‘हो. या विभागात घरपोच जेवणाचे तीन चॉइस आहेत. पंजाबी, मद्रासी किंवा गुजराथी. रीमा दर शनिवारी एकेका स्टाइलचं जेवण मागवते. आजपासून पंजाब सप्ताह सुरू झाला. गेल्या आठवडय़ात हंसाबेनच्या उंधियो, खिचडी, ढोकळा, ठेपला यांचा रतीब लागला होता. आता यानंतर दररोज राधाम्माच्या रसम-सांबारमची पाळी.’’    
अरिवदनं धसकून म्हटलं, ‘‘अरे बापरे! तसं असेल तर मी येत्या शुक्रवारीच चंबूगबाळं आवरतो.’’
तितक्यात दिग्विजय बाहेर आला. सोबत दोन भलीमोठी बोचकी घेऊन दारापाशी गेला.
अरिवदनं विचारलं, ‘‘हे काय नेतोयस?’’
  तो उत्तरला, ‘‘कपडे.’’
‘‘कोणाचे?’’
‘‘कोणाचे म्हणजे? आम्हा तिघा जणांचे. तुमचेपण काही असतील तर द्या.’’
‘‘जुने कपडे का? शनिवारचं दान द्यायला निघाला आहेस वाटतं. छान!’’
‘‘ओ शिट! चॅरिटी नाही करत आहे. लाँड्रोमॅटमध्ये घेऊन जातोय.’’
‘‘कशाला?’’
‘‘कशाला म्हणजे? धुवायला.’’
‘‘एका दिवसाचे हे इतके कपडे?’’
‘‘एका दिवसाचे कसे असतील? संपूर्ण आठवडय़ाचे आहेत.’’
‘‘शी. म्हणजे तुम्ही लोक आठवडय़ाभराचे घामट कपडे न धुता तसेच पारोसे ठेवून देता?’’
‘‘हो. तशीच पद्धत असते इथं स्टेट्समध्ये.’’
‘‘लाँड्रोमॅट म्हणजे?’’
‘‘प्रत्येक अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमध्ये वॉिशग मशीन्स असतात. जे रिकामं असेल त्यात कपडे सरकवायचे. तासाभरानं ते ड्रायरमध्ये घालायचे. सो ईझी! सो क्लीन! सो मॉडर्न!’’
‘‘शी! म्हणजे या इमारतीतल्या अनोळखी काळ्या-पिवळ्या लोकांच्या कुबट कपडय़ांसोबत तुमचे कपडे धुता? कोणाला कसला रोग असेल. अस्वच्छ नाही कसं वाटत तुम्हा लोकांना?’’
भाचा नव्‍‌र्हस झाला. मेहुणा तोंड िभतीकडे वळवून अर्धवट छद्मीपणे हसला आणि लगेच तोंड फिरवून साळसुदासारखा चिरंजीवांकडे मख्खपणे पाहायला लागला.
भाचा सावरून म्हणाला, ‘‘अशीच पद्धत असते स्टेट्समध्ये. इथं मोलकरणींकडून हातानं आपटून धोपटून कपडे धुण्याचा गावठीपणा करत नाहीत.’’
मेहुणा हळूच म्हणाला, ‘‘मुळात मोलकरणीच नाहीत इथं. सगळं आपणच हातानं करायचं.’’
भाचा तडकला, ‘‘हातानं कशाला? मशीन्स असतात प्रत्येक टास्कसाठी.’’
अरिवदनं मूळ मुद्दा लावून धरला, ‘‘हो, पण कपडय़ांसारख्या खासगी वस्तूंची धुलाई करण्याची यंत्रं सार्वजनिक असतात ना. हे तुमच्या वैयक्तिक आरोग्याला अत्यंत हानिकारक आहे. यंत्रामध्ये तुमच्या आधी कपडे घातलेल्या माणसाला खरूज, इसब, नायटा झालेला असला तर?’’
भाचा चिडून म्हणाला, ‘‘अमेरिकेत असले फालतू इंडियन रोग होत नसतात.’’
‘‘ठीक आहे. कोणाला एड्स झालेला असला तर?’’
डोळ्यानं खूण करून मेहुण्यानं दटावलं तसं अरिवद गप्प बसला. भाचा धुसफुसत सार्वजनिक धोबीघाटावर गेला.
अरिवदनं मेहुण्याला ठणकावलं, ‘‘हे बघ, प्राण गेला तरी मी माझे कपडे सार्वजनिक सुलभ स्वच्छतालयात धुवायला देणार नाही. मोलकरीण मिळत नसेल तर मी स्वत:च्या हातानं धुवून टाकेन.’’
मेहुण्यानं सूनबाईंच्या हालचालीचा अंदाज घेऊन हळूच तिढा टाकला, ‘‘पण ते सुकवशील कसे?’’
‘‘कसे म्हणजे? गॅलरीतल्या दोरीवर वाळत घालेन की.’’
मेहुण्यानं तिढा आवळला, ‘‘पण गॅलरीत दोरीच बांधलेली नाही.’’
‘‘एवढय़ा टकाटक फ्लॅटमध्ये एक मामुली दोरी नाही? ही कसली डोंबलाची सुबत्ता?’’
‘‘इथं बाल्कनीत कपडे वाळत घालत नाहीत. लाँड्रोमॅटच्या ड्रायरमध्ये ओले कपडे सुकून निघतात.’’
चेकमेट! अरिवद अवाक झाला.
जरा वेळानं त्यानं मेहुण्याला विचारलं, ‘‘तू एकटाच परत येणार का माझ्याबरोबर भारतात?’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 1:01 am

Web Title: story of arvind who went to america to his relatives and compared americas luxury life with indian life
टॅग : Story
Next Stories
1 यावे त्याच्या वंशा!
2 शुचिर्भूत
3 आम अ‍ॅडमी
Just Now!
X