या दशकाच्या प्रारंभी झालेल्या ‘अरब स्प्रिंग’ या क्रांतीनं जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. अरब देशांतील हुकूमशाह्य़ांविरोधात, अराजकाविरोधात रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्या तरुणाईमुळे राजकीय समीकरणे बदलली. बशर आसद यांच्या सीरियातील राजवटीदरम्यान तेथील नागरिकांच्या मनात असंतोष खदखदत होता. एकीकडे वाढत चाललेली लोकसंख्या आणि दुसरीकडे वाढती महागाई, बेरोजगारीमुळे नागरिक मेटाकुटीला आले होते. देशात लोकशाही आली तर किमान मूलभूत प्रश्न सोडवले जाऊ शकतात, अशी लोकभावना सीरियात जोर धरू लागली होती. इजिप्तमधील होस्नी मुबारक सरकारविरोधात असंतोष प्रकट करताना कैरोतील तहरीर चौकात तरुण फळविक्रेत्याने आत्मदहन केले. या घटनेनंतर अरब देशांतील असंतोषाचा आगडोंब उसळला तो राजकीय बदल घडवल्यानंतरच शांत झाला. या अरब स्प्रिंगबाबत, सीरिया-इस्रायल युद्धं, राजकीय संघर्ष आणि सततच्या युद्धाने सीरियात झालेली प्रचंड मनुष्यहानी, देशाचा बिघडलेला राजकीय- सामाजिक पोत आणि तेथील लोकांचे सद्य:जीवन याबाबत जाणून घेण्यासाठी निळू दामले यांचे ‘सीरिया – सगळे विरुद्ध सगळे’ हे पुस्तक महत्त्वाचे आहे. अरब देशांची राजकीय – सामाजिक स्थिती हा अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न. सीरियासारखा देश, इतर अरब राष्ट्रांचं राजकारण, जागतिक घडामोडींच्या संदर्भाने सीरियाची सद्यस्थिती असे अनेक क्लिष्ट मुद्दे ओघवत्या व रंजक लेखनशैलीने सहजरीत्या या पुस्तकात उलगडलेले आहेत.

‘सीरिया – सगळे विरुद्ध सगळे’

CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

– निळू दामले, मनोविकास प्रकाशन,

पृष्ठे- १९८, मूल्य- १९९ रुपये.