कौस्तुभ केळकर- नगरवाला

जिगरी मतर सदाभौ यास,

banana in 15 thousand hectares of garden dried up in Jalgaon and solapur due to summer heat
उन्हाच्या झळांचा केळीला फटका; जळगाव, सोलापुरात १५ हजार हेक्टरवर बागा सुकल्या
man killed his wife in front of daughter for refusing to quit job
सोलापूर : नोकरी सोडण्यास नकार दिल्याने मुलीच्या डोळ्यादेखत पत्नीचा खून
A drunken boy who beat his parents at Rethere Budruk in Karad taluka was killed by his father
आई वडिलांना मारहाण करणाऱ्या मद्यपी मुलाचा वडिलांकडून खून; कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील घटना
nashik water crisis marathi news, nashik water scarcity marathi news
नाशिक: प्रचाराच्या धामधुमीत टंचाईचा प्रश्न ऐरणीवर, ६३९ गावे-वाड्यांना टँकरने पाणी

दादासाहेब गांवकरचा दंडवत..

राम राम सदाभौ. आमी जातू आमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. मंजी आमी गावाकडंच राहनार आन् तुमी ममईला. चालतंय की! टपालकीचा  शिलशिला आता थांबतुया. तुम्चं वैनीसायेब म्हनत्यात.. आम्चं धनी राजामानूस हाय, पर वाईच मेंटल हाईत. आक्षी बरूबर हाय तिचं. आमी मेंटल हाईच, पर आज शेंटीमेंटल बी झालूया. सदाभौ.. आवं, टपालकी सुरू जाली आन् पोष्टमनभाऊंशी गाठभेट होवू लागली. गावाकडं बी पोष्टमनभाऊ आजकाल षटीसामासीच दिसत्यात. धा-पंदरा वर्सापूर्वी रोज भ्येटनारा हा मानूस.. आता त्येचं दर्सन दुर्लब झालंया. सेलफूनच्या जमान्यात समदं पोष्टखातंच धपांडीइष्टाप खेळून ऱ्हायलंय जनू. राज्य बिचाऱ्या पोष्टमनवर. गावाकडचा मानूस त्योच हाई.. पर पत्ता बदलल्येला. पोष्टाचा पत्ता ईसरून गेलाय त्यो. ढाई अक्शर प्रेम के. हरवलंय समदं. अक्शरवळख ईसरून नुस्तं कापी आन् प्येष्ट. कायाप्पावर ढीगानं पीक येतंया मेशेजांचं. पर मनाच्या कानापत्तुर काय बी पोचत न्हाई त्यातलं. आम्ची जिंदगी उदास होवून ऱ्हायलीया. तुम्चं ल्येटर भ्येटलं की मनामंदी आनंदाचं कारंजं थुईथुई नाचू लाग्तं बगा. पंकजकुमार दिलामंदी दिल से गजल गावून ऱ्हायलाय.. चिट्टी आई है, बडे दिनों के बाद.. आवं, पंदरवडा बी लांबच लांब वाटायचा. लंबी जुदाईवानी. तुम्चं ल्येटर गावलं की येकदम झ्याक वाटायचं. आमी निवांत झोपाळ्यावर बसायचो लोडाला टेकून. आन् तुम्चं वैनीसायेब कड्डक चाय पाटीवनार. घुटक घुटक चाय आन् सदाभौची पत्रभ्येट. आमी गालातल्या गालात खुदक खुदक हसतूया. सदाभौ, विराटवानी ईराट ब्याटींग करायचं तुमी. ये लगा सिक्सर. कंदी गडाबडा हसायचं आमी. कंदी डोळ्यामंदी पानी. कंदी हल्के हल्के प्वाटाला चिमटा. कंदी आंखोंमंदी गुस्सा. आमी आसं तुम्च्या अक्शरामंदी हरवून जायचो. मंग तुम्चं वैनीसायेब आमाला ‘मेंटल’ म्हनायच्या.

चालतंय की..

सदाभौ, तुमास्नी दूरदर्शन आटवतंय का? ‘महाभारत’ शिरियल. म्हाभारतामंदी येक से येक बढकर क्यारेक्टर. आम्चं फ्येवरेट कोन हुतं..? सांगतू की. त्योच- जो कंदी दिसला न्हाई, पर हमेशा साथ असायचा. आभाळावानी श्येवट नसलेला अनंतराव. त्यो हरिश भिमानीचा धीरगंबीर आवाज. ‘‘मं समय बोल रहा हूँ!’’ वोच. त्यो समय आमास्नी लई आवडायचा. समयची जाम सवय जालेली तवा. आसं वाटायचं की जिंदगी मुठ्ठीभर वाळूवानी हातातून निसटून चाललीया जनू. ह्य़े थांबायला हवं. समयनं बी वाईच उपडय़ा हाताला जीब लावून टाईम प्लीज म्हनाया पायजेल. वाईच थांबाया पायजेल. पर त्यो लई बिलंदर.

कलंदर आन् सिकंदर बी. त्यो कंदी बी थांबत न्हाई. हमेशा पुडं पुडं पळतुया. घाईची लागल्यासारका. सदाभौ, तुमी येकदम भारी बोल्ला बगा. दिस, म्हैना, साल चिमनीवानी भुर्रकन् उडून जात्यात. परत्येक चांगल्या गोष्टीला श्येवट आसतुया. तसा आपल्या टपालकीचा बी ग्वाड श्येवट हुनार आजच्याला. जगाच्या श्टाìटगपासून यंडपत्तुर फकस्त मऱ्हाटी शिरियल चालत्याती.. टपालकी न्हाई. सदाभौ, तुम्चा ‘सीदी बात, नो बकवास’वाला अंदाज आमाला लई प्यारा हुता.

फुकाचा फापटपसारा न्हाई. मुद्दे की बात. तमाकू कवाच सोडली आमी. टपालकीची आताशा सवय जाली हाई. ही सवय सुटनं वाईच जड जानार बगा. सदाभौ, परत्यक्ष मुलाकात न्हाई जाली तुम्च्यासंगट कंदी बी. तुमी मस ममईला बोलीवलं.. पर न्हाई जम्लं.

राग नगा मानू, सदाभौ.. आमीच मनावर न्हाई घ्येतलं. गावाकडचे सिदेसादे रस्ते ममईला ग्येले की गर्दीत हरवून जात्यात. तिथल्ल्या गर्द गर्दीत आपला मानूस वळकता न्हाई येत. फकस्त अक्शरभ्येट आप्ली. पर फेविकालवानी बान्डिंग जालेलं. लई वाटायचं- सदाभौ आप्लं हाईती. सग्या भावावानी सोगत हुईल आप्लं ममईला. जीवाची ममई करू. पन लगोलग भ्याबी वाटायचं. रोजची लडाई लडतो सदाभौ ममईला. जागेची अडचन, वेळेची अडचन. उगा दिलाची अडचन कशापाई कराया पायजेल? हाये ते ब्येस हाई की! परत्यक्ष भेटून काय हुईल? आपुलकी डबल हुईल? प्रीम डबल हुईल? असं काय बी न्हाई. ते समदं हाईच. पर अपेक्शा वाढत्यात. मत्रीचं नातं जालं की गृहित धरतू आपुन येकमेकांना. अपेक्शाभंग ब्रेकअपपेक्सा डेंजर. परत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. आपुन आपलं टपालकीतून भ्येटत ऱ्हावू सदाभौला. निरपेक्श, सच्ची दोस्ती चिट्टीमदनंच जमून ऱ्हायलीय जनू. सदाभौ, हमारे तुमारे खयालात कितने मिलतेजुलते है बगा. कित्ती टायमाला आमी तुमास्नी गावाकडे बोलवून ऱ्हायलोय, पर तुमाला गावची येष्टी गावंना. चलता है!

सदाभौ, गावाकडच्या लोकान्ला ममईचं लई कवतिक. ममईची चौपाटी, शापिंग मॉल, घडय़ाळाच्या काटय़ावर चालनाऱ्या आगीनगाडय़ा, आभाळामंदी बुंगाट उडनारी ईमानं. समदं भारी. ममईचा मानूस मंजी येकदम भारी. स्मार्ट. हुश्शार. येकदम परग्रहावरचा असल्यासारका. टायवाला. सुटाबुटातला. फाडफाड विंग्रजी बोलनारा. त्येला गावाकडं करमत नसनार. त्येला गावकडच्या साद्या, फेटंवाल्या, श्येतकरी मानसाईषयी कशाला प्रीम वाटनार? सदाभौ, दोस्तीचा रिश्ता ना काष्ट शर्टिफिकेट मागून ऱ्हायलाय, ना इन्कम शर्टिफीकेट. आम्च्या-तुम्च्या जुळती तारा, मधुर प्रेमाच्या बरसती धारा. आक्षी तसंच. तुमी आमास्नी आप्लं म्हन्लं. तुमच्यासाटी काय पन. सदाभौ, ममईला मानूस गर्दीत लपतू खरा; पर येकटाच आसतुया. मनाच्या सांदीकोपऱ्यात त्येला गावचा उजेड दिसतुया. शिवार, हिरवं रान, सर्जा-राजाची जोडी, डेरेदार आंबा.. समदं आटवून ऱ्हायलंया त्येला. गावच्या आटवनीनं झुरतोय त्यो. तो मस ठरवतूय, की रिटायर्ड जालं की गावाकडं परत जायाचं. सुद्दं, निर्मळ जगायचं. पन तवर काय? रोज लडायचं. ही रोजची लडाई कामन हाई. कामन मॅनसाटी. मंग त्यो गावाकडचा आसू द्य्ो, न्हाईतर सिटीवाला. टपालकी ो पूल हुता गावाला ममईशी जोडनारा. आम्ची माती, आम्ची मान्सं. सदाभौ, तुमी ध्येनात ठिवा. गावाकडं तुम्चा भाव हाई ‘दादासायेब’ नावाचा. गावाकडनं ममईला जानाऱ्या गाडीला रिवर्स गिअर न्हाई. पर तुम्ची गाडी रिवर्समंदी येवू द्य्ो.. वापस गावाकडं. हा दादासायेब तुम्ची वाट बघतुया. दिस नकळत जाई.. सांज रेंगाळून राही.. क्षन येकही न ज्याला- तुजी आटवन न्हाई. शेम टू शेम तसंच. तुमी रिटायर्ड जालं की गावाकडं शेटल व्हा. जब साथ जियेंगे दो दोस्त.. मजा येईल बगा.

सदाभौ, दिस येतील, दिस जातील. पर २०१९ पेशल हुतं आम्च्यासाटी. बाकी मस उन्नीस-बीस जालं सालभर. पर तुम्चं ल्येटर सौ फीसदी थंडक देवून ऱ्हायलंया मनाला. परत्येक अक्शरानं प्रीमाची सर्दी. सटासट शिंका. आपुलकीचा वलावा. शिंकरून, खाकरून भावनांचा निचरा. कचरा साफ. टपालकीनं दोस्तीची तबीयत येकदम टुनटुनीत. शोशल मीडियाची देन तुमी. वळख जुनी लई दिसाची. पर आभासी. कमेंटा आन् लाईका देनारी लिमिटेड मानुसकी. कौन केहता है की थोबाडपुस्तकावरची मान्सं तोंडघशी पाडत्यात? तिथंच मान्सं बिनधास्त व्यक्त हुतात. आवं, रोज जगताना आपुन मस मुखवटे लावतू.

थोबाडावर उसनं आसू आन् शिनेमावानी खोटी शेंटी डायलागबाजी. समदा चोरीचा मामला. पर तुम्चं-आम्चं तसं न्हाई. सोसंल तेवडंच शोशल राहाया पायजेल परत्येकानं. थोबाडपुस्तकानं तुम्ची फ्रेन्ड रिक्वेश्ट पाटवली आन् तुमी आमास्नी सच्चा दोस्त मानलं. दोन ओंडक्याची हुते सागरात भ्येट. एक लाट तोडी दोगा. आपुन तसंच भ्येटलो सोशल मिडीयावर. पर वेव्हलेन्ग्थ जुळली बगा आप्ली. टपालकीनं या दोस्तीला चार चांद लाग्लं. अजबच हाई समदं. पर खरं हाई.

सदाभौ, ये शिलशिला है प्यार का. टपालकीत तुमी पूरब म्हन्लं की आमी पच्चीम. तुमी म्हनून ऱ्हायलंया.. यापुडं टपालकी बंद. चालतंय की! आता पुडच्या साली फूनवर बोलू परत्याक्ष. आन् २०२२ मंदी गळाभ्येट. तुम्ची-आम्ची टपालकी थांबली तरी बी चालतंय की. गावची आन् ममईची टपालकी थांबाया नगं. आवं, लोकशत्ता हाई ही. ‘लोकसत्ता’च पूल होवून ऱ्हायलंया दोन्नी तीरास्नी जोडनारा. पूलाखालनं मस पानी वाहून जाऊन ऱ्हायलंय. पर तिथल्ला मानुसकीचा झरा आटनार न्हाई कंदी. सदाभौ, सदासर्वदा योग तुजा घडावा. तुम्च्यासाटी, देशासाटी, देह माजा पडावा. टपालकी चिरायू होवो सदाभौ. तुम्च्या वैनीसायेबांचं म्हननं पुन्यांदा आटवतंय. आमी मेंटल बी.. शेंटीमेंटल बी. दाटून कंठ येतो. मस रडू येतंया, पर तरीबी बाकी टपाल हशील..

येतू सदाभौ. जपा जीवाला.

टपालकी चिरायू होवो.

तुम्चा जीवाभावाचा दोस्त..

दादासाहेब गांवकर

(समाप्त)

kaukenagarwala@gmail.com