|| सॅबी परेरा

 

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

प्रिय मित्र दादू यांस,

सदू धांदरफळेचा नमस्कार.

दादू, आपण ‘कालनिर्णय’च्या जमान्यातले (म्हणजे नामशेष होऊ घातलेल्या प्रजातीतले) लोक असल्यामुळे आपल्याला फक्त संकष्टय़ा, चतुर्थ्यां आणि आंगणेवाडीच्या भराडीदेवीची जत्रा तेवढय़ा ठाऊक असतात. मात्र, जगभर रोज कसला न् कसला आंतरराष्ट्रीय विशेष दिवस साजरा केला जात असतो. असे विशेष दिवस असो वा सण; तो साजरा करण्याची पद्धत समाजागणिक आणि व्यक्तिगणिक वेगवेगळी असते. कुणी पारंपरिक वेशात, लोकगीतांच्या तालावर नाचत-गात जल्लोष करतात, कुणी प्रार्थनेत दिवस घालवतात. कुठे नथी वगैरे पारंपरिक दागिने घालून महिलावर्ग फेटे बांधून बुलेटवरून मिरवणुका काढतात. कुणी सूर्योदयापूर्वीच काळी पिशवी घेऊन खाटकाच्या दुकानासमोर रांगा लावतात, तर कुणी मित्रांचा गोतावळा गोळा करून ‘बसतात.’ पण हल्ली या सगळ्यांपेक्षा एक मोठा वर्ग तयार झाला आहे.. जो बाकीचं काही करो- न करो, पण केवळ सोशल मीडियावरून शुभेच्छा देऊन हरेक दिवस साजरा करतो. मागच्याच आठवडय़ात सोशल मीडियावर आलेल्या शुभेच्छांमुळे मला समजलं की- १०ऑगस्ट हा ‘जागतिक आळशी दिवस’ आहे म्हणून!

खरं म्हणजे त्याच दिवशी तुला पत्र लिहायचा माझा बेत होता, पण कंटाळा केला. दादू अरे, मी काही तसा आळशी माणूस नाही. पण कधी कधी (म्हणजे रोजच) मला जरा कंटाळा येतो. हा कंटाळा जणू माझ्या हाडांमासी भिनलाय. आणि त्यामुळेच आजवर मी कधी कोणती स्पर्धा जिंकलो नाही की कधी नंबरात आलो नाही. मला कधीच कोणतं बक्षीस, पारितोषिक, प्रमाणपत्र, ट्रॉफी असं काही मिळालंच नाही. हा, कॉलेजात असताना एकदा मला ‘लेझीएस्ट स्टुडन्ट ऑफ द ईयर’ अ‍ॅवार्ड जाहीर झालं होतं, पण मी ती ट्रॉफी घ्यायला गेलोच नाही. आयशप्पत.. जाम कंटाळा आला होता! असो. ‘लेझी डे’च्या शुभेच्छा त्याच दिवशी देणं म्हणजे बायकोच्या वाढदिवशी गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जाण्यासारखं आहे. पुन्हा एकदा.. असो. साताठ दिवस उशिराने का होईना, तुला ‘इंटरनॅशनल लेझी डे’च्या हार्दकि शुभेच्छा!

खरं म्हणजे आळशी असणं हा माणसाचा नैसर्गिक स्वभावधर्म आहे आणि कामसू असणं हे निसर्गनियमाच्या विरुद्ध वर्तन आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. (आळशी माणसांना प्रामाणिक आणि अप्रामाणिक अशी दोन-दोन मतं बाळगायची उधळपट्टी परवडत नाही.) पण कुणी मला माझं हे मत सिद्ध करायला लावणार असेल तर मत सिद्ध करण्याची मेहनत करण्यापेक्षा बसल्या जागेवरून माझं मत मागे घेणं मी पसंत करीन. उगाचच्या उगाच निसर्गाच्या कामात लुडबुड करणाऱ्या आणि स्वत:ला कामसू समजणाऱ्या लोकांनी निसर्गाची सगळ्यात मोठी हानी केलेली आहे. आळशी माणूस वारा येईल तशी पाठ फिरवतो किंवा पाण्याचा प्रवाह असेल तसा वाहत जातो. तो उगीच त्या वाऱ्यासमोर पवनचक्की बसवून उंगली करत नाही, किंवा भविष्यात खेकडे फोडतील अशी धरणं बांधण्याचे फालतू धंदे करत नाही. तुला सांगतो दादू, जगातले सगळेच लोक जर माझ्यासारखे आळशी असते तर आज आपले कदाचित खाण्यापिण्याचे बारके बारके प्रॉब्लेम झाले असते; पण ग्लोबल वॉìमग, ओझोनच्या थराला पडलेली भोकं, अंतराळातला ई-कचरा, हिमशिखरांवरील प्लास्टिक, समुद्र मागे हटविण्यासाठी होणारी खारफुटीची कत्तल असे मोठमोठे प्रश्न निर्माणच झाले नसते. पटतंय की नाही?

मुळात काही मुठभर कामसू लोकांनी आळशी असणं हे काहीतरी वाईट किंवा हलक्या दर्जाचं आहे असं ठरवलं आणि बहुसंख्य असलेल्या आळशी लोकांनी आपल्या स्वभावधर्माप्रमाणे या तथाकथित कामसू लोकांचं म्हणणं खोडून काढण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे माझ्यासारख्या आळशी माणसाला ज्या आळसाचा गर्व वाटायला हवा, त्याचीच लाज वाटून घ्यायची वेळ आली आहे. अरे दादू, आपल्या आळशी असण्याला मोठी देदीप्यमान परंपरा आहे. इतिहासातदेखील अंगच्या खुमखुमीमुळे रणांगणात लढून मरणाऱ्या राजांपेक्षा राजवाडय़ात  ऐषोआराम करून मेलेल्या आळशी राजांची संख्या जास्त आहे.

दादू, तुला माहीत आहेच, की एक कारकून म्हणून मी माझी कारकीर्द सुरू केली. मी जर आळस केला नसता तर वयाच्या पंचविशीत एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीचा सीईओ किंवा प्रेसिडेंट होऊ शकलो असतो. किंवा मग शिक्षणाच्या भानगडीतच न पडता चहा विकून एव्हाना देशाचा प्रमुख झालो असतो. पण एकदा का टॉपला पोहोचलो की मग उरलेल्या आयुष्यात काय करायचं, हा दूरदर्शी विचार माझ्या डोक्यात आला आणि मी त्या फालतू महत्त्वाकांक्षेच्या फंदातच पडलो नाही.

लोक जरी मला आळशी म्हणत असले तरी मला कामाची खूप आवड आहे. काम पाहून मी अक्षरश: वेडा होतो. कामाकडे तासन् तास मी नुसता बघतच राहतो. काल तर काय झाले- की ऑफिसमध्ये असाच कामाकडे पाहत असताना अचानक बॉस आला आणि इटालिक फॉन्टमध्ये (म्हणजे तिरकसपणे रे!) म्हणाला, ‘‘आजवर खूप काम पडल्यामुळे एखाद्याला प्राण गमवावा लागल्याचे मी तरी ऐकले नाही!’’ मी मान वर करण्याचेही कष्ट न घेता  म्हणालो, ‘‘पण उगाच रिस्क कशाला घ्या!’’

अरे दादू, वाईट या गोष्टीचं वाटतं की आज संपूर्ण जगात ऊर्जेचा तुटवडा असताना, लोक नैसर्गिक साधनसामुग्रीची हेळसांड करीत असताना मी आणि माझ्यासारखी आळशी माणसं रिकामटेकडी राहून ऊर्जेची किती बचत करतो, याची या कामसू जगाला कदरच नाही. लोकांना (विशेषत: बायको आणि बॉसला) असे वाटते की मी आळशी आहे. पण खरी गोष्ट अशी आहे- की देवाने आपल्याला काही ठराविक कार्य करायला या धरतीवर पाठवले आहे अशी माझी बेसिक श्रद्धा आहे. जोपर्यंत आपले ते विहित कार्य पूर्ण होत नाही तोवर देव आपल्याला मरू देणार नाही अशीही माझी टॉपअप केलेली श्रद्धा आहे. मग उगाच काम करायची काय घाई आहे? होईल सावकाश!

आता आपलं वय झालं. त्यामुळे आपण कामधाम, धावपळ, दगदग कमी करून थोडा आराम करायला पाहिजे असं मला अगदी बालपणापासून वाटत आलंय! प्रॉब्लेम असा झालाय, की माझी स्वप्नं मोठी असल्यामुळे मला सकाळी उशिरा जाग येते. त्यामुळे मी खूप झोपतो असा लोकांचा गैरसमज झालाय. त्याला मी काही करू शकत नाही. अरे, त्या रणवीरसिंग, सिद्धार्थ जाधवसारखी काही माणसं तेरा महिने (दुष्काळ आपल्या पाचवीलाच पूजला असल्याने महिनेही कायमस्वरूपी वाढवले आहेत याची नोंद घ्यावी.) चोवीस तास उत्साहाने फसफसलेली कशी काय राहू शकतात याचंच मला आश्चर्य वाटतं. मला तर बुवा या लोकांच्या उत्साहाचा कधी कधी कंटाळाच येतो. आणि मग मी दिवसचे दिवस निष्क्रिय पडून राहतो. तेही सोपं नाही म्हणा! खरं म्हणजे निष्क्रिय राहणं हे सगळ्यात अवघड काम. त्याची सुट्टीदेखील मिळत नाही.

काम का करावं आणि ते मीच का करावं, हे दोन प्रश्न मला नेहमीच भेडसावतात. मग पहिला प्रश्न पहिला सोडवावा कीदुसरा प्रश्न पहिला सोडवावा, हा तिसराच यक्षप्रश्न उभा राहतो. दुसऱ्या एका अँगलने विचार केला तर मला असं वाटतं की, खूप हालअपेष्टा सोसून, मेहनत करून आपण मोठं व्हायचं; आणि एकदा का आपण मोठे झालो, यशस्वी झालो, आपलं नाव झालं कीमग आपल्या जीवनावर सिनेमा बनवून अक्षयकुमार किंवा सुबोध भावे आपल्यापेक्षा जास्त पैसे कमावणार! हे काही मला पटत नाही. म्हणून मग मला मेहनत करावीशीच वाटत नाही.

दादू, तुला सांगतो- घरीदारी, ऑफिसात, मित्रमंडळींत, बायकोच्या नातेवाईकांत पदोपदी ‘निष्क्रिय’, ‘आळशी’ असा स्वत:चा अपमान करून घेणं मला आता सहन होईनासं झालं आहे. असं वाटतं, की माझ्यासारख्या समविचारी आळशी माणसांना सोबत घेऊन ‘लेझीस्तान’ नावाचा स्वतंत्र देशच स्थापन करावा. (त्याला ‘आळशीस्तान’ही म्हणता आलं असतं; पण एक अक्षर जास्त लिहायला लागलं तर आमच्या देशात स्थापनेच्या आधीच नक्षली चळवळ सुरू होईल याची भीती!) मी तर आमच्या नवीन देशाचं राष्ट्रगीतही ठरवून ठेवलं आहे. कवी केशवसुतांच्या कवितेच्या ‘एक तुतारी द्या मज आणुनि, फुंकीन मी ती स्वप्राणाने’ या दोन ओळी म्हणजे आमच्या लेझीस्तानचं राष्ट्रगीत! आमच्या राष्ट्राचं अगदी तंतोतंत प्रतिबिंब या दोन ओळींत उमटलेलं आहे. म्हणजे तुतारी वाजवायला आमची काही हरकत नाही.. आम्ही ती वाजवूच. पण त्यासाठी आम्ही बसल्या जागेवरून उठणार मात्र नाही. कुणीतरी ती कोपऱ्यातली तुतारी आम्हाला इथे आणून द्या. आहे की नाही चपखल राष्ट्रगीत!

एकदा का आपलं स्वत:चं सार्वभौम राष्ट्र झालं म्हणजे निदान आपल्या देशात तरी आपल्याला कुणी झोपेतून उठवणार नाहीत. काम देणार नाहीत. इन्क्रिमेंट, प्रमोशनची लालूच दाखवून राबवून घेणार नाहीत. पोरांचा अभ्यास घ्यायला लावणार नाहीत. कुणी चिडवणार नाहीत. टोमणे मारणार नाहीत. घालूनपाडून बोलणार नाहीत. चुकून कधी परदेशाशी आपला रोटी-बेटी व्यवहार झाला आणि तिथल्या व्याह्यने आपल्या देशाचा अपमान केला तर त्याला हँडपंप उखडून ‘गदर’मधल्या तारासिंहच्या तोऱ्यात ठणकावता येईल.. ‘‘अश्रफअली २२ अश्रफअली २२ अश्रफअली, ये सियासी खेल क्यूं खेल रहे है आप? आपका अ‍ॅक्टिवस्तान झिंदाबाद है, इससे हमें कोई ऐतराज नहीं. लेकिन हमारा लेझीस्तान झिंदाबाद था, झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा!’’

तुझा लेझीस्तानी मित्र

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com