पु. ग. सहस्रबुद्धे हे महाराष्ट्रातील विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील विख्यात असे विचारवंत. आज साठीत असलेल्या वाचकांना त्यांचे नाव वसंत मासिकात नियमित लिहिणारे एवढे तरी आठवत असेल. १९६२ ते lok06१९७९ या काळात त्यांची ९ वैचारिक पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यापैकी महाराष्ट्र संस्कृती (१९७९), इहवादी शासन (१९७२), हिंदू समाज संघटना आणि विघटन (१९६७) ही विशेष गाजली.
वर उद्धृत केलेल्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरील पुस्तकांपैकी ‘सत्याचे वाली’ हे पुस्तक १९३३ साली प्रसिद्ध झाल्याचे समजले. परंतु ‘वधूसंशोधन’ या पुस्तकाचा उल्लेख कुठेच सापडत नाही. याचं एक कारण असं असू शकेल, की ते कोणाला ठाऊक नाही. प्रस्तुत पुस्तक उस्मानिया विद्यापीठाच्या डिजिटल लायब्ररीवर उपलब्ध आहे. मात्र त्यावर प्रकाशन वर्ष दिलेले नाही.
पु. ग. सहस्रबुद्धे यांची ख्याती लक्षात घेता त्यांनी नाटक हा प्रकार हाताळला असेल असे कुणालाच वाटले नसेल. प्रस्तुत पुस्तक म्हणजे तीन अंकी नाटक आहे आणि ‘सामाजिक’ असे विशेषण लावले असले तरी ते फार्सिकल आहे. ते कुठल्याही इंग्रजी नाटकावर, कथा-कादंबरीवर आधारित आहे असे म्हटलेले नाही.
नाटकाचे कथानक म्हणजे मूलत: समजुतीचा घोटाळा असे आहे. एका गृहस्थाच्या मुलीला बघण्यासाठी एकजण येणार असतात. आपल्या मुलीला तसे सांगून ते कामाला जातात. नियोजित वेळेअगोदर दुसरा एक तरुण तिथे येतो. ती मुलगी त्यालाच नियोजित वर समजते व त्याच्या बरोबर त्याच्या गाडीतून जाते. तिला बघायला येणारा जो मुलगा (वर) असतो तो चुकून दुसऱ्या घरी जातो. तिथेही एक उपवर मुलगी असते. दोन्ही मुलींना घरात सुमाताई म्हणत असतात. (पहिलीचे नाव सुमन, दुसरीचे नाव सुमती) भरीस भर म्हणून दूरध्वनी क्रमांक, पत्ता यांचे घोटाळे. एकातून दुसरा आणि दुसऱ्यातून तिसरा असे गैरसमज वाढत जातात. जवळपास लग्न जमत असते ते मोडायची वेळ येते. अखेर (अर्थातच) सर्व गैरसमज दूर होऊन दोन विवाह पार पडतात.
फार्स हा नाटय़प्रकार आपल्याकडे तसा नवीन नाही. तो १८८६ पासून अस्तित्वात आहे. मात्र, त्यावेळेच्या फार्समध्ये आणि गेल्या शतकाच्या दुसऱ्या अध्र्या भागातील फार्स यात खूपच फरक आहे.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील फार्स हे रंजनात्मक, वेगवान घटनांनी भरलेले व lr20कित्येक वेळा काही असंभवनीय गृहीतकांवर बेतलेले असत. या नाटकातही गैरसमजावर बेतलेल्या घटना एकामागून एक घडतात. मूळ गैरसमजाला सुरुवात होते ती सामान्य प्रथा पाळली न गेल्याने. मुलगी पाहायला येणाऱ्या मुलाला त्याचे नावसुद्धा न विचारता त्याच्याबरोबर जाते हेच आज अशक्य वाटेल. परंतु एकदा ही अशक्यता दृष्टीआड केली की, मागे उरते ते निखळ मनोरंजन.
या नाटकात किंवा आपण त्याला प्रहसनच म्हणू- मुख्य पात्रांशिवाय म्हणजे दोन उपवर मुली, दोन उपवधू मुलगे, त्यांचे पालक याशिवाय दोन घरचे नोकर हे सगळेच विनोद निर्मितीचा हातभार लावतात.
फार्सला आवश्यक असणारा वेग आणि सतत घडत राहणारे गैरसमज यामुळे नाटक कुठेही कंटाळवाणे होत नाही.
पु.गं.सारख्या तत्त्वचिंतकाने – विचारवंताने असे रंजक, हलकेफुलके नाटक लिहावे हेच फार नवलाचे आणि स्वागतार्ह म्हणायला हवे.
मुळात हे प्रहसन पु.गं.नी का लिहिले असेल याची उत्सुकता वाटत राहते आणि फार्स या प्रकाराला आवश्यक अशी मांडणी करता येते, असे सिद्ध केल्यानंतर आणखी अशा स्वरूपाचे आणखी लेखन पु.गं.नी केले होते का याचाही शोध घेणे उचित ठरेल. या पुस्तकावर प्रकाशनाचे वर्ष नाही आणि लेखकाच्या नावावर फक्त एम.ए. ही पदवी आहे. (पु.गं.च्या बहुतेक पुढच्या लिखाणावर डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे एम.ए., पीएच.डी. अशी मुद्रा असे) त्यावरून पु. गं.च्या लेखन काळाच्या सुरुवातीस सदर लेखन झाले असावे. या नाटकाचे प्रयोग झाले होते का? असल्यास कुणी केले होते? आणि प्रयोग झाले असले तर बंद का पडले? मराठी रंगभूमीच्या इतिहासाच्या अभ्यासकांना आव्हान असे हे लेखन आहे, हे निश्चित.
वधू संशोधन,
पु. ग. सहस्रबुद्धे,  
प्रकाशक : मॉडर्न बुक डेपो. आनंदाश्रमासमोर, पुणे- २
मूल्य : १२ आणे

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
ajit pawar warns his siblings
“गप्प बसतोय म्हणून वळवळ करु नका”, अजित पवार यांचे भावंडांना प्रत्युत्तर
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’