– अशोक नायगावकर

फक्त एक फोर

balmaifal Jiru giraffe and rain
बालमैफल: जिरू जिराफ आणि पाऊस
short story on potholes on road in monsoon season
विक्रमवेताळ आणि खड्डे पुराण
Iru The Remarkable Life of Irawati Karve
‘इरू’ समजून घेण्यासाठी…
interest and curiosity while making a documentary
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आस्था आणि कुतूहलासाठी…
Loksatta lokrang article about Painting Ganpati 2024
चित्रास कारण की…: गोलम् स्थूलम् सुंदरम्
padsaad reders reactions on chaturang articles
पडसाद: परखड लेख
narayan dharap horror books
भयकथा म्हणजे…
narayan dharap horror books
भयकथांचा भगीरथ…
Readers reactions, Doctor, Readers,
पडसाद…

तर

बाकी होती

शतक झळकवायला

आणि अगदी

हसत खेळत

मुक्कामाला परतलीस

तुझ्यावर प्रेम करता करता

आमची तर

सगळ्यांची, प्रजेची

वयेच होत गेली

आणि

तू तर अधिकच

फ्रेश

ताठ

इम्युनिटी वाढवत नेलीस

वाकला थोडासा

कणा

लवली थोडी मान

पण ते खरे तर

अभिवादन स्वीकारत होतीस म्हणूनच

तुझा शुभ्रधवल केसांचा टोप

आणि

राजमुकुट पवित्रसा आणि

नजर नव्हे

आश्वासक डोळे

अंतर्बा

न्याहाळत प्रजेला

तुझ्या गळ्यातील

मोत्यांच्या

तीन सरी

त्यांचे

लक्ष्यवेधी

तेजच तेज सर्वत्र

आणि

राणी

तुझ्या अनोख्या शोभणाऱ्या

वस्त्रांचे

चंद्रधनुष्यच जणू शीतल

मी शोधतोय

या सुखद रंगच्छटा

अद्भुत

आणि दुर्मीळ

तुलाच शोभणाऱ्या

तुझ्यासाठीच बेतलेल्या, विणलेल्या

एकेक पाऊल

धीमेपणाने

पुढे टाकताना

एक हात

चिमुकल्यांकडून

गुच्छच गुच्छ

स्वीकारणारा

अलगद

आणि दुसऱ्या हातातील

पर्स

त्यात राष्ट्रकुलच

सामावलेले जणू

तू

धूतवस्त्रासारखी

पवित्र वाटायचीस

आता आप्त असोत का कसेही

(नाइलाज असतो म्हणा)

पण त्यांच्या गराडय़ात

तुझे सर्व काही

अधिकच उजळून दिसायचे

सगळ्यांच्या तोंडून एकच वाक्य निघाले

‘तू चांगली होतीस’

इतिहास कसा खूश तुझ्यावर

सात दशके

तसे तर इतिहासात

अखेरचे असे

काहीच नसते

पण तुझी निर्लेप संवत्सरे

गाठताना जीव

थकून जाईल कुणाचाही!

राणी,

आता खरे सांगू

तसे अश्रू ओघळले म्हणा

ध्वजदेखील पायउतार झाले

अर्ध्यावर

पण हिंडतं-फिरतं

हसत खेळत

महाराणीचंही

जगणं काय असते

ते मात्र तुझ्याकडून

तुझ्याकडूनच!

असणं म्हणजे काय

हे तुझ्याकडे पाहत

आणि नसणं म्हणजे

काय, हेही आता तुला आठवत!

ती एक आमच्या मातीतली

नव्वदीपार

दीदी स्वरांचे गाठोडे

घेऊन

परतली मूळ घराकडे

आणि बघता बघता

तूही

आश्वासक

सुखद हसत हसत

हात हलवत टाटा केलास..