जयवंत दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष बुधवारपासून (१४ ऑगस्ट) सुरू होत आहे. कविता वगळता मराठी साहित्यात सर्वसंचारी असलेल्या या लेखकापुढे कथाकार, कादंबरीकार आणि साहित्यविश्वावर हातोडीने ठणाठण प्रहार करणारा ‘ठणठणपाळ’ अशा अनेक बिरुदावल्या लागल्या आहेत. पत्रकारितेतून लेखणीआरंभ केलेल्या दळवी यांची सर्वच नाटके प्रायोगिक आणि व्यावसायिक यांच्या सीमेवरची म्हणून ओळखली गेली. खणखणीत संहिता आणि विजयाबाई मेहता यांच्या दिग्दर्शनासह दशकभर मराठीतील उजळून निघालेल्या नाटयपर्वाचा स्मृतिआलेख तसेच त्यांच्या योगदानावर दृष्टिक्षेप..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रायोगिक की व्यावसायिक? अशी चर्चा तावातावाने सुरू होती तेव्हाची म्हणजे ही सत्तरच्या दशकातली गोष्ट. त्या वेळी जयवंत दळवी एकदा म्हणाले की, ‘‘मी खरा म्हणजे प्रायोगिक रंगभूमीचा. पण माझी नाटके चालत असल्यामुळे आणि ती यशस्वी ठरत असल्यामुळे मी व्यावसायिक रंगभूमीचा ठरलो. पण प्रायोगिक-व्यावसायिक या भेदाला फारसा अर्थ नाही.’’ दळवी यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य असावे असे दिसते.

सत्तरच्या दशकामध्ये वसंत कानेटकर आणि काही प्रमाणात रत्नाकर मतकरी यांच्या नाटयलेखनाचा ओघ ओसरलेला दिसतो. कानेटकर यांची ‘माणसाला डंख मातीचा’, ‘सूर्याची पिल्ले’, ‘एकरूप अनेक रंग’, ‘गोष्ट जन्मांतरीची’ वगैरे नाटके ७७-७८ मधली. ती सगळी नाटके तशी सामान्य दर्जाची म्हणता येतील. मतकरी यांची ‘अश्वमेध’, ‘चि. सौ. कां.’, ‘चंपा’, ‘गोवेकर’, ‘दुभंग’ ही नाटकेही ८०-८१ च्या आसपासची तशीच. जयवंत दळवी नाटककार म्हणून प्रकर्षांने समोर आले ते याच सुमाराला. त्यांची ‘संध्याछाया’, ‘बॅरिस्टर’, ‘महासागर’, ‘सावित्री’, ‘पुरुष’ ही नाटके ७३ ते ८३ च्या दशकामध्ये यावी आणि विजया मेहता यांनी ती दिग्दर्शित करावी हा काही योगायोग नव्हता.

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेंट्रीवाले : बदल घडण्यासाठी…

सत्तरच्या दशकातल्या रंगभूमीवर रंगायन संस्थेच्या विजया मेहता यांनी अनेक एकांकिका आणि नाटके सातत्याने केली. कसदार जीवनानुभव आणि त्याचे सुविहित नाटयप्रयोग विजयाबाई करीत असलेल्या छोटेखानी सभागृहात असायचे. गंभीरपणाने ते प्रयोग वेळोवेळी पाहत आलेला प्रेक्षकवर्ग हळूहळू, पण निश्चितपणे संख्येने वाढत होता. आणि नेमका तोच प्रेक्षकवर्ग जयवंत दळवी आणि विजया मेहता यांना मिळाला. एक प्रौढ, प्रतिष्ठित व्यावसायिक रंगभूमी उभी राहिली. व्यावसायिक रंगभूमीवर दळवी आणि विजयाबाई यांची जोडी दशकभर राहिली.

‘संध्याछाया’, ‘बॅरिस्टर’, ‘महासागर’, ‘सावित्री’, ‘पुरुष’ (अनुक्रमे १९७३, १९७७, १९७९, १९८१ आणि १९८२) अशी ही सगळी नाटके त्या वेळची. दु:ख हा या नाटकांचा जणू काही स्थायिभाव आहे; पण त्यापैकी कोणतेही नाटक भावविवश मात्र अजिबात नाही. तो समन्वय नाटककार आणि दिग्दर्शक यांनी घडवून आणला.

‘संध्याछाया’मध्ये जगण्यामधील एकटेपणाच्या भावनेने नाना-नानी यांचा मृत्यू होतो. त्या दोघांनी आत्महत्या केल्याचे दाखवावे असा नाटकाचा पर्याय असू शकत होता. पण तो पर्याय कठोर आणि कर्कश वाटण्याची शक्यता होती. अशा वेळी झोपेच्या गोळयांचे प्रमाण जास्त झाल्याची शक्यता, असा एक पर्याय दळवी आणि विजयाबाई दोघांनीही सुचविला आणि तो मान्य झाला. आता टीव्ही, मोबाइल, ईमेल आपल्या घरादारात आले आहेत, तर मग वृद्ध जोडप्याचा एकाकीपणा कमी होतो किंवा काय, या प्रश्नाचा विचार या अनुषंगाने उपस्थित झाला. दळवी आणि विजयाबाई दोघांचेही म्हणणे एकच होते की केवळ भौगोलिक अंतराबद्दलचा तो प्रश्न नसून, सर्वस्पर्शी एकटेपणाबद्दलचा आहे. सबब, एकटेपण हा निरंतरचा असतो. नाटककार आणि दिग्दर्शक यांच्या अशा प्रकारच्या आदान-प्रदानाचे स्वागत करायला हवे!

दळवींचे ‘बॅरिस्टर’ हे गहन -गूढ असा मनोवैज्ञानिक स्वरूपाचा अनुभव देणारे नाटक. अनेक प्रसंगी प्रेक्षकांचा श्वास रोखणारे, एक समृद्ध जीवनानुभव देणारे नाटक. ते तशाच ऐवजाने नाटयप्रयोगामध्ये उतरले. आपल्या व्यावसायिक रंगभूमीने या नाटकाला मोठाच प्रतिसाद दिला ही सत्तरच्या दशकानंतरचीही एक महत्त्वाची घटना. ‘महासागर’मध्ये दिगू व चंपू हे कनिष्ठ मध्यमवर्गीय नवरा-बायको जसे आहेत, तसे त्यांच्याबरोबरचे आई-काकी- भाऊ असे कोणीकोणी आहेत. दुसऱ्या बाजूला आहेत घनश्याम व सुमी हे नवश्रीमंत जोडपे आणि त्यांची मित्रमंडळी. ‘‘अधिक सुख म्हणजे तरी काय? सुखाच्या, अधिक सुखाच्या, त्याहून सुखाच्या जाती असणार..’’ असा या नाटकाचा आशय. ‘संध्याछाया’, ‘बॅरिस्टर’ आणि ‘महासागर’ अशी ही अगदी वेगळया प्रकारची आणि अस्वस्थ करणारी नाटके. तसेच आले ‘सावित्री’- श्यामू आणि सावित्री आणि त्यांचा लहान मुलगा यांचे हे नाटक. यशस्वी उद्योजकाच्या खुणा सावित्रीला दिसत आहेत. पण तिघांचे घर-संसार सांभाळताना तिची ओढाताण होत आहे. कुरबुर वाढत जाते आणि आपल्या नवऱ्याला व मुलाला एकटे सोडून स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय सावित्री घेते. तिच्या केटी नावाच्या उद्योजकाबरोबर काही वर्षे ती राहतेही. पण पुढे केटीच तिला सोडून जातो आणि सावित्री अखेरीस एकटी राहते. तिचा मानसिक तोल ढळत जाऊन तिचा मृत्यू होतो. याही नाटकाच्या निमित्ताने काही प्रश्न पुढे आले. सावित्रीचा मानसिक तोल ढळत जाऊन ती अखेर वेश्याव्यवसायाला लागते असा सूचक शेवट दळवी यांनी सुचविल्यानंतर विजयाबाईंनी त्याला कडाडून विरोध केला. दोन्ही पुरुष सगळया प्रकरणातून सुटतात आणि एकटया सावित्रीलाच शिक्षा काय म्हणून? असा त्यांचा प्रश्न होता. मानसिक तोल जाऊन सावित्रीचा अपघाती मृत्य होतो असा पर्याय अखेर मान्य झाला. विजयाबाईंनी म्हटले की, सावित्री हे नाटक मध्यमवर्गीय नीतिमूल्यांना धक्का देणारे वाटल्यामुळे सावित्रीला तसा कोमटच प्रतिसाद मिळाला.

आणखी वाचा-निमित्त : एकनिष्ठ वाङ्मय अभ्यासक…

दळवी यांच्या ‘पुरुष’ नाटकाने एक गंभीर प्रकारची चर्चा उपस्थित झाली. एका लहान शहरात एका तरुण शिक्षिकेवर बलात्कार झाला ही नाटयांतर्गत घटना. ज्या पुरुषाने ते कृत्य केले, त्याचा नाटकामध्ये लिंगच्छेद केला जातो. दिग्दर्शक म्हणून आपल्या निर्णयाचे समर्थन करताना विजयाबाईंनी बलात्कारित व्यक्तीसमोर दुसरा कोणताच पर्याय उरला नसताना प्रत्यक्ष दुर्गाच का न उभी राहावी, असा प्रश्न केला आणि नाटयप्रयोगात बंडा या तरुणाच्या रूपात ते सूचक रीतेने घडवून आणले. विजयाबाई आणि दळवी दोघांनाही वास्तववादी घटनेमध्ये रस नव्हता हे अर्थातच अधोरेखित झाले.

तर दळवी आणि विजया मेहता यांचे नाटककार आणि दिग्दर्शक म्हणून असे हे महत्त्वाचे योगदान. दळवी यांच्या आणखी दोन-तीन नाटकांचा उल्लेख केला पाहिजे. त्यापैकी एक आहे ‘सूर्यास्त’ १९७८ मधले. त्याचे दिग्दर्शक होते कमलाकर सारंग. १९७५ मधील आणीबाणीचा साक्षात संदर्भ जागविणारे हे नाटक, आता इतक्या वर्षांनंतरही सत्तासंघर्षांची आठवण करून देते आणि देत राहील. एका अर्थाने ते आजीव नाटक. निळू फुले यांनी ‘सूर्यास्त’मध्ये अप्पाजी या वृद्ध स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका केली होती. पंचाहत्तरच्या आणीबाणीमध्ये निळू फुले सक्रिय होते हे आज कोणाला माहीत असण्याची शक्यता नाही. जयवंत दळवी यांना अर्थातच ते ठाऊक होते. त्यांचे आणखी एक नाटक आहे ‘दुर्गी’ १९८० मधले. खरे तर लिव-इन रिलेशनशिप हा त्या काळी गहजब करू शकणारा विषय म्हणायचा. ‘‘एकटेपणा- लोन्लीनेस म्हणजे काय ते तुला आता कळायचे नाही,’’ असे एका बाजूला थेट आपल्या मुलालाच त्यांच्या वडिलांनी बजावून ठेवलेले, तर प्रत्यक्ष सुनेनेच सासरेबुवांच्या दुर्गीला लग्न करण्यासाठी प्रोत्साहन दिलेले. दिग्दर्शक दामू केंकरे यांनी ते नाटक बेतशीर आणि बांधेसूद केले असते तर हे नाटक केव्हाच अर्थपूर्ण ठरले असते.

जयवंत दळवी यांनी पाहिलेल्या विविध मनुष्यस्वभावावरची ही नाटके. ती मुख्यत्वेकरून धीरगंभीर स्वरूपाची आहेत. प्रयोगक आणि प्रेक्षक दोघांनाही त्यांनी समृद्ध केले आहे. जयवंत दळवी यांना विचारावे तर म्हणतील, ‘‘मी खरा म्हणजे प्रायोगिक रंगभूमीचा. पण माझी नाटके चालत असल्यामुळे आणि ती यशस्वी ठरत असल्यामुळे मी व्यावसायिक रंगभूमीचा ठरलो. पण प्रायोगिक-व्यावसायिक या भेदाला फारसा अर्थ नाही.’’ दळवी यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य असावे असे दिसते.

आणखी वाचा-फडणीसांची ‘सुंदर ती दुसरी दुनिया’

कादंबरीकार दळवी..

‘प्रभात’ आणि ‘लोकमान्य’ या दैनिकात पत्रकारिता करणाऱ्या जयवंत दळवींनी साप्ताहिक पुरवण्यांमधून कथालेखनाला आरंभ केला. ‘गहिवर’, ‘एदिन’ आदी डझनांहून अधिक कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. मुंबईतील झोपडपट्टी जीवनावरील ‘चक्र’द्वारे झालेला त्यांचा कादंबरी लेखनप्रवास ‘महानंदा’, ‘स्वगत’, ‘अथांग’, ‘अल्बम’ या बहुचर्चित आणि ‘कहाणी’, ‘मंगलमूर्ती आणि कंपनी’ यांसारख्या आज विसरल्या गेलेल्या कादंबऱ्यांपर्यंत पाहायला मिळतो. ‘कहाणी’ या कादंबरीत आणीबाणी काळातील मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबामधील ताणेबाणे आहेत. तर ‘मंगलमूर्ती आणि कंपनी’मध्ये पुलंच्या बटाटयाच्या चाळीतील वल्लीसमान व्यक्तींची गंमत आहे. गणपती मूर्ती विक्रीचा व्यवसाय करायला निघालेल्या चाळकऱ्यांची फटफजिती झालेली ही कादंबरी आज दुर्मीळ गटात मोडते. मुंबई-कोकणातील लोक, त्यांच्या वाटयाला आलेले भोग आणि वेडसर व्यक्तींची एक शाखा दळवींच्या कादंबऱ्यांमधून सापडू शकेल. ‘सारे प्रवासी घडीचे’मधील व्यक्तिरेखा जशा जिवंत आणि रसरशीत वाटतात, तसे त्यांचे लेखक मित्रांवरील लेख, मुंबईतील खाद्यजीवनावर लिहिलेले लेखन आजही आवडू शकेल. साठच्या दशकात आलेले ‘लोक आणि लौकिक’ हे अमेरिकेवरील प्रवासवर्णनही गाजले.

‘युसिस’मधील योगदान..

अमेरिकन सरकारच्या मुंबई येथील माहिती खात्यामध्ये (युसिस) जयवंत दळवी यांनी केलेल्या कामाचे योगदान, त्यांच्यामुळे मराठीत आलेल्या जागतिक ग्रंथांच्या कामाबद्दल दुर्दैवाने फारशी नोंद वा दखल घेतली जात नाही. त्या काळात गाजत असलेल्या बहुतांश लेखकांना त्यांनी अनुवाद करायला लावले. हेन्री डेव्हिड थोरो यांचा लोकप्रिय ग्रंथ ‘वॉल्डनकाठी विचार विहार’ या नावाने दुर्गाबाई भागवतांनी केला. मार्क ट्वेन यांच्या ‘हकलबरी फिन’ला भा. रा. भागवतांनी ‘भटकबहाद्दर’ हे रूप दिले. दि. बा. मोकाशी यांनी हेमिंग्वेच्या ‘फॉर हूम द बेल्स टोल’चा ‘घणघणतो घंटानाद’ अशा दणकट नावाचा अनुवाद केला. लुईसा मे अल्कॉट यांच्या ग्रंथाचा ‘चौघीजणी’ हा शांता शेळके यांनी केलेला अनुवाद आजही आवडीने वाचला जातो. विजय तेंडुलकरांनी पाच कादंबऱ्या युसिससाठी अनुवादित केल्या. जी. ए. कुलकर्णी यांनी केलेला ‘सोन्याचे मडके’ हा अनुवाददेखील युसिसद्वारेच आलेला. भा. रा. भागवतांनी केलेला ‘ममाज बँक अकाऊंट’ या पुस्तकाचा ‘सगळं सगळं ठीक होतं’ हा सुंदर अनुवाद आज जुन्या पुस्तकांच्या दुकानांतही अप्राप्य आहे. याशिवाय रॉय किणीकर, मंगेश पाडगावकर, मालतीबाई बेडेकर, चिं. त्र्यं खानोलकर, श्री. ना. पेंडसे यांनी केलेल्या अमेरिकन पुस्तकांच्या अनुवादांपैकी थोडेच आज उपलब्ध आहेत. ‘द स्कार्लेट लेटर्स’पासून अॅुडगर अॅंलन पो यांच्या दीर्घकथांची माळ गुंफलेला ग्रंथ मराठीत सत्तरीच्या दशकातच उत्तम अनुवादांसह आला तो जयवंत दळवींमुळे. अरविंद गोखलेंना त्या काळातील लोकप्रिय अमेरिकन लघुकथांचा अनुवाद करायला लावला. लेखनासाठी पूर्ण वेळ मिळावा म्हणून त्यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी म्हणजे १९७५ साली युसिसमधून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यानंतर हे सारे ग्रंथ हळूहळू इतिहासजमा झाले. त्यातले काही वाचनालयांमध्ये उरले असतील.

आणखी वाचा-वैद्याक शोधकथांच्या ‘आतल्या गोष्टी…’

समीक्षकवजा वचक..

साठोत्तरीतील साऱ्या प्रयोगभरल्या साहित्यिक वातावरणात ‘ललित’ मासिकामधून ‘ठणठणपाळ’ यांचे ‘घटका गेली पळे गेली’ हे सदर येऊ लागले. दशकभरात मराठीतील मान्यवरांपासून नवथरांच्या टोप्या उडविणाऱ्या या विनोदी-वक्रोक्तीपूर्ण लिखाणाने साहित्यविश्वात कुतूहल निर्माण केले. समीक्षकी थाटापलीकडे चिमटे काढण्याच्या या लेखनाचा वचक तब्बल दीड दशकाहून अधिक काळ राहिला. सुरुवातीची पाच वर्षे ‘कोण हा ठणठणपाळ’ ही उत्सुकता लेखक, वाचकांमध्ये होती. मोजक्याच जणांना ठणठणपाळ म्हणजे जयवंत दळवी हे माहीत होते. ‘बॉम्बे बुक डेपो’ या दुकानात सदानंद भटकळांनी लेखकांच्या स्वाक्षरीचा कार्यक्रम जाहीर करून त्यात ‘ठणठणपाळ वाचकांना स्वत: साक्षरी देतील’, अशी जाहिरात केली. जयवंत दळवी त्यास तयार नसल्याने भटकळांनी शक्कल लढविली. लाकडी फळीवर ठणठणपाळाचे हातोडीसह येणारे प्रसिद्ध चित्र रंगवले. त्याच्या पोटात पुस्तक जाण्याइतपत फट राखली. या कार्यक्रमाला वाचकांची प्रचंड गर्दी झाली आणि ‘ठणठणपाळा’ला पाहायचा जोरदार पुकारा झाला. वाचकांच्या आग्रहास्तव ठणठणपाळ म्हणजे जयवंत दळवी यांना बाहेर यावे लागले. दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांत ‘ठणठणपाळ कोण’ याची बातमी झाली. निर्विष विनोदासह चेष्टा करणारे हे सदर लेखक माहिती झाला तरी लोकप्रियता कायम राखून होते. त्यांचा दबदबा मराठी साहित्यविश्वावर कायम राहिला. मासिकांमध्ये पुढे अशा प्रकारच्या ‘टोपी-उडव्या’ सदरांची परंपरा ठणठणपाळपासून सुरू झाली.

vazemadhav@hotmail.com