घनिष्ठा प्रफुल कळसकर
एक होता कावळा, तो बोले काव काव. तो एकदा गेला पोपटाजवळ, पोपट बोले मिठू मिठू… कावळ्याने विचार केला, आपणही पोपटासारखं बोलू लागलो तर किती मजा येईल? मग कावळा पोपटाला म्हणाला, ‘‘मलाही तुझ्यासारखं गोड गोड बोलायचं आहे. तू मला तुझ्यासारखं छान छान गोड गोड बोलायला शिकवशील का?’’
पोपट म्हणाला, ‘‘तू जर माझ्यासारखं बोलशील, तर लोक तुला पकडतील आणि पिंजर्यात ठेवतील. चालेल का तुला?’’ पण कावळ्यानं काही पोपटाचं ऐकलं नाही. तो हट्ट धरून बसला. मग पोपटानं कावळ्याला पोपटासारखं बोलायला शिकवलं. कावळा काव काव करण्याऐवजी मिठू मिठू बोलू लागला. नंतर तो झाडावर आपल्या मित्रांबरोबर बसला व पोपटासारखं मिठू मिठू बोलू लागला. त्याच्या मित्रांना वाटलं, हा आपल्यासारखं बोलत नाही. याला पोपटानं झपाटलं आहे आणि ते सगळे त्याला टोचू लागले. तो खूप घाबरला आणि पुन्हा काव काव करू लागला. कावळ्याला आता कळून चुकलं की, आपण कावळ्यासारखेच राहू आणि बोलू, देवाने आपल्याला दिले तेच खरे.
इयत्ता- दुसरी, कांतीलाल शाह विद्यालय, तळेगाव दाभाडे, पुणे.
