गाडी चालवताना पुढे जाणाऱ्या वाहनांच्या पृष्ठभागावर लिहिलेले ’One liners’ वाचणे हा माझा एक विरंगुळा आहे. गाडी चालवतानाचा एकसुरीपणा कमी करणारी ही वाक्ये कधी कधी खळखळवून हसवतात, तर कधी अंतर्मुख करतात. भाषा बदलते प्रांताबरोबर आणि वाक्याचा बाज बदलतो प्रदेशाबरोबर. मग आमच्या मिरजेकडे ट्रकच्या पाठीवर ‘जसे पलवानाला मटण, तसे इंजनाला इंधन’, ‘कटिंग मारशील तर पायताण खाशील’ म्हणजे कोल्हापूर, ‘शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरावे’, ‘आज रोख, उद्या उधार’ म्हणजे पुणे, ‘मेरी चली तो तेरी क्यूँ जली’ म्हणजे दिल्ली-राजस्थान, ‘मालिक मेहरबान, तो ड्रायव्हर पहलवान’, ‘अनारकली भरके चली, निकल जा तू पतली गली’, ‘बुरी नजरवाले तेरा मुँह काला’, ‘लटक मत, पटक दूँगी’.. अशी िहदी साहित्यात भर म्हणजे उत्तर भारतीय!
ऑस्कर किंवा फिल्म फेअर पुरस्कार मिळाल्यावर जशी आभार प्रदर्शनाची जंत्री लागते तसेच ‘पप्पांचा आशीर्वाद, नानांचा सल्ला, ताईच्या शुभेच्छा, आप्पांचे आभार’ वाचायला मिळतात. कधी मालकाच्या किंवा ड्रायव्हरच्या चिल्ल्या-पिल्ल्यांची वंशावळ असते, तर कधी ग्रामदेवतेला साकडं घातलेलं असतं. कधी ‘मेरा भारत महान, पर कर्जसे परेशान’ म्हणून आíथक विवंचनेला स्पर्श केलेला असतो, तर कधी ‘सौ में से निन्यानबें बेइमान, फिर भी मेरा भारत महान’ म्हणून वर्तमानावर नेमके बोट ठेवलेले असते. परवा मात्र एका ट्रकच्या पाठीशी ‘मेरा भारत महान, तू तेरा देख’ हे वाचल्यावर मी हादरलोच.
तसं पाहायला गेलो तर या डल्ली ’्रल्ली१२ ना फारसा अर्थ नसतो. पळभराची करमणूक मात्र. पण तुमच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे काम मात्र ते करतात. ट्रकचालकांच्या आयुष्यात त्यांचा ट्रक ही त्यांची ‘जिंदगी’ असते आणि ते जगत असलेल्या आयुष्याचे आणि जोपासत असलेल्या भावभावनांचे प्रतििबबच या डल्ली ’्रल्ली१२ च्या रूपाने वाहनावर उमटते. त्यात कधी आनंद असतो, कधी अपेक्षा. कधी नराश्याचे वास्तव, तर कधी वर्तमानातील बेफिकीरता. कधी भविष्यातील स्वप्नं असतात, तर कधी भूतकाळाच्या पडछाया.
एक मात्र नक्की, की ही वाक्ये रंगविण्यापूर्वी बरेच विचारमंथन झालेले असते. हे डल्ली ’्रल्ली१२ कधी सामाजिक विचारांना स्पर्श करतात, तर कधी राष्ट्रभक्तीला हात घालतात. ते विनोदी तर असतातच; पण कधी कधी हृदयस्पर्शीही ठरतात. यमक उत्तम जुळल्यामुळे त्यांना काही अंशी साहित्यिक मूल्यही प्राप्त होते. आणि कधी ती आत्म्याचे परमात्म्याशी मीलनही घडवतात. हे डल्ली ’्रल्ली१२ ट्रक-ड्रायव्हर्सच्या खडतर आयुष्याची प्रतिमा बनतात. पारंपरिक शिक्षणापासून वंचित राहिलेला सामाजिक वर्गही राष्ट्रकल्याणापासून विभक्त नसतो याची साक्ष पटवून देतात. ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’ म्हणून एखादी ग्रामीण महिला जिच्यावर आपले पोट आहे, त्या ट्रकची उतराई होते. तर कधी ‘सुखी ठेव माझा धनी कुंकवाचा’ म्हणून आपल्या धन्याला सुरक्षित ठेवण्याचे साकडे घालते. ट्रकांच्या भाऊगर्दीत मार्केटात नेमका आपला ट्रक ओळखायलाही त्यांचा उपयोग होतो.
बरं, हे वेड केवळ आपल्याच देशात आहे असे नाही, तर अगदी पाश्चात्त्य देशांतही सजवलेल्या ट्रकधुडांच्या रेसट्रकवर रेसेस होतात आणि ट्रक हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो. लाल-पिवळ्या एस. टी.च्या पाठीवरही शासनाच्या योजनांची कल्पक वाक्ये अवतरतात. आणि मग लक्षात येते की, अल्प वेळात लोकांमध्ये एखादा निरोप, संदेश पोहोचवायचा असेल तर पाठीवर किंवा बाजूंवर ‘डल्ली ’्रल्ली१२’ धारण करणाऱ्या ट्रक- बस- रिक्षाइतकं प्रभावी, प्रवाही माध्यम नाही. बरं, त्यातून अनेकांना रोजगार मिळतो, साहित्यिक-कवींना कल्पनांचे धुमारे फुटतात, आणि शासनालाही शारदेच्या दरबारी आपली सेवा रुजू करता येते.
फ.ळ.ड.चे नियम पाळून या माध्यमाचा अधिक चांगला विकास व्हायला हवा. लोकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या, समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागती ठेवणाऱ्या, राष्ट्राभिमान ज्वलंत आणि जागृत ठेवणाऱ्या डल्ली ’्रल्ली१२ ची आज गरज आहे. कधी त्यांनी सुरक्षेचा संदेश द्यावा, तर कधी सामाजिक जबाबदारीचा. एका दिवसात अनेक मल पादाक्रांत करून असंख्य गावे जोडणाऱ्या या ट्रकांना मग कळत-नकळत संदेशवाहकाचे रूप येईल आणि त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला दिसेल.
..सिग्नलला गाडी थांबविली. बाजूला एक टेम्पो येऊन थांबला. ड्रायव्हरच्या दारावर शब्द होते- ‘पहले प्रभू का नाम बोल, फिर दरवाजा खोल.’ एका वाक्याने ड्रायव्हरला त्याचे कर्तव्य आणि ईशस्मरण करून देणाऱ्या या वाक्यामुळे माझेही स्टिअरिंगवरचे हात आपोआप जोडले गेले..                                    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व जनात...मनात बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hilarious one liners at back sides of vehicles
First published on: 14-09-2014 at 02:49 IST